Thursday, 9 May 2024

दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे जिल्हाधिकारी

अभिनव गोयल यांची मुलाखत

 

               मुंबईदि. ९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांची मुलाखत घेण्यात आली आहे.

            ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात मंगळवार  १४ मे२०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक रोशन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            धुळे जिल्ह्यातील मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृतीबाबत राबविलेले उपक्रमकायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजनसर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

 मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत

दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

 

            मुंबईदि. ९  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत सामान्य जनतेला दाद मागण्याकरिता ०२२-२०८२२६९३ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, मुंबई शहराचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांनी दिली.

          लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे२०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत मुंबई शहर हद्दीत पोलीस / भरारी पथक/ स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे जप्त केलेल्या रोख रकमेबाबत (निवडणूक प्रचारासंदर्भात नसेल / तक्रार दाखल नसेल तर) सर्वसामान्य जनतेला दाद मागण्याकरिता या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्री. सुरवसे यांनी केले आहे.   

           भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत जप्त केलेली रक्कम निवडणुकीसंदर्भात नसल्याचे दिसून आल्यास मुक्त करणेबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ३० - मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ व ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जप्तीबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जप्त वस्तू / रकमेबाबत निर्णय घेणार आहे. समिती मतदानानंतर ७ दिवसापर्यंत कार्यरत राहील.

0000

मुंबई शहर जिल्ह्यातील सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त सर्व तक्रारीचे निवारण एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

 मुंबई शहर जिल्ह्यातील सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त सर्व तक्रारीचे निवारण

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

            मुंबईदि. ९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल (cