मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला: देवेंद्र फडणवीस
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 7 December 2024
मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला: देवेंद्र फडणवीस
Friday, 6 December 2024
मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे मार्गे मॅरेथॉन धावणार 54 व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरॅथॉनचे आयोजन; राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे मार्गे मॅरेथॉन धावणार
54 व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरॅथॉनचे आयोजन;
राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि.6- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54 व्या विजय दिवसानिमित्त आयोजित 'विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन'ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. ही मॅरेथॉन 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून मॅरेथॉनमध्ये सहभागी सैन्य दलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे 405 किमी अंतर पार करणार आहेत. या मॅरॅथॉनचे आयोजन स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे करण्यात आले.
मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.
अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सैन्य दलातील जवान, माजी अधिकारी, युवक व एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत. सैन्य दलाच्या वतीने या परिक्रमेदरम्यान नाशिक येथे 'जाणूया सैन्य दलांना' व अहिल्यानगर येथे 'सैन्य दलात महिलांना समान संधी' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर येथे माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल बिक्रमदीप सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) 7 डिसेंबर रोजी लोक अदालत
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) 7 डिसेंबर रोजी लोक अदालत
मुंबई, दि.6- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या (दि.07 डिसेंबर) रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोक अदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, ए. पी. कुऱ्हेकर, सदस्य(न्या.) आणि आर. बी. मलिक, सदस्य (न्या.) हे कामकाज पाहणार आहेत.
या लोक अदालतीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील प्रलंबित असलेली सेवाविषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
000
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) 7 डिसेंबर रोजी लोक अदालत
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे (मॅट) 7 डिसेंबर रोजी लोक अदालत
मुंबई, दि.6- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई कार्यालयामध्ये उद्या (दि.07 डिसेंबर) रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोक अदालतीसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन पॅनल आयोजित करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, ए. पी. कुऱ्हेकर, सदस्य(न्या.) आणि आर. बी. मलिक, सदस्य (न्या.) हे कामकाज पाहणार आहेत.
या लोक अदालतीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामधील प्रलंबित असलेली सेवाविषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत..
कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ
कालीदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ
वृत्त क्र. 234
मुंबई, दि. 6 :- विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली.
राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली.
विधानसभेची बैठक दि.7 डिसेंबर रोजी मुंबईतमुख
विधानसभेची बैठक दि.7 डिसेंबर रोजी मुंबईत
मुंबई, दि.6 : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे शनिवार, दि.7 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वा. आयोजित केली असल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव(1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली आहे.
याच बरोबर महाराष्ट्र विधान परिषदेची बैठक सोमवार, दि.9 डिसेंबर, 2024 रोजी दु.4 वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली
233
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
विधानभवनात आदरांजली
मुंबई, दिनांक 6 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, अवर सचिव विजय कोमटवार, उप सभापती यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...