Thursday, 13 June 2024

प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

 प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत

विशेष लोकअदालत सप्ताह

 

            मुंबईदि.  13 :- लोकअदालतीव्दारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. ही विशेष लोकअदालत दिनांक २९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या दरम्यान होणार आहे.

            लोकअदालतीमध्ये तडजोडीव्दारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठया प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीव्दारे निकाली काढण्याकरिता लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहे. यामुळे विशेष लोकअदालती मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत.

            मा. सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची यादी  https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी ज्यांची प्रकरणे या यादीमध्ये असतील त्यांनी स्वतः अथवा वकीलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई किंवा संबंधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून याचा लाभ पक्षकारांनी घ्यावाअसे आवाहन सदस्य सचिवमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांनी केले आहे.

            संपर्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संपर्क क्रमांक (कंसात) पुढीलप्रमाणे :  अकोला  (८५९१९०३९३०)बीड (८५९१९०३६२३)चंद्रपूर (८५९१९०३९३४)गोंदिया (८५९१९०३९३५)कोल्हापूर (८५९१९०३६०९)नांदेड (८५९१९०३६२६)उस्मानाबाद (८५९१९०३६२५)रायगड (८५९१९०३६०६)सातारा (८५९१९०३६११)ठाणे (८५९१९०३६०४)यवतमाळ (८५९१९०३६२९)अहमदनगर (८५९१९०३६१६)अमरावती (८५९१९०३६२७)भंडारा (८५९१९०३९३६)धुळे (८५९१९०३६१८)जळगाव (८५९१९०३६१९)लातूर (८५९१९०३६२४)नंदूरबार (८५९१९०३९३९), , परभणी (८५९१९०३६२२)रत्नागिरी (८५९१९०३६०८)सोलापूर (८५९१९०३६१३)वर्धा (८५९१९०३९३२)मुंबई (८५९१९०३६०१)औरंगाबाद (८५९१९०३६२०)बुलढाणा (८५९१९०३६२८)गडचिरोली  (८५९१९०३९३३)जालना (८५९१९०३६२१)नागपूर (८५९१९०३९३१)नाशिक (८५९१९०३६१५)पुणे (८५९१९०३६१२)सांगली (८५९१९०३६१०)सिंधुदूर्ग (८५९१९०३६०७)वाशिम (८५९१९०३९३७) आणि मुंबई उपनगर (८५९१९०३६०२).

000

 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपदग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

 घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपदग्रस्तांना

अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

मंत्री अनिल पाटील

              मुंबईदि. १३ : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून अधिक मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू  आहे. घाटकोपर होर्डिंग  दुर्घटनेसारख्या भविष्यात दुर्घटना होवू नयेतयासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असून   आपदग्रस्तांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

            घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपदग्रस्तांच्या नातेवाईकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी माजी लोकसभा सदस्य किरीट सोमय्याआमदार पराग शहाआपत्ती व्यवस्थापन संचालक लहुराज माळीमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरभारत पेट्रोलियम निगम लिमिटेडचे व्यवस्थापक मौलिक कपाडियालोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवेघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपदग्रस्तांचे नातेवाईक या बैठकीला उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार लाख रुपये असे एकूण प्रत्येकी ९ लाख रूपयांचे सहाय्य करण्यात आले आहे. १७ पैकी फक्त एका मृतांच्या नातेवाईकाला हे सहाय्य मिळणे बाकी आहे. संबंधित नातेवाईकांशी संपर्क झाला असून त्यांना हे सहाय्य वितरीत करण्यात येईल. होर्डिंग कोसळलेल्या दुर्घटनेत जे आपदग्रस्त सात दिवसापेक्षा अधिक वेळ रूग्णालयात उपचार घेत होतेत्यांना प्रत्येकी १६,००० रूपये देण्यात आले आहेत असे एकूण २ लाख ८ हजार रूपयांचे सहाय्य करण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी उपचार घेणाऱ्या रूग्णांना प्रत्येकी ५४०० रूपये प्रमाणे १ लाख ४५ रूपयांचे सहाय्य  देण्यात आले आहेत. काही रूग्णांवर तात्काळ उपचार केले त्यासाठी देखील शासनाकडून सहाय्य करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ज्या रूग्णांना सहा महिन्यांपेक्षा अधिक उपचार घ्यावे लागतील यासाठी विशेष बाब म्हणून मुंबई महापालि केच्या सहकार्याने संबधित रूग्णांवर उपचार करावे असे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी दिले.   

           मंत्री श्री. पाटील म्हणाले कीघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसारख्या भविष्यात दुर्घटना होवू नयेत यासाठी शासन ठोस उपाययोजना करणार आहे. सर्व स्थानिक यंत्रणांसाठी सर्वसमावेशक नियमावली करण्यात येईल. वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्सबाबतही काटेकोर नियम करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. या दुर्घटनेत उपचार घेत असलेले आणि दगावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाकडून जितकी शक्य आहेती सर्व मदत करण्यासाठी स्थानिक यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवावा. बीपीसीएल कंपनीने या दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या व्यक्तींचा मदतीसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजूर करून या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आर्थिक सहाय्य  करावे.

            यावेळी माजी लोकसभा सदस्य किरीट सोमय्याआमदार पराग शहा यांनी शासनाने अशा घटना घडू नयेतयासाठी कठोर उपाययोजना कराव्यातअशा सूचना यावेळी केल्या.

***

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावी

 राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे

नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावी

उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील विकासप्रकल्पांचा सविस्तर आढावा

 

            मुंबईदि. 13 :- राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्या दृष्ट‍िने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेलीप्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठकीत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातउपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), मुख्य सचिव डॉ. नितीन करीरसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमारमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरावित्त व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरपरिवहन आणि बंदरेगृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीनगर विकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-1) असीमकुमार गुप्ताउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा राज्यकर आयुक्त आशिष शर्मापर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेपुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, (व्ही.सी.द्वारे) पुणे म.न.पा. आयुक्त डॉ.राजेंद्र भोसलेपुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (व्ही.सी.द्वारे)सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हाधिकारी जलज शर्मा (व्ही.सी.द्वारे) क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुखमहारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वालमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरसारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडेवैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरअहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ (व्ही.सी.द्वारे)रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेरत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह (व्ही.सी.द्वारे) उपस्थित होते. तर पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीपुणे मेट्रो क्रमांक तीन च्या कामाला वेग द्यावा. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावावे. या कामासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देतानाच सातारा सैनिक स्कुलचे काम सुध्दा तातडीने मार्गी लावावे. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी’ किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेचे पुण्यातील मुख्यालयऔंधनाशिककोल्हापूरनागपूरअमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामपुणे येथील कृषीभवनशिक्षण आयुक्तालयकामगार कल्याण भवनसहकार भवननोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. 

*****

मराठी कवितेत *‘बालकवी’* म्हणून अजरामर ठरलेल्या *"त्र्यंबक बापूजी ठोंबरे"* यांची ही गोष्ट आहे.

 *५ मे १९१८* ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत आडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 


एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती.


 पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. 


मराठी कवितेत *‘बालकवी’* म्हणून अजरामर ठरलेल्या *"त्र्यंबक बापूजी ठोंबरे"* यांची ही गोष्ट आहे. 


जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?


जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 


या वर्षी हा दिवस ५ मे रोजी संपन्न झाला.


*आनंदी आनंद गडे*

*इकडे तिकडे चोहिकडे*

*वरती खाली मोद भरे*

*वायूसंगे मोद फिरे*

*नभांत भरला*

*दिशांत फिरला*

*जगांत उरला*

*मोद विहरतो* *चोहिकडे*

*आनंदी आनंद गडे !*


अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही. 


आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे


स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला  

मत्सर गेला  

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे


बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९०  रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.


