Saturday, 2 November 2024

फक्त 3मिनिट

 दारावरची बेल वाजली. वंदनाताई दार उघडायला लगबगीने उठल्या. मुख्य दरवाजा उघडून सेफ्टी डोअर उघडणार इतक्यात बाहेरून आवाज आला


 *"ताई नका दार उघडू".* 


 समोर एक रुबाबदार, काळी सावळी बाई उभी होती. बाई कसली जेमतेम 

तिशीतली मुलगीच ती. छानशी पिवळसर रंगाची कॉटनची साडी, गळ्यात एक छानशी बॅग आणि कपाळाला छोटीशी टिकली. अतिशय मोहक व्यक्तिमत्व होते ते.


म्हणाली, मला फक्त तुमची तीन मिनिटे हवी आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. अपेक्षा एवढीच आहे की फक्त मला तीन मिनिटे तुमच्याशी शांतपणे बोलायचे आहे.

मी कुठलीही स्कीम घेऊन आले नाही, मी सेल्समन देखील नाही. फक्त आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचेत.


मी बोलेन पण तुमची परवानगी असेल तरच. 


 वंदनाताई ना काय बोलावे सुचेना. त्या दोन क्षण स्तब्ध झाल्या आणि म्हणाल्या ठीक आहे हरकत नाही मी दार न उघडता ऐकेन तुमचे.


हे बघा ताई मी तुम्हाला बाहेरूनच नमस्कार करते तुम्ही जर हिंदू असाल आणि थोड्याशा आस्तिक असाल तरच मी तुमचा वेळ घेईन.


वंदनाताईंनी  होकारार्थी मान हलवली. 

 

आमची एक संस्था आहे "भान" नावाची. आम्ही सगळ्या हिंदू लोकांना फक्त एक जाणीव करून देतो आपल्या कर्तव्याची. आमची एक दिनचर्या आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने वागावे अशी माफक अपेक्षा आहे आमचा संस्थेची.

 प्रत्येक कार्यकर्त्यांनी एका महिन्यात निदान 25 घरी तरी ही जाणीव करून द्यावी अशी अपेक्षा आहे आमच्या संस्थेची. 


अख्या महाराष्ट्रात हा उपक्रम चालू आहे. गणेश चतुर्थी पासूनच सुरुवात केली आहे आम्ही. आमचे टार्गेट आहे निदान एक लाख लोकांपर्यंत पोचण्याचे. 

दररोज नवीन नवीन कार्यकर्ते आमच्या संस्थेत येत असल्याने हे टार्गेट काही फार अशक्य नाही. 


आमच्या संस्थेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही धार्मिक संस्थेशी सुतराम संबंध नाही. आम्ही एक पैसा देखील कोणाकडून घेत नाही, कोणाला त्यांचा मोबाईल नंबर विचारत नाही. एवढेच काय कोणाच्याही घरात जाण्याची देखील आम्हाला परवानगी नाही.


वंदनाताईंनी या मुलीला मध्येच थांबूवून सांगितले, अहो काही संकोच बाळगू नका तीन मिनिटे काय तीस मिनिटे सुद्धा मी ऐकायला तयार आहे. करा सुरुवात.


ताईने सुरुवात केली......आपल्यातील बरेच लोक कर्मकांडांच्या मागे असतात आणि काहीतरी अपेक्षेने देवाच्या मागे लागतात आणि येता जाता नमस्कार करत सुटतात. अगदी रस्त्यात कुठलेही देऊळ दिसले तरी यांचा हात अर्धवट छातीवर जातो व त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. 


आमच्या अपेक्षा......

शक्यतो सूर्योदयाच्या वेळी सूर्याला किंवा पूर्वेकडे बघून नमस्कार करा.


सकाळी उठल्यावर घरातील तुमच्या आवडत्या ठिकाणी  किंवा देवघरा जवळ बसून कुलदेवतेचे स्मरण करा.


मग तुमच्या आई-बाबांना नमस्कार करा मनातल्या मनात.


तुमचे पूर्वज मनातल्या मनात आठवा, चार पिढ्या मागे जा व त्यांचे स्मरण करा. हेच खरे श्राद्ध. रोजच पितृपक्ष म्हणा हवे तर.


पृथ्वी तेज आप वायू आकाश या आपल्या खऱ्या देवता.

सकाळी चहा करायला गॅस पेटवाल तेव्हा आधी त्या ज्योतीला नमस्कार करा कारण तोच अग्नी. 


मग येतो पाण्याचा नंबर त्यालाही हात जोडा.


संध्याकाळी किंवा रात्री चंद्राकडे बघण्याचा प्रयत्न करा नमस्कार नाही केला तरी चालेल.


संध्याकाळी शक्यतो भीमसेनी  कापुराची आरती घरात फिरवा.


महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बरोबर चंद्रोदयाच्या वेळी शक्य झाले तर घरातील सगळ्यांनी चंद्राचे दर्शन घ्या.


आणि सगळ्यात महत्त्वाचे.....आपल्या घरात कोणी लहान मुले असतील तर त्यांना देखील या सवयी लावण्याचा प्रयत्न करा ते अतिशय महत्त्वाचे आहे. 


आठवड्यातील एका ठराविक वारी नित्यनेमाने तुमच्या आवडत्या व स्वच्छ अशा देवळात जा. देवळात जर घंटा असेल तर शक्यतो हळू आवाजात घंटा वाजवून घंटेच्या खाली शांतपणे उभे राहा. 

आणि हो, एक सांगायचे राहिले की देवळात जाताना किंवा येताना जर भिकारी दिसले तर त्यांना शक्यतो भिक्षा देऊ नका. भीक मागणे हा त्यांचा व्यवसाय आहे, ते गरजू नाहीत.


आणि सगळयात शेवटचे....

तुमची आवडती आरती, स्तोत्र, तेही नाही जमले तर अगदी एखादे क्लासिकल भारतीय गाणे म्हणा तेही घरातील सर्व मंडळींनी, सामुदायिक पणे आणि रोज. 


या सगळ्यात महत्त्वाचे आहे ते सातत्य आणि ठराविक वेळ.


बस, धन्यवाद  काकू. माझी तीन मिनिटे संपली. 


आमची संस्था तुम्ही मानत असलेले देव, स्वामी, तुमचे गुरू, तुमची श्रद्धास्थाने यात ढवळाढवळ करणार नाही. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.

  

हा होता आमचा बेसिक अभ्यासक्रम.


बस,येते मी. आमचा चौघींचा ग्रुप आहे बाकी तिघी खाली उभ्या आहेत.  तीन मिनिटाच्या वर बोलले तर लगेच कॉल येईल मला. 

आमच्या संस्थेचे विचार पटले तरच मला कॉल करा. माझे नाव तन्वी.

मी येताना तुमच्या वॉचमनच्या पुस्तकात एन्ट्री केलीय, त्यात नंबर आहे माझा.  आणि हो.....येण्यापूर्वी तुमच्या सेक्रेटरीची देखील मी परवानगी घेतली आहे काळजी नसावी.


योग आला तर परत भेटूच. 


पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.


वंदनाताई कितीतरी वेळ सेफ्टी डोअर पाशी उभ्या होत्या, त्या पाठमोऱ्या तन्वी कडे बघत. आता त्यांना खूप सुरक्षित वाटत होते.


 *******संजय मुकुंद जोगळेकर***** 

9867180426

किती सुंदर धान्यलक्ष्मीची पूजा केली आहे... केवढा कृतज्ञताभाव...

 : किती सुंदर धान्यलक्ष्मीची पूजा केली आहे...

केवढा कृतज्ञताभाव...

*ही खरी आपली संस्कृती आहे...*

पार्श्वगायनात ऐकू येणारी 'मिया की तोडी' निव्वळ अप्रतिम.

[: अपत्याचे गृह प्रवेश करताना जो आनंद मिळतो तो आनंद धान्य प्रवेश


गमन विधी ने किती प्रसन्नता मिळतें 🙏💐

निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक

 निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक

 

          मुंबईदि. ०२ :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता  भारत निवडणूक आयोग यांनी खर्चविषयक सूचना सारसंग्रह २०२४ मध्ये निर्देश दिल्यानुसार उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणे आवश्यक आहे.

      उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातून उमेदवाराने आपला निवडणूक खर्च धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल असल्याची, नसल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाचीबाब म्हणून गणली जाईल.

 

0000

 

 

 


मुंबई शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर

 मुंबई शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या

दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर

 

मुंबईदि. ०२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारप्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. 

       मुंबई शहर जिल्ह्यातील धारावीसायन कोळीवाडा, वडाळामाहिमवरळी या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता तर शिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रित काम पाहत आहेत. 

 

  विधानसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी उमेदवारांचा खर्च तपासणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 

 

खर्च तपासणीसाठी तारीख :- 

१) गुरुवार दि. ७ नोव्हेंबर २०२४ 

२) बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४

३) सोमवार दि.१८ नोव्हेंबर २०२४

 तपासणीचे ठिकाण :- सह्याद्री अतिथीगृह तळमजला बैठक कक्ष  मलबार हिलमुंबई.

तपासणीची वेळ :- सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होईल. 

 

          उमेदवारप्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे कीदैनंदिन खर्च नोंदवहीरोख नोंदवहीबँक नोंदवहीसंबंधित प्रमाणकेदेयके (खर्चाच्या पावत्या)बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे.

0000

अयोध्या की दीपावली

 अयोध्या की दीपावली 🙏 Divyata se bharpur Kshan, Mann Prafullit ho uthta Hai। 


Some lucky spiritual souls from Takshila are going to Ayodhya during Prayagraj Mahakumbh.


*14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा दिवाळीला लक्ष्मीची पूजा का केली जाते?*

 *14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा दिवाळीला लक्ष्मीची पूजा का केली जाते?*


*प्रभू श्रीराम आणि सीता मातेची पूजा का केली जात नाही?*


*दुसरे म्हणजे, दिवाळीला लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते, भगवान विष्णूची का नाही?*


*दिवाळीचा सण तर रामाशी संबंधित आहे.* 


*खर तर दिवाळी हा सण सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगांशी संबंधित आहे.*


*सत्ययुगात समुद्रमंथनामुळे त्या दिवशी माता लक्ष्मीदेवी प्रकट झाली होती, म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते.*


*त्रेतायुगात या दिवशी प्रभू श्रीरामही अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत केले, म्हणून त्याचे नाव दीपावली आहे.*


*या पर्वाची दोन नावे आहेत, लक्ष्मीपूजन जे सत्य युगाशी संबंधित आहे आणि त्रेतायुगातील प्रभू श्रीराम आणि दिवे यांच्याशी संबंधित दुजा दिवाळी.*


*माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे नाते काय?*


*आणि दिवाळीत या दोघांची पूजा का केली जाते?*


*सागरमंथनात माता लक्ष्मी जी सापडल्या, भगवान विष्णूनी त्यांच्याशी लग्न केले आणि त्यांना सृष्टीची धन संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवी बनवण्यात आले.*


*माता लक्ष्मीजींनी धन संपत्ती वाटण्यासाठी कुबेराला आपल्यासोबत ठेवले, कुबेर खूप कंजूस होता, त्याने धन वाटलेच नाही उलट तो स्वतःच धनाचा भंडारी होऊन बसला, हे पाहून माता लक्ष्मी दुःखी झाल्या, त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळत नव्हता. त्यांनी आपली व्यथा भगवान विष्णूना सांगितली. भगवान विष्णूंनी सांगितले की, कुबेराच्या जागी संपत्ती वाटण्याचे काम दुसऱ्यावर सोपवा. माता लक्ष्मीजी म्हणाली की यक्षांचा राजा कुबेर हा माझा महान भक्त आहे, त्याला वाईट वाटेल.  तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना गणपतीच्या अफाट बुद्धीचा उपयोग करण्याचा सल्ला दिला, माता लक्ष्मीजीनीही गणेशजींना कुबेरा सोबत ठेवले.*


*गणेशजी अतिशय बुद्धिमान होते. ते बोलले, माताश्री, मी तुम्हाला कोणाचेही नाव सांगेल, त्यांना तुम्ही कृपा आशीर्वाद द्या. मला कुठलाही उलट किंतू परंतु प्रश्न विचारू नका, माता लक्ष्मीजी हो म्हणाल्या , व गणेशजींनी लोकांच्या धन सौभाग्याचे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली.*


*कुबेर फक्त पाहत राहिला आणि अशा प्रकारे कुबेरांच्या भांडाऱ्याची द्वारे गणेशजीनी उघड केली.*


*भगवान गणेशाची आपल्या भक्तांप्रती असलेली प्रेमळ कृपा पाहून माता लक्ष्मीने आपला मानसपुत्र श्री गणेश याला आशीर्वाद दिला की ज्यावेळी माझे पती नारायण माझ्या सोबत नसतील त्यावेळी माझा पुत्र म्हणून तू माझ्यासोबत रहावे.*


*दिवाळी अश्विन अमावस्येला येते, त्यावेळी भगवान विष्णू योग निद्रामध्ये असतात, ते अकरा दिवसांनी देव उथनी एकादशीला जागे होतात.*


*शरद पौर्णिमा आणि दिवाळी या मधील पंधरा दिवसांत माता लक्ष्मीला पृथ्वी भ्रमण करण्यासाठी यावे लागते, म्हणून त्या आपला मानसपुत्र गणेशजींना सोबत घेऊन येतात, म्हणून दिवाळीला लक्ष्मी गणेशाची पूजा केली जाते.*


*Happy Diwali*🪔🎉

Friday, 1 November 2024

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त

 मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी

सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च  निवडणूक निरीक्षक नियुक्त

 

मुंबईदि. ०१ :  मा.भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी सर्वसाधारणपोलीस आणि खर्च  निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारणदोन खर्च आणि एक पोलिस निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.धारावी व सायन कोळीवाडा या मतदार संघासाठी  सत्यप्रकाश टी. एल. (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१६९६४०२ आणि ई-मेल आयडी dharavisionkoliwadagenobserver@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. वडाळा व  माहिम या मतदार संघासाठी हिमांशू गुप्ता (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ८९२८७९३६०१ आणि ई-मेल आयडी wadalamahim genobserver@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. वरळी व शिवडी या मतदार संघासाठी समीर वर्मा (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१३८१८३२ आणि ई-मेल आयडी worlishivadigenobserver@gmail.com हा आहे. नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. भायखळा व मलबार हिल या मतदार संघासाठी अंजना एम.(भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९१३७३७२५४३ आणि ई-मेल आयडी bycullamalabarhill genobserver@gmail.com  हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. मुंबादेवी व कुलाबा या मतदार संघासाठी शिल्पा शिंदे (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९१३७३७८१८३ आणि ई-मेल आयडी mumbadevicolaba genobserver@gmail.com हा आहे. यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ असणार वाजेपर्यंत आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजी (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण एलवीन गेस्ट हाऊसहेन्री रोडअपोलो बंदरमुंबई असून संपर्क क्रमांक  ८५९१७४३२६८ आणि ई-मेल आयडी observerpolicemumbaicity@gmail.com हा आहे. नागरिकांनी भेटण्याची वेळ दुपारी १२ ते  १ वाजेपर्यंत असणार आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील धारावीसायन कोळीवाडा,वडाळामाहिमवरळी या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता (भा.राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४००२१६ आणि ई-मेल आयडी exp178to182@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. शिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रित (भा.राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४७४०७३ आणि ई-मेल आयडी  exp183to187 @gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) प्रत्यक्ष उपस्थित राहून  पाहणी करतील. केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभागकायदा– सुव्यवस्था याबाबत  हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील. केंद्रीय खर्च निरीक्षक उमेदवारांच्या खर्चाची तपासणीबाबत कामकाज पाहणार आहेत.

0000


 

Featured post

Lakshvedhi