Monday, 9 December 2024

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून

 राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन


नागपूर येथे 16 डिसेंबरपासून


 


           मुंबई, दि. ९ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सोमवार, दि. १६ ते शनिवार, दिनांक २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.


            विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.


            या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.


0000

महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका! फ्लॅगशीप योजनांसाठी स्वतंत्र वॉररूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्यपण थांबू नका!

फ्लॅगशीप योजनांसाठी स्वतंत्र वॉररूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट

 

मुंबईदि. 9 : महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एकवर आहोतम्हणून थांबू नकाअसा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजेअसे सांगतानाच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या फ्लॅगशीप योजनांसाठीही स्वतंत्र वॉररूम सुरु करण्याचे निर्देश यावेळी दिले.

विधानभवन येथील समिती सभागृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव आदी वरीष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट केली.

पारदर्शकतागतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्याअसे नमूद करूनमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकेंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. यासाठी अधिक समन्वयपाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. याकरिता नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून व्यवस्था उभी करा.

एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच. ही वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजेयाची मुख्य सचिवांनी नव्याने रचना करावी. या धर्तीवर राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी पण दुसरी वॉररूम आता असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे. यासाठी प्रयत्न करता येतील. यात जनता दरबारलोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजेते तळागाळात नेले पाहिजेत. आपले सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालविण्यात यावे. जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यांचे तातडीने दौरे सुरु करावेत. पालक सचिवांनी आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून देण्यावर भर द्यावा. वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करा. ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतीलयावर भर दिला पाहिजे. अर्थातच यात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईलअसेही मुख्यंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासनाची सर्व संकेतस्थळ हे आरटीआय फ्रेंडली करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, 'इज ऑफ लिव्हिंग'वर सर्वाधिक भर द्या. राज्यभरातून नागरिक सर्वाधिक कोणत्या कारणासाठी आपल्याकडे येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतीलयावर भर देण्यासाठीचे नियोजन केले जावे. यासाठी सहा-सहा महिन्याचे दोन टप्पे करून उद्दिष्ट गाठता येईल. यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईलत्यासाठी त्यांची एक समिती गठित करून अभ्यास अहवाल तयार करण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे. त्यांचा थेट सचिवांशी संवाद व्हावा आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावेयावर भर देण्यात यावा. नवीन नियुक्त  कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना त्यांच्या सेवेशी संबंधित जिल्ह्यात पदस्थापना दिल्या जाव्यात. जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. 

नागरिकांना सुविधा देण्यासाठी तसेचप्रशासकीय कामांसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यासाठी प्रत्येक विभागाने शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करून तो सादर करावाअसे निर्देशही दिले.

प्रयागराज महाकुंभ मध्ये तब्बल 45 कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांची माहिती मुंबईत पार पडला महाकुंभ 2025 रोड शो


 प्रयागराज महाकुंभ मध्ये तब्बल 45 कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा


उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांची माहिती

मुंबईत पार पडला महाकुंभ 2025 रोड शो

मुंबई, 9 डिसेंबर. :  महाकुंभ-2025 हे भारतीय संस्कृती आणि ऐक्याचे जागतिक प्रतीक बनवण्यासाठी योगी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये तब्बल 45 कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री पाठक यांनी उत्तर प्रदेश मत्स्यपालन मंत्री संजय निशाद यांच्या उपस्थितीत यावेळी आयोजित भव्य रोड शोचे नेतृत्व केले.

महाकुंभ हा भारताच्या विविधतेतील एकतेचा एक अनोखा उत्सव असल्याचे सांगून त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना आमंत्रित केले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  महाराष्ट्रातील भाविकांनी प्रयागराज महाकुंभ-2025 ला भेट द्यावी असे आवाहन पाठक यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, हे सरकार आंतरराष्ट्रीय सहभाग आणि अत्याधुनिक सुविधांसह महाकुंभ ऐतिहासिक बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे.  महाकुंभ ही भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक चेतनेची नाडी आहे. ही 'एक भारत-श्रेष्ठ भारत-सर्वसमावेशक भारत' ची दैवी आणि चैतन्यदायी झांकी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयागराज कुंभ 2019 चा 'दैवी आणि भव्य' अनुभव मिळेल, यावेळी होणारा महाकुंभ मागील कुंभापेक्षा अधिक दिव्य आणि भव्य असेल. प्रयागराज महाकुंभ-2025 मध्ये 45 कोटी यात्रेकरू, साधू, संत, कल्पवासी आणि पर्यटकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्या नेतृत्वाखाली प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती मातेच्या पवित्र संगमाच्या किनाऱ्यावर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभाचे आयोजन केले जात आहे. युनेस्कोने घोषित केलेला जागतिक मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असलेला महाकुंभ 12 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रयागच्या पवित्र भूमीवर आयोजित केला जात आहे अशी माहिती पाठक यांनी यावेळी दिली.

महाकुंभात हे असेल खास

हा एक स्वच्छ, निरोगी, सुरक्षित आणि डिजिटल महाकुंभ आहे.  एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकमुक्त महाकुंभावर तोडगा काढण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छ महाकुंभ उपक्रम 4 लाख मुलांपर्यंत आणि प्रयागराजच्या लोकसंख्येच्या 5 पट मुलांपर्यंत नेण्यात येत आहे.  संपूर्ण प्रयागराजमध्ये सुमारे तीन लाख रोपेही लावली गेली आहेत. जत्रा संपल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार वनस्पतींचे संरक्षण करेल. यात्रेकरू, साधू, संत, कल्पवासी आणि पर्यटकांच्या आरोग्य सेव तज्ज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. परेड मैदानावर 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. 20 खाटांची आणि 8 खाटांची दोन छोटी रुग्णालयेही तयार करण्यात आली आहेत. सेना रुग्णालयाने मेळा परिसर आणि अरेल येथे प्रत्येकी 10-10 खाटांचे दोन आयसीयू उभारले आहेत. या रुग्णालयांमध्ये 24 तास डॉक्टर तैनात असतील. 291 एमबीबीएस आणि तज्ज्ञ डॉक्टर, 90 आयुर्वेदिक आणि युनानी तज्ज्ञ आणि 182 परिचारिका कर्मचारी आहेत. पुरुष, महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.

डिजिटल महाकुंभ

महाकुंभचे संकेतस्थळ, अॅप, 11 भाषांमधील ए. आय. चॅटबॉट, लोक आणि वाहनांसाठी क्यू. आर. आधारित पास, बहुभाषिक डिजिटल लॉस्ट अँड फाउंड सेंटर, स्वच्छता आणि तंबूंचे आय. सी. टी. निरीक्षण, जमीन आणि सुविधा वाटपासाठी सॉफ्टवेअर, बहुभाषिक डिजिटल सिग्नेज व्ही. एम. डी., स्वयंचलित रेशन पुरवठा प्रणाली, ड्रोन-आधारित देखरेख आणि आपत्ती व्यवस्थापन, 530 प्रकल्पांच्या देखरेखीसाठी थेट सॉफ्टवेअर, इन्व्हेंटरी ट्रॅकिंग सिस्टम आणि गुगल मॅपवरील सर्व साइटचे एकत्रीकरण.

विशेष अधिवेशनात ९ डिसेंबर रोजी ४ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली सदस्यपदाची शपथ

  

विशेष अधिवेशनात ९ डिसेंबर रोजी

४ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली सदस्यपदाची शपथ

 

मुंबईदि. ९ : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात दि. ९ डिसेंबर रोजी ४ नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

 

शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये सर्वश्री जयंत राजाराम पाटीलविनय विलासराव कोरे (सावकार)सुनील शंकरराव शेळकेउत्तम शिवदास जानकर यांचा समावेश आहे. या विशेष अधिवेशनाच्या कालावधीत एकूण २८३ सदस्यांनी सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे – उपमुख्यमंत्री अजित पवार

 महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा  अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर म्हणालेमहाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे सभागृह आहे. या सभागृहाचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. सभागृहाला संवेदनशील अध्यक्ष लाभले असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लोकहितकारी व परिणामकारक निर्णय होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कायद्याची उत्तम जाण असणारे अध्यक्ष सभागृहाला लाभले आहेत. सभागृहासमोर आलेल्या प्रश्नांवर तितक्याच ताकदीने उत्तर देऊन त्यांनी सभागृह उत्तम चालविले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधानसभा सदस्य सर्वश्री जयंत पाटील, नाना पटोले, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊतविश्वजीत कदमरोहित पाटील यांनीही अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.


विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची भूमिका समन्यायी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची भूमिका समन्यायी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेवून कामकाजाची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची हातोटी आहे. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे नाव विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

  विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबदल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. ॲड.नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी चांगले काम केले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अडीच वर्षात त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहेअसे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काढले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देशाचाराज्याचा कारभार चालतो. राज्यात आता विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व सुरु झाले आहे. अध्यक्षांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच होईल. या सभागृहाचे पावित्र्य राखत राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यास सर्वांनी प्रयत्न करूया असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi