Sunday, 6 October 2024

उपवास कसा करावा..? उपवास कोणी करु नये..? कसा उपवास कधीच करु नये

 *उपवास*

उपवास कसा करावा..? उपवास कोणी करु नये..? कसा उपवास कधीच करु नये..? चुकिच्या पद्धतीच्या उपवासाचे काय होणार तोटे..? उपवास आवर्जुन कोणी करवा..?

वरील सर्व प्रश्र्नांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे हवे असल्यास  आपणास सर्व प्रथम उपवासा बाबतची शरीरक्रिया समजुन घेऊया.

मानवी देह प्रमुख दोन प्रकारचे कामे करते. पहिला प्रकार👉 स्वत:च्या संरक्षणासाठी, स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आणि उपजिविका चालवण्यासाठी आपण शरीराकडुन कष्टाची तसेच बौद्धिक कामे करुन घेतो. हि कामे अनंत प्रकारची असतात.

दुसरा प्रकार👉 शरीर प्रकृती उत्तम राखण्यासाठी शरीर स्वत:साठी स्वत:च काही कामे करते. आपली इच्छा असो वा नसो पण शरीर स्वत:साठी ती कामे करतेच करते. ती कामे होत असताना आपण रोखुनी धरु नये. रोखुन धरल्यास आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते, त्यामुळे काही आजारांची निर्मिती होऊ शकते. ती एकुण कामे चौदा प्रकारची आहेत. त्याच  चौदा कार्यांना वेग असे म्हणतात. अपान वेग म्हणजेच पाद, मल वेग म्हणजेच शौचविधी, मुत्रवेग म्हणजे लघवी, उदार वेग म्हणजेच ढेकर, क्षवथु वेग म्हणजे शिंक, निद्रावेग म्हणजे झोप, कासवेग म्हणजे खोकला, श्रमजन्य श्वासवेग म्हणजे धाप, जृंभावेग म्हणजे जांभई, अश्रुवेग म्हणजे रडणे, वमी वेग म्हणजे उलटि, शुक्रवेग म्हणजे कामेच्छा, तृष्णावेग म्हणजे तहान आणि क्षुधा वेग म्हणजे भुख. हि एकुण चौदा कामे आहेत. जे शरीर स्वत:हुन करते. ती आपण रोखुन धरु नयेत. असे आयुर्वेदात सांगितले आहे. आता आपल्याला उपवासा बाबत माहिती घ्यायची झाल्यास वरील चौदा पैकी तृष्णा आणि क्षुधा वेगा शी म्हणजेच तहान आणि भुक याबाबत संबंध येतो. म्हणुन याच वेगांबाबत सविस्तर माहिती घेऊया.

शरीरला कार्यक्षम आणि निरोगी राखण्यासाठी उर्जेची म्हणजेच एनर्जीची आवश्यकता असते. ती एनर्जी आहारातुन मिळते. एनर्जी जेव्हा जेव्हा संपत येते तेव्हा तेव्हा आपल्याला आपोआप भुक लागते. भुक लागल्यानंतर ही काहीही न खाणे म्हणजे उपवास होय. अशी आपली सर्व सामान्यपणे धारणा असते.परंतु भुक लागल्यानंतर ही आपण आहार घेतला नाही तर शरीर बौद्धिक आणि अंगमेहनतीचे कार्य करण्यास सक्षम राहत नाही. म्हणुन उपवावासात ही अल्प प्रमाणात काही पौष्टिक फळे आणि काही प्रकारचे अन्न जसे शेंगदाणे, गुळ, भगर, बटाटे, रताळु असे खाण्यास सांगितलेलेच आहे. यालाच आपण फराळ असे नाव दिलेले आहे. ज्यामुळे शरीर कार्य चालण्यास बाधा येत नाही.

*उपवास का करावा..?*

ईश्वराप्रति भक्तिभाव तसेच आपले मन, अंतःकरण आणि शरीर शुद्धी साठी.

*उपवासाचे फायदे*

उपवासात कुलदैवताची आराधना, भक्तिभाव, देवपुजा करुन वाईट कृत्य टाळुन मन आणि अंतःकरण शुद्ध होते. आहार नियंत्रण करुन शरीर शुद्धी होते.

*शरीर शुद्धी साठी उपावास*

शरीर शुद्धि साठी प्रत्येकाच्या प्रकृती नुसार उपवास करणे आवश्यक आहे.

*खाता-पिता म्हणजेच फराळासह उपवास👉* जी लोक हमाली, मोलमजुरी, खोदकाम, बांधकाम, ऊसतोडी अशी भरपुर अंगमेहनतीचे कामे करतात त्यांनी फराळ करुनच उपवास करने हिताचे असते. म्हणुन त्यांनी खाता-पिता उपवास करावा कारण कि अशा काबाडकष्ट करणा-यांना शरीरशुद्धी ची आवश्यकता नसते किंवा क्वचित असते. त्यांनी काहीही खाल्ले नाही तर त्यांना त्यांचे काम करण्यास शरीर सक्षम नसेल.

*फक्त द्रव पदार्थांवर उपवास कोणी करावा👉* जी माणसे अंगमेहनतीचे कोणतेही काबाडकष्ट न करता फक्त बौद्धीक क्षमतेचे कामे करतात, जी माणसे दिवसभर खुर्चित बसुन कार्य करतात त्यांनी आवश्यकतेनुसार द्रव पदार्थ, फळांचा रस घेऊन उपवास करावा. पोटाला थोडासा ताण पडु द्यावा.

*काहीच न खाता उपवास कोणी करावा👉* जी माणसे शरीराने स्थुल आहेत. ज्यांची अतिरिक्त चरबी कमी होणे गरजेचे आहे. त्यांनी वेळच्यावेळी फक्त पाणी पिऊनच उपवास करावा. जेणे करून त्यांच्या शरीरातील अतिरिक्त कैलरीज उपवासाच्या दिवशी वापरात येतात. फैट्स कमी होऊन, चरबी कमी होण्यास म्हणजेच वजन नियंत्रणात राहण्यास हिताचे ठरेल.

जी माणसे मांसाहारी आहेत त्यांनी ही काहीच न खाता उपवास करावा. कारण कि मांसाहार हा पचायला अधिक वेळ लागतो, पचायला जड असतो. मांसाहारी प्राणी एकदा का शिकार केली कि बराच काळ काहीही खात नाही. जसे वाघ, सिंहा सारखे जंगली प्राणी. अजगराने एखादा का एखादा प्राणि खाल्ला कि तो एक-दोन आठवडे काहीही खात नाही. म्हणुन मांसाहारी माणसांनी वेळच्यावेळी पाणी पिऊन उपवास करावा.

थोडक्यात काय तर शरीर शुद्धि साठी उपवास करताना शरीरयष्टि नुसार आणि शाकाहारी-मांसाहारी प्रकारानुसार आपापल्या हिताचा उपवास करावा. कोणाचेही बघुन, ऐकुन आपणही तसाच उपवास करु नये.

*उपवासा बाबत गैरसमज*

1) जितका अधिक कडकडीत उपवास केला तितकि अधिक ईश्वरभक्तिचा लाभ होईल.

👉ईश्र्वर भक्ति ही आपले मन, अंतःकरण शुद्ध ठेऊन, देव-देश-धर्मा प्रति विचार आणि आचरण करुन प्राप्त होते. आहाराचा संबंध हा प्रामुख्याने शरीरशुद्धी बाबत असल्याने आपापल्या प्रकृती नुसार आहार घ्यावा.

👉अमुक एकाने कडकडीत उपवास केला म्हणुन आपणही तसाच उपवास करने. 

*❌निर्जला उपवास❌*

काही माणसे ईश्वर भक्ति तील गैर समजाने इतका कडकडीत उपवास करतात कि पाणी देखील पित नाही. यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. उपवासा बाबत बोलताना त्या अभिमानाने सांगतात कि पाण्याचा एकही घोट न घेता उपवास केला. यालाच निर्जला उपवास म्हणतात. जो पुर्णतः चुकिचा आहे, हानिकारक आहे, अवैज्ञानिक आहे. म्हणुन असा निर्जला उपवास कोणीही कधीही करु नये.🙏

त्यास कारण कि..आपण खाल्लेल्या अन्नाचे विघटन होऊन ते पचवण्यासाठी आपल्या पोटात हायट्रोक्लोरिक एसीड ची निर्मिती दर काही तासांच्या अंतराने दररोज होत असते. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे सुक्ष्म विघटन होऊन अन्न सहज पचन होते. ज्या दिवशी आपण उपवास धरला त्या दिवशी देखील नियमितपणे हायट्रोक्लोरीक एसीडची निर्मिती तर होतेच परंतु त्याची उपयुक्तता होण्यासाठी पोटात अन्न नसते. अशा वेळी आपल्या या एसीड ची मात्रा वाढते.

हायट्रोक्लोरीक एसीड काय आणि कसे कार्य करते हे बघावयाचे असल्यास प्रयोग शाळेत हायट्रोक्लोरीक एसीड मध्ये रात्री एक लोखंडी खिळा किंवा तार टाकल्यास सकाळपर्यंत त्या लोखंडी खिळ्याचे विघटन होत असते,  लोखंडी तार विरघळते. अशा या हायट्रोक्लोरीक एसीड ची मात्रा पोटात अतिरिक्त वाढु नये म्हणुन दर काही तासाला किंवा तहान लागल्यास दिवसभरात वरचेवर पाणी प्यावेच. जेणेकरुन पिलेल्या पाण्यात हे एसीड एकत्र होऊन पाण्याबरोबर लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जाते. पोटात अतिरिक्त एसीड जमा होत नाही. परंतु निर्जला उपवास किंवा कडकडीत उपवास धरण्याच्या विचाराने आपण दिवसभरात पाणी पिलो नाही तर मात्र या एसीड ची मात्रा पोटात वाढते. त्यामुळे पहिली तक्रार म्हणजे एसीडीटि वाढते, असेच निर्जल उपवास वारंवार किंवा लगातर करत राहिल्यास दिवसेंदिवस पोटातील हायट्रोक्लोरीक एसीडची मात्रा वाढत वाढत जाऊन हळुहळु एसीडीटि नंतर जळजळ होऊ लागते. या एसीड ची मात्रा भयंकर वाढत गेल्यास पोटातील मोठ्या आतडीचा अल्सर होऊ शकतो. या एसीड चा प्रकोप झाल्यास कैंसर देखील होऊ शकतो. म्हणुन उपवासात वरचेवर पाणी तरी नियमितपणे प्यावेच प्यावे. निर्जल उपवास धरणे अध्यात्मिक आणि शारीरिक दृष्ट्या पुर्णतः चुकिचे असल्याने असा निर्जल उपवास कोणीही करुन नये.

आपापल्या शारीरीक प्रकृती नुसार आपणास योग्य तसा उपवास धरावा. उपवासाच्या दिवशी कुणाचे मन दुखावु नये, रागावर नियंत्रण ठेवावे. एकमेकांचा मत्सर टाळावा. मन प्रसन्न ठेवावे. आपापल्या कुलदैवताची भक्ति, आराधना, ध्यान, भजन, नामस्मरण करुन ईश्वरभक्ती तुन मन आणि चित्त शुद्धिकरण करावे. शरीर शुद्धि साठि आपापल्या शरीर प्रकृती नुसार योग्य तो संतुलित आहार घेऊन उपवास करावा. अशा प्रकारे उपवासातुन मन, चित्त आणि शरीरशुद्धी चे ध्येय साध्य करावे.

🚶‍♂️चला.‌.🚶‍♂️

💪विश्वगुरु असणाऱ्या💪

प्राचीन भारतीय संस्कृतीकडे..🚶‍♂️

🇮🇳जय हिंद🇮🇳

🚩जय गोमाता🚩

🇮🇳वंदेमातरम🇮🇳

Saturday, 5 October 2024

जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका आपले शरीर अनमोल आहे

 _*🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴

नमस्कार मंडळी...

मी हरिदास जाधव मी गरवारे पॉलिस्टर लिमिटेड वाळूज औरंगाबाद मध्ये कामगार आहे मो नं  9922238922   आमच्या सासरेबुवाच्या पायाला ठेच लागलं कारण जखम झाली होती तर जालना येथील हॉस्पिटल मध्ये ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना शुगर असल्या कारण ती जखम बरी होत नव्हती डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता तरीपण ती जखम बरी होण्याची गॅरंटी दिली नव्हती .हो..म्हणजे अपंगच झालं असतं


. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता एक पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व  रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि  आपले शारिरीक अवयव गमवु नये*.

*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका  आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.

 इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.


_पत्ता:-_

*वैद्य दत्तात्रय कदम*

*कदम उपचार केंद्र*

*Bank  of India शेजारी*

*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*

Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*

www.woundskadamupchar.com

_उपचार केंद्रची वेळ:-_

*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*

 

टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)

मस्तच कुठेही शब्द चाल बिघडले नाहीत. अप्रतिम

 मस्तच 

कुठेही शब्द चाल बिघडले नाहीत.

अप्रतिम 👌👌👌 जय श्रीराम 🚩🙏🙏🙏🙏

Zindgi imtihaan लेती है


 गोवा दुर्घटना में आज 23 शव बरामद, 40 लोगों को बचाया गया और 64 लापता। ओवरलोडिंग में नाव मालिक का लालच, यात्रियों का अतिविश्वास भी. अत्यंत दुखद, त्रासद... 😭

महाराष्ट्र आणि जर्मनीचे परस्पर संबंध अधिक मजबूत होतील मुखं

 महाराष्ट्र आणि जर्मनीचे परस्पर संबंध अधिक मजबूत होतील

मंत्री दीपक केसरकर यांनी डे ऑफ जर्मन युनिटी’ निमित्त दिल्या शुभेच्छा

 

मुंबई दि. 4 - भारत आणि जर्मनीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे मुंबई आणि स्टुटगार्ट या सिस्टर सिटी असून महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग या राज्यांमध्ये झालेल्या कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या करारामुळे भविष्यात हे संबंध अधिक मजबूत होतीलअसा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. डे ऑफ जर्मन युनिटी २०२४’ निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जर्मन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणालेजर्मनीमधील व्यावसायिक शिक्षण उच्च दर्जाचे असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात देखील व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक तसेच सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. सर्व क्षेत्रात प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर समन्वयाने काम करूयाअसे सांगून श्री. केसरकर यांनी मुंबईतील जर्मन नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग राज्यांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी झालेल्या करारामध्ये मंत्री श्री. केसरकर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन डे ऑफ जर्मन युनिटी’ साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून घडणार शेतकऱ्यांची सेवा

 कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून घडणार शेतकऱ्यांची सेवा

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नाशिकदि. 4 : काष्टी (तालुका मालेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.  छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

या कार्यक्रमास खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार किशोर दराडेमंजुळाताई गावितमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटीलअपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाणजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे. महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधवअपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारतीकृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सचिन नांदगुडे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शुभेच्छा देतांना सांगितले कीराज्य शासनाच्या माध्यामातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिलांसाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी निश्चित येवून नागरिकांशी लवकरच संवाद साधू असेही त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देतांना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मिळणार आहे. तसेच कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार असून  विद्यार्थीशेतकऱ्यांसह उत्तर महाराष्ट्रास मार्गदर्शक केंद्र ठरेलअसे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. भुसे पुढे म्हणालेमहात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरी अंतर्गत वर्ष २०२०-२१ मध्ये मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली. देशातील एकमेव संकुल आहे की यामध्ये एकाच ठिकाणी ५ कृषी व संलग्न महाविद्यालय व १ कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले आहे.या संकुलातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी ३०० विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.  एकूण १२०० ते १३०० विद्यार्थी एकाच वेळेच कृषी व संलग्न पदवीचे शिक्षण घेणार आहेत. संकुलात एकूण ५०० ते ६०० अधिकारी/कर्मचारी कार्यरत असणार आहेत. येणाऱ्या काळात विद्यार्थी येथे कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेवून यशस्वी होतील. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

         राज्यातील कृषी शिक्षणाचा आदर्श परिसर म्हणून विकसित करणेराज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या अध्ययन करून कृषी विस्तार तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा प्रचार प्रसार करणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन सोडविणे. हाच कृषि विज्ञान संकुल स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. भविष्यात कृषी व संलग्न शाखांचे पदव्युत्तर पीएच.डी पदवी अभ्यासक्रम देखील या कृषी विज्ञान संकुलात सुरू करण्याचे प्रस्तापित करण्यात आलेले आहे. नार-पार हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी 7.50 हजार कोटींचा निधी प्रस्तावित आहे.

