Tuesday, 31 December 2024

कूछ तो लोग कहेंगे

 लोक माझ्याबद्दल  काय विचार करतात?लोक माझ्याबद्दल काय बोलतात? लोक माझ चुकीच  valuation करतात. एक ना अनेक प्रकारे  आपण लोकांचा विचार करत असतो. आपण इतका लोकांचा विचार करतो की आपण स्वतः पण ह्या जगात आहोत ह्याचा आपल्याला विसर पडतो. 


मी चांगला म्हणून  पूर्ण जगसुद्धा चांगल असलच पाहीजे असा विचार करणं म्हणजे ओढ्याप्रमाणे ऊन्हाळ्यात समुद्रही सुकायलाच हवा अशी अपेक्षा करणं.


एक तर आपल स्वतःचं व्हॕल्युएशन आपल्याखेरीज दुसरं कोणीच करू शकत नाही,कारण प्रत्येक व्यक्ती  तिच्या तिच्या  विचारसरणीप्रमाणे, त्या दृष्टीने  तुमच्याकडे  बघणार, जे कधीच पूर्णतः  खर नसणार. त्यामुळे कोण आपल काय व्हॕल्युएशन करतय ह्यापेक्षा  मी स्वतःला किती ओळखते हे महत्त्वाचं आहे. 


आता मुद्दा राहीला लोक काय विचार करतील ,काय बोलतील आपल्याबद्दल हा  तर तिथेही हाच नियम आहे,जशी त्यांची विचारसरणी तशी त्यांची कृती. एक लक्षात  ठेवायचं तुमच्या  बद्दल बोलावस वाटतय तुमच्या बद्दल विचार करावासा वाटतोय त्यांना म्हणजे  तुम्हि महत्त्वाचे आहात त्यांच्यासाठी. कारण महत्त्व  नसलेल्या गोष्टींवर विचार केला जात नाहि किंवा त्यावर बोललपण जात नाहि.  त्यामुळे ऊगीच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यापेक्षा, आपण महत्त्वाचे आहोत हा विचार करायचा आणि अधिकाधिक स्वतःवर फोकस करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं. बस इतकच......

माझे माहेर पंढरी भारतातील पहिलं माहेरघर सामाजिक

 भारतातील पहिलं माहेरघर  

लेखक: निरेन आपटे 


माहेरी जाऊन राहावसं वाटतंय? तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय? आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर?...स्वतःच्या माहेरी हे सगळं कदाचित होणार नाही, पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल. असं महेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के ह्यांनी. बदलापूरमध्ये. ह्या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल सांगत आहेत निरेन आपटे. 


बदलापूरमध्ये प्रभाताईंनी बंगला घेतला आहे तो महिलांना आणि पुरुषांनाही माहेरचा आनंद घेता यावा ह्यासाठी. बंगल्याच्या दारात महिला आल्या की त्यांना ओवाळले जाते. भाकर तुकड्याने नजर काढली जाते, गरम पाण्याने पाय धुतले जातात आणि प्रभाताई हसतमुखाने ह्या महिलांना माहेरवाशीण असल्याचा आनंद देतात. जेवायला पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, पुरी भाजी असे जे मागाल ते मिळते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार आहेत.  शिवाय इथे राहायची, भरपूर गप्पा मारायची, गाणी गायची आणि नाचायचीही सोय आहे. हे सगळं करताना प्रभाताईंचा सहभाग असतो. प्रत्येक महिलेला काय हवं ते त्या स्वतः पाहतात. चहा, नाश्ता असे सगळे लाड पुरवतात. डोहाळजेवण, व्याहीजेवण, केळवण, वाढदिवस असे कार्यक्रम करतात. पुरुषांचं माहेर नसतं, पण प्रभाताईंनी तीही सोय केली आहे. माहेरवाशिणींचे लाड करणं हा प्रभाताईंचा व्यवसाय आहे आणि नव्या जीवनशैलीमुळे अनेक ग्रुप त्यांच्याकडे येत आहेत. त्यासाठी त्या अत्यंत माफक दर आकारतात. 


