Saturday, 4 January 2025

सायबर सुरक्षा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना पुढील 100 दिवसांमध्ये गृहविभागाने करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 सायबर सुरक्षा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

पुढील 100 दिवसांमध्ये गृहविभागाने करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 4 : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे गृह विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेसायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित गव्हर्नन्सरिस्क व कंम्प्लायन्स करण्यात यावे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता नवीन पदे निर्माण करावी. नक्षलविरोधी उपक्रमांमध्ये नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये नवीन सशस्त्र चौक्या उभारण्याच्या कामाला गती द्यावी तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र कारागृह नियमावलीचे प्रारुप तयार करण्यात यावेअशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त सर्व प्रयोग शाळांचे संगणकीकरण करणे सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबईपुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरनाशिक या पाच प्रयोग शाळांचे संगणकीकरण तसेच प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे प्रकल्पाचे डाटा सेंटर उभारण्यात आले आहेअशी माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी दिली. यावर अमरावतीकोल्हापूरनांदेडठाणेधुळेसोलापूररत्नागिरीचंद्रपूर या प्रयोगशाळांचे संगणकीकरण करावेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या बैठकीस कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढागृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ.पंकज भोयरगृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदममुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहलअपर मुख्य सचिव ओ पी गुप्तामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीतसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरील पुस्तकाचे प्रकाशन

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

योजनेवरील पुस्तकाचे प्रकाशन

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या "द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव यांनी हे पुस्तक लिहीले आहे.

 

शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष

 शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उपक्रम राबवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर देण्याच्या महिला व बालविकास विभागाला सूचना

 

पुढील 100 दिवसांमध्ये महिला व बालविकास विभागाने करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

मुंबई दि. 4 : राज्याच्या  ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे महिला व बालविकास विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे महिला व बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढामहिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरेगृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयरगृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदममुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशीमहिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमहिला व बालविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधून शहरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीच्या योजना राबवाव्यात. महिला व बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रातील शौचालये स्वच्छ ठेवणेत्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणेनागरी बाल विकास केंद्र तातडीने सुरू करण्यावर भर द्यावा.


राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा

 राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

 

                मुंबईदि.4 : राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी  ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेविभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अद्यावत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी  नियोजन करा. औद्योगिक आस्थापनांचा सहयोग वृध्दिंगत करण्यात येणार आहे. स्टार्टअप सहाय्य योजनेतून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात येणार असल्याचेश्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

बैठकीस कौशल्यरोजगारउद्योजकता  आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहलअपर मुख्य सचिव ओ पी गुप्तामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव गणेश पाटीलमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीतसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

 

नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

मुंबई दि.4 - राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावेअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्य मंत्री माधुरी मिसाळराज्य मंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.

 

नगरविकास विभाग(एक)चे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणेशहरां जवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणेराज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविणेइमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणेपर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीराज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र यासाठी निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेतअशा सूचना दिल्या.

 

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल कातसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावाअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सोलापूर स्मार्ट सिटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. यामुळे सोलापूरवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

 

सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा मी

 सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा

                                  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा

 

मुंबई दि.4 : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा;  या कामांना विलंब चालणार नाहीपुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतीलअसे नियोजन कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होते.

 

यावेळी श्री फडणवीस म्हणालेअनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेतत्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेतत्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेतयाचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतत्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईलयाबाबत नियोजन करा. यावर्षी किमान 23 किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-3 मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.

 

 इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेनगरविकास विभाग (1) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्तामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी,  मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरठाणे महापालिका आयुक्त सौरभ रावमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे  अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार अश्विन मुदगलमहामुंबई मेट्रो संचलन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवालझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

000000

प्रयाग्राजमुखं वळे हाथी का दर्शन

 


Featured post

Lakshvedhi