Tuesday, 5 November 2024

१८१-माहिम विधानसभा मतदारसंघातील ०६ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 --

१८१-माहिम विधानसभा मतदारसंघातील ०६ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१)  अमित राज ठाकरे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

२) महेश बळीराम सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

३) सदानंद शंकर सरवणकर – शिवसेना

४) सुधीर बंडू जाधव - बहुजन समाज पार्टी

५) फारुक सलिम सय्यद - बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी

६) नितीन रमेश दळवी – अपक्ष

१८०-वडाळा विधानसभा मतदारसंघातील ०९ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 १८०-वडाळा विधानसभा मतदारसंघातील ०९ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१) कालिदास निळकंठ कोळंबकर - भारतीय जनता पार्टी

२) श्रध्दा श्रीधर जाधव - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

३) स्नेहल सुधीर जाधव - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

४) जलाल मुख्तार खान - बहुजन महा पार्टी

५) मनोज मोहन गायकवाड - रिपब्लिकन सेना

६) रमेश यशवंत शिंदे  - राईट टू रिकॉल पार्टी

७) अतुल शारदा शिवाजी काळे - अपक्ष

८) मनोज मारूती पवार - अपक्ष

९) सूर्यकांत सखाराम माने – अपक्ष

Monday, 4 November 2024

मुंबई शहर१७९-सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील १५ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष

 --

१७९-सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील १५ अंतिम उमेदवारांचे नावपक्ष

१) गणेश कुमार यादव - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

२) कॅप्टन आर तमिल सेल्वन - भारतीय जनता पार्टी

३) विलास धोंडू कांबळे - बहुजन समाज पक्ष

४) संजय प्रभाकर भोगले - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

५) मोहम्मद शब्बीर अब्दुल वारिस अन्सारी

६) राजगुरू बाळकृष्ण कदम - वंचित बहुजन आघाडी

७) रंगण कृष्णा देवेंद्र - प्रहार जनशक्ती पार्टी

८) शमसे आलम गुलाम हुसेन शेख - इन्सानियत पार्टी

९) अश्विनीकुमार रामदर्श पाठक - अपक्ष

१०) करम हुसेन किताबुल्लाह खान - अपक्ष

११) प्रमित कमलेश मेहता - अपक्ष

१२) मलिक खुशनुद मलिक मेहमूद अहमद - अपक्ष

१३) वेट्टेश्वर पेरियानडार - अपक्ष

१४) शानूर अब्दुल वहाब शेख - अपक्ष

१५) संगीता अविनाश जाधव - अपक्ष

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मुंबई, दि. 4 : मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. धारावी मतदारसंघातून ०३, वरळी मतदारसंघातून ०२, भायखळा मतदारसंघातून ०५ तर कुलाबा मतदारसंघातून ०२ जणांनी अर्ज मागे घेतले. १७८-धारावी विधानसभा मतदारसंघातील १२ अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष १) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड - इंडियन नॅशनल काँग्रेस २) मनोहर केदारी रायबागे - बहुजन समाज पार्टी ३) राजेश शिवदास खंदारे – शिवसेना ४) अनंता संभाजी महाजन - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक ५) मनोज लक्ष्मण वाकचौरे - आपकी अपनी पार्टी पिपल्स ६) अजय रामचंद्र देठे - अपक्ष ७) आकाश लक्ष्मण खरटमल -अपक्ष ८) ईश्वर विलास ताथवडे - अपक्ष ९) गाजी सादोद्दीन - अपक्ष १०) दळवी राजू साहेबराव - अपक्ष ११) प्रशांत उत्तम कांबळे - अपक्ष १२) अॅड. संदीप दत्तू कटके - अपक्ष

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघात 315 अंतिम उमेदवार

  

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघात

315 अंतिम उमेदवार

 

मुंबईदि. 04 : - मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम 315 उमेदवार आहेतअशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अखेरच्या दिवशी 53 जणांनी माघार घेतली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

गोरेगाव येथे वाहनातून सहा लाखांची रक्कम जप्त

 गोरेगाव येथे वाहनातून सहा लाखांची रक्कम जप्त

मुंबईदि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आचारसंहितेच्या भरारी पथक क्रमांक ८ ने १६३- गोरेगाव येथे वाहन तपासणी केली. या तपासणीदरम्यानजैन मंदिराजवळील एस. व्ही. रोडवर एका वाहनामध्ये ६ लाख ११ हजार ८२० रुपये रोख रक्कम सापडली.

आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विहित रकमेपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगल्याबद्दल गोरेगाव पोलिस ठाण्यात रीतसर पंचनामा करून या नोटांच्या तपशीलासह जप्त रक्कम जमा करण्यात आली आहे. यासंदर्भात भरारी पथकातील अधिकारी पुढील कार्यवाही करत आहेत.

चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

 चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

मुंबईदि. 4 : चेंबूर विधानसभा मतदारसंघात मतदारांना प्रलोभन म्हणून साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

३ नोव्हेंबर २०२४ रोजीचेंबूर विधानसभा मतदारसंघातील मनपा वार्ड क्र. १५३घाटला येथील शिवशक्ती रहिवाशी संघाजवळील कर्नाटक शाळेच्या परिसरात निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी मतदारांना भुलवण्याच्या उद्देशाने साड्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली.

संबंधित विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाने तात्काळ पाहणी केली. प्राप्त व्हिडिओच्या आधारे भरारी पथकाने गोवंडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसारगोवंडी पोलिस ठाण्यात भगवान बोडके आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली आहे.


Featured post

Lakshvedhi