Sunday, 8 December 2024

विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 106 सदस्यांनी सदस्यपदाची घेतली शपथ

 विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी

106 सदस्यांनी सदस्यपदाची घेतली शपथ

 

मुंबई, दि. ८ :  विधानसभेच्या  विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

शपथ घेतलेल्या सदस्यांची यादी

1.      नानाभाऊ फाल्गुनराव पटोले

2.       राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील

3.      दिलीप गंगाधर सोपल

4.      मंगलप्रभात गुमानमल लोढा

5.      भास्कर भाऊराव जाधव

6.       डॉ. नितीन काशिनाथ राऊत

7.      विजय नामदेवराव वडेट्टीवार

8.       चंद्रशेखर बावनकुळे

9.      जितेंद्र सतीश आव्हाड

10. अब्दुल नबी सत्तार

11. अमित विलासराव देशमुख

12. असलम रमजानअली शेख

13. डॉ. तानाजी जयवंत सावंत

14. आदित्य उद्धव ठाकरे

15. विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख

16. सुरेश रामचंद्र धस

17. विश्वजीत पतंगराव कदम

18. सुनील वामन प्रभू

19. डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

20. कृष्णा पंचमजी खोपडे

21. अमित सुभाषराव झनक

22. अमीन अमीरअली पटेल

23. प्रशांत बन्सीलाल बंब

24. रवी गंगाधरराव राणा

25. प्रताप बाबुराव सरनाईक

26. दिलीपराव शंकरराव बनकर

27. प्रकाश आनंदराव आबिटकर

28. अजय विनायक चौधरी  

29. डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील

30. संजय गोविंद पोतनीस

31. आकाश पांडुरंग फुंडकर

32. सुनील राजाराम राऊत

33. महेश (दादा) किशन लांडगे

34. नारायण गोविंदराव पाटील

35. बालाजी देविदासराव कल्याणकर

36. विकास पांडुरंग ठाकरे

37. नितीनकुमार भिकनराव देशमुख

38. शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक

39. रोहित पवार

40. कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे)

41. डॉ. किरण यमाजी लहामटे

42. संदीप रवींद्र क्षीरसागर

43. जितेश रावसाहेब अंतापूरकर

44. अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल

45. राहुल प्रकाश आवाडे

46. हिकमत बळीराम उढाण

47. संजय उपाध्याय

48. हेमंत भुजंगराव ओगले

49. ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके

50. रमेश काशीराम कराड

51. मनोज देवानंद कायंदे

52. बाबाजी रामचंद्र काळे

53. देवेंद्र राजेश कोठे

54. अमोल धोंडीबा खताळ

55. सिद्धार्थ रामभाऊ खरात

56. राजू ज्ञानू खरे

57. हारून खान

58. श्याम रामचरण खोडे

59. मनोज भीमराव घोरपडे

60. शंकर पांडुरंग जगताप

61. अमोल हरिभाऊ जावळे

62. चरणसिंग बाबूलालजी ठाकूर

63. प्रवीण वसंतराव तायडे 

64. आनंद शंकर तिडके

65. प्रवीण प्रभाकरराव  दटके

66. संजय नीलकंठराव देरकर

67. करण संजय देवतळे

68. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख

69. सत्यजित शिवाजीराव देशमुख

70. अनंत (बाळा) भि. नर

71. डॉ. मिलिंद रामजी नरोटे

72. राजन बाळकृष्ण नाईक

73. मुरजी (काका) पटेल

74. साजिद खान पठाण

75. गोपीचंद कुंडलिक पडळकर

76. विक्रम बबनराव पाचपुते

77. अभिजीत धनंजय पाटील

78. अमोल चिमणराव पाटील

79. राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील

80. रोहित सुमन आर.आर. आबा पाटील

81. शिवाजी शट्टूप्पा पाटील

82. सचिन पाटील

83. आमश्या फुलजी पाडवी

84. विजयसिंह शिवाजीराव पंडित

85. राजेश भाऊराव बकाने

86. सुहास अनिल बाबर

87. हरिश्चंद्र सखाराम भोये

88. अतुलबाबा सुरेश भोसले

89. देवराव विठोबा भोंगळे

90. रामदास मलुजी मसराम

91. दलितमित्र डॉ. अशोकराव (बापू) माने

92. संजय नारायणराव मेश्राम

93. राजेश गोवर्धन मोरे

94. अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर

95.  शंकर हिरामण मांडेकर

96. उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर

97. हेमंत नारायण रासने

98. गजानन मोतीराम लवटे

99. विठ्ठल वकीलराव लंघे

100.         राजेश श्रीरामजी वानखडे

101.         किसन मारोती वानखेडे

102.         सुमित वानखेडे

103.         राजेश उत्तमराव विटेकर

104.         किरण उर्फ भैय्या सामंत

105.         महेश बळीराम सावंत

106.         प्रवीण वीरभद्रया स्वामी


Saturday, 7 December 2024

 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रा.डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीचे प्रसारण*

मुंबईदि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र'  कार्यक्रमात अर्थतज्ज्ञशिक्षणतज्ज्ञलेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ही मुलाखत  मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

26 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरात 'संविधान दिनसाजरा करण्यात आला. या दिनानिमित्त 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात अर्थतज्ज्ञशिक्षणतज्ज्ञलेखक आणि विचारवंतप्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या पहिल्या भागातून डॉ. जाधव यांनी संविधान निर्मितीची प्रक्रियाइतिहासवैशिष्टे आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान या विषयावर माहिती दिली. त्या अनुषंगाने 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. या भागात डॉ.आंबेडकर यांचे लेखन व साहित्य या विषयावर त्यांनी माहिती दिली आहे. 

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

मॅट’ च्या लोक अदालतीत १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली सेवाविषयक प्रकरणांसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन

 मॅट’ च्या लोक अदालतीत १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली

सेवाविषयक प्रकरणांसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई

 येथे ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन

 

मुंबई. दि. ७ : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणमुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समितीमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची सेवाविषयक प्रकरणे तातडीने व सामंजस्याने मार्गी लागावी म्हणून ३३ वर्षात प्रथमच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणमुंबई येथील कार्यालयात 'लोक अदालतआयोजित करण्यात आली. या लोक अदालतीत तिन्ही खंडपीठ मिळून एकूण  ५४२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १३८ इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आलीअशी माहिती महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरणमुंबईचे विशेष कार्य अधिकारी (न्यायिक) सुरेश जोशी यांनी दिली.

मेकर टॉवरई-विंगतिसरा मजलाकफ परेडजागतिक व्यापार केंद्राच्या बाजुलामुंबई येथे मॅट च्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नागपूर,मुंबईछत्रपती संभाजीनगर खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली. यामध्ये  मुंबई खंडपीठाच्या- २३८ प्रकरणापैकी ३९ निकाली तर नागपूर- खंडपीठाच्या १५० पैकी ६३ व छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या १५४ प्रकरणांपैकी ३६ निकाली काढण्यात आली असल्याची माहितीही श्री. जोशी यांनी दिली.

मुख्य सचिव सुजाता सौनिकयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील सचिव यांनी लोक अदालत यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मोलाचे सहकार्य केले. मंत्रालयातील प्रत्येक विभागातर्फे नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलीत्यामुळे लोक अदालतीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणांच्या बाबतीत शासनाशी संपर्क साधणे सोयीचे झाले. तसेच बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मणचेकर यांनी  तपासणी केली  व शासनाने नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्यामार्फत प्रलंबित प्रकरणे लोक अदालत समोर ठेवण्यासाठी योग्य ठरविण्यात आलीअसेही विशेष कार्य अधिकारी (न्यायिक) सुरेश जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणमुंबईच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकरयांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील सर्व अधिकारीकर्मचारीमुख्य सादरकर्ता अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण बार असोसिएशनमधील सर्व वकील वर्गमहाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील वकील आणि शासनाचे सर्व नोडल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेनंतर ३३ वर्षांनी प्रथमच लोक अदालत झाली.

लोक अदालतसाठी तीन पॅनल आयोजित करण्यात आले होते. लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशीए. पी. कुन्हेकरसेवानिवृत्त सदस्य (न्या) आर. बी. मलिकसेवानिवृत्त सदस्य (न्या) व पॅनल सदस्य म्हणून नितिन गद्रेसदस्य (प्र)मप्रन्यानागपूरविजयकुमारनिवृत्त सदस्य (प्र)मप्रन्याऔरंगाबादविजया चौहानसंदेश तडवीनिवृत्त सहसचिवआर. एम. कोलगेवकील आणि एम.बी. कदमवकील यांनी काम पाहिले.

00000


ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे

 ध्वजनिधीला सर्वांचे योगदान गरजेचे

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

·         अमृत महोत्सवी सशस्त्र सेना ध्वज दिन उत्साहात साजरा

 

मुंबई, दि. 7 : देशाच्या सीमेवर सैन्यदलाच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळे देशातील नागरिक सुखाने राहू शकतात व देश प्रगती करू शकतो.  ही जाणीव ठेवून प्रत्येकाने सशस्त्र सैन्यदल ध्वजनिधीला आपले योगदान दिले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.  देशातील प्रत्येकाने मतभेद विसरून एकदिलाने काम केल्यास सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.    

सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शनिवारी (दि. ७) राजभवन मुंबई येथे आरंभ केलात्यावेळी ते बोलत होते.

सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (नि.) दीपक ठोंगे यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैन्य दलाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

महाराष्ट्र  छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती संभाजी महाराज यांसारख्या शूरवीर योद्ध्यांची भूमी आहे.  आपली ही सैन्यदले हा वारसा सांभाळत देशाचे रक्षण करीत आहेत.  आपल्या सैन्यदलांनी जशी कारगिलडोकलाम येथे कठीण परिस्थितीत कामगिरी केली आहेतशीच कामगिरी त्यांनी  नैसर्गिक संकट व पूरस्थितीच्या वेळी देखील पार पाडली आहेअसे राज्यपालांनी सांगितले.  

आज भारत जगातील तिसरी महासत्ता होण्याकडे वाटचाल करित आहेअसे सांगून अमेरिकन दूतावासासमोर ज्याप्रमाणे आज लोकांच्या रांगा दिसताततश्या रांगा भारतीय दूतावासापुढे लागलेल्या दिसाव्या असे आपले स्वप्न असल्याचे राज्यपालांनी सांगितले.    

यावेळी गेल्या वर्षभरात ध्वज निधी संकलनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते विविध शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक संस्थांनी तसेच व्यक्तींनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

कोकणचे विभागीय आयुक्त राजेश देशमुखनाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडामनागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकरमुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादवयवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आदींना यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंहप्रधान सचिव अंशू सिन्हामेजर जनरल बिक्रमदीप सिंहएअर व्हाईस मार्शल रजत मोहनकर्नल दीपक संचालकसैनिक कल्याण विभाग  आदी उपस्थित होते.

हौतात्म्य प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच सेवानिवृत्त जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वजनिधीचा विनियोग केला जातो. 

००००

केंद्र सरकारने PAN कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे, PAN 2.0. परंतु यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकार नवीन अपडेटेड PAN कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल.

 केंद्र सरकारने PAN कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे, PAN 2.0.

परंतु यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकार नवीन अपडेटेड PAN कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल.


महत्त्वाचे: PAN कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी फोन, मेसेज, किंवा ई-मेल पाठवले, तर त्याला उत्तर देऊ नका. कोणतीही माहिती किंवा OTP शेअर करू नका.


नाही म्हणजे नाही.

जागरूक राहा, सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.


वंदे मातरम्‌ व राज्यगीताने महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

 वंदे मातरम्‌ व राज्यगीताने महाराष्ट्र विधानसभेच्या

 विशेष अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

 

मुंबईदि. 7 :- विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व  जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.       

००००


Featured post

Lakshvedhi