Wednesday, 1 January 2025

जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा

 जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. ३१ :- जल जीवन मिशन  योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक असण्यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर पूर्ण करून योजना संपूर्ण सोलरायझेशनवर आणावीअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेजलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास वीजेबरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी  विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावीअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा  व स्वच्छता विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटसामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळपाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकरसहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईकमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तामुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव संजय खंदारेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीसामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया

 प्रगतीशील महाराष्ट्रगतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कष्टकरीशेतकऱ्यांसह सर्वांना घेणार सोबत

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्या नागरिकांना शुभेच्छा

 

मुंबईदि. 31 :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही...अशी प्रतिज्ञा करूयाएकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरीशेतकरीकामगारासह सर्वांचीच साथ लाभेलअसा विश्वास देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, 'येणारे वर्ष सुखसमाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहोहीच मनोकामना. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखालील महाराष्ट्राला आधुनिकीकरणाच्या या युगात जगातील सर्वोत्तम राज्य म्हणून अग्रेसर ठेवायचे आहे. आपल्या कष्टकरीशेतकरीकामगारांच्या राबणाऱ्या आणि कला-क्रीडा-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील सर्जक हातांनी या राज्याच्या वैभवात भरच घातली आहे. हा लौकिक आपल्याला वाढवायचा आहे. शेती-माती व सिंचनशिक्षणआरोग्यउद्योग- ऊर्जामाहिती तंत्रज्ञान ते नवनव्या औद्योगिक क्रांती यांना पादाक्रांत करायचे आहे. यासाठी राज्यातील शांतता-सलोखापरस्पर स्नेहआदरभाव वृद्धिंगत होईल. पर्यावरण आणि जल-जंगल-जमीन यांचं जतन-संवर्धन होईलअसे प्रयत्न करायचे आहेत. हा संकल्प घेऊन वाटचाल करायची आहेत्यासाठी नववर्ष चैतन्यदायी ठरेल. सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या नवसंकल्पना घेऊन येईल. यातून आपला महाराष्ट्र आता थांबणार नाहीहा यत्न पूर्णत्वास जाईल. अशी मनोकामना करतो. तशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोअसे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शुभेच्छा देऊन सगळ्यांचे नववर्षाभिनंदन केले आहे.

००००

 


वाचन संस्कृती वाढवण्यासाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम

 वाचन संस्कृती वाढवण्यासाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचाउपक्रम

मुंबईदि. 31 तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान "वाचन संकल्प महाराष्ट्राचाहा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च  तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहेहा उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.

            या उपक्रमांतर्गत दि. 30 डिसेंबर रोजी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा  मान्यवर लेखकांच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 1 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान राज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबई येथे शालेय  महाविद्यालयीन विद्यार्थीग्रंथालयातील वाचक यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके वाचन करण्याचा सामहिक उपक्रमविद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण  पुस्तक कथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेतसेच मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रथालय भेट  सामहिक ग्रंथ वाचन कार्यक्रममहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य कार्यशाळाविद्यार्थी - लेखक परीसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन रण्यात आले

युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

 युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

 

मुंबईदि. 31 : ‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ.भावना पाटोळे यांनी कळविले आहे.

            या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी दि. 3 जानेवारी 2025 पूर्वी siac@1915@gmail.com या ई-मेलवर अर्ज करावेत. मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-22070942 येथे संपर्क साधावा असे संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/ससं/


 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास गती द्यावी

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास गती द्यावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 31 : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम करताना येत असणाऱ्या अडचणींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा घेऊन येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीजमीन अतिक्रमीत झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारीपोलीस अधीक्षकजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी. अतिक्रमित जमिनीसंदर्भातील विकासकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना जबाबदारी देण्यात यावी.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाकरिता प्रकल्प विकासकांना लागणाऱ्या आवश्यक सर्व परवानग्या ऑनलाईन देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीहा प्रकल्प राबवितांना काही अडचणी येत असतील आणि त्या जिल्हापातळीगावपातळीवर सोडविणे शक्य नसेल तर त्या मंत्रालय स्तरावर सोडविल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित होईलयाकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ची आढावा बैठक झाली. या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारअतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रप्रधान सचिव एकनाथ डवलेवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीनाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मामुख्य विद्युत निरिक्षक संदीप पाटीलऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे दूरदृश्य प्रणालीद्वारे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे तसेच पुणेजालनालातूरअहिल्यानगरनंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच या प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते.

000

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा

 नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी

विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा

मुख्य सचिव सुजाता सौनिक

 

        मुंबईदि. ३१ : नाशिक येथे सन २०२७-२८ या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्थानियोजित साधूग्रामनागरिकांची सुरक्षा व घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील कामांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजित आराखडा सादर करावाअशा सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

          सन २०२७-२८ या वर्षात  नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजनासंदर्भात मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तापरिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठीनगरविकास विभाग- १ चे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तानगरविकास विभाग- २ चे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोंविदराजपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेनाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडामपर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटीलनाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मानाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्रीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

            मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या कीसिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेऊन पायाभूत सोयीसुविधांची कामेसाधूग्राममध्ये साधू-महंताची निवासव्यवस्थावाहनतळ उभारणेनागरिकांची सुरक्षाकायदा व सुव्यवस्थापरिसर सुशोभीकरणगोदावरी नदी आणि उपनद्या संवर्धनशुद्धीकरण व सुशोभीकरणग्रीन झोनगर्दीचे सनियंत्रणआरोग्य तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर अनुषंगिक कामे याबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर बैठका घेऊन कामे अंतिम करून त्याचा आराखडा राज्यस्तरावर सादर करावा.

         सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावरील कामांचा आढावा घेण्यासाठी ठराविक कालावधीत बैठका आयोजित केल्या जाव्यातसर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करावेया कामांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करावीजेणेकरून नियोजित कामांमध्ये आवश्यक तिथे सुधारणा करण्यासाठी मदत होईलअशा सूचनाही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

            यावेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाममहापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले.

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी

६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. ३१ :- राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

पदभार स्वीकारल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरापणन संचालक विकास रसाळउपसचिव संतोष देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल म्हणाले कीसोयाबीन उत्पादक शेतकरीलोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजेच ६ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत १२ जानेवारीपर्यंत केली जाणार आहेअशी महिती देखील मंत्री श्री. रावल यांनी दिली.

पणनमंत्री श्री. रावल म्हणाले कीकिमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ ७ हजार ४०० क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांना हमी भावतर ग्राहकांना रास्त दरात माल मिळाला पाहिजे यासाठी विभागाच्या माध्यमातून यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती असली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याअंतर्गत आदिवासी भागातील तालुक्यांवर भर देण्यात येईलया भागात शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहित केले जाईलअशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली.

पणन विभागामार्फत शेतकरी हिताचे धोरण आखण्यात येणार आहे. सोयाबीनधानकापूस यासारख्या पिकांना हमीभाव मिळवून देण्यासह कांद्यासारख्या नाशवंत पिकांना रास्त भाव मिळण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. त्यासाठी जगातील उत्तम बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या राज्यात वापर करण्यात येणार आहे.  बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यासह त्यांचे बळकटीकरण केले जाईलअशी ग्वाही मंत्री श्री. रावल यांनी दिली.

नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट केला जाणार आहे. आशियातील अग्रेसर बाजार समिती म्हणून तिचा लौकिक होण्यासाठी जगातील उत्तमोत्तम व्यवस्था याठिकाणी राबविण्यात येणार आहे. शेतकरीहमालमापारीव्यापारी यासारख्या सर्व संबंधित घटकांचा विचार केला जाणार आहेअसा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात शीतगृहांची उभारणीगोदामांची निर्मिती, गाव तेथे गोदाममाथाडी कामगार कायदाशेतमालांची आयात-निर्यातबाजार समित्यांना मिळणारा सेसराज्यातील पीक पद्धतीदांगट समितीचा अहवालबाजार समिती सभापतींची परिषद यासारख्या बाबींचाही पणन मंत्री श्री. रावल यांनी यावेळी आढावा घेतला.

-------

Featured post

Lakshvedhi