Thursday, 30 May 2024

HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती* --------

 *HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती*

----------------------------------------

 *मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*

----------------------------------------

०१) *नीट* आँनलाईन फाॅर्म प्रिंट

०२) *नीटप्रवेश* पत्र

०३) *नीट मार्क* लिस्ट

०४) १० वी चा मार्क मेमो

०५) १० वी सनद

०६) १२ वी मार्क मेमो

०७) नॅशनॅलीटी सर्टीफिकेट

०८) रहिवाशी प्रमाणपत्र

०९) १२ वी टी सी

१०) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस

११) आधार कार्ड

१२) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१३) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते

१४) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे

०१) जातीचे प्रमाणपत्र

०२) जात वैधता प्रमाणपत्र

०३) नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 

(मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)

----------------------------------------

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.

----------------------------------------

*इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*

----------------------------------------

०१) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट

०२) *MHT-CET* पत्र

०३) *MHT-CET* मार्कलिस्ट

०४) १० वी चा मार्क मेमो

०५) १० वी सनद

०६) १२ वी मार्क मेमो

०७) नँशनँलीटी सर्टीफिकेट

०८) रहिवाशी प्रमाणपत्र

०९) १२ वी टी सी

१०) आधार कार्ड

११) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१२) राष्ट्रीय बँकेतील खाते

१३) फोटो

----------------------------------------

*मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*

----------------------------------------

०१) जातीचे प्रमाणपत्र

०२) जात वैधता प्रमाणपत्र

०३) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र (मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)


कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे

----------------------------------------

           *वैद्यकीय क्षेत्र* 

----------------------------------------

*शिक्षण - एमबीबीएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEET प्रवेश परीक्षा 

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*

----------------------------------------

*शिक्षण - बीएएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*

----------------------------------------

*शिक्षण - बीएचएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडी*

----------------------------------------

*शिक्षण - बीयूएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*

----------------------------------------

*शिक्षण - बीडीएस*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडीएस*

----------------------------------------

*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*

----------------------------------------

*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच*

कालावधी - पाच वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

----------------------------------------

         *शिक्षण - डिफार्म*

----------------------------------------

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश

संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - बीफार्म*

----------------------------------------

*शिक्षण - बीफार्म*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी

संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा

पुढील उच्च शिक्षण - एमफार्म

----------------------------------------

  *संरक्षण दलांत प्रवेशासाठी*

----------------------------------------

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. 

एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. 

वयोमर्यादा : साडेसोळा ते १९ वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात

----------------------------------------

*अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल*

 ----------------------------------------

*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश 

संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार

पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

*शिक्षण - बीई*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस

*शिक्षण - बीटेक*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई

संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी

कालावधी - चार वर्षे

पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण

कालावधी - दोन वर्षे

पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण

----------------------------------------

    *कॉम्प्युटरमधील कोर्सेस*

----------------------------------------

डीओईएसीसी 'ओ' लेव्हल

कालावधी - एक वर्ष

डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी

कालावधी - दोन वर्षे

सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी

कालावधी - सहा महिने

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन

कालावधी - तीन महिने

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग

कालावधी - दहा महिने

इग्नू युनिव्हर्सिटी

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग

कालावधी - एक वर्ष

----------------------------------------

         *शिक्षण - बारावी*

 ----------------------------------------

*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन* 

कालावधी - एक वर्ष

वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट

कालावधी - दोन महिने

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स

कालावधी - एक वर्ष 

(फक्त मुलींसाठी)

डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग

कालावधी - दोन वर्षे

गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट

कालावधी - एक वर्ष

प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन

कालावधी - एक वर्ष

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट

कालावधी - एक वर्ष

डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर 

कालावधी - एक वर्ष

----------------------------------------

     *रोजगाराभिमुख कोर्सेस*

 ----------------------------------------

*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता - बारावी (७० टक्के)

संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड

इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी

उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स

इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर

*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*

कालावधी - चार वर्षे

पात्रता - दहावी आणि बारावी पास

संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर

(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग

फाउंडेशन (एनटीटीएफ) 

सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस

कालावधी - एक वर्ष

फॅशन टेक्‍नॉलॉजी

कालावधी - एक वर्ष

मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस

कालावधी - तीन वर्षे

----------------------------------------

*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*

 ----------------------------------------

*टूरिस्ट गाइड*

कालावधी - सहा महिने

डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस

कालावधी - दीड वर्ष

बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग

कालावधी - तीन महिने

बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन

सिस्टम (एअर टिकेटिंग)

