Friday, 6 December 2024

फडणवीस, श्री. देवेंद्र गंगाधरराव परिचय

 फडणवीसश्रीदेवेंद्र गंगाधरराव

 

जन्म : २२ जुलै१९७०

 

जन्म ठिकाण  नागपूर

 

शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटडी.एस.बर्लिनजर्मनी येथून उत्तीर्ण

ज्ञात भाषा : मराठीहिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहितपत्नी श्रीमती अमृता.

अपत्ये  एकूण १ (एक मुलगी).

व्यवसाय : सामाजिक कार्य.

पक्ष : भारतीय जनता पक्ष.

मतदार संघ : ५२ - नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा - नागप.

 

इतर माहिती :

कार्यकारी सदस्यरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीनाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्षराष्ट्रीय अपंग कल्याण संस्थाअध्यक्षस्वआबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनागपूर; अध्यक्षनागप जिल्हा बास्केट बॉल संघटनाअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग.

१९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्षधरमपेठ वॉर्डनागपूर१९९० प्रसिद्धी प्रमुखभाजपनागपूर (पश्चिम); १९९२-९५ अध्यक्षभाजप युवा मोर्चानागपूर शहर१९९५-२००४ उपाध्यक्षमहाराष्ट्र प्रदेशभारतीय जनता युवा मार्चा२००४ - २००९२००९  २०१४ राष्ट्रीय उपाध्यक्षभारतीय जनता युवा मोर्चा२००९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख२०१० महामंत्री२०१२-२०१४ प्रदेशाध्यक्षमहाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे प्रथम भारतीय लोकप्रतिनिधीउपाध्यक्षग्लोबल पार्लमेंट फोरमहाबीतात१९९२  १९९७ नागपूर महानगर पालिका सदस्य  १९९७ मध्ये महापौरमहानगरपालिकानागपूर; १९९८ मे अरइन कौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड;

१९९९-२००४२००४-२००९२००९-२०१४२०१४-२०१९२०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, सदस्यविधानमंडळ नियम समितीसार्वजनिक उपक्रम समितीविनंती अर्ज समितीगृहनिर्माण  नगरविकास स्थायी समिती सदस्यमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीसदस्यकार्यकारी परिषद डॉपंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.बीसीनॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्नअध्यक्षनिती आयोग शेती विषयक उच्चाधिकार समितीभारत सरकारराष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील "उत्कृष्ट संसदपटुपुरस्कार प्राप्तः 'उत्कृष्ट वक्ताम्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तरोटरी क्लबचा "मोस्ट चॅलेंजिंग युथ अॅवार्डप्राप्तहिंदू लॉ विषयात नागपूर विद्यापीठाच "बीकेबोस अॅवॉर्डप्राप्त; प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मुक्तचंद पुणे या संस्थे तर्फे "उत्कृष्ट संसदपटुपुरस्कारप्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राजयोगी नेता पुरस्काराने सन्मानीत; राज्य  राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत.

यशदा, पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली. ३१ ऑक्टोबर २०१४ ते २१ नोव्हेंबर, २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री२२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर२०१९ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्यडिसेंबर २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

३० जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खाती - गृहविधी  न्यायजलसंपदा  लाभक्षेत्र विकासगृहनिर्माणऊर्जाराजशिष्टाचार.

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवडदिनांक  डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

 

                        (संदर्भ – १४ वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली शपथ

 देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत

ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी

उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेअजित पवार यांनी घेतली शपथ


 

मुंबईदि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदेअजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहकेंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डाकेंद्रीय भूपृष्ठ परिवहन व  महामार्ग मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहानकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनकेंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयलकेंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकरकेंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादवकेंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवकेंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारस्वामीकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानकेंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझीकेंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधियाकेंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजूकेंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंहकेंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवानउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथआंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारअरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडूआसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्माछत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव सायगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलहरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनीमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवमेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमाराजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मात्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहाउत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामीपुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामीओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझीमणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंहनागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओसिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांगकेंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवलेमुरलीधर मोहोळप्रतापराव जाधवरक्षाताई खडसेविविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्यब्रजेश पाठकपवन कल्याणराजेंद्र शुक्लाअरुण सावोविजय शर्माप्रेमचंद बैरवाविजयकुमार सिन्हासम्राट चौधरीकनक बर्धन सिंह देवप्रवती परिदाचौना मेनप्रेसतोन त्यांसोंगयांथुंगो    पटॉनटी. आर. झेलियांगएस धारश्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधूसंतमहंतविविध धर्मांचे गुरुराज्यातील खासदारआमदारविविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेतेउद्योगक्रीडामनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरविशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.

००००

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर · पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत

 मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची

 पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

·        पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत

 

मुंबईदि. ५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

 

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना  पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत.

 

चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

0000

शिंदे, श्री. एकनाथ संभाजी, परिचय

 शिंदेश्रीएकनाथ संभाजी उपमुख्यमंत्री

 

जन्म : ६ मार्च १९६४.

जन्म ठिकाण अहिरतालुका महाबळेश्वरजिल्हा सातारा.

शिक्षण बी..

ज्ञातभाषा : मराठीहिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहितपत्नी श्रीमती लता.

अपत्ये एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य

पक्ष : शिवसेना

मतदार संघ : १४७ – कोपरी पाचपाखाडीजिल्हा ठाणे.

इतर माहिती :

 

ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षसन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग,  ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केलासंपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केलेठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरीसचिन तेंडुलकर मिनी स्टेडियमइंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकशहिद हेमंत करकरे क्रीडा संकूलजॉगिंग पार्कसेंट्रल लायब्ररी सुरु केली;

आदिवासी प्रभाग मोखाडातलासरी  जव्हार येथील आश्रम शाळेत  आरोग्य केंद्रात सकस



मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन









मुंबई, दि.५ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच जिजामाता शहाजीराजे भोसले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi