Friday, 31 January 2025

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

 सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना

खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

 

मुंबईदि. 31 : राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर  मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.

            मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने  हा निर्णय घेण्यात आला आहे.

            या सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाकडे क्यूआर कोडेड आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच इंडियन मर्चंड शिपींग ॲक्ट 1958 च्या 435(एच) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारित 2021) मधील कलम 6(4) नुसार देशातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरुपी दिसेल असे रंगविणे आवश्यक आहे. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक राहील.

            याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यवाही न करणाऱ्या नौकांच्या मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981(सुधारीत 2021) अंतर्गत मासेमारी परवाना अटी – शर्ती भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती, आयुक्त श्री.तावडे यांनी दिली.

00000

विद्यार्थ्यांना आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचाही शाळांना पर्याय

 विद्यार्थ्यांना आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचाही शाळांना पर्याय

शालेय शिक्षण विभागाची माहिती

 

मुंबईदि. 31 : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरविण्यासाठी शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास अंडा पुलाव व गोड खिचडी, नाचणी सत्व याचा लाभ देण्याबाबतचा पर्याय शाळांना देण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. केंद्र शासनाने सद्य:स्थितीत प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 5.45 रुपये आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 8.17 प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्च मर्यादा निश्चित केली आहे.

केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्यतृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने आरोग्यआहारशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार दि. 11  जून 2024 च्या शासन निर्णयान्वये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे (Three Course Meal) म्हणजेच तांदूळडाळी/ कडधान्यापासून तयार केलेला आहारमोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नवीन पाककृती निश्चित करण्यात आली होती.

या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरिता लोकप्रतिनिधीकेंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था/ बचत गटयोजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने प्राप्त झाली होती. ही निवेदने तसेच केंद्र शासनाने निश्चित केलेल्या प्रति दिन प्रति विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेतापाककृती सुधार समितीने शिफारस केलेल्या पाककृतींचा समावेश करुन तसेचसुधारित पाककृतीनुसार लाभ देण्याबाबतचा दि. 28 जानेवारी 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयातील पाककृतींमधील अनु.क्र. 11 (अंडा पुलाव) व अनु.क्र. 12 (गोड खिचडी/ नाचणी सत्य) या पाककृती पर्यायी स्वरुपात देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून यापूर्वी विद्यार्थ्यांना अंडी/ केळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. केंद्र शासनामार्फत तृणधान्यातील पौष्टिकतेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत तृणधान्याचा वापर वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पेसा क्षेत्रातील व आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आहाराचा लाभ देण्यासाठी मिलेट बार उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही केंद्र शासनाकडून प्राप्त होते. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांनी आठवड्यातून किमान एक दिवस फळेसोयाबिस्कीटदूधचिक्कीराजगीरा लाडूगुळशेंगदाणेबेदाणेचुरमुरे आदी स्वरुपात पूरक आहार देण्यात येत असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात

परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ३१ : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर 'कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चया विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणा-या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीचं प्रक्रियासर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी केले आहे.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्चकुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चसर्व वयोगटातील लसीकरणगर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड 'एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंबआणि 'मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्तीयामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावेयासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्या अनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे प्रशिक्षित कर्मचारी फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती संकलित करतीलअसे आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले  आहे.

००००

प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारकया कार्यालयांमध्ये, ट्रस्ट खाजगी रुग्णालय,संस्अंथa,तर्गत तक्रार समिती गठित करणे अनिवार्य कामाच्या

 प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक

समिती गठीत न केल्यास ५० हजार दंड

                                                    - जिल्हाधिकारी संजय यादव

 

मुंबई दि ३१ : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार सर्व शासकीयनिमशासकीयखाजगी कार्यालयआस्थापनेमध्ये अंतर्गत  तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे. समिती गठीत न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

दहा व त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात समिती गठित करणे आवश्यक आहे. या समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिलेची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावीतसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधून सामाजिक कार्याचा अनुभव किंवा कायद्याचे ज्ञान असलेले दोन कर्मचारी सदस्य म्हणून नियुक्त करावेत व महिलांच्या प्रश्नांशी बांधिल असलेल्या अशासकीय संघटनेचा एक सदस्य असावा.   त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती गठीत केल्याचा फलक दर्शनी भगात लावणे बंधनकारक आहेत. तसेच या अधिनियमानुसार दर तीन वर्षांनी या समितीची स्थापना किंवा पुनर्रचना करणे आवश्यक आहे. असे या कायद्याच्या अमलबजावणी करून घेणारे जिल्ह्याचे प्रमुख उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) तथा जिल्हा अधिकारी गणेश सांगळे यांनी सांगितले आहे.

या कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित करणे अनिवार्य

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संदर्भातील अधिनियमानुसार प्रत्येक शासकीय / निमशासकीय कार्यालयसंघटनामहामंडळेआस्थापनासंस्था शाखा ज्यांची शासनाने स्थापना केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधीशासनामार्फत किंवा स्थानिक किंवा शासकिय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सरकारी संस्था यांना दिला जातो.  अशा सर्व आस्थापनातसेच कोणतेही खाजगी क्षेत्रसंघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्थाएंटरप्रायजेसअशासकिय संघटनासोसायटीट्रस्टउत्पादकप्रवठावितरण व विक्री यासह वाणिज्यव्यावसायिकशैक्षणिककरमणूकऔद्योगिकआरोग्य इ. सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादाररुग्णालयशुश्रूषालयक्रीडा संस्थाप्रेक्षागृहेक्रीडा संकुले इ. ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या कामाच्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांच्या ठिकाणी अंतर्गत समिती गठित करणे अनिवार्य असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी म्हटले आहे.

