Tuesday, 11 June 2024

पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपाची व्यवस्था करावी

 पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपाची व्यवस्था करावी

- उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

 

             मुंबईदि. 10 : हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी साचणेपुराचे पाणीनाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात. तसेच महानगरपालिकानगरपालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

              मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी ठाणे जिल्हा मान्सुनपूर्व आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी माहिती दिली. तसेच अन्य प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुखअधिकारी उपस्थित होते.

               नाल्यांची साफ-सफाई करण्यात आली आहे. मात्र मोठा पाऊस झाल्यास नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होवू शकते. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे. धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची आवश्यकता भासल्यास तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. या ठिकाणी पिण्याचे पाणीवीजेची सुविधा असावी,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

               मंत्री श्री. देसाई पुढे म्हणालेनागरी व ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे. साथरोगावरील औषधांची उपलब्धता निश्चित करावी. गृह विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये इमरजन्सी हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा सुरू करावी. पूर किंवा पावसाशी निगडीत घटनेशी संबंधित दूरध्वनी किंवा सूचना आल्यासतात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती देवून गरजू नागरिकांना मदत द्यावी. बैठकीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००

अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर

 अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी

उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

            मुंबईदि. १० : उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथीभाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

            उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्गशरयू नदीजवळ ग्रीन फिल्ड टाऊनशिप विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी हा भूखंड उत्तरप्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी ६७.१४ कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकामविद्युतीकरण व अन्य सोयी सुविधांसाठी सुमारे २६० कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहितीकाल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रस्तावित जागेची अयोध्या येथे पाहणी करतेवेळी दिली. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकरसचिव सदाशिव साळुंखेसचिव संजय दशपुत्रेमुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्यासह उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाच्या आवास योजनेचा अभियंता पी.के.सिंगअभिषेक वर्माविनय चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

            अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून सुमारे ७.५ कि.मी. तर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनपासून ४.५ कि.मी. अंतरावर हे प्रस्तावित महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार आहे. अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर हे महाराष्ट्र सदन उभे राहणार आहे अशी माहिती, मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यासाठी यापूर्वी अयोध्येत प्रत्यक्ष स्थळी जाऊन जागाही निश्चित केली होती. त्याच अनुषंगाने काल सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यामार्फत या २.३२७ एकर जागेच्या व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून उत्तर प्रदेश सरकारला १०% रक्कम अदा केली. पुढील दोन महिन्यात जागेचा पूर्ण मोबदला अदा करून लवकरात लवकर भक्त सदन बांधण्याची कार्यवाही सुरु होईल, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Monday, 10 June 2024

राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांकडून घेतला आढावा

 राज्यातील पाऊसखतेबी-बियाणे

टँकरपीक कर्जपाणीसाठ्याचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांकडून घेतला आढावा

 

            मुंबईदि. १० : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणेखतांचा पुरवठा करावा. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमानखतेबी-बियाणे पुरवठापीक कर्ज वितरणटँकरची स्थितीधरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजनपूर नियंत्रणचारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमारआपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळीकृषी विभागाचे उपसचिव श्री. चांदवले आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारअमरावती विभागीय आयुक्त निधी पांडेनागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरीछत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायुक्त जगदीश मणियारनाशिक विभागाच्या उपायुक्त राणी ताटेकोकण विभागाचे उपायुक्त संजीव पलांडेकृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेपहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आले. महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस पडला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावीयासाठी कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती करावीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावात्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरेगावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नयेयासाठी आतापासून नियोजन करावे. तसेच मेडिगट्टागोसीखुर्द धरणाबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाहीयाबाबत काळजी घ्यावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

            पाऊसमान चांगले असल्यामुळे पाणी तुंबणेअनियंत्रित विसर्गामुळे पूर येणे आदींबाबत यंत्रणांनी काळजी घ्यावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूर्वसूचना देऊन सतर्क करावे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचावेळेवर मदत व पुनर्वसनाचे सर्व उपाय योजण्याचा प्रयत्न करावा. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. याबाबत अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यातअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

            विभागीय आयुक्तांनी आपआपल्या विभागातील पाऊसधरणातील जलसाठाखरीप हंगामाचे नियोजनतर पुणे विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी यासोबतच आषाढी वारीच्या नियोजनाबबात माहिती दिली. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी 

नियंत्रण कक्ष कार्यान्वित

            

            मुंबईदि. १० :  राज्यातील शेतकरीवितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५  उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

             खरीप हंगामात बियाणेखते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री  (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४०००  क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

            संबंधितांनी व्हॉट्सॲपटोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणीनिविष्ठांची गुणवत्ताकिंमतसाठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवतानानावपत्तासंपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.

           ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.   शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतीलअसे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

0000

Sunday, 9 June 2024

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा

 बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्रीबोगस वाण विक्री,

अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा

                                                                                    - कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबईदि. 09 :- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्रीबोगस वाण विक्रीअनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांकजारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनिय ठेवले जाणार आहे.

 

            राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतीलबी-बियाणेखते किंवा कीटक नाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतीलअनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतीलएखादे बोगस वाण विक्री करत असतील किंवा शेतकऱ्यांच्या अन्य काही तक्रारी असतीलतर अशा विक्रेत्यांविरूद्ध तक्रारी ह्या दुकानाचे नावठिकाणतालुकाजिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊनत्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईलत्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईलअशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

 

            मागील वर्षी देखील कृषीमंत्री श्री.मुंडे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याद्वारे हजारो तक्रारींची सोडवणूक करण्यास मदत मिळाली होती. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय श्री.मुंडे यांनी घेतला असून, 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित केला आहे.

महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

            मुंबईः दि. 9 :  महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे आदी उपस्थित होते.

 

*वेदांच्या विकृती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


*वेदांच्या विकृती*


लेखकः  दिवाकर बुरसे, पुणे


पुण्यातील तुळशीबाग येथील रामजी संस्थानच्यावातीने २ जून ते ३१ जुलै २०२४ या काळात ऋग्वेदाच्या घनपारायणाचे आयोजन केले जात आहे. चि.श्रीनिधी स्वानंद धायगुडे हे घनपारायणकर्ते असून वेदमूर्ती समोहन कोल्हटकर श्रोता म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीनिधी यांचे अध्ययन वडील वेदरत्न स्वानंद धायगुडे यांच्याकडे झाले आहे. ऋग्वेदाचा घनपाठ श्रवण करण्याची ही अमूल्य संधी वेदांविषयी पूज्यभाव बाळगणा-या लोकांनी गमावू नये. या कार्यक्रमाला उपस्थित राहून या अलौकिक ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा.


या घनपाठपारायणाच्या निमित्ताने वेदांच्या विकृती आणि घनपाठ म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ.


मूळच्या वेदमंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्ट होऊ नयेत म्हणून प्राचीन बुद्धिमान, कल्पक ऋषींनी अनेक क्लुप्त्या योजल्या आहेत. हे वेदमंत्र सस्वर टिकावेत यासाठी एक युक्ती प्राचीन ऋषींनी योजिली तिला 'वेदांच्या विकृती' म्हणतात. तेजस्वी ब्राह्मणांनी सर्व वेद आणि त्यांच्या विविध विकृती अथक परिश्रम घेऊन कंठस्थ करून एका पिढीकडून दुस-या पिढीकडे सहस्रावधी वर्षे हस्तांतरित करून आजपर्यंत जतन केल्या आहेत. 


जेव्हा एखादी व्यक्ती प्रतिदिन बारा तास या प्रमाणे सतत बारा वर्षे अध्ययनाला देते तेव्हाच त्याला घनपाठी होता येते!


वेदाचा घनपाठी म्हणजे 'घन' या  नांवाची वेदाची विकृति पठण करणारा. जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ व घन अशा वेदपाठणाच्या एकूण आठ पद्धती म्हणजे  'विकृती' आहेत.


घनपाठी होण्याला असामान्य कतृत्व, प्रखर बुद्धिमत्ता, तीव्र, तीक्ष्ण स्मरणशक्ती, अथक परिश्ररम, दुर्दम्य इच्छाशक्ती, उत्तम आरोग्य आणि उत्तम ज्ञानी गुरु या सर्व गोष्टींची नितांत आवश्यकता आहे! घनपाठ पूर्ण करण्याचा क्रम असा आहे .


*१) पदपाठ*– संहितेत जे मंत्र आलेले आहेत ते वेगवेगळे करून म्हणणे म्हणजे 'पदपाठ' होय. 

संहितेत 'कुक्कुटोsसि मधुजिह्वा' असे आले आहे तर याचा पद पाठ 'कुक्कुटः असि मधुजिह्वsइति मधु जिह्वः'  असा होईल. 

पदपाठ असणे फार महत्त्वाचे आहे. ह्या पायावरच पुढील इमारत उभी आहे.

ऋग्वेदामध्ये  साधारणपणे १०५५२ मंत्र आहेत. या सगळ्या मंत्राना वेगवेगळे करून म्हणणे हा झाला पदपाठ. उदा- सा रे ग म प ध नि सा


*२) क्रमपाठ* — वेगवेगळी पदे विशिष्ट क्रमाने म्हणणे म्हणजे 'क्रमपाठ' होय.

 या मध्ये प्रत्येक पद १-२-२-३-३-३-४-४-५  या क्रमाने म्हटले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण करायला साधरणपणे २ वर्षे लागतात.

उदा- सारे ,रेग, गम, मप,पध ,धनि, निसा


*३) जटापाठ*- जर संहिता म्हणायला १५ मिनटे वेळ लागला तर जटापाठ म्हणायला २ तास वेळ लागतो. यामध्ये १-२-२-१ -१-२ असा क्रम झाल्यावर पहिले पद सोडून दिले जाते मग २-३-३-२-२-३-३-३  मग २रे पद सोडून दिले जाते या क्रमाने म्हटले जाते. उदा – सा-रे-रे-सा-सा-रे


*४) घनपाठ*- संहितेतील प्रत्येक पद १-२-२-१-१-२-३-३-२ -१-२-३  मग पहिले पद सोडून द्यावे मग २-३-३-२-२-३-४-४-३-२-२-३-४ या क्रमाने म्हणावे.उदा- सा-रे-रे-सा-सा-रे-ग-ग-रे-सा-सा-ग-रे.

हा वेळ आणि हे कष्ट केवळ मंत्र शिकण्यासाठी आहेत.


हे मंत्र कुठे उपयोजायचे कसे उपयोजायचे, कुठल्या यज्ञात उपयोजायचे ह्याचे ज्ञान ग्रहण करण्याला लागणारा वेळ वेगळा द्यावा लागतो.


अष्टविकृतीमुळे कोणालाही वेद मंत्रांचे कोणतेही अक्षर, काना, मात्रा, विसर्ग यात बदल करणे शक्य नाही. ते कोणालाही व्याकरणदृष्ट्यासुद्धा शक्य नाही. कारण ऋग्वेद, यजुर्वेद या वेदांसाठी 'प्रातिशाख्य' नावाचे स्वतंत्र व्याकरण  आहे.


सहस्रावधी वर्षापासून ही  'गुरुशिष्य वेदाक्षर ब्रह्म कंठस्थ परंपरा'  अव्याहत चालू आहे. ही परंपरा ब्रह्मवृंदानी प्राणापलीकडे जपली आहे. अपरंपार परिश्रम घेऊन स्वतः जतन करून पुढील पिढीला दिली आहे. ब्राह्मणांची अरण्यात राहून, अर्धवस्त्रे लेऊन, निष्कांचन अवस्थेत सहस्रावधी वर्षे अव्याहत जी ज्ञानोपासना केली, ज्ञानासाठी सर्वस्वाचा होम केला त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही! 



धन्य भारतभूमी, धन्य ती गुरुशिष्य परंपरा, धन्य त्यांची ज्ञानोपासना..



🙏🏽🙏🏽🙏🏽


लेखकः  दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९२८४३००१२५

          ९५५२६२९२४५

          (३१ मे २०२४)


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Featured post

Lakshvedhi