Wednesday, 8 January 2025

सिंचन व्यवस्था बळकटीकरणासाठी अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा

 सिंचन व्यवस्था बळकटीकरणासाठी अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा

 तुलनात्मक अभ्यास करावा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबदि. ७ :-  राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी राज्यातील सिंचन व्यवस्था व अन्य राज्यातील सिंचन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास करावा. याचा राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यास मदत होईल. या अनुषंगाने जलसंपदा विभागाने कार्यवाही करावीअशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील कामांचा आढावा घेतला. यावेळी  जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरलाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरेकार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव सर्वश्री अभय पाठकसंजीव टाटू,  अभियंता प्रसाद नार्वेकर यांच्यासह गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या सिंचनाच्या कामांना गती देऊन प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कृती आरखडा तयार करावा. बांधकामाधीन प्रकल्पाची कामे जलदगतीने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. सिंचन प्रकल्पांच्या नवीन कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता लवकर मिळाव्यात. त्यासाठीचे प्रस्ताव क्षेत्रीय स्तरावरून तातडीने पाठवावेत. सिंचन प्रकल्पाची कामे लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ट कामे विहित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेतअशा सूचना देऊन जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की,  १०० दिवसाच्या कालावधीत घेण्यात येणाऱ्या कामांचे सुयोग्य नियोजन करावे. जलसंपदा विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी मुदतीत मिळण्यासाठी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेतली जाईल.

वॉटर अकांऊटबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. धरणातील पाणीधरणातून सोडलेले पाणीसोडलेल्या पाण्याचा झालेला वापरआकरलेली व वसूल झालेली पाणीपट्टी  याबाबत जलसंपदा विभागाने सुयोग्य नियोजन करावेअशा सूचना जलसंपदा मंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीत गोदावरी खोरे महामंडळांतर्गत येणाऱ्या १०० दिवसांमध्ये ज्या प्रकल्पांचे भमिपूजन अथवा उद्घाटन करणे शक्य असेल अशा प्रकल्पांचा आढावाप्रकल्पांमध्ये असणारा पाणीसाठा व सिंचनाची सद्यःस्थितीनदीजोड प्रकल्पाची सद्यःस्थितीसुरु असणारे प्रकल्प अथवा प्रकल्प घटकांच्या कामांची सद्य:स्थितीमंजूर प्रकल्पांची सद्यःस्थितीउपसा जलसिंचन योजना व महत्वाच्या प्रकल्पांची सद्यःस्थिती. यामध्ये प्रामुख्याने साईगंगा उपसा जलसिंचन योजनेचे हस्तांतरण व अंमलबजावणीसाकूरता. संगमनेर येथील प्रस्तावित उपसा जलसिंचन योजनावांबोरी पाईप चारी टप्पा-१ दुरुस्ती / टप्पा-२भोजापूर ता. संगमनेर येथील जलसिंचन योजनासहकारी तत्वावर असलेल्या उपसा जलसिंचन योजनांचे तापी जलसिंचन योजनेच्या धर्तीवर नुतनीकरण करणेबाबतचे सादरीकरणजायकवाडी प्रकल्पाची सद्यःस्थिती (पर्यटन विकासन्यायालयीन बाबी /अहवाल)करावयाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे अनावरण

 वस्त्रोद्योग मंत्री  संजय सावकारे यांच्या हस्ते

आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे अनावरण

 

मुंबई, दि. 7 : वस्त्रोद्योग विभागाने एनआयसी द्वारे (NIC) ' स्वासप्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळाचे वस्त्रोद्योग मंत्री  संजय सावकारे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मंत्रालयात आज वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंहआयुक्त संजय दैनेउपसचिव श्रीकृष्ण पवार, श्रद्धा कोचरेकर उपस्थित होते.

या संकेतस्थळावर वस्त्रोद्योग विभागाच्या धोरणांतर्गत विविध योजनाअनुदान आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील अद्ययावत सर्वसमावेशक माहिती यांचा अंतर्भाव आहे. तसेच हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना सुलभरित्या हाताळण्यायोग्य बनविण्यात आले आहे. सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवेशयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी मोबाइलसारख्या सर्व उपकरणांद्वारे वापरता येईलअशी सोय करण्यात आली आहे.

0000

भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरआम् खाकर डायबेटिस ठीक हो जाता हैं


 

भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा* *पिढी-गुणसुत्र आणि नातं*

 *भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा* 

*पिढी-गुणसुत्र आणि नातं*


1) नवरा बायको --- पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई  50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसुत्रे share करतात.

3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात.

4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात.

5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात.

6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात.

7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात.


म्हणून मुळ पुरुष, जोडप्यापासून  सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते. 


*आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.*


तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि *सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात !*


*खरंच आपले पुर्वज किती ज्ञानी होते याचा आपल्याला अभिमान पाहिजे*


*सात पिढ्यांचा उल्लेख नेहमी केला जातो पण त्याच्या मागचे कारण आज समजले.*👌🏻

अग्रेषित

भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा

 *भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा


◆ *फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?*

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते 

*कोंबा फ्रीजमध्ये,* 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!


या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण *१००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील *५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात *स्त्रियांचं प्रमाण अधिक* आहे

आणि आश्चर्य म्हणजे या *५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार* चालू होता.


■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, *लागते तेवढेच आणा.*


■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज  करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 


■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.


फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 


दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.


*साभार : डॉ. मकरंद करमरकर*

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई


*एक विनंती हा मेसेज प्रत्येक  घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*


 आपल्या माता भगिनी चे आयुष्य वाढवा🙏🏻

Tuesday, 7 January 2025

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

 माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा घेवून आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

माजी सैनिक कल्याण महामंडळाची माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण महामंडळाचे सचिव  डॉ.प्रशांत नारनवरे  उपस्थित होते.

    मंत्री श्री. देसाई म्हणाले की,माजी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनास्वयंरोजगाराच्या योजनांसाठी नव्याने आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत सर्व योजनांचा आढावा घ्यावा. माजी सैनिकांसाठी आलेला शंभर टक्के निधी खर्च करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही मंत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या संचालक मंडळाची रचनाकार्ये आणि जबाबदाऱ्याउपलब्धीकार्यालयीन मनुष्यबळ यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

****

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

 गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

-         क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

·         द्रोणाचार्यअर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

 

            मुंबईदि. 7 : खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे क्रीडायुवक कल्याणअल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

            मंत्रालयातील दालनात श्री.भरणे यांनी विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरक्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणेसहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते.

            क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले कीक्रीडायुवक कल्याण विभागअल्पसंख्याकऔकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठीच्या  कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही श्री.भरणे यांनी यावेळी दिली.

क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

            यावेळी जलतरण क्रीडा प्रकारात योगदान देणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांना केंद्र शासनाच्यावतीने अर्जुन (जीवन गौरव) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रीडा मंत्री श्री. भरणे यांनी  सन्मानित केले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक  दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कारगोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिल्लारी यांना अर्जुन पुरस्कार, शूटींग क्रीडा प्रकारात स्वप्निल कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. भरणे यांनी सन्मानित केले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवित देशाबरोबर राज्याचे नाव उज्ज्वल करावेअशी अपेक्षा व्यक्त करीत श्री. भरणे यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

०००

Featured post

Lakshvedhi