0000

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार




 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार

- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

"भारतभारती"ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक!

 

मुंबई31 :- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज  राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला. यावेळी उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरमुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुनउपसंचालक रेवती कुलकर्णीसहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणेमुख्य सुरक्षा अधिकारी योगेश महाजन आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आलेले आहेत. त्यांचे पालन करण्यात येत आहे. मात्र पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे तीस हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 5 कोटी खर्च अपेक्षित आहेअशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेलअशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी मंत्री ॲड.शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले.

दरम्यानयाबाबत आढावा घेतल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी या क्षेत्रात नवी बिबट्याची सफारी सुरू करात्यासाठी लागणारा निधी वन खात्याकडून  आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ,  असे  त्यांनी सांगितले.  याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

"भारतभारती"ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक!

या उद्यानात "भारत आणि भारती" हे तीन वर्षाचे दोन सिंह नुकतेच 26 जानेवारीला गुजरात मधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री ॲड.शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च मंत्री ॲड.शेलार वैयक्तिकरित्या करणार आहेत.

411 जणांना सुरक्षा कवच

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 400 वन मजूर असून ते उनवारा पाऊस याची तमा न बाळगता तसेच वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. यातील बहूसंख्य हे आदिवासी बांधव आहेत.

तर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी 11 जणांची टीम असून या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाहीही बाब मंत्री ॲड.शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत निर्देश दिले व या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यास सांगितले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वा

सौ भाग्य अलंकार चे महत्व

 ' स्त्रियांचे कुंकू '

 एक गोष्ट अशी,

एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडिंगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसरने विचार केला, एवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी  आणण्यास सांगितले. त्यांनी केळी  आणली. एक केळं सोलून फाकवून त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले आणि ते केळं  त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडिंग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली. 

गोष्ट  ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते. 

मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले. 

आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.

कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.

शुद्ध कुंकू कसे ओळखावे - 

१] कुंकवाला हळदीचा वास येतो. 

२] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते आणि त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.


👉🏻 बांगडी, पैंजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वाण नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


👉🏻 " सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते. "


बांगडी घालण्याचे फायदे :-


१) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताचा रक्तसंचार वाढतो.

२) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.

३) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.

४) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.

५) तुटलेली बांगडी घालू नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.


जोडवी घालण्याचे फायदे :-


१) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तू नाही.

२) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील 

"Hormonal System" योग्यरित्या कार्य करते.

३) जोडवी घालण्याने "Thyroid" चा धोका कमी होतो.

४) जोडवी "Acupressure" उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात.

५) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.


पैंजण घालण्याचे फायदे :-


१) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.

२) पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील "Fat's" कमी करण्यात मदत होते.

३) वास्तुशास्त्रानुसार पैंजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.

४) चांदीच्या पैंजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.

५) पायातील पैंजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.

६) पायात सोन्याचे पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते..


*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*


*(कॉपी पेस्ट)*


नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-*

 *नाकात तूप सोडण्याचे(नस्य करण्याचे) फायदे व नुकसान:-* 


देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.  पण तुम्हाला नाकात तूप सोडण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का? 

             हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. देशी गाईचे शुद्ध तूप आयुर्वेदात औषध म्हणून ओळखले जाते.  रात्री झोपताना देशी तुपाचे फक्त 2 थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात...


 *नाकात तूप सोडण्याचे फायदे:-* 


 *👉🏽त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी*

 वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नाकात तूप टाकून समतोल साधता येतो.  यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीन वेळा नाकात टाका.


 *👉🏽डोळ्यांसाठी उत्तम आरोग्यासाठी* 

जेव्हा तुम्ही गाईचे तूप नाकात घालता तेव्हा ते डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवते. दृष्टी वाढवण्यासाठी, रात्री झोपताना तुपाचे दोन थेंब नाकात घाला.


 *👉🏽केस गळणे थांबवण्यासाठी*

तुपामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात.  तुमचे केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घाला.


 *👉🏽स्मरणशक्ती साठी* 

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नाकातील तूप फायदेशीर आहे.  तुपाचे दोन थेंब नाकात घाला.


 *👉🏽डोकेदुखीमध्ये* 

 जर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनने त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.


  *इतर फायदे -* 

- रात्री झोपण्यापूर्वी तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने निद्रानाशाची समस्या संपते.

 - तूप ओतल्याने नाकाचा कोरडेपणा संपतो.

- नाकात तूप सोडल्याने एखाद्या व्यक्तीला कोमामधून उठवण्यास मदत होते.

- कफाची समस्या दूर होते.

- नाकात तूप टाकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

- यामुळे कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.


 *नाकात तूप सोडण्याचे तोटे-* 


 गायीच्या तुपाचे काही थेंब(प्रमाणात) नाकात घातल्याने कोणतेही गंभीर नुकसान होत नाही.  यासाठी तुम्ही फक्त देशी गायीचे शुद्ध तूप वापरावे.  जर तुम्हाला तुपाच्या वासाने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर ते वापरू नये.

टीप- वरील कुठलाही प्रयोग करण्याआधी वैद्यांचा सल्ला घ्या.


*टीप - आपल्या कडील देशी गिरगाईचे (A2) अस्सल गावरान चुलीवर बनवलेले तूप ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा*

*9518708634)



 *

Featured post

Lakshvedhi