येणाऱ्या पाच ते सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.  मालेगाव शहरात महिला व बालकल्याण रूग्णालयाचे लोकार्पण झाले असून या रूग्णालयात 17 दिवसांत 312 महिला रूग्णांना उपचार देण्यात आले आहेत. मुंबई येथील रूग्णालयांच्या धर्तीवर या  रूग्णालयात उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. संजय गांधी निराधार योजनेचा शहरी व ग्रामीण भागातून 71 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. तसेच 20 हजार कामगारांना सुरक्षितेच्या दृष्टीने किटचे वाटप करण्यात आल आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1 हजार पेक्षा अधिक युवकांना नोकरीचे आदेश  प्रदान करण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

            यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलामध्ये

 शेतकरी बांधवांसाठी सोयी-सुविधा

उत्तर महाराष्ट्रातीत नाशिकधुळेजळगाव व नंदुरबार इ. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळपिके व इतर भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने द्राक्षडाळिंबकेळीतसेच कापूस हे महत्त्वाचे पिके आहेत. या सर्व पिकांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्रीचा वापर करून शेतकरी बांधवांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

0000000


कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन श्री एकविरा देवी देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

 कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

श्री एकविरा देवी देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणेदि.४:- श्री एकविरा देवीचे मंदिर प्राचीन आणि सुंदर आहे. त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी मुख्य मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते कार्लेता.मावळ येथील श्री एकविरा आई देवी देवस्थान परिसरातील मंदिराचे जतनसंवर्धन व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणेखासदार आणि मंदिराचे मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रेविभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसेश्री एकविरा देवी देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळेसरपंच पूजा पडवळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणालेनवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर सुरु आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. श्री एकविरा आई देवस्थानच्या पावन भूमीत मंदिर संवर्धन आणि भाविकांच्या सुविधांसाठी विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे याचा मला आनंद आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्व सामान्यांसाठी विविध लोककल्याणकारी योजना शासनाने सुरु केल्या असून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. राज्यात मोठ मोठे प्रकल्प व उद्योग उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना’मुख्यमंत्री वयोश्री योजनामुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदी लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्याचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे. यापुढेही विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा वेगवान व गतिमान कार्यक्रम असाच सुरु राहीलअशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

कार्ले येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीचा विकास करण्यासाठी आवश्यक अनुदान देण्यात येणार असून लवकरच पोलीस चौकीही मंजूर करण्यात येईल. भाविकांच्या सोयीसाठी गडावर रोप-वे चे बांधकाम आणि  कार्ला फाट्यावर उड्डाण पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ४५ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असून लवकरच कामाची सुरुवात होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नियोजित विकास कामांची संक्षिप्त माहिती

श्री एकविरा देवी मंदिरनगारखानास्तंभ व समाधी यांचा जीर्णोद्धार व मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्य मंदिराची दुरूस्ती करणेमंदिर परिसरातील नगारखान्याची दुरूस्ती करणेस्तंभ व समाधीच्या दगडी बांधकामाची सफाई आणि सांधे भरणी आणि सुसंवादी प्रदिपण करणेसध्याच्या रांग-मंडपाला उतरवून सुसंवादी शैलीचे रांग-मंडप उभारणेमोकळ्याजागेत बगीचा निर्माण करणेभारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या कक्षाचे बांधकामतिकीटघर व शौचालय यांची नवीन सुसंवादी वास्तू बांधणे या कामांचा समावेश आहे. गडावरील पायऱ्यांची दुरूस्तीसंरक्षण भिंत,शौचालयपार्किंगडोंगराच्या कठडयाला  लागून दगडी पादचारी रस्ता तयार करणेधबधब्या जवळ तटबंदीची दुरुस्ती करून विश्रांती क्षेत्र तयार करणेपायऱ्यांच्या मध्यंतरात दमलेल्या भाविकांसाठी प्याऊबेंच आणि कचरापेट्या बसवणेभाविक व पर्यटकांच्या माहिती व सुरक्षतेसाठी सूचना फलके बसविणे ही कामे करण्यात येणार आहेत.

०००


Featured post

Lakshvedhi