Friday, 7 June 2024

*अशुभ रौरव कालयोग*

 *अशुभ रौरव कालयोग*


येत्या २३ जून २०२४ पासून येणाऱ्या अत्यंत मोठ्या वाईट योगाची माहिती देणारा लेख अत्यन्त ज्ञानी ज्योतिषाभ्यासक श्री. भरत नाबरिया यांनी लिहिला आहे. आपल्या पंचांगामध्ये नेहमीच पंधरा-पंधरा दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी ते १४ दिवसांचे पण होतात. तिथींच्या क्षय-वृद्धीमुळे क्वचित ते सोळा दिवसांचेही होतात. पण अतिशय कमी परिस्थितीमध्ये तेरा दिवसांचा पक्ष होतो. अत्यंत क्वचित येणारा असा हा योग असतो. ह्याला 'रौरवकाल योग' असे म्हणतात. 


ह्या योगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनहानी व धनहानी होत असते. श्रीदत्तमहात्म्यामध्ये सांगितलेल्या सात इती म्हणजे १) अनावृष्टी म्हणजे अजिबात पाऊस न पडणे, २) अतिवृष्टी म्हणजे अत्यधिक पाऊस पडणे, ३) टोळधाड म्हणजे असे किडे जे संपूर्ण अन्नधान्य खाऊन टाकतात. ४) भूकंप ५) परचक्र म्हणजे दुसऱ्या देशाकडून आक्रमण, ६) मोठ्या प्रमाणात संक्रमणामुळे होणारे रोग जसे कोरोना, ७) देशात बंड होणे, असे अनेक उपद्रव निर्माण होतात.


असा योग द्वापारयुगात महाभारत युद्धाच्या आधी तेरा दिवसांचा कृष्णपक्ष आला होता, त्यावेळी आला होता. आता पुन्हा यावेळी २३ जूनला आपल्या देशात असा योग परत येत आहे. ज्येष्ठ कृष्णपक्षात प्रतिपदेचा क्षय होऊन द्वितीयेपासून ज्येष्ठ कृष्णपक्ष सुरू होतोय आणि नंतर त्रयोदशी तिथीचा क्षय झालेला आहे. यामुळे महाराष्ट्रात तेरा दिवसांचा ज्येष्ठ कृष्णपक्ष आलेला आहे. उत्तर-पूर्व भारतात मात्र द्वितीयेचा आणि चतुर्दशीचा क्षय झालेला आहे. त्यामुळे उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर दुर्योग निर्माण झालेला आहे. यामुळे उत्तर भारतात पूर येणे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी अनावृष्टी, काही ठिकाणी रोगराई, काही ठिकाणी बंड हे असे होऊ शकते. महाभारत काळात दुर्योधनाची सत्ता पालटली होती. या वाईट काळात 

धर्मशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचा व्रतारंभ, मंगल कार्य, कोणत्याही व्रताचे उद्यापन त्यानंतर घराची, जमिनीची खरेदी विक्री, गृहप्रवेश करू नये. सर्व प्रकारची शुभ कार्ये टाळावीत. याबाबतीत श्री.भरत नाबरिया यांनी आजच दाते पंचांगकर्ते आणि या क्षेत्रातील अधिकारी आदरणीय श्री. मोहनराव दाते यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या महाराष्ट्रात प्रतिपदेचा लोप होत आहे. त्यामुळे हा तेवढा मोठ्या प्रमाणावर वाईट नाहीये, जर प्रतिपदेचा लोप न होता द्वितीयेचा लोप झाला असता, तर मात्र हा योग फार वाईट झाला असता. पूर्वोत्तर भारतात मात्र द्वितीयेला लोप असल्यामुळे उत्तर भारतात याचा परिणाम जास्त मोठ्या प्रमाणावर दिसून येईल. श्री. भरत नाबरिया यांच्या मते परत एकदा अरुणाचल, मणिपूर, नागालँड, मिझोराम, आसाम अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये काही उपद्रव होऊ शकतो. पूर्वोत्तर राज्यांत ह्याचे परिणाम तीव्रतेने दिसून येऊ शकतात. चीनचे आक्रमण होऊ शकते. कुठल्याही एखाद्या मोठ्या प्रदेशात युद्ध किंवा तत्सम कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर जनधन हानी झाली तरी त्याचा संपूर्ण परिणाम संपूर्ण देशावर होतच असतो. हे सर्व टाळण्याकरता मोठे सिद्ध पुरुष प्रयत्नशील असतात, आताही आहेत. पण श्री. भरत नाबरिया यांचे  म्हणणे असे आहे की, आपण सर्वांनीही या देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने शांततेकरता, सुबत्तेकरता, या देशाकरता काही विशेष अनुष्ठान सुरू करावे. पू. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, देहाकडून देवाकडे जाण्याच्या मार्गात मध्ये देश आणि धर्म लागतात, त्या देश आणि धर्मासाठी नित्य काही ना काही करत राहाणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. २३ जून ते पाच जुलै २०२४ पर्यंत हा योग चालू राहील. या संपूर्ण ज्येष्ठ महिन्यातील ग्रहस्थितीसुद्धा फार विचित्र आहे. प्लूटोसारखा अत्यंत संहरक ग्रह शनीच्या राशीत अष्टमस्थानी आहे. अष्टमस्थान स्वाभाविकच अत्यंत वाईट स्थान आहे. ६ जूनची वैशाख अमावास्या, जी शनिदेवाची जयंती अमावास्या असते, ती चंद्राच्या नक्षत्रात होत आहे आणि ज्येष्ठ महिन्याची अमावास्या राहूच्या नक्षत्रात होत आहे. अमावास्यांचे हे योग आणि या दरम्यान असणारे इतर काही ग्रहयोग हे विचित्र आहेत. प्लूटो ग्रह शनीच्या राशीत गोचर कुंडलीमध्ये अष्टमस्थानी आलेला आहे.

          

यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रासाठी संकल्पपूर्वक तीन जूनपासून पुढे ४० दिवस म्हणजे १३ जुलैपर्यंत "दत्तमाला महामाला मंत्र, हनुमान वडवानल स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, सिद्ध कुंजिका स्तोत्र" म्हणायचे आहे.  यापैकी कोणत्याही स्तोत्राचे नित्य पाठ करावेत.


        

✍️ सौ अपर्णा कल्याणी सोलापूर

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात

 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात

 

            मुंबईदि. 6 : लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईकोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळादरम्यान सामंजस्य करार

 रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि

महाराष्ट्र विधानमंडळादरम्यान सामंजस्य करार

* सिस्टर सिटी वाटचालीत हा एक मानाचा तुरा - ॲड. राहुल नार्वेकर

* विविध उपक्रमांना सामंजस्य कराराने चालना मिळेल - डॉ. नीलम गोऱ्हे

            सेंट पिटर्सबर्गरशिया दि. ६ :  महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून२०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग (रशिया) च्या अभ्यास दौऱ्यावर असून आज दिनांक ६ जून रोजी दोन्ही विधानमंडळांमधील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा सामंजस्य करार भारत-रशिया मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने तसेच मुंबई-सेंट पिटर्सबर्ग सिस्टर सिटीजच्या वाटचालीतील मानाचा तुरा ठरणार असल्याची भावना यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि अभ्यासदौरा शिष्टमंडळाचे नेते ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे विविध उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

             या सामंजस्य करारावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे,  विधानसभा सदस्य अमिन पटेल आणि श्रीमती गिता जैनविधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळेजनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह मुंबईतील रशिया हाऊसच्या संचालक श्रीमती एलिना रेमेझोव्हासेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे सन्माननीय सदस्यअधिकारी उपस्थित होते.

            भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोककल्याणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करणारे कायदेसखोल विचारमंथन आणि वाद-प्रतिवाद-सुसंवाद ही संसदीय लोकशाहीला अभिप्रेत असलेली सभागृहातील चर्चेची परंपरा याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही विधानमंडळांमध्ये वैचारिक आदान-प्रदानदोन्हीकडील सदस्यांच्या अभ्यासभेटीसंगीत-कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यक्रमांचे आयोजन या सामंजस्य करारामुळे आता अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

            विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी बोलताना रशियाने एक सच्चा मित्र या नात्याने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताच्या भूमिकेला नेहमीच बळ दिल्याचे सांगितले. सुमारे ५५५ वर्षांपूर्वी भारत भेटीवर आलेले रशियन व्यापारी अफानासी निकीतीन यांचे अलिबाग जवळील रेवदंडा येथे उभारण्यात आलेले स्मारक तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा मॉस्कोतील रुदोमिनो राष्ट्रीय ग्रंथालयात समारंभपूर्वक बसविण्यात आलेला पुतळा आणि आता आजचा हा सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभ यामुळे हे मैत्रीसंबंध वेगळ्या उंचीवर पोहचले असल्याचे त्या म्हणाल्या. मराठीतील उत्तम साहित्य रशियन भाषेत अनुवादित करणाऱ्या मराठी भाषा प्रेमी आणि तज्ज्ञ डॉ. नीना क्रस्नादेम्बस्काया यांचा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आवर्जून गौरव केला. महिला सशक्तीकरणअत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम (Student Exchange Programme) या बाबींना सामंजस्य करारामुळे निर्माण झालेल्या संयुक्त मंचाद्वारे प्राधान्य दिले जावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांनी सप्टेंबर२०२३ मध्ये आपल्या मुंबई भेटीतील आठवणींना उजाळा दिला आणि सामंजस्य करारातील मुद्यानुसार यापुढील काळात परस्पर सर्वक्षेत्रीय संबंध आणखी दृढ होतील, अशी ग्वाही दिली.

सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरमला उपस्थिती

            रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ आणि ७ जून रोजी सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरम - २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या अत्यंत महत्वाच्या परिषदेसाठी देखील या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे हे फोरमच्या  व्यासपीठावर आपले विचार मांडणार आहेत.

Thursday, 6 June 2024

राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान राजभवन येथे २०२१ व २०२२ वर्षांकरिता पोलीस पदक अलंकरण समारंभ संपन्न

 राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार

यांना पोलीस पदक प्रदान

राजभवन येथे २०२१ व २०२२ वर्षांकरिता

पोलीस पदक अलंकरण समारंभ संपन्न

 

            मुंबई, दि. ६ : राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पोलीस शौर्य पदकउल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. 

            राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

            तीस (३०) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आलेतर ७ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली.  अठ्ठयात्तर (७८) पोलीस अधिकारी व अंमलदारांना  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

            पोलीस अलंकरण समारंभाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारीसेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या  पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

            विनय कारगांवकरसेवानिवृत्त पोलीस महासंचालकवाहतूक मुंबईआशुतोष डुंबरेआयुक्त ठाणे शहरअशोक अहिरेसेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकनाशिक ग्रामीणविनोदकुमार तिवारीसेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकचंद्रपूर जिल्हाप्रल्हाद खाडेसेवानिवृत्त समादेशकरा. रा. पो. बल - गट क्र. ६धुळेचंद्रकांत गुंडगेसेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकपोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीजदौंड व मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेगसेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकनांदेड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. 

            पदकाने सन्मानित पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी जोडली आहे.

0000

 

Governor presents President’s Police Medals

to 115  Police Officers, Personnel

 

      Mumbai, 6th June : The Governor of Maharashtra Ramesh Bais presented the Police Medals for Gallantry, President’s Police Medals for Meritorious Service and Police Medals for Meritorious Service to 115 Police Officers and Police personnel at an Investiture Ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Thursday (6th Jun). 

       The police medals announced on the Independence Day in 2021 and the Republic Day in 2022 were given away.

       Addl Chief Secretary (Home) Sujata Saunik, Director General of Police Rashmi Shukla, Commissioner of Police Brihanmumbai Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, decorated police officers and police personnel and their family members were present.

       Thirty police officers and police personnel were awarded the Police Medals for Gallantry, while President's Police Medals were presented to 7 police officials.  Seventy eight police officers and police personnel were given the Police Medals for Meritorious service on the occasion.

       Vinay Kargaonkar, Retired DGP, Mumbai Traffic, Ashutosh Dumbre, Commissioner Thane City, Ashok Ahire, Retired Sub-Inspector of Police, Nashik Rural, Vinod Kumar Tiwari, Retd. PSI Chandrapur, Pralhad Khade, Retd Commandant, SRPF Group 6, Dhule, Chandrakant Gundge, retired Senior PI, Police Training Center Nanvij, Daund and Mirza Anwar Baig Ibrahim Baig, retired Sub-Inspector, Nanded were awarded the President's Police Medal for Meritorious Service.

       List of police officers who were presented medals is enclosed.

0000

नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस सेवा

 नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस सेवा


सेवेचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन


 


            मुंबई, दि. 6 : सध्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. टेलिमानस या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


               या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. राज्यात आजपर्यंत 70 हजार व्यक्तींनी समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. यामध्ये नैराश्य, ताणतणाव, निद्रानाश, दु:खी मन:स्थिती, पौगंडावस्थेतील मानसिक स्थित्यंतरे आदी समस्यांचे निराकारण केले जाते. राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.


--

कापुराचे झाड --एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते

 कापुराचे झाड  --एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते

आता हे  झाड   शेतात लावणार आहे कारण हे फार मोठे होते जवळपास 80 ते 90 फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात

इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली , लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य

हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुरा चे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे.

एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते , शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच , पुजेला आपण जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाहीच त्याचा तोटाच जास्त , भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.

रोप ऍमेझॉन वरून मागवता येते , हिरवे पुण्य नर्सरी नाशिक येथे मिळेल


Akash Ahale *कापूर रोपे बुकिंग फॉर्म  - हिरवेपुण्य नर्सरी.* 


* कापूर रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा आणि पेमेंट करा. 

* रोपे विक्री १५ जून पासून.  

* रोपे लहान असल्या कारणाने ज्यांना नर्सरीत येऊन रोपे नेता येतील त्यांनी नर्सरीतून न्यावे. 

* ज्यांना बस ने डिलेव्हरी हवी आहे त्यांना डिलेव्हरी चार्जेस जादा लागतील व ते पार्सल बुकिंगच्या वेळेवर कळवण्यात येतील.


रोप किंमत ₹150 प्रति रोप 

रोपाची उंची 6 इंच ते 1 फूट 


पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र ह्या परिसरात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा -  अमृता पारेख 8329208882

मुंबई - कोंकण परिसरात आणि इतर भारतीय राज्यात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा - चिरंतन पारेख 9673917771


हिरवेपुण्य नर्सरी - 

एम एस इ बी सब स्टेशन जवळ,पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक  - 422009

ऑफिस क्र : 02532970018 ,  मोबा : 9673917771


*कृपया हा मेसेज  इतर ग्रुपवर शेयर करा*

Featured post

Lakshvedhi