Monday, 2 December 2024

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा महाराष्ट्र दौरा केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा महाराष्ट्र दौरा

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या

शतकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

 

 

नवी दिल्ली २ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार असूनमुंबई येथे विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतचभारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेज्यामध्ये कृषी तज्ज्ञसंशोधकतसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील.

0000

Kazakhstan is in Central Asia. Have you ever heard the Kazakh language ?


 Kazakhstan is in Central Asia. Have you ever heard the Kazakh language ?

 

Listen to their news !

   *You'll love it !!*


No, this is not a joke at all.

      This is for real !!

चोवीस मुळांची आई तर पहा


 

बाबूजी सांभाळले पीना


 

*कळीचे फूल झाले*

 *कळीचे फूल झाले*

             एक दिवस लेकीला 

             आई हळूच बोले

             रांधा ,वाढा ,उष्टी काढा, 

             दुसरे मी काय केले? 


लेक म्हणे हसून

श्लोक ,ओव्या ,सुरेल गाणी

तूच ना आम्हा ऐकवलेस

सुरेल शब्द, स्वच्छ वाणी

भांडार तूच खुले केलेस 


        तुझा स्वयंपाक बघून बघून

        मलाही लागली गोडी

        तुझ्यातली अन्रपूर्णा

        माझ्यातही आली थोडी


 संस्कारवर्गात नाही आई

 जावे लागले आम्हाला

 कसे वागावे, कसे बोलावे

 ठेवा तुझाच सर्वांना


      नव्हते यू ट्यूब, नव्हते गुगल

      तरी काहीच अडले नाही

      तुझ्यासोबत बोलताना

      गोष्टी कधीच संपल्या नाहीत


सण, सोहळे, लग्नकार्य

तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट

जमाखर्च, देणीघेणी

तूच शिकवलीस ॲडजेसमेंट       


    आमच्या छोट्या दुखण्यांसाठी

     डाॅक्टर आमचा तूच होशी

     ओवा, हळद, शेवपा, हरडा

     आजही असते माझ्यापाशी


तुझी रांगोळी, तुझे भरतकाम

कलात्मकता शिकवून गेली

माहित नाही कशी केव्हा

सुंदरता या जीवनी आली


       पै पाहुण्यात वाढलो म्हणून

       कंटाळा आजही येत नाही

       माणसं जोडण्याची कला

       जणू जगण्याचाच भाग होई


तरीही आई आता म्हणतेस

आयुष्यात मी काय केले

तुझ्याशिवाय का गं आई, 

माझ्यातल्या *कळीचे फूल झाले?*

Sunday, 1 December 2024

*अमृतधारा - ४९*

 💧श्रीराम समर्थ💧


   *अमृतधारा - ४९*


पुष्कळदा आपण जे करतो ते कशाकरता करतो कळत नाही. 


आपण नोकरीकरता नोकरी करत नाही तर पैशाकरता करतो. आपण गाडीत कशाकरता बसलो ते माहीत नसले, तर मग सगळाच  घोटाळा होतो. मुक्काम माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व जीवनाचे कष्ट कशाकरता करायचे ते माहिती पाहिजे. 


माणूस प्रपंचाकरता श्रम करतो, त्यासाठी देश सोडतो, मानापमान पण सोसतो, हे सर्व सुख समाधान मिळण्याकरता तो करतो.


मग विचार करू की इतके वर्षे कष्ट केले तर सुख किती मिळाले? 


प्रपंचात समाधान मिळाले नाही तर तो फुकट गेला. म्हणून माणसाने आपले ध्येय ठरवावे.


आनंद वेगळी अशी वस्तू नाही, तो ज्याच्याजवळ असतो तो भगवंत मिळवावा.


भगवंताच्या विस्मरणात इतर सर्व गोष्टी मिळतील, पण समाधान मिळणार नाही.


भगवंताचे स्मरण सुटले तर गाडीबरोबर ये-जा करण्यासारखे जन्म मरण घडते (ड्रायव्हर व गार्ड रोज गाडी बरोबर काशीला ये-जा करतात पण त्यांना काही काशीयात्रा घडत नाही).


समाधान वैभवाने वा श्रीमंतीने येत नाही. ते गरीबी व झोपडीतही असेल. ते मिळाले नाही तर सर्व कष्ट फुकट गेले. समाधान मिळाले तर कष्टाचे काही वाटणार नाही.


समाधान मिळण्याकरता काय करावे हे संतांनी सांगितले. भगवंत साधावा, त्याचे प्रेम साधावे. आपण भगवंताचे होऊन राहाणे यात खरे भूषण आहे. 


*ज्याच्या प्रपंचात भगवंत व त्याचे स्मरण आहे तेथेच समाधान असते.*


*आशीर्वाद.*

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

 जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

       मुंबईदि. ३० : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे 02 डिसेंबर,2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर आधारित प्रदर्शन स्टॉल, लोककलापथक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचे मनोगत तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांचा सत्कार इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

 जागतिक एड्स दिनी दरवर्षी १ डिसेंबर रोजी विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस एड्सबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत पावलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित आहे. यावर्षी सन २०२४ ची जागतिक एड्स दिनाची संकल्पना ‘टेक द राईटस् पाथ ही आहे. ही संकल्पना एचआयव्ही/एड्स संसर्गाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तसेच मानवी हक्कांचे समर्थन करण्याच्या महत्वावर भर देते.

या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-2 नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त श्री.ओमागाधू श्री.रंगा नाईक, संचालक आरोग्य सेवा, मुंबई डॉ.स्वप्निल लाळे, संचालक आरोग्य सेवा, पुणे डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट राज्य एड्स नियंत्रण संस्था डॉ. विजय कंदेवाड, सिनेकलाकार संजय नार्वेकर, श्रीमती कल्याणी मुळे उपस्थित राहणार आहेत.

0000

Featured post

Lakshvedhi