माहेरवाशिणींचे लाड करण्याचा हा व्यवसाय भारतातला बहुदा पहिलाच व्यवसाय आहे. ह्या अनोख्या संकल्पनेमुळे अनेक महिलांना आनंद मिळत आहे. हा आनंद देणाऱ्या प्रभाताईंचा प्रवासही खूप काही शिकवणारा, प्रेरणा देणारा आहे. विशेषतः ज्या महिलांसमोर संकट उभं राहतं. ऐन उमेदीत दुःखाचं आभाळ कोसळतं त्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रभाताईंचा  जीवनप्रवास नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो. 


प्रभाताईंचे यजमान आकाशवाणीवर बासरी वाजवण्याचे, संगीत देण्याचे काम करत असत. दोघांचा प्रेमविवाह झाल्यामुळे संसार चांगला सुरु झाला होता. पण दैवाने उलटे फासे टाकले. यजमान रियाज करत असताना त्यांना हार्ट ऍटॅकचा झटका आला. त्यांची तडफड पाहून प्रभाताई क्षणभर हवालदिल झाल्या. पण लगेच खंबीर होऊन हालचाल केली आणि यजमानांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा कसाबसा जीव वाचवला. त्यांचा जीव वाचला खरा, पण अपंगत्व आले. ते अंथरुणाला खिळून राहिले. त्यांची सेवा करण्यात प्रभाताईंचा दिवस जाऊ लागला. आर्थिक परिस्थिती खराब होत गेली. चार पैसे मिळावेत म्हणून त्या काही घरांमधून पोळी-भाजी बनवण्याचं काम करू लागल्या. एकीकडे डॉक्टरांकडे चकरा चालू होत्या. यजमानांवर उपचार होत होते. तो खर्च वाढत होता. त्यात डॉक्टरांनी सल्ला दिला की मुलबाळ होऊ देऊ नका. कारण पित्याच्या अशा स्थितीमुळे मुलामध्ये व्यंग येण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रभाताईंसमोर काहीही भविष्य उरलं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. यजमानांना जगवण्यासाठी धावपळ सुरु केली. आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे हे लक्षात आल्यावर त्यांनी जिममध्ये इंस्ट्रक्टर होण्यासाठी तळवलकर जिममध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्या इंस्ट्रक्टर झाल्या. एकीकडे पोळी भाजीचे डबे पोहचवत होत्या. यजमानांकडे पाहत होत्या आणि आता स्वतःचं जिम सुरु केलं. वॉकर आणि सायकल घेऊन महिलांसाठी जिम सुरु केलं. सगळ्यांशी त्या प्रेमाने वागत होत्या. त्यामुळे ६ महिन्यात गर्दी वाढली आणि आणखी मोठी जागा घ्यावी लागली. 

पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत राबायला सुरुवात झाली. प्रभाताईंच्या हाताला अनोखी चव होती. त्यांचे डबे सगळ्यांना आवडू लागले. एकदा एकावेळी ५०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. प्रभाताईंनी ठरवलं होतं की कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही. कमी वेळात इतक्या पुरणपोळ्या बनवण्याचं आवाहन त्यांनी स्वीकारलं. त्या पुरणपोळ्या इतक्या रुचकर बनल्या की प्रभाताईंना सगळे सुगरण मानू लागले. त्या कामात बुडून गेल्या. सकाळी घरातून निघताना यजमान म्हणायचे की लवकर ये! त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रभाताईंना वाईट वाटे. ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्या मुलुंडला राहतं होत्या. घर छोटं होतं. आपला एक बंगला असावा असं स्वप्न होतं आणि स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते कष्ट करायची तयारी होती.


अशात बदलापूरला जागा मिळत होती. पण ती विकत घेता येईल इतके पैसे नव्हते. तेव्हा प्रतिभाताई पिळगावकर ह्यांनी मोठी रक्कम देऊ केली. शिवाय बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेच्या मॅनेजरने त्यांचा जिम आणि खानावळीचा व्यवसाय पाहिला. आपल्या समोर आलेला ग्राहक शून्यातून सगळं निर्माण करत आहे हे पाहून मॅनेजर भारावला आणि त्यांनी कर्ज मंजूर केलं. 


यजमानांची सेवा केल्यामुळे बदलापूरच्या जागेत आपण वृद्धाश्रम सुरु करावा आणि वृद्धांची सेवा करावी असा विचार मनात आला. पण तोवर स्वतःच वय वाढलं होतं. शिवाय यजमानांकडे पाहायची जबाबदारी होतीच. त्या जागेत जिम चांगलं चालू लागलं. तिथे डायटेशियन आणि डॉक्टर नेमला. पण जितक्या प्रभाताई कणखर, तितकीच नियती कठोर होती. २००५ साली पूर आला आणि पुराचं पाणी घरात शिरलं. सगळे कष्ट पाण्यात बुडाले. पुन्हा शून्यापासून उभं करायची वेळ आली. त्यावेळी विजूताईनी खूप मदत केली. दरवेळी कोणी ना कोणी महिला मदतीसाठी उभी राहायची. संकट इथेच थांबलं नाही. यजमानांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की ते वाचणार नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेऊन आणखी खर्च करू नका! अखेरीस जे विधिलिखित होतं तेच घडलं. यजमानांनी प्रभाताईंसमोर प्राण सोडला. हा घात इतका मोठा होता की आत्महत्येचे विचार मनात यायला लागले.आसपासचे लोक धीर द्यायला येत होते. शेवटी जे घडेल ते स्वीकारायचं हे मनाशी ठरवून पुन्हा उभं राहायचं ठरवलं. जिवलग मैत्रीण सुवर्ण जोशी हिने सल्ला दिला की तुझ्या जागेत महिलांसाठी माहेर सुरु कर. ही अभिनव संकल्पना होती. प्रभाताईंनी सुरुवात केली. पहिल्यांदा १५ महिलांचा ग्रुप आला. त्यांना दारात ओवाळून आत घेतलं. गरम पाण्याने पाय धुतले. सायंकाळी शुभंकरोती म्हणून घेतलं आणि त्यांना पुलाव-कढी बनवून खायला घातली. त्या महिलांना स्वतःच्या आईकडे आल्यासारखे वाटले. त्यांना इतकं प्रेम मिळालं की त्यांनी आणखी काही जणांना सांगितलं. अशाप्रकारे ह्या माहेरचा प्रचार होत गेला आणि एकामागून एक ग्रुप येऊ लागले आणि प्रभाताईंना एक नवीन काम मिळालं.  हे काम करताना मनाशी एक निर्णय घेतला की ज्या महिला परिस्थितीने पिचून गेल्या आहेत त्यांना मदत करायची. म्हणून त्यांनी स्वतःच्या माहेर घरात अनेक गरजू महिलांना स्वयंपाक, साफ सफाई अशी कामे दिली. रोजगार मिळवून दिला. ह्यापुढे आणखी गरजू महिलांना काम द्यायचं त्यांचं ध्येय आहे. अनेक पीडित महिलांचे संसार उभे करावे असं स्वप्न आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी इतकी जपली की २०१९ साली आलेल्या पुरात पन्नास लोकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था केली. बदलापूर शहर अध्यक्ष वामनदादा म्हात्रे ह्यांना ही गोष्ट कळली. त्यांनी येणारी मदत प्रभाताईंकडे फिरवली आणि तिथून ती अनेक बदलापूरकरांना मिळत गेली. म्हणजे स्वतः संकटे झेलुनही प्रभाताई इतरांना संकटात मदत करू लागल्या. कष्ट, जिद्द, चिकाटीने फक्त त्यांचं नाही तर अनेकांचं भलं केलं.  


दरम्यान माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या महिलांची संख्या पुन्हा वाढू लागली. आनंदी झालेल्या महिलांनी ह्या माहेरघराचे विडिओ बनवून समाज माध्यमांवर टाकले. ते विडिओ अमेरिकेतही गेले. आपोआप ह्या माहेरघरात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यांचे लाड पुरवताना चकल्या, पुरणपोळ्या, मोदक, आम्रखंड अशा पदार्थांची ऑर्डर घेणे चालू होते. एकदा एकावेळी ७०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. कोणतीही ऑर्डर आली तर नाकारायची नाही हे ठरवलेच होते. त्यामुळे आसपासच्या महिलांना सोबत घेऊन ऑर्डर पूर्ण केली. ग्राहक समाधानी होत गेले आणि त्यांची मागणीही वाढत गेली. नियती जणू प्रभाताईंची परीक्षा घेत होती. लॉक डाउनचही संकट येऊन गेलं. पण प्रभाताईंनी हार मानली नाही. दोन्ही लॉक डाउननंतर पुन्हा अनेक महिला माहेरवाशिणीचं सुख घ्यायला येत आहेत. एका ७० वर्षाच्या आजोबांनी तर फोन करून कळवलं की फक्त महिलांचे लाड करू नका, पुरुषांनाही माहेरपणाचं सुख द्या. तिथून पुरुषांचही स्वागत सुरु झालं आहे. सगळंच अनोखं आहे. 


संकटे येतात. अक्षरशः आयुष्य उध्वस्त करून जातात. जीवलगांचा मृत्यू, पूर-दुष्काळ, आर्थिक अडचणी, बेरोजगारी पाचवीलाच पुजलेली असते. पण त्यातून यशाचा मार्ग काढता येतो. प्रभाताई शिर्के ह्यांचा जीवनप्रवास हाच संदेश देत आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या बळावर मोठी संकटही दूर करता येतात.

प्रभा शिर्के ह्यांचा संपर्क क्रमांक: + 91 9923564125


हे अनोखं माहेरघर तुमच्या मित्र-मैत्रिणींना कळवण्यासाठी हा लेख इथून कॉपी-पेस्ट करून whatsapp किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता.

मृत्यु नंतर सुद्धा पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे

 *मृत्यु नंतर सुद्धा  पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय*

***********************************

🔜 *(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रन्थ भैंट करा , जेव्हा कोणी त्याचे पठण करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(3). = कोणत्याही अन्नक्षेत्र साठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण करेल पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(4). = कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाटर कुलर लावा, नेहमी पुण्य मिळेल*❗️

🔜 *(5). = कोण्या अनाथला शिक्षित करा, तो आणि त्याची येणारी पिढीही तुमच्या सुखाची प्रार्थना करेल , तर पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(6). = तुमच्या मुलांना परोपकारी बनवू शकाल तर ,  सदैव पुण्य मिळत राहील*❗️

🔜 *( 7). = सर्वात सोपी आहे की ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा एकाने जरी या पैकी एक गोष्ट पूर्ण केली तर पुण्य तुम्हाला लागेल*❗️ 

🔺 *सर्वात पहिले सेंड करा कारण जो पर्यंत कोणी हा  MSG वाचत राहील*

*तुमच्या नावाचे पुण्याचे झाड लागत राहतील आणि तुम्हाला फळ मिळत राहील , म्हणूनच बोलतोय थांबू नका , निरंतर चालू रहा।* 


*🙏 जय श्रीराम 🙏*

कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर

 कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील 100 दिवसांमध्ये परिवहन विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

 

मुंबईदि. 30 : परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षितसुंदर आणि  शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहनबंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

परिवहन सेवेला गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सीमॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. जुनी 13 हजार शासकीय वाहने भंगारात काढली जावी अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीटॅक्सीऑटोशहर बस सेवेच्या तिकीट दरासंदर्भातही निर्णय घेण्यात यावेत. वडसा-गडचिरोली तसेच सोलापूर-धाराशीव येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे. राज्य परिवहन सेवेच्या 15 वर्षे झालेल्या बसेस भंगारात काढून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. यंत्रणा बसविण्यात यावी जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर अभियांत्रिकी उपाययोजना शोधून काढावी. यावेळी बंदरे तसेच विमानतळ प्राधिकरण आदिंबाबतची चर्चा झाली.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलारग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव संजय सेठीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव रणजीतसिंह देओलप्रधान सचिव एकनाथ डवलेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीसचिव विरेंद्र सिंहसचिव रविंद्र सिंहपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

भवताल मासिक : डिसेंबर २०२४

 भवताल मासिक : डिसेंबर २०२४


नमस्कार,
‘भवताल मासिका’चा डिसेंबर २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

* ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’चा अदृश्य विळखा सोडवण्यासाठी
अँटिबायोटिक औषधांना न जुमानणारे गंभीर जीवाणू विकसित होण्याची क्रिया अदृश्यपणे सुरू आहे. त्यातून ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’चा गंभीर विळखा घट्ट होत चालला आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरात लाखो मृत्यू होत आहेत. हा विळखा सोडवण्यासाठी जागरुकता आणि कृती यांची आवश्यकता आहे. या विषयावरील विवेचन...
- अभिजित घोरपडे

* दीडशे वर्षांपूर्वी मुंबई होती तरी कशी?
मुंबई महानगरात शंभर ते दोनशे वर्षांपूर्वी वाघाचे अस्तित्व होते, यावर विश्वास ठेवणे कठीणच! मात्र, हे वास्तव आहे. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी मुंबईचे वन्य जीवन समृद्ध होते, असे अनेक जुन्या नोंदी आणि लिखाणावरून निदर्शनास येते. तेव्हा, अर्थात १८०० ते १९५० या दीडशे वर्षांच्या कालखंडात मुंबई होती तरी कशी? याचा हा आढावा...
- संजीव नलावडे

* भवताल : देवाण-घेवाण विशेषांक
‘भवताल’चा यंदाचा दहावा दिवाळी विशेषांक. ‘देवाणघेवाण’ ही वेगळी थीम. आगळा-वेगळा महाराष्ट्र जगापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. हा अंक महाराष्ट्रासंदर्भात दस्तावेज तर आहेच, शिवाय ‘भवताल’ने भूमिका घेऊन केलेले स्टेटमेंटसुद्धा !

* भवताल बुलेटिन
भवतालचे विविध उपक्रम व घडामोडींची माहिती देणारे सदर...

* इको अपडेट्स
अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.
.........
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

मासिकाच्या नावनोंदणीसाठी लिंकः 

(आम्ही आपणाला 'भवताल मासिका'ची २०२५ या वर्षाची रु. ७९० इतकी वर्गणी भरण्याचे आवाहन करत आहोत, जेणेकरून आम्हाला त्याचा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी QR code:

Bhavatal Foundation.jpg

बँकेचे तपशील:
अकाउंट नेम- Bhavatal Foundation
अकाउंट नंबर- 033805009849
IFS Code- ICIC0000338

दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत

 दिलखुलास', 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 

डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत

 

मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात दि. 3 जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 

दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 2, शुक्रवार दि. 3, शनिवार दि. 4 आणि सोमवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी तर दुसरा भाग मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणासाठीच लढा दिला नाहीतर त्यांनी देशातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अस्पृश्यताबालविवाहसती प्रथाविधवा पुनर्विवाहाला बंदी यासारख्या वाईट गोष्टींचा त्यांनी विरोध केला. आयुष्यभर त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे तसेच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहेहे सावित्रीबाईंनी ओळखले आणि यासाठी त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. त्यांचे योगदान आणि विचार आजही कसे मार्गदर्शक आहेत, याविषयी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.

०००

 


शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

- कृषीमंत्री  अॅड. माणिकराव कोकाटे

 

 मुंबई, दि. 30 कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषीमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते.

             कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावलेउपसचिव हेमंत म्हापनकर, उपसचिव संतोष कराडउपसचिव प्रतिभा पाटीलउपसचिव अंबादास चंदनशिवेउपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते

Featured post

Lakshvedhi