Tuesday, 1 October 2024

अटल सेतुवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस प्रणाली योग्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण

 अटल सेतुवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस  प्रणाली योग्य

परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण

 

मुंबईदि. ३० : अटल सेतूवर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे उभारण्यात आलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याचे स्पष्टीकरण परिवहन आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे.

शासनाच्या ११जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) मध्ये नमुद केल्यानुसार राज्यातील आयटीएमएस  (इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम /एचटीएमएस(हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रकल्पाकरीता राज्याचे  परिवहन आयुक्तमुंबई यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.

त्यानुसार या कार्यालयातील सह परिवहन आयुक्त (अंमल-२)  मुंबई यांनी एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पाअंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवर लावलेल्या उपकरणांची तपासणी २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन पनवेल कार्यालयाच्या पथकासह केली.

            या तपासणीमध्ये टोलनाक्यावर ओव्हरस्पीड वाहनांची व टोलनाक्यावर टोल न भरलेल्या वाहनांची तपासणी केली.  तसेच उरण येथील एमएमआरडीएच्या कमांड व नियंत्रण कक्षामधील उपकरणांची तपासणी केली. या तपासणीमध्ये दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तेथील उपकरणे योग्य असल्याचे आढळले.

            त्यानुसार आज ३० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) नुसार परिवहन आयुक्तमुंबई यांनी अटल सेतुवर उभारलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याबाबत प्रमाणपत्र जारी केले आहे. याबाबत प्रकाशित झालेले  वृत्त निराधार आहेअसे स्पष्टीकरण सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्य पूर्ण पाठपुराव्याला यश

 जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्य पूर्ण पाठपुराव्याला यश

 

मुंबईदि. ३० : जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. या निर्णयामुळे जामनेर तालुक्यातील 31 गावेजळगाव तालुक्यातील 28 गावे आणि पाचोरा तालुक्यातील 16 गावे अशा एकूण 75 गावांना लाभ मिळणार आहे.

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांच्या दूरदृष्टी आणि आणि विकासाभिमुख निर्णयामुळे या परिसरातील लोकांच्या जीवनमानात कमालीचा बदल होईल आणि हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे भागपूर धरणापासून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंत उपसा सिंचन योजनेतून जामनेर तालुक्यातील 31 गावांना लाभ होणार असून त्यातील 11 हजार 388 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

जळगाव तालुक्यातील 28 गावांना लाभ होणार असून 14 हजार 224 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.तर पाचोरा क्षेत्रातील 16 गावांना लाभ होणार असून 5152 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे असे ३० हजार ७६४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत जामनेर तालुक्यातील २३ लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना व पाचोरा तालुक्यातील २६ लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना पाणी पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पात गोलटेकडी ल.पा तलाव व एकुलती साठवण तलावाच्या कामाचा सुध्दा समावेश आहे.

मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील

 मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणेदि. ३० (जिमाका) :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन होत आहेयाचा मला आनंद होत आहे. मीरा-भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर व्हावेयासाठी शासन विविध विकास प्रकल्प प्रकल्प राबवित आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणभाईंदर पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पणघोडबंदर किल्ला जतन व संवर्धननिरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पणभाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पणकाशी गाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पणशासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने  भूमीपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी खासदार नरेश म्हस्केआमदार प्रताप सरनाईकआमदार गीता जैनरवींद्र फाटकमीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकरमीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेअतिरिक्त आयुक्त डॉ.संभाजी पानपट्टेअतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकरशहर अभियंता दीपक खांबितउपायुक्त कल्पिता पिंपळेउपायुक्त सचिन बांगरउपायुक्त प्रसाद शिंगटेउपायुक्त संजय दोंदे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले कीप्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून मीरा-भाईंदरमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि ते पूर्णही होत आहेत. मीरा-भाईंदर मधील लोकप्रतिनिधी सर्व संस्कृती जपून सर्वधर्मियांना सोबत घेऊन चालत आहेत.  मिरा-भाईंदर हे मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी आहे. त्यानुषंगाने येथील विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.

             यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या घरांचा प्रश्न लवकर मार्गी लावावाअशा सूचनाही दिल्या. चोरी झालेले दागिने संबंधितांना परत मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचेही विशेष अभिनंदन केले.

0000

मीरा भयंदर के समग्र विकास के लिए सरकार हर संभव प्रयास कर रही है

- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे

 

ठाणे३० सितंबर: - मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने मीरा भयंदर नगर निगम द्वारा किए गए विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन करते हुए आनंद व्यक्त किया और कहा कि राज्य सरकार यह सुनिश्चित करने के लिए विभिन्न परियोजनाएं लागू कर रही है कि मीरा भाईंदर शहर स्वच्छ और सुंदर बने।

मुख्यमंत्री ने आज घोड़बंदर में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरणभयंदर पूर्व में हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे आर्ट गैलरीघोड़बंदर किलों का संरक्षण और संरक्षणनिरुपंकर डा. अप्पासाहेब धर्माधिकारी सामुदायिक हॉल का सार्वजनिक समर्पणसंगीतमय फव्वारे का सार्वजनिक समर्पण कियाभयंदर नवघर में झीलकाशीगांव में जरी मारी झील में म्यूजिकल फाउंटेन का सार्वजनिक लोकार्पण और सरकारी निधि से विभिन्न विकास कार्यों का ऑनलाइन भूमिपूजन और सार्वजनिक लोकार्पण किया।

इस अवसर पर सांसद नरेश म्हस्केविधायक प्रताप सरनाईकविधायक गीता जैनरवीन्द्र फटकवरिष्ठ अधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे।

सभा को संबोधित करते हुए मुख्यमंत्री श्री शिंदे ने विधायक प्रताप सरनाईक के प्रयासों की विशेष रूप से सराहना की. उन्होंने कहा कि मीरा भयंदर के अधिकार क्षेत्र में विभिन्न विकास कामों की पहल प्रताप सरनाईक द्वारा किए गए प्रयासों और उनके दृष्टिकोण से संभव हो पाई है. उन्होंने कहा कि ये सभी विकास कार्य पूरे होने के करीब हैं। उन्होंने आगे कहा कि मीरा भयंदर के जन प्रतिनिधि विकास के पथ पर आगे बढ़ते हुए सभी संस्कृतियों और विभिन्न धर्मों के लोगों को एक साथ लेकर चल रहे हैं। उन्होंने यह भी कहा कि मीरा भयंदर मुंबई और ठाणे के केंद्र बिंदु है और इसलिए इस क्षेत्र में विभिन्न विकास कार्य पूरे किए गए हैं।

मुख्यमंत्री ने प्रशासन को पत्रकारों के लिए आवास की समस्या का समाधान करने के भी निर्देश दिये. मुख्यमंत्री ने चोरी हुए आभूषणों को बरामद किये जाने और उन्हें उनके मालिकों को वापस लौटने के लिए स्थानीय पुलिस के प्रयासों की सराहना की।

००००

Government taking all efforts for overall development of Mira Bhayandar

- Chief Minister Shri Eknath Shinde

 

Thane, September 30: -While stating that he is happy to inaugurate various development works undertaken by Mira Bhayandar Municipal Corporation, Chief Minister Shri Eknath Shinde said that the state government is implementing various projects to ensure that MIra Bhayander city becomes clean and beautiful.

The Chief Minister today unveiled the Statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Ghodbunder, the Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Art Gallery at Bhayandar East, Ghodbunder forts Preservation and conservation, public dedication of Nirupankar Dr Appasaheb Dharmadhikari community hall, public dedication of musical fountain built on the lake at Bhayandar Navghar, public dedication of musical fountain at Jari Mari lake at Kashigaon and performed the Bhumi Pujan and public dedication online of various development works through the government funds.

Member of Parliament Naresh Mhaske, legislator Pratap Sarnaik, legislator Geeta Jain, Ravindra Fathak, senior officers and civilians were present in large numbers on this occasion.

Addressing the gathering, Chief Minister Sri Shinde specially appreciated the efforts taken by legislator Pratap Sarnik. He said that various initiatives in the jurisdiction of Mira Bhayandar are out of the efforts taken by Pratap Sarnaik and his vision, adding that all these developmental works are near completion. He further said that the representatives of people from Mira Bhayandar are taking along all the cultures and people of various religions together while marching ahead on the path of development. He said that Mira Bhayandar is at the central point of Mumbai and Thane and hence various development works have been completed in this region.

The Chief Minister also directed the administration to resolve the issue of housing for journalists. The chief minister applauded the efforts of local police for recovering the stolen ornaments and handing them over to their owners.

0000


आयुष उपचार प्रणालीमुळे वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात जगात भारताला विशेष स्थान

 आयुष उपचार प्रणालीमुळे वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात

जगात भारताला विशेष स्थान


- केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव


          मुंबई, दि. ३० : भारताचा वैद्यकीय पर्यटनाचा दृष्टीकोन केवळ शारीरिक उपचारांपुरता मर्यादित नाही, तर त्यात मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचाही समावेश आहे. आयुष प्रणालीमुळे भारताला जगभरातील वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात एक विशेष स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले.


            केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, लवकरच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आयुषच्या १७० हून अधिक आजारांवरील उपचाराच्या पॅकेजेसचा समावेश करण्यात येणार आहे. मंडळ, तहसील स्तरावर आयुष औषध केंद्रे उघडण्यात येणार आहे. यामुळे आयुर्वेदासह आयुषच्या सर्व यंत्रणांची सर्व औषधे एकाच ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध होतील. सर्वप्रथम आयुष जन औषधी केंद्र ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, दिल्ली उघडण्यात येणार आहे.


              बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हॉटेल सेफिटेलला आयोजित 'आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल' संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय आयुष विभागाचे सचिव राजेश कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनचे अध्यक्ष देवेंद्र त्रिगुणा, आयुष विभागाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, पश्चिम विभागातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


           केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, भारताची नैसर्गिक विविधता स्वतःच अद्वितीय आहे. या विविधतेमध्ये वसलेली आयुर्वेद वैद्यकीय केंद्रे आणि शांततापूर्ण योग आश्रम शतकानुशतके विविध रूची असलेल्या परदेशी नागरिकांना आकर्षित करत आहेत. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) च्या सर्वांगीण पद्धती निरोगी पर्यटनाच्या तत्त्वांशी परिपूर्ण सुसंगत आहेत, ज्यामुळे जगभरात असलेल्या भारतातील अभ्यागतांना एक प्रामाणिक आणि समृद्ध अनुभव मिळतो. रोगांच्या सर्वांगीण उपचारांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, सर्वसमावेशक आणि कायमस्वरूपी उपाय शोधणाऱ्या लोकांसाठी आयुष प्रणाली आकर्षणाचे केंद्र बनत आहे.


             दरवर्षी अमेरिका, युरोप, रशिया, युरेशियन देश, मध्य पूर्व आणि इतर प्रदेशातून हजारो परदेशी पर्यटक आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घेण्यासाठी भारतात येतात. आयुष वैद्यकीय प्रणालींची मागणी गेल्या दशकात अनेक पटींनी वाढली आहे, परिणामी अनेक रुग्णालयांनी त्यांच्या वैद्यकीय चौकटीत आयुर्वेद आणि आयुष सेवांचा समावेश केला आहे. आयुष सेवा आणि त्यांची मानके सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.


            यावर्षी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण भगवान धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारत सरकारने धनत्रयोदशी हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे. या वर्षी आयुर्वेद दिनाचे ९ वे वर्ष आहे आणि त्याची संकल्पना "जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना" आहे, या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.


             प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचे म्हणजेच शारीरिक आणि मानसिक रचनेचे आयुर्वेदिक शास्त्रीय विश्लेषण करण्याच्या उद्देशाने सरकारने देशभरात “देश का प्रकृती परिक्षण ” मोहीम सुरू केली आहे. भारताने पारंपरिक प्रणालींना आधुनिक वैद्यकासोबत जोडण्यात यश मिळविले आहे, ज्यातून इतर देशांनाही प्रेरणा मिळू शकते आणि हे मॉडेल स्वीकारले जाऊ शकते, जे जगभरातील आरोग्य सेवांमध्ये क्रांती घडवू शकत असल्याचा विश्वासही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्री. जाधव यांनी व्यक्त केला.


           कार्यक्रमाला आयुष मंत्रालय व आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.


००००

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ; उत्पन्नाची अट रद्द मंत्रिमंडळाची मान्यता; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील

लाभामध्ये दुप्पट वाढउत्पन्नाची अट रद्द

मंत्रिमंडळाची मान्यताकृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 

          मुंबई, दि. 30 : कृषी विभागाच्यावतीने अनुसूचित जातीनवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

          अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेचा निधी वितरित करण्यात येतो. रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते. मात्र त्या तुलनेत या योजनेतील लाभ घेण्यास लाभार्थी इच्छुक नसल्याचे दिसून आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील लाभ वाढविण्याचे प्रस्तावित केले होते.

          या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दीड लाख वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच विहिरीच्या खोलीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अनेक तांत्रिक अटींमध्ये भरपूर सवलती देण्यात आलेल्या आहेत.

           मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे आता अनुसूचित जाती नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीसाठी 2.5 लाख ऐवजी 4 लाख रुपये मिळतील. जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये मिळतील. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख ऐवजी 2 लाख मिळतील.

          तसेच इनवेल बोरिंग साठी 20 ऐवजी 40 हजारवीज जोडणी आकार 10 ऐवजी 20 हजारविद्युत पंप संच साठी 20 ऐवजी 40 हजारसोलार पंपसाठी 30 हजार ऐवजी 50 हजारएचपीडीई पीव्हीसी पाईप साठी 50 हजारतुषार सिंचन संच साठी 25 ऐवजी 47 हजारठिबक सिंचन संच साठी 50 हजार ऐवजी 97 हजार, तसेच तुषार सिंचन संचठिबक सिंचन पूरक अनुदान  यातसुद्धा जमीन धारणेच्या प्रमाणात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

          या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

0000

पीक प्रात्यक्षिकासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 पीक प्रात्यक्षिकासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत

शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

          मुंबई दि. ३० : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. चालू वर्षी हरभरागहू,  जवस करडईभूईमुग,  व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार  आहेत. पीक प्रात्याक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

          पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या बियाण्याचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे.

          या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने  करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर  दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत बियाणेऔषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.


मिहान प्रकल्पाकरिता निधीस मंजूरी

 मिहान प्रकल्पाकरिता निधीस मंजूरी

नागपूर येथील मिहान प्रकल्पाकरिता आवश्यक अशा तीन हजार ९९४ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या प्रकल्पासाठी भूसंपादन, पुनर्वसन, तांत्रिक कामे तसेच भूसंपादनाचे दावे इत्यादीकरिता या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi