Friday, 1 November 2024

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा


मुंबई, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) सत्यप्रकाश टी. एल.हिमांशू गुप्तासमीर वर्माअंजना एम.शिल्पा शिंदेकेंद्रीय निवडणूक पोलिस निरीक्षक पोनुगुंतला रामजी आणि केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी विधानसभा कामकाजासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजासंबंधी माहिती जाणून घेतली.

बैठकीत मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित निवडणुकीच्या कामकाजविषयक केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विधानसभा मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी जोशीमुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवपोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरीमुंबई दक्षिण विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुखआणि मध्य मुंबईचे अपर पोलिस आयुक्त अनिल पारसकरसमन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजनसमन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजूसिंग पवारप्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादमउपजिल्हा निवडणूक अधिकारी शामसुंदर सुरवसे समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानीसमन्वय अधिकारी (तक्रार व्यवस्थापन-निवारण व मतदार हेल्पलाईन ) राजू थोटेसमन्वय अधिकारी (स्वीप) विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती जोशी यांनी मतदान केंद्रांवर सुरळीत आणि वेळेत मतदान होण्यासाठी केलेल्या पूर्व नियोजनाबद्दलप्रत्येक विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्याचेफ्लाईंग स्कॉडस्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमने केलेल्या कामाबाबत माहिती दिली. मतदार यादीत नावनोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले की, "भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व समन्वय अधिकारी कार्यवाही करत आहेत. मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात स्वीप अभियानांतर्गत मतदार जनजागृतीवर भर दिला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्प पत्र आणि फ्लॅश मॉब यासारख्या विविध माध्यमांतून प्रभावीपणे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. एसएसटीएफएसटी पथके कार्यान्वित केली आहेत. सी-व्हिजिलवर ॲपवर आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. सर्व विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत."

पोलिस प्रशासनाने मुंबई शहर जिल्ह्यात मतदान निष्पक्षशांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य समन्वय असल्याची माहिती दिली.

यावेळी नोडल अधिकारी (स्वीप) यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक खर्च समितीप्रसारमाध्यम कक्षआचारसंहिता कक्षभरारी पथकपरिवहन व्यवस्थापनपोस्टल बॅलेट तसेच इतर नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक पूर्वतयारीसंदर्भात सादरीकरण केले.

००००

Thursday, 31 October 2024

राज्यात 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभरी पार केलेले 47 हजार 392 मतदार

 राज्यात 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 तर

वयाची शंभरी पार केलेले 47 हजार 392 मतदार

 

मुंबईदि. 31 : राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले 47 हजार 392 मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            राज्यातील एकूण मतदारांमध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला तर 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार असे एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 मतदारांमध्ये पुरुष मतदार 12 लाख 91 हजार 8479 लाख 30 हजार 704 महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 153 इतकी आहे. 20 ते 29 या वयोगटातील एकूण 1 कोटी 88 लाख 45 हजार 005 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 1 लाख 62 हजार 412महिला मतदार 86 लाख 80 हजार 199 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2394 इतकी आहे. 30 ते 39 या वयोगटातील एकूण 2 कोटी 18 लाख 15 हजार 278 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 11 लाख 21 हजार 577महिला मतदार 1 कोटी 6 लाख 91 हजार 582 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 हजार 119 इतकी आहे.

            40 ते 49 या वयोगटातील एकूण 2 कोटी 7 लाख 30 हजार 598 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 7 लाख 49 हजार 932महिला मतदार 99 लाख 79 हजार 776 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 890 इतकी आहे. 50 ते 59 या वयोगटातील एकूण 1 कोटी 56 लाख 10 हजार 794 मतदारांमध्ये पुरुष मतदार 78 लाख 54 हजार 052महिला मतदार 77 लाख 56 हजार 408 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 334 इतकी आहे. 60 ते 69 या वयोगटातील एकूण 99 लाख 18 हजार 520 मतदारांमध्ये पुरुष मतदार 50 लाख 72 हजार 362महिला मतदार 48 लाख 46 हजार 25 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 133 इतकी आहे.

वर्ष 70 ते 79 या वयोगटातील एकूण 53 लाख 52 हजार 832 मतदारांमध्ये पुरुष मतदार 26 लाख 36 हजार 345महिला मतदार 27 लाख 16 हजार 424 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 63 इतकी आहे. 80 ते 89 या वयोगटातील एकूण 20 लाख 33 हजार 958 मतदारांमध्ये पुरुष मतदार 9 लाख 15 हजार 798महिला मतदार 11 लाख 18 हजार 147 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 13 इतकी आहे. 90 ते 99 या वयोगटातील एकूण 4 लाख 48 हजार 38 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 लाख 97 हजार 323 तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 50 हजार 715 इतकी आहे.

वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या 100 ते 109 या वयोगटातील एकूण 47 हजार 169 मतदारांमध्ये पुरुष मतदार 20 हजार 983महिला मतदार 26 हजार 184 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 आहे. 110 ते 119 या वयोगटातील एकूण 113 मतदारांमध्ये पुरुष मतदार 52 तर महिला मतदारांची संख्या 61 आहे. तर 120 हून अधिक वयोगटातील 110 मतदारांमध्ये पुरुष मतदार 56 तर महिला मतदारांची संख्या 54 आहे.

            विशेष वयोगटामध्ये 85 ते 150 वयोगटामधील एकूण 12 लाख 40 हजार 919 मतदारांमध्ये 5 लाख 42 हजार 891 पुरुष6 लाख 98 हजार 022 महिला आणि 6 तृतीयपंथी मतदार आहेत. तर 100 ते 150 वयोगटामधील एकूण 47 हजार 392 मतदारांमध्ये 21 हजार 91 पुरुष26 हजार 299 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार 3 लाख 84 हजार 69महिला मतदार 2 लाख 57 हजार 317 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 39 इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स)  एकूण 1 लाख 16 हजार 170 मतदारांमध्ये 1 लाख 12 हजार 318 पुरुष तर 3 हजार 852 महिला मतदार आहेत.

            राज्यात मतदानासाठी एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र असणार आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

00000


निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

  निवडणुकीसाठी राज्यात

९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

 

मुंबईदि. ३१ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरूष मतदार तर ३ हजार ८५२ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.

राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे.


महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध

 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध

 

मुंबईदि. ३१ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

00000

एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

 एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

 

 

मुंबईदि.31  अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज अभिनंदन केले.

काम्याने बुधवारी (दि. 30) आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांचेसह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली. 

 मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवलाअसल्याचे तिच्या वडिलांनी यावेळी सांगितले.

मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन शाळेची बारावीची विद्यार्थिनी असलेल्या  काम्याने मिशन "साहस" अंतर्गत प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचा तसेच दोन्ही ध्रुवांवर स्की करण्याचा संकल्प केल्याचे तिने सांगितले.

0000

 

Maha Governor applauds Young Mountaineering Prodigy

 

Mumbai Dated ३१ :Maharashtra Governor C P Radhakrishnan congratulated Kaamya Karthikeyan, the १६ year old mountaineering prodigy, who recently became India's youngest and the world's second youngest to scale Mount Everest from Nepal.

Kaamya, a class XII student at Navy Children School, accompanied by her father Cdr S Karthikeyan and mother Lavanya met the Governor at  Raj Bhavan Mumbai on Wednesday (३०th Oct)

 The Governor blessed the young mountaineer in her mission "SAHAS"which aims at climbing the highest peak in each continent and ski to both poles.

 

 

0000

 

 

 

 


🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻नरकचतुर्दश *अभ्यंगस्नानाची* संगीत

 ⚜🔆🚩🔆🕉🔆🚩🔆⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                   

                 *नरकचतुर्दशी*

               *अभ्यंगस्नानाची*


        *सैनिकांविषयी कृतज्ञतेची*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *🪔 दीपोत्सव विशेष पर्व  🪔*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🌹🔆🌸🔱🪔🔱🌸🔆🌹


        *गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।*

        *नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं ॥* 


        *आज दीपोत्सवातील तनामनाला अत्यंत सुखावणारा नरकचतुर्दशी.. अभ्यंग स्नानाचा दिवस.*

        *बाहेर धुक्याची चादर पसरलीय. बोचरे वारेही सुरु आहेत. आकाश कंदीलाच्या प्रकाशात अंगणातील शुभदायी रंगीबेरंगी रांगोळी आणखी खुलल्यात. पण थंडीची पर्वा न करता भारवर्षातील लोकांची सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नानाची लगबग सुरु आहे.*

        *बदलत्या ऋतूचा.. थंडीचा सामना करण्यासाठी शरीराला अत्यावश्यक हे स्नान. आज राजालाही हेवा वाटावा असे सुख जनसामान्य आज उपभोगतात. औक्षण करून तीळाचे तेल.. उटणे लावून होणारे हे पवित्र अभ्यंग स्नान. उटणे याला आयुर्वेदीय मान्यता आहे. नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद, मसूर डाळ, जटामासी, वाळा इ. औषधीचे हे चूर्ण. या उटण्याचे लेपन करुन नंतर होणारे हे स्नान शरीर.. मन टवटवीत.. प्रफुल्लीत करणारे.*

        *यानंतर नववस्त्रे परिधान करुन देवपूजा होणार. दिवाळी फराळाचा नैवेद्य दाखवला जाणार. वर्षभर आरोग्यासाठी गरजेचे हे अभ्यंग स्नान व्हावे म्हणून आज अभ्यंग स्नान करणारा नरकात जाणार नाही हा कृष्ण वरदानाचा श्रद्धा भाव जोडला गेलाय.* 

        *आमच्या पुराणकथा सदैव.. प्रेरणादायी. प्रत्येक युगात देव आणि दानव वृत्ती असणारच. दुर्जनांना अस्त्र शस्त्र शक्ती लाभते तेव्हा ते नेहेमीच जन सामान्यांना वेठीस धरतात.*

        *एखाद्या खेळात विजय प्राप्त झाला तरीही लोकं आनंदाने जल्लोष करतात. मग जेव्हा अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या जनतेची त्यातून कायमची सुटका होते.. अत्याचारी दानवाचा अंत होतो तेव्हा तर आनंदाला पारावर नसतो. त्रेता युगात रावण संपला म्हणून श्रीरामाच्या स्वागताला दिवाळी साजरी झाली.*  

        *व्दापार युगात प्रागज्योतिष्यपूर राज्यातील नरकासूर दैत्याने अत्याचाराचा कळस गाठला होता. सोळा सहस्त्र निरपराध स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. त्यांच्या मुक्ततेसाठी श्रीकृष्णानं सत्यभामेकडून त्याला यमसदनी धाडले. अन्यायाने जीणे नकोसे झालेल्यांचा हा स्वातंत्र्य दिनच.*

        *नरकासूराच्या अत्याचाराच्या बळी पिडीतांचा उद्धार व्हावा, बंदिवान स्त्रियांना समाजात सन्मान मिळावा म्हणून श्रीकृष्णानं त्यांना आपले नाव देत त्यांना संरक्षण दिले. असूर ही वृत्ती आहे. सामान्याच्याही मनात ती उसळी घेते तेव्हा तो पण असूर होतो.* 

        *या नरकासूराचा अंत होताच जनतेने मुक्त श्वास घेत आनंदोत्सव केला. लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशवाट उजळली, म्हणून आजही मनोमनीचा अंधार नष्ट होण्यासाठी "तमसो मा ज्योर्तिगमय" हे वरदान मागायचे. भारतीय संस्कृतीचा दिपोत्सव शांत.. सुसंस्कृत.. आनंदी आदर्श जीवन कसे जगावे हे शिकवतो.*

        *नरकासुरासह सगळ्याच असुरांचे निर्दालन करुन भक्त कल्याण करणाऱ्या श्रीकृष्णाला वंदन करुया.* .

▪️▫️▪️▫️▪️▫️▪️

        *भारताचा आज पर्यंत झालेला विकास.. सगळ्याच क्षेत्रातील गगनभरारी.. साधनसंपत्ती, नागरिकांचे सुख आणि मुख्य म्हणजे देशातील शांतता.. एकात्मता हे शेजारी देशांना डोळ्यांत सलते. मग ते देशावर आक्रमणाचा सतत अयशस्वी प्रयत्न करतात.*

        *आमची भूमी बळकावणे शत्रूला आजवर शक्य झालेले नाही.. आणि होणारही नाही. आमचे शूर सैनिक सीमेवर अहोरात्र अखंड सावध राहून जागता पहारा ठेवतात. आमचे वीर सैनिक प्रतिकूल हवामान जीवघेणी थंडी.. वादळवारा.. पाऊस कशाचीही पर्वा न करता लढतात. प्रसंगी देशासाठी सर्वोच्च असे बलिदानही देतात.*

        *देशात दिवाळी आनंदाने संपन्न होताना देशवासीयांनाही याची तेवढीच जाण आहे. सैनिकांच्या पराक्रमाने त्यांचा उर भरुन येतो. सारे देशवासी सैनिकांविषयी कृतज्ञ आहेत. सैनिकांविषयी सार्थ अभिमान वाटतो. सैनिकांविषयी देशवासियांना प्रेम आहे. या पराक्रमी सैनिकांना शतशः वंदन. दिवाळीच्या शुभेच्छा !!*

        *आपण आहात म्हणून आम्ही आहोत.. आमची ही सुखद.. हर्षोल्हासी दिवाळी साजरी होत आहे.*

*वंदे मातरम्.. !!*

*🇮🇳 जयहिंद 🇮🇳*

              

🌸🔱🌷🌺🙏🌺🌷🔱🌸

  

  *धीर धरि धीर धरी*

  *जागृत गिरीधारी*

  *तारितसे भाविकांस*

  *तोच चक्रधारी ॥*


  *अढळ पदी अंबरात*

  *बसविले धृवाला*

  *संकटात पीतांबर*

  *दिला द्रौपदीला*

  *दिधली वैकुंठपेठ*

  *सकल गोकुळाला*

  *ऐसा दाता थोर*

  *कुंजवन-विहारी ॥*


  *होसी का भयकंपित*

  *धरसि का शंका ?*

  *गाजतसे वाजतसे*

  *तयाचाच डंका*

  *'जय गोविंद जय मुकुंद*

  *जय जय सुखकारी' ॥*


⚛️🪔🌸🔆🪔🔆🌸🪔⚛️


  *गीत : विद्याधर गोखले*  ✍️

  *संगीत : पं. राम मराठे*

  *स्वर : पं. वसंतराव देशपांडे*

  *नाटक : मेघमल्हार*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-३१.१०.२०२४-*


🌻🌸🪔🔆🌺🔆🪔🌸🌻

a Senior citizen help line phone no. 14567 (just dial the number *directly* without any area code or any

 Dear all,


I wish to inform you all that the Govt. of India has set up a Senior citizen help line phone no. 14567 (just dial the number *directly* without any area code or any prefix).  I checked on this phone and I was pleasantly surprised by the response by a lady.  This centre provides any help / support needed by Senior citizens between 8 am and 8 pm.  One can refer to a case of Senior citizens in distress, medical help needed, or protection from harassment, vaccination centres nearby etc.  I was very impressed by the person who expressed concern with the  promise for immediate help.  I would suggest we must share and circulate this information widely to help those in need of help.


Please note that the service is available between 8 am to 8 pm only and this service is available in every State except in Haryana and West Bengal, where it has not started as yet but will shortly.  Will you please circulate this message to all the Senior citizens in your circle (friends, relatives, neighbours).  This is a great initiative taken by the Government of India and will definitely extend benefits to those Senior citizens who are in need of assistance.

 

Very informative, it’s working.  Please share the same in all of your groups.

Featured post

Lakshvedhi