कालावधी - एक महिना 

अप्रेन्टाईसशिप

कालावधी - पाच महिने ते चार वर्षे

*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*

डिजिटल फोटोग्राफी

कालावधी - एक वर्ष

स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग

कालावधी - एक ते तीन वर्षे

सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी

कालावधी - एक ते तीन वर्षे

----------------------------------------

        *बांधकाम व्यवसाय*

 ----------------------------------------

*शिक्षण - बीआर्च*

कालावधी - पाच वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NATA , JEE

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक

----------------------------------------

        *पारंपरिक कोर्सेस* ----------------------------------------

*शिक्षण - बीएससी*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 

पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी

----------------------------------------

*शिक्षण - बीएससी (Agri)*

कालावधी - ४ वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET

संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय

पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन

----------------------------------------

*शिक्षण - बीए*

कालावधी - तीन वर्षे

संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी

----------------------------------------

*शिक्षण - बीकॉम*

कालावधी - तीन वर्षे

संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी

----------------------------------------

*शिक्षण - बीएसएल*

कालावधी - पाच वर्षे

संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा

पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 

----------------------------------------

*शिक्षण - डीएड*

कालावधी - दोन वर्षे

प्रवेश - सीईटी आवश्‍यक

संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक

पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड

----------------------------------------

*शिक्षण* - बीबीए, बीसीए, बीबीएम

कालावधी - तीन वर्षे

प्रवेश - सीईटी

संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए


----------------------------------------

*फॉरेन लॅंग्वेज*

(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)

कालावधी :- बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित

----------------------------------------

*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.*

अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.

विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.

उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.


अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.


अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.


इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.


काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.

बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.

×+×+×+×+×+×+×+×+×+×


*काही महत्त्वाची संकेतस्थळे*

०१) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.

(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)

www.dte.org.in


०२) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)

www.dmer.org


०३) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)

www.dvet.gov.in


०४) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ

www.unipune.ac.in


०५) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 

आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)

www.iitb.ac.in


०६) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण

www.aipmt.nic.in


०७) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)

www.upsc.gov.in

लोकसभा निवडणुका २०२४ च्या मतमोजणीची तयारी' या विषयावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 लोकसभा निवडणुका २०२४ च्या मतमोजणीची तयारीया विषयावर

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची

'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. ३० : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची मतमोजणीयाविषयी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            लोकसभा २०२४ साठी राज्यात ४८ मतदार संघात निवडणुका झाल्या. यांच्या मतमोजणीची प्रक्रियामतमोजणीच्या दिवशी प्रसार माध्यमांनी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात२०१९ च्या तुलनेत राज्याची मतदानाची वाढलेली टक्केवारीआदर्श आचारसंहिता याबाबत डॉ. किरण कुलकर्णी यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ही मुलाखत शनिवार दि. १ जूनसोमवार दि. ३ जून २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

००००

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

 

            मुंबईदि.30 : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवारदिनांक 21 जुलै2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे.

             शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यासअशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै2024 रोजी घेण्यात येणार आहे.

            आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर  करू शकले नाहीतअशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे2024 ते दिनांक 7 जून2024 असा आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावेअसे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.

००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये

अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

 

            मुंबईदि. 30 : कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक 10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक 63 चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींचा निवासभोजन आणि प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन मुंबई शहरजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयमुंबई शहर येथे दिनांक 31 मे 2024 ते  3 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागपुणे यांच्या या संकेतस्थळावर जाऊन त्यामध्ये CDS-36 अभ्यासक्रमासाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.

             सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने  अर्ज सादर केलेला असावा. 

            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-245132 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीमुंबई शहर यांनी केले आहे.

--

देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान महाराष्ट्र एनसीसीला राज्यपालांचे प्रशस्तीपत्र प्रदान एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतात

 देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान

महाराष्ट्र एनसीसीला राज्यपालांचे प्रशस्तीपत्र प्रदान

एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतात

- राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबईदि. 30 : एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्तीशिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल. एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतातअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 

            राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) राजभवन येथे 'राज्यपालांचे प्रशस्तीपत्रसमारंभपूर्वक प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. 

            राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या 'प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यातराज्यपालांच्या हस्ते  महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. 

            आपण स्वतः एनसीसी कॅडेट होतो असे  नमूद करून देशातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व जाणवलेतर देश अतिशय वेगाने प्रगती करेल,  असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

            महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने आजपर्यंत २३ वेळा पंतप्रधानांचे ध्वजनिशान जिंकले. तसेच ८ वेळा महाराष्ट्र संचालनालय उपविजेते ठरले आहेयाबद्दल राज्यपालांनी राज्यातील एनसीसीच्या सर्व अधिकारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

            राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एनसीसी कार्यरत असून एकूण १.१७ लाख कॅडेट्स कार्यरत आहेत. पुढील १० वर्षांत कॅडेट्सची राज्यातील संख्या १.८५ लाख इतकी वाढविली जाणार आहेहे कौतुकास्पद आहे असे राज्यपालांनी सांगितले. 

            एनसीसी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना केले.

            या सोहळ्याला भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारीशासनाचे अधिकारीविद्यापीठांचे कुलगुरु तसेच विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या चमूने एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.    

००००

LPG gas स्फोट झाला की काय करावं

 


शिष्यवत्ती चां बनावट सन्देश

 


Featured post

Lakshvedhi