Friday, 8 November 2024

सुविधा ॲप 2.0

 सुविधा ॲप 2.0

भारत निवडणूक आयोगाने (ECI) 'सुविधा 2.0' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणेप्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणेअर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. त्याचबरोबर या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रियानिवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

गुगल प्ले स्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

ॲफिडेविट पोर्टल ‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज

ॲफिडेविट पोर्टल ‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनाची संपूर्ण यादी पाहता येते. कोणताही नागरिक ‘ॲफिडेविट पोर्टल’चा उपयोग करून उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पाहू शकतो व डाउनलोड ही करू शकतो. नागरिकांच्या सुविधेसाठी नामांकन दाखल, स्वीकारले, नाकारले, मागे घेतले, उमेदवार स्पर्धेत आहे याची माहिती मिळते. पोर्टलची लिंक : https://affidavit.eci.gov.in

निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी

 निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.                          

केवायसी ॲप :- (know your Candidate)*

 केवायसी  ॲप :- (know your Candidate)*

मतदारांना त्यांच्या उमेदवारांबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशीलउमेदवाराची माहिती इत्यादी पाहता येऊ शकते.

 गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.ksa

 ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/kyc-eci/id1604172836

सक्षम ॲप*

 सक्षम ॲप*

            भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता  हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

            निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नावपत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईलत्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थाव्हीलचेअरसहाय्यकमदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

       सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थानमतदान केंद्रउपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.

 गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp

ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

*व्होटर टर्नआऊट ॲप*

 *व्होटर टर्नआऊट ॲप*

व्होटर टर्नआऊट ॲप प्रत्येक राज्यजिल्हा आणि मतदारसंघासाठी अंदाजित मतदानाच्या टक्केवारीची दर दोन तासांनी माहिती देते. हे अॅप्लिकेशन फक्त विधानसभालोकसभा आणि पोटनिवडणुकीच्या वेळी सक्रिय होते.

व्होटर टर्नआऊट’ ॲपमध्ये प्रत्येक राज्यजिल्हा आणि मतदारसंघाची अंदाजित मतदान टक्केवारी दाखवते.भारत निवडणूक आयोगाच्या सर्व्हर वरून रिअल-टाइम’ डेटाचा उपयोग  करण्यात येतो.निवडणूक प्रकारराज्यजिल्हा आणि मतदारसंघानुसार यामध्ये मतदानाच्या टक्केवारीची माहिती मिळते.एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मतदानाचा अंदाज मिळवण्याचा हा एक जलद आणि सोपा असा पर्याय आहे

व्होटर ट्रर्नआऊट अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN

ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत परराज्यातील दारू, ४ वाहनांसह ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत परराज्यातील दारू,

 ४ वाहनांसह ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

 

मुंबईदि. ८ :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्कमुंबई विभागाचे आयुक्त  डॉ.विजय सूर्यवंशीसंचालक प्रसाद सुर्वेपुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकरअधीक्षकचरणसिंग राजपूतउप-अधीक्षकसंतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डी विभागाकडून २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घोटावडे गावच्या हद्दीतआंबटवेट रोडवर दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा लावून टाटा कंपनीचे एस गोल्ड या प्रकाराचे चारचाकी वाहन क्र. MH १२ TV५१२२ पकडले. या वाहनामधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारूचे एकूण १८ बॉक्स (८६६ सिलबंद बाटल्या) तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल असा एकूण ३ लाख ५५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस ३ दिवस एक्साईज कोठडी मंजूर केली. पुढील तपासात ४ नोव्हेंबर २०२४ रोजी कोथरूडकर्वे पुतळ्याजवळ तपासाकामी छापा टाकला असता सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे विविध बॅन्डचे विदेशी मद्याचे एकूण १०,००० नग बनावट लेबलसह सापडले आहे. याची एकूण किंमत ८८,१६० रुपये आहे. या गुन्ह्यातील पुढील तपासात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी शनिवार पेठयेथून बनावट लेबल छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीनसह एकूण ३० लाख २ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात एकूण ३४ लाख ४५ हजार ५५० रुपयांच्या मुद्देमालासह एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई निरीक्षकराज्य उत्पादन शुल्कडी विभाग सचिन श्रीवास्तवई विभागाचे निरीक्षकशैलेश शिंदेस.दु.नि. स्वप्नील दरेकरस.दु.नि.सागर धुर्वेजवान श्री. गजानन सोळंकेजवान श्री. संजय गोरेयांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असून पुढील तपास निरीक्षकसचिन श्रीवास्तव करीत आहेत.

या विभागाने १ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत एकूण ३१ गुन्हे नोंद करून ३१ आरोपींना अटक करून ४ वाहनांसह एकूण ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गावठी दारू ९९१ लिटरकच्चे रसायन १६०० लिटरताडी २२७ लिटरदेशी दारू ३३.०० ब. लि.बिअर २५५ ब. लि. व परराज्यातील गोवा निर्मित मद्य एकूण १५५.८८ ब. लि. यांचा समावेश आहे. ही कारवाई विभागाचे दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशीगणपती थोरातश्रीमती शीतल देशमुख जवान श्रीमती वृषाली भिटे यांनी केली केली.

0000


Featured post

Lakshvedhi