Thursday, 2 January 2025

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी स्वीकारला पदभारमी

 मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी स्वीकारला पदभार


            मुंबईदि. 1 :
 मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील दालनात त्यांच्या विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावाही घेतला. यावेळी सहसचिव कैलास गायकवाड, सहसचिव  अरुण कोल्हे, सहसचिव संजय इंगळे यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तत्पूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव यांनी  छत्रपती शिवाजी महाराजमहात्मा ज्योतिराव फुलेसावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पदभार स्वीकारला

 अन्न व औषध प्रशासन मंत्री

नरहरी झिरवाळ यांनी पदभार स्वीकारला

 

मुंबईदि. 1 :  अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडाराघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजमहात्मा ज्योतिराव फुलेसावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना श्री.झिरवाळ यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करावे

 महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करावे

                            माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

 

मुंबईदि. १ : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावेयासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करावेअसे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योगव्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळेल व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेलअसे त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहावर माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री ॲड. शेलार यांनी आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटियामहाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीएआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे.

मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इंडिया एआय मिशनअंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी ₹१०,३७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्मऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्पग्राफिक प्रोसेसिंग युनिट्सइंडिया एआय इनोव्हेशन सेंटरफ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकार जानेवारी २०२५ पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. यामुळे स्टार्टअप्सकंपन्याशैक्षणिक संस्था आणि संशोधन ॲप्स विकसित करण्यासाठीविविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे.

आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रेसर राहिला पाहिजेअसेही मंत्री अ‍ॅड.शेलार यावेळी म्हणाले.

Wednesday, 1 January 2025

आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

 आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम असावा. आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला कुठेही पैसे भरावे लागू नयेअशा तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करावी. महात्मा फुले जन आरोग्य अभियानातील अंगीकृत असलेल्या रुग्णालयांचे कामकाज चुकीचे आढळल्यास चौकशी करून संबंधित रुग्णालय पॅनलवरून कमी करण्यात येईल. महिलांमध्ये सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्शवभूमीवर महिलांमधील कर्करोगाचे निदान व तातडीने उपचार मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देशही श्री. आबिटकर यांनी दिले.

बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानवैद्यकीय अधिकाऱ्यांची पद भरतीसध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ व रिक्त पदेमानसिक आरोग्य आस्थापनाडायलिसिस व अन्यसेवांचा विस्तारअर्थसंकल्पीय तरतुदीमाता व बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम१५ व्या वित्त आयोगाचा निधीराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमनियमित लसीकरणराष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमसिकलसेल निर्मूलन कार्यक्रमकर्करोग निदान कार्यक्रमराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमराष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य कार्यक्रम, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य अभियानमोबाईल मेडिकल युनिट, महाराष्ट्र वैद्यकीय आपत्कालीन सेवा आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

०००००

रुग्णालयांच्या इमारतींचे विशिष्ट मॉडेल तयार करावे.

 रुग्णालयांच्या इमारतींचे विशिष्ट मॉडेल तयार करावे.

            श्री. आबिटकर म्हणाले कीआरोग्य विभागाच्या रुग्णालयांच्या इमारतींचे एक विशिष्ट मॉडेल तयार करावे. इमारत सुंदर असावीयासाठी विभागाने वास्तूविषारदांचे पॅनल तयार करावे. उत्कृष्ट दर्जाच्या इमारती असण्यासाठी आग्रह असावा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या पायाभूत सुविधा, विकास शाखेचे बळकटीकरण करावे. या शाखेंतर्गत रुग्णालयेइमारती पायाभूत सुविधांची निर्मिती करावी.

मनोरुग्णालयांचे सक्षमीकरण करावेमू

 मनोरुग्णालयांचे सक्षमीकरण करावे

सार्वजनिक आरोग्य विभागाची काही रुग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्यात आली आहेत. रुग्णालयांचा याबाबतचा करार संपला असल्यास ती पुन्हा विभागाकडे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. विभागाकडे अत्यंत महत्वाचा असलेला मानसिक आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. मानसिक रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता असल्याने विभागाकडे सद्यस्थितीत असलेल्या मनोरुग्णालयांचे सक्षमीकरण करावे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावेअसे निर्देशही श्री. आबिटकर यांनी दिले.

सद्यस्थितीत डायलिसिसएमआरआयसिटी स्कॅन तसेच अन्य रक्त चाचण्यांचे अहवाल विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे निदान उशिरा होऊन उपचार योग्य पद्धतीने मिळत नाहीत. याबाबतीत सेवा घेतलेल्या कंपनीचे करार तपासावेत. तपासणी अहवाल विलंबाने येण्याची चौकशी करावी. याविषयी समिती नियुक्त करून तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावीअशा सूचनाही श्री. आबिटकर यांनी दिल्या. 

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करावे

 महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करावे

 सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले कीरुग्णालयांत चांगल्या दर्जाची व नामांकित कंपन्यांची औषधे पुरवण्यात यावी. सध्या देण्यात येत असलेल्या औषधांतील 'ड्रग कन्टेन्टतपासून घ्यावा.  महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करावेत्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. प्राधिकरणाचे कंपन्यांशी झालेले दर करार तपासण्यात यावेत. गरीब रुग्णांना मिळणारी औषधे दर्जेदार असावीयाविषयी विशिष्ट कार्यपद्धती तयार करावी. औषध नमुन्यांच्या तपासणीमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी.बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांनी त्यांच्या तपासणीचे आणि सुविधांचे दर ठळक स्वरूपात रुग्णालयांमध्ये प्रसिद्ध करावेत. कुठल्याही प्रकारे रुग्णांची आर्थिक फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. राज्यात सुरू असलेल्या रक्त तपासणी व अन्य प्रयोगशाळांच्या सनियंत्रणासाठी कायदा करण्यासंदर्भातील प्रक्रिया त्वरीत करण्यात यावी. प्रयोगशाळांच्या तपासणीसाठी भरारी पथके तयार करावीयाबाबतीत विशिष्ट कार्यपद्धती अंमलात आणावी. 

Featured post

Lakshvedhi