Tuesday, 7 January 2025

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

 महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

 

             नवी दिल्ली 6  : महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण’ या  मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.


दिलखुलास' कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांची मुलाखत

'दिलखुलास' कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांची मुलाखत मुंबई, दि. 6 : रस्त्यांवरील अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात 'रस्ता सुरक्षा' मोहीम राबविण्यात येते. यासाठी परिवहन व महामार्ग सुरक्षा विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. नागरिकांनी रस्तासुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती 'दिलखुलास' कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांची मुलाखत मंगळवार दि. 7, बुधवार दि. 8, गुरूवार दि. 9 आणि शुक्रवार दि. 10 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण मोठे आहे. ही बाब विचारात घेवून केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेच्या माध्यमातून रस्ते वाहतूक व महामार्ग रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी स्पीडगनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे, हेल्मेटचा वापर करणे तसेच वाहतूक नियमावलीचे पालन करणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेची राज्यात करण्यात येणारी अंमलबजावणी याबाबत 'दिलखुलास' कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांनी माहिती दिली आहे.

Monday, 6 January 2025

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 उद्योगव्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे 

त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ६ : केंद्र व राज्य शासनविविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योगव्यवसायमहामंडळेमहापालिकातसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३१ जानेवारी पर्यंत सादर करावेअसे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्चजूनसप्टेंबरडिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापनाउद्योगव्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३१ जानेवारी,  २०२५ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे,

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते, आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास mumbaicity.employment@gmail.com  या ईमेलवर संपर्क करावा. ३१ डिसेंबर२०२४ च्या तिमाही अखेर हजेरी पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर ३१ जानेवारी२०२५ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाहीअसे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000

मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस

 मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. : रस्ते वाहतूकरेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाची आवश्यकता मांडण्यात येईलअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

 नवी दिल्ली येथे 7 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सादरीकरणानंतर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ‘पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत  सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने  रोप वे विकसित करण्याचा मानस असून यासंदर्भातील विकास आराखडा तयार करुन तत्वत: मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, असेही मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

            मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे.  मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरणवाहनांची वाढती संख्यानवीन रस्ते व रेल्वे सेवाप्रदूषण याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

 मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थानसागरी किनारा खाडीचा प्रदेशएलिफंटासारखी प्राचीन लेणीमाथेरानसारखे थंड हवेचे पर्यटन स्थळसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानतुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘रोपवे’च्या माध्यमातून ‘केबल कार’ प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

0000

पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा

 पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

          मुंबई दि. 6 : राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटन उपक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी त्याच बरोबर आगामी शंभर दिवसात राबविण्यात येणा-या उपक्रमांवर भर द्यावा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन सचिव जयश्री भोजपर्यटन संचालक डॉ बी एन पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले कीदेशातंर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी गाव ते राज्यस्तरापर्यंत जिथे पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे त्याची प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवून पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबवावेनवीन पर्यटन धोरणपर्यटन संचालनालयाकडे वर्ग करण्यात आलेली कामेपर्यटन स्थळांची वर्गवारीप्रसिद्धी उपक्रमकृषी पर्यटन धोरणसाहसी पर्यटन धोरणकॅरॅव्हॅन धोरण,बीच शॅक धोरण इत्यादी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

            पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत हे लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी पर्यटन धोरण 2024 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, विविध पर्यटन धोरण, पर्यटन संचालनालयामार्फत सुरू असलेले उपक्रम, प्रादेशिक पर्यटन विकास आराखडेकेंद्र शासनाच्या मदतीने सुरू असलेले प्रकल्प यांना गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक विभाग व हंगामानुसार विविध महोत्सवांचे नियोजनूपर्वक आयोजन करणे. जिथे पर्यटन वाढू शकते अशा ठिकाण शोधून अशा  पर्यटनस्थळांचा विकास करणे यावर पर्यटन विभागाने भर द्यावा. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आधारित पर्यटन उपक्रम राबवावा, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

****

वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

मुंबई,दि. 6  वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून 'वाचन संकल्प महाराष्ट्राचाहा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

 ग्रंथालय संचालनालयांतर्गत राज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबईच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत समूह वाचनग्रंथप्रदर्शनवाचन कौशल्य कार्यशाळाग्रंथपरिक्षण व कथनव्यवसाय मार्गदर्शन,  वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 या प्रसंगी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकरग्रंथालय उपसंचालक श्री.काकडयंग लेडीज हायस्कूलच्या शिक्षिका उषा वर्मासुजाता महाजनवर्षा शिंदे यांच्यासह विद्यार्थीनीइतर वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी वाचन कार्यशाळेचे उद्घाटन करून वाचनाचे महत्व सांगून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. शामकुमार पां. देशमुखदयानंद कला व शास्त्र महाविद्यालयसोलापूर यांनी मार्गदर्शन केले. वाचन म्हणजे कायत्याचे फायदेकाय वाचावेवाचण्याच्या विविध पद्धतीचे सविस्तर विवेचन केले. वाचनाने मनाची ताकदआकलन क्षमतावैचारीक पातळी वाढते. वाचनाचे मुलभूत अंग या प्रसंगी विशद करण्यात आले. वाचनाचे चार स्तर असून प्रत्येक स्तरावर आपल्या वैचारीक पातळीत बदल होतो. वाचनाची सवय लावण्यासाठी दररोज आवडीच्या विषयावर किमान 20 मिनिटे वाचन करण्याचे स्वत:ला बंधन घातले पाहिजे असेही त्यांनी उपस्थित वाचक आणि  विद्यार्थ्यांना  सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन  योगेश बिर्जेजिल्हा ग्रंथालय अधिकारीराज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबई यांनी केले.

0000

आपलं सरकार’ वेब पोर्टल आता सक्षम आणि नव्या स्वरूपात; ‘आपलं सरकार’ ॲप तयार करावे

 आपलं सरकार’ वेब पोर्टल आता सक्षम आणि नव्या स्वरूपात;

‘आपलं सरकार’ ॲप तयार करावे

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. 6  : महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे "आपलं सरकार" (1.0) वेब पोर्टल अधिक सक्षमअद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करावे. त्याचबरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे 'ॲपतयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावेअसे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मंत्रालय येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीयाराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूरमहा आयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वेमहा आयटीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीआपलं सरकार ही वेबसाईट अपग्रेड करुन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्यात यावी. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतीलतसेच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईट वापरण्याची पध्दत सुलभ असायला हवीअधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉट सारख्या सुविधांसह  ए आय चा वापर करुन  त्या वेबसाईट वापरण्यास सुलभ बनवाव्यात. तसेच आपलं सरकारचे एक ॲप तयार करुन  सुविधा ॲपवरुन उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा नागरिकांना आपलं सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अन्य राज्यांचा यासंदर्भातील अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाच्या 485 व्यतिरिक्त 285 अधिकच्या नवीन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. यावर महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि महा आयटी कंपनी काम करीत आहे. या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर 770 सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये येईल. या दृष्टीने विभागाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार  राज्याचा "स्टेट ओन क्लाउड" तयार करण्याचे निर्देशही ॲड. शेलार यांनी दिले.

****

Featured post

Lakshvedhi