Wednesday, 30 October 2024

निवडणूक प्रक्रियेत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

 निवडणूक प्रक्रियेत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा               

 

निवडणूक निरीक्षक गोपाल चंद , निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा

 

धाराशिव दि.३० (माध्यम कक्ष) :  येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर  सोपविण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रियेच्या कामात कोणतीही चुक होणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.असे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) गोपाल चंद यांनी दिले.

 

२९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विधानसभा निवडणूक कामकाजाचा आढावा घेतांना श्री.चंद बोलत होते.यावेळी निवडणूक निरीक्षक ( सामान्य) श्री.पंकज कुमार, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, निवडणूक निरीक्षक (खर्च) अलुरु व्यंकट राव निवडणूक निरीक्षक (पोलीस) आर एस.बेलवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

श्री पंकज कुमार म्हणाले,उमेदवारांच्या नामांकन अर्जाची छाननी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावी. छाननी करताना ती अतिशय काळजीपूर्वक आणि दक्षतेनी करावी. छाननीच्या वेळी आवश्यक तेवढा पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

 

 डॉ.श्री.ओंबासे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.स्थिर पथके व फिरती पथके आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.आंतरराज्य व जिल्ह्याच्या सीमेवर पुरेसा पोलीस व निवडणुक यंत्रणाचा कर्मचारी वर्ग २४ तास तपासणी नाक्यावर उपस्थित राहणार आहे. बॅरिकेट्स व सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी व कर्मचारी प्रत्येक वाहनाची तपासणी करून रोख रक्कम, मद्य वाहतूक होत आहे का तसेच संशयास्पद बाबीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          जिल्ह्यातील मतदार संघातील मतदान केंद्र, मतदार, क्रिटिकल मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेसाठी लागणारे मनुष्यबळ, क्षेत्रीय वाहतूक नियोजन याबाबतची माहिती डॉ.ओंबासे यांनी दिली.

निवडणूक निरीक्षकांनी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आवश्यकता त्या सूचना दिल्या व निवडणुकीच्या तयारीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.बारगजे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमी जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून हातभट्टीच्या दारुसह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी दिली. या बैठकीला सर्व नोडल अधिकारी, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक ए.एम.पिललेवार, राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त एन.व्ही.शिंदे, आयकर अधिकारी संजय पानसरे व डाक विभागाचे अधीक्षक श्री.अंबेकर उपस्थित होते.


भारत की विविधता, विविधता मे भारत


 

हायातीच दाखला 30पेन्शन धारक साठी


 

*दीपोत्सवातील कलेच्या* *आस्वादाची*

 🌹⚜🌻🔆🌅🔆🌻⚜🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

        

         *दीपोत्सवातील कलेच्या*

                 *आस्वादाची*              


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

           *दीपावली विशेष पर्व*  

            ⚜️⚜️🪔⚜️⚜️


⚜🌺☘🔆🪔🔆☘🌺⚜


        *भारतीय संस्कृती आणि कला यांचे अतूट नाते आहे. कलोपासना ही स्वानंदासाठी असली तरीही त्या सृजनाचा आनंद संपूर्ण विश्वाला होतो.*

        *भारतवर्षातील समस्त महिला वर्गाने परंपरेने जपलेला स्वतःसोबत इतरांना आनंद वाटणारा कलाप्रकार म्हणजे रांगोळी. दिवाळी आणि रंगवल्ली अगदी प्राचीन.. वेदकाळापासूनचे नाते.*  

        *रंगवल्ली हे नावही कित्ती सुंदर आहे ना.. नाव उच्चारताच मन रंगून जाते ते बालपणीच्या दिवाळीच्या गोड आठवणीत. घरोघरी भल्या पहाटे अंगण झाडून सडासमार्जन व्हायचे. सड्याचा आणि बागेतील फुलांचा सुगंध दरवळायचा. मग आजी, आई, ताईंची शेजारच्या मंडळींशी रांगोळी काढण्याची जणु स्पर्धा सुरु व्हायची.*           

        *भारतीय संस्कृतीचा हा वसा आजही घरोघरी जतन केला जातोय.. यामध्ये वाढ होतेय. रांगोळी जी मांगल्य.. उदारता.. शक्ती प्रदान करते. दिवाळी म्हणजे तर सुंदर.. कलात्मक रांगोळी रेखाटनाची पर्वणीच. रांगोळी शिवाय दिवाळी ही कल्पनाही अशक्य. रांगोळी म्हणजे सौंदर्याचा साक्षात्कार.. मांगल्याची सिद्धी.*

        *घर लहान असो वा मोठे, मोठे कार्य असो वा नसो, नित्य उंबरा.. देवघर.. तुळशीच्या वृंदावनासमोर शुभ रांगोळी ही हवीच. प्रत्येक भारतीय महिलांना उपजत येणारी ही कला. आईने रेखाटलेल्या रांगोळी बघताना लुडबुड करणाऱ्या बालिका केव्हा यामध्ये तरबेज होतात हे कळतच नाही. दिवाळीत मग पहिले तजविज केली जाते ती रांगोळीच्या विविध रंगांची. रोज कोणकोणत्या प्रकारच्या रांगोळी काढायच्या हे ठरविले जाते. तर कधी नकळत स्वयंप्रेरणेने रांगोळी साकारली जाते.*          

        *रांगोळीच्या आकृतीप्रधान.. वल्लरीप्रधान आणि ठिपक्यांची रांगोळी या  तीन प्रकारचे दर्शन घरोघरी घडते. रांगोळी काढणे आरोग्यदायी व्यायामच. यामुळे ठराविक वेळ.. विशिष्ट पद्धतीने बसण्याची सवय होते. यामध्ये निष्ठेचे दर्शन घडते. एकाग्रता.. संयम वाढविणारी ही रांगोळी.*

        *सुरेख रेघा आणि रंगसंगती जमली की रस्त्यावरून जाणाऱ्यांची पाऊले थबकतात. शेजारच्यांशी निखळ स्पर्धा करायला शिकवणारी.. स्वानंद देणारी ही कला. यामुळे एकमेकांचा फायदा होतो. दिवाळीतील आमच्या घरातील फराळाचे पदार्थ कसे झाले याबरोबरच रांगोळी रेखाटन किती सुंदर झाले हाही विषय आनंद देतो. आज समाज माध्यमाच्या मदतीने विदेशातही याचे फोटो पाठवून आप्ताना आनंद वाटता येतो.*            

        *तुमची कला, त्याची साधना.. त्यात नैपुण्य प्राप्ती साठी उपसलेले कष्ट हे जेव्हा लोकांच्या समोर पोहोचतात तेव्हाच कलावंत आणि कलेचा उदगाता सुखावतो. गावोगाव दिवाळीत होणाऱ्या 'दिवाळी पहाट' संगीत कार्यक्रमात म्हणूनच हजारो लोक आस्वादासाठी जमतात. उत्तमोत्तम संगीताचा 'दिवाळी पहाट' च्या निमित्ताने रसिकांना आस्वाद घेता येतो. नव्या पिढीतही किती प्रतिभावंत कलाकार आहेत, गुणवत्ता आहे याची प्रचिती येते.*


🌟🏮🎶🎊🪔🎊🎶🏮🌟

  1️⃣

  *पानाफुलांचे तोरण दारी*

  *अंगणी देखणी साजे रांगोळी*

  *उटण्याचा सुगंध साऱ्या* 

  *शिवारी पसरुदे*

  *सुखाची चाहूल होऊ दे*

  *सारे दुःख ते विसरू दे*


  *फुलवाती अंगणात सोनसकाळी*

  *सौख्य जणू भरुनी*

  *हे आले ओंजळी*

  *आली दिवाळी, आली दिवाळी*


  *दिन दिन दिवाळी*

  *गाई म्हशी ओवाळी*

  *गाई म्हशी कुणाच्या*

  *माझ्या लक्षुमणाच्या*

  *......*

  *गीत : शशांक कोंडविलकर*  ✍️

  *संगीत : शशांक कोंडविलकर*

  *स्वर : युक्ता पाटील आणि*

  *सत्यम पाटील*


⚜🌺⚜🎶🥀🎶⚜🌺⚜

  2️⃣

  *घर हे माझे आनंदाचे*

  *दाराशी सुरेख नक्षी*

  *जोडीत जाती मना मनाला*

  *नात्यांचे हळवे पक्षी*

  *या वातीला वात मिळुनी*

  *आसमंत उजळी*

  *सांगते कथा घराची*

  *माझी ठिपक्यांची रांगोळी*


  *रचूनी एक एक वीट*

  *बांधले मायेचे घरकुल*

  *होईल दुरावा दूर,*

  *टाकता हसून पुढे पाऊल*

  *दृष्ट घराची काढण्याला*

  *सूर्य ये सकाळी*

  *नांदते सुखात अवधी*

  *माझी ठिपक्यांची रांगोळी*


  *गीत : रोहिणी निनावे*  ✍

  *संगीत : निलेश मोहरीर*

  *स्वर : सई टेंभेकर*

  *शिर्षक गीत : ठिपक्यांची रांगोळी*

  

  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-३०.१०.२०२४-*


🌻⚜🌺🌟🏮🌟🌺⚜️🌻

एक् salute

 रस्त्यावरच्या भटक्या गाई वाहनचालकांना दुरूनही दिसाव्यात आणि अपघात टळावा यासाठी गाईंच्या गळ्यात लाल पट्टा अडकवणाऱ्या या पोलीसबंधूने “वसुबारस” खऱ्या अर्थाने साजरी केली.


आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

 आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’


 


            विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


            आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत.


आचारसंहिता काळात काय करावे?


            निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणे, पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.


प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या, सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.


आचारसंहिता काळात काय करू नये?


            निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. उमेदवार आणि मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणाही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. शासकीय काम आणि निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार यांची सरमिसळ करू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नये. वेगवेगळ्या जाती, समूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासाठी करू नये. मतदारांना लाच देणे, दारुचे वाटप करणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण वा धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टींना मनाई आहे.


इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत. याचबरोबर मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.


            आचारसंहितेच्या या तत्त्वांचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांनी सी-व्हिजील ॲपवर ध्वनीमुद्रण, ध्वनीचित्रमुद्रण या माध्यमातून तक्रार करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्या

त आले आहे.


0000


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

बंदोबस्तात वाढठिकठिकाणी तपासणी

तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. 29 :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्‍यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आदर्श आचारसंहितेची 28 पथके स्थापन करण्यात आली आहेत. 211-भरारी पथके, 226- स्थिर पाहणी पथके, 172- व्हिडिओ निगराणी पथके,65- व्हिडिओ पाहणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. 105- तपासणी नाके आहेत.

 

तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

निवडणूक काळात नागरिकांनी, व्यापाऱ्यांनीव्यावसायिकांनी कोणतेही साहित्यरकमा सोबत ठेवतांना त्‍यासंदर्भाचे योग्य दस्‍तऐवज सोबत ठेवावेतअसे आवाहन प्रशासनाने केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून दाखल झालेले निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून जिल्ह्यातील जप्ती प्रकरणातील आढावा घेण्यात येत आहे.

विविध यंत्रणांकडून तपासणी

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापरमद्याचा मोफत पुरवठाभेटवस्तूंचे वाटपकिंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नयेयासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्सराज्य उत्पादन शुल्ककेंद्रीय वस्तू आणि सेवा करराज्य वस्तू आणि सेवा करव्यावसायिक करअमली पदार्थ नियंत्रण दलसीमा सुरक्षा दलसशस्त्र सीमा दलपोलीस दल केंद्रीयऔद्योगिक सुरक्षा दलभारतीय किनारा दलरेल्वे संरक्षण दलपोस्ट विभागवन विभागनागरी उड्डयन विभागविमानतळ प्राधिकरणराज्य नागरी विमान वाहतूक विभागराज्य परिवहन विभागयांच्यासह  फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत आहेत.

निवडणूक काळात  वाहनांची कसून तपासणी होत असून दररोज हा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जात  असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.

- - - - - ००० - - - - -

Featured post

Lakshvedhi