Thursday, 1 August 2024

सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी हेल्पलाईन, वेब पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन

 सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी हेल्पलाईन,

 वेब पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. १ : माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अशा गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० या नंबरचा वापर करावानॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर दोस्त’ (Cyberdost) या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.

            सध्या देशामध्ये मोबाईल फोन तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता ही बचावाची प्रथम पायरी असल्यानेकेंद्र शासनाच्या गृह विभागांतर्गत असलेल्या भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राने (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर - I4C) सायबर गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. कोणत्याही आर्थिक सायबर गुन्ह्याच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी तत्काळ नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० वर कॉल करावा अथवा www.cybercrime.gov.in  या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदणी करावी.

            सायबर क्राइमबाबत ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सायबर दोस्त (Cyberdost) या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

सायबर दोस्तला पुढील लिंकवर क्लिक करुन फॉलो करु शकता 

https://x.com/Cyberdost

https://www.facebook.com/CyberDostI4C

https://www.instagram.com/cyberdosti4c

००००००

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू

 पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल

 अशा अफवांवर विश्वास ठेवू नये

                                                    - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. १ : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी  काही  पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे. असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

            मंत्री तटकरे म्हणाल्या  की,  "या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या  बँक खात्यात प्रत्येकी  एक रुपया जमा करण्यात येत आहे.

            ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका "असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज दाखल, लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला आपला पीक विमा

 राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज दाखल,

लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला आपला पीक विमा

-कृषी मंत्री धनंजय मुंडे

पीक विम्यापोटी राज्य शासन भरणार 4725 कोटींचा हिस्सा

 

            मुंबईदि. 1 : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली असून 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले आहेत. याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी पीक 1 रुपया विमा हप्ता भरून पीक संरक्षित केले असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

            प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होतीमात्र कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21 लाख 90 हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे.

            दरम्यान, राज्यात एकूण 97 टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे.

            एकूण विमा हप्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असूनत्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाखराज्य हिस्सा एकूण 4725 कोटीत्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.

            मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्या पोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी पीक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा

 महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीतमहामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत

मुंबई-नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. १ : मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्गउड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्रपुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना आज दिले.

            मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळआमदार रईस शेखनियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरराज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाडसचिव (बांधकामे) संजय दशपुतेराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तवठाण्याच्या महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक मनोहर दहीकर आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेआमदार देवयानी फरांदेदिलीप बनकरहिरामण खोसकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद  प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेकी मुंबई-नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा व प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाववाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाश्यांना दुपटीपेक्षा जास्त वेळ लागत आहेतसेच त्यांना आर्थिकमानसिक त्रास सहन करावा लागत आहेही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. महामार्गावरील खड्डे वेळीच बुजविल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते. मात्रया महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीलोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीतमहामार्गाची डागडुजी केली जात नाहीतोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणाले कीमागील काही वर्षांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर दर्जोन्नतीरुंदीकरणउड्डाणपूलभुयारी मार्ग अशी विविध कामे सुरु आहेत. महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असून ते वेळीच बुजवले जात नाहीत. काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्यांचा दर्जात्यावरील खड्डेवाहतूक नियंत्रणातील त्रुटींवर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळसार्वजनिक बांधकाम विभागवाहतूक पोलीसभिवंडीकल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांचे समन्वयन करून पुढील १० दिवसांत उपाययोजना राबवाव्यात. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावाअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            मुंबई-नाशिक महामार्गावर तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीबहुतांश वेळा वाहतूक कोंडीत वाहने खराब झाल्यामुळे पाठीमागच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. खराब झालेले वाहन तातडीने दूर करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ४० टनाच्या क्रेन्स वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून घ्याव्यात. त्यासाठी एनएचएआय आणि एमएसआरडीसीने वाहतूक पोलिसांना निधी उपलब्ध करून द्यावा. गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. कार्यक्षम वाहूतक व्यवस्थेसाठी या महामार्गावरील रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करावी. वाहतूक नियंत्रणासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेण्यात यावी. एमएसआरडीसीने वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेल्या वॉर्डन यांना गणवेश द्यावा. त्यासाठी लागणारा निधी नियोजन समितीतून दिला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

            ज्याठिकाणी उड्डाणपूलभुयारी मार्गाची कामे सुरु आहेतत्याठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित होत असल्याचे पाहायला मिळते. यावर उपाययोजना करण्यासाठी यापुढे कामांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण असलेला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे आधीच्या रस्त्याच्या उंचीच्या समप्रमाणात पर्यायी रस्ते तयार केले गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक करूनच महामार्गावरील कामांना परवानगी द्यावीअशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या.

0000

वंदना थोरात /वि.स.अ


 

कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील महाराष्ट्राचा अभिमान...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन

 कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील महाराष्ट्राचा अभिमान...!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन

 

            मुंबईदि. १ : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

            मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात कीस्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊनतशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकविले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करतानास्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबीयप्रशिक्षकमार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहेया सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदनअसे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईलअशी ग्वाही दिली आहे. तसेच त्याला स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Shiv स्तुती

 ॐ भैरवरुद्राय महारुद्राय कालरुद्राय कल्पांतरुद्राय

वीररुद्राय रुद्ररुद्राय घोररुद्राय अघोररुद्राय

मार्तंडरुद्राय अंडरुद्राय ब्रह्माण्डरुद्राय

चंडरुद्राय प्रचंडरुद्राय दंडरुद्राय

शूलरुद्राय वीररुद्राय भवरुद्राय भीमरुद्राय

अतलरुद्राय वितलरुद्राय सुतलरुद्राय

महातलरुद्राय रसातलरुद्राय तलातलरुद्राय

पताळरुद्राय नमोनमः


हर हर हर हर हर हर हर हर महादेव

हर हर हर हर हर हर हर हर महादेव


ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं

ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||१||


वीरभद्राय अग्निनेत्राय घोरसंहारकाय

सकललोकाय सर्वभुताय सत्यसाक्षात्काराय


शंभो शंभो शंकरा

ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं


हर हर हर हर हर हर हर हर महादेव


ॐ नमः सोमाय च रुद्राय च नम:ताम्राय च अरुणाय च 

नम: शंखाय च पशुपतये च नम: उग्राय च भीमाय च 

नमो अग्रेवधाय च दुरेवधाय च नमो हंत्रे च हनियसे च 

नमो वृक्षेभ्यो हरिकेषेभ्यो नम: ताराय नम: शम्भवे च 

मयोभवे च नमः शंकराय च मयस्कराय च 

नमः शिवाय च शिवतराय च


अंड ब्रम्हाण्ड कोटि अखिल परिपालना

पूरणा जगकारणा सत्यदेव देवप्रिया

वेदवेदांतसारा यज्ञ यज्ञोमया

निश्चला दुष्‍टनिग्रहा सप्तलोक संरक्षणा


सोम सूर्य अग्नि लोचना श्वेत ऋषभ वाहना

शूलापाणी भुजंगभूषणा त्रिपुरनाश रक्षणा

व्योमकेश महासेन जनका पंचवक्त्र परशुहस्त नमः


ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं

ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||२||


कालत्रिकाल नेत्रत्रिनेत्र शुलत्रिशुल धात्रं

सत्यप्रभाव दिव्यप्रकाश मंत्रस्वरूप मात्रं


निश्प्रपंचादि निष्कलंकोह निजपूर्ण बोधहं हं

सत्यगात्माग नित्यब्रम्होहं स्वत्प्रकाशोह हं हं


सचित्प्रमाण ॐ ॐ मूलप्रमेय ॐ ॐ

अयं ब्रह्मास्मि ॐ ॐ अहं ब्रम्हास्मि ॐ ॐ

गण गण गण गण गण गण गण गण

सहस्रकंठ सप्तविहरकी

ङम ङम ङम ङम डुम डुम डुम डुम

शिवडमरुनाद विहारकी


ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं

ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||३||


वीरभद्राय अग्निनेत्राय घोरसंहारकाय

सकललोकाय सर्वभुताय सत्यसाक्षात्काराय


शंभो शंभो शंकरा

ॐ शिवोहं ॐ शिवोहं रुद्रनामं भजेहं भजेहं ||धृ||


राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे विधानभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन मुंबई, दि. १ : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज विधानभवन येथे भेट देऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने विधानभवनातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस राज्यपाल यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सचिव (१) कार्यभार जितेंद्र भोळे उपस्थित होते.

 राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे विधानभवन येथे छत्रपती शिवाजी महाराजलोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

            मुंबईदि. १ : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज विधानभवन येथे भेट देऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने विधानभवनातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  प्रतिमेस राज्यपाल यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरसचिव (१) कार्यभार  जितेंद्र भोळे उपस्थित होते.





Featured post

Lakshvedhi