श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे, 

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 


किंवा 


हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती..


या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? *केशवसुत, बालकवी* पासून ते *कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील* अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.


या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात


तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके


आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो


नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो


आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.


बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे.


 त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. 


त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे


*घड्याळांतला चिमणा काटा*

*टिक_ टिक् बोलत गोल फिरे*

*हे धडपडते काळिज उडते*

*विचित्र चंचल चक्र खरे!*

*घड्याळातला चिमणा काटा*

*त्याच घरावर पुन्हा पुन्हा*

*किति हौसेने उडत चालला*

*स्वल्प खिन्नता नसे मना!*


काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?


शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?


सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हंसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !


बालकवींना १०३ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!!..🌹👏🏻🙏🏻

माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.*

 *माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.*  

पण, पाठीमागून हात ठेवल्यामुळे, हत्तीला विश्वास वाटत होता की, आपला मालक आपल्याला मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर चढवून घेत होता.  

*प्रेरणा देणे एक साधी कृती एवढेच.*


आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत, ज्यांना पाठिंबा किंवा प्रेरणा देणारे कोणी नसल्यामुळे ते मागे पडले आहेत.


कधीकधी काहींना वाटत असते, जर आम्ही जागरूक/अपडेट असतो, जर कोणी आम्हाला आधार आणि प्रेरणा दिली असती तर आम्ही फार काही करू शकलो असतो... 


आपण हे सर्वाणसाठी करू  शकत नाही, परंतु काहींसाठी, काही कठीण वेळी आपण ते करू शकतो.


*प्रेमाचा एक साधा शब्द, सकारात्मकता किंवा शक्ती आणि समर्थनाचे काही प्रेरक शब्द एखाद्याचे आयुष्य कायमचे बदलू शकतात.*

🙏🙏

मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४ नियमांचे पालन करण्याचे मुद्रणालयांना निर्देश

 मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४

नियमांचे पालन करण्याचे मुद्रणालयांना निर्देश

            मुंबई, दि. १२ :- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या पार्श्वभूमीवर मुद्रणालयांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) अन्वये नियमांचे पालन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

            लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) अन्वये मुद्रणालयांवर निवडणुकविषयी पत्रकेभित्तीपत्रकेफलक इत्यादींचे मुद्रण व प्रकाशन करणेबाबत निर्बंध लादण्यात आलेले आहेत. कलम १२७ ए मध्ये 'मुद्रित करण्यात येणारी पत्रके यांच्या मुखपृष्ठावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद करणेप्रकाशकाकडून ओळखीबाबतचे घोषणापत्र घेणेमुद्रित करण्यात आलेले पत्रकफलक इ. यांची संख्या व त्यासाठी आकारण्यात आलेले शुल्क यांची माहिती सादर करणे आवश्यक असते. कलम १२७ ए मधील तरतूदींचा भंग केल्यास करण्यात येणारी कारवाईइ. बाबतच्या तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत.

            लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५१ चे कलम १२७ ए (Section १२७A) मधील नमूद तरतूदी कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षनिवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांना निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील सर्व मुद्रणालयांनी कलम १२७ ए मधील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.

परदेशी शिष्यवृत्ती करिता 12 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

 परदेशी शिष्यवृत्ती करिता 12 जुलै पर्यंत

अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

 

            मुंबई‍‍दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी  दि.12 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण आयुक्त यांनी केले आहे.

             सामाजिक न्याय विभागाची परदेशी शिष्यवृत्ती योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. सन 2003 पासून ही योजना राबविली जात आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी ३० % जागावर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावरील ताज्या घडमोडी’ या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावी. परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासहसमाज कल्याण आयुक्तालय3चर्च पथमहाराष्ट्र राज्यपुणे- 411001 या पत्यावर पाठवावेत. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडेपरदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फीनिर्वाह भत्ताआकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम डी  व एम एस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावीअसे समाज कल्याण आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

Featured post

Lakshvedhi