Monday, 9 December 2024

विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले

 विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन

ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि. 9 : सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन ही लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहे. शिस्तशीर आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. संवादातून, चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम सभागृह करीत असते. ॲड. राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  विधानसभेच्या अध्यक्षपदी  निवडीबदल मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते.

  मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेपुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत चारच जणांना मिळाला आहे. ॲड.नार्वेकर यांना हा बहुमान मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षांसाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही मतभिन्नता झाली तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. अध्यक्ष दोन्ही बाजूंचे ऐकतात. यावेळीही अध्यक्षांकडे ही जबाबदारी आहे. लोकशाहीत प्रभावी विरोधी पक्ष हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            विधिमंडळात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन लोकशाही अधिक सुदृढ होईल. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम या सभागृहात होते. सभागृहातील सदस्य महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या सभागृहातील परंपरांचा मान - सन्मान निश्चितपणे कायम राहील. यापुढील काळातही नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात व्यापक जनहिताचे निर्णय होतील. विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा यांची उंची राखत सर्व सदस्यांना न्याय देण्याची भूमिका अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी त्यांच्या मागील अडीच वर्षाच्या काळात  प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना सांगितले.

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची भूमिका समन्यायी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेवून कामकाजाची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची हातोटी आहे. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे नाव विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

  विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबदल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. ॲड.नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी चांगले काम केले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अडीच वर्षात त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहेअसे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काढले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देशाचाराज्याचा कारभार चालतो. राज्यात आता विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व सुरु झाले आहे. अध्यक्षांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच होईल. या सभागृहाचे पावित्र्य राखत राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यास सर्वांनी प्रयत्न करूया असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड

 .राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड

 

मुंबईदि. ९ : विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांची १५ व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावास सदस्य सर्वश्री अनिल पाटीलॲड. आशिष शेलारचंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ॲड.राहुल नार्वेकर यांच्या नावाचा विधानसभा अध्यक्ष पदासाठीचा प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. ॲड.राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.

ॲड. राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभा सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेनाना पटोलेजयंत पाटीलनितीन राऊत हे ॲड. नार्वेकर यांना अध्यक्षपदी स्थानापन्न होण्यासाठी अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेवून गेले. सभागृहातील सर्व सदस्यांनी ॲड. नार्वेकर यांचे अभिनंदन केले. Me

मॅट’च्या ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन सेवा विषयक १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरीचा लाभ

 मॅटच्या ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन

सेवा विषयक १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली

तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरीचा लाभ

 

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ५४२ सेवा विषयक प्रकरणांपैकी १३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.  

न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यात आला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीसाठी तीन पॅनल आयोजित करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशीसेवानिवृत्त सदस्य (न्या) ए. पी. कुन्हेकरआर. बी. मलिक यांनी काम पाहिले. नितिन गद्रे (नागपूर)विजयकुमार (औरंगाबाद)विजया चौहानसंदेश तडवीआर. एम. कोलगे आणि एम.बी. कदम यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. अदालतीत बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मणचेकर यांनी तपासणी केली.

या लोक अदालतीमध्ये नागपूरमुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली. यामध्ये मुंबई खंडपीठाच्या- २३८ प्रकरणांपैकी ३९ तर नागपूर- खंडपीठाच्या १५० पैकी ६३ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या १५४ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी माजी सैनिक उमेदवार मिळू शकले नाही. त्यामुळे लोक अदालतीत तडजोडीनंतर उर्वरीत रिक्त जागा इतर उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. या निर्णयामुळे १२६ उमेदवारांना शासकीय नोकरी मिळू शकणार आहे. या निर्णयामुळे माजी सैनिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील सचिव यांच्यासह न्यायाधिकरणामधील सर्व अधिकारीकर्मचारीमुख्य सादरकर्ता अधिकारी, न्यायाधिकरण बार असोसिएशनमधील सर्व वकीलशासनाचे सर्व नोडल अधिकारी यांनी सहकार्य केले

Sunday, 8 December 2024

कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील उमेदवारांची शासनाकडे शिफारस

 कर सहायक संवर्गाच्या

प्रतीक्षायादीवरील उमेदवारांची शासनाकडे शिफारस

 

       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे कर सहायक परीक्षा-२०१६  कर सहायक गट क संवर्गाच्या  प्रतीक्षायादीमधून अराखीव सर्वसाधारण वर्गवारीचे एक पद व भ.ज. (क) वर्गवारीचे एक पद अशी दोन पदे राखून ठेवून उर्वरीत ४० पदांकरिता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. राखून ठेवलेल्या दोन पदाबाबत शासनाचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर या पदांच्या शिफारशीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

 

       उमेदवारांच्या माहितीसाठी प्रतीक्षायादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

 

तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ.

 तालुका क्रीडा अधिकारीसामान्य राज्य सेवागट-अ.

 

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तालुका क्रीडा अधिकारीसामान्य राज्य सेवागट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक ०५ डिसेंबर२०२४ ते ०६ डिसेंबर२०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

 

सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (अलिबाग)

 सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (अलिबाग)

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहयोगी प्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवागट-अ (अलिबाग) या पदाच्या मुलाखती दिनांक 12 व 13 नोव्हेंबर2024 रोजी घेण्यात आल्या होत्या. विचाराधीन पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 5 डिसेंबर2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा संवर्गाचा निकाल जाहीर

  आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक,

दापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा संवर्गाचा निकाल जाहीर

 

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापकदापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवाकृषिपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागगट-अया संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाकरिता आरक्षित पदे वगळून प्रस्तुत संवर्गाच्या मुलाखती दिनांक 01 सप्टेंबर,2023 रोजी घेण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने या पदाचा निकाल यापूर्वीच दिनांक 20 ऑक्टोबर2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

       चाळणी परीक्षेअंती पात्र ठरलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 28 फेब्रुवारी,2024 रोजी घेण्यात आल्या असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाकरिता आरक्षित पदांचा समावेश करुन प्रस्तुत संवर्गाचा सुधारित निकाल प्रसिध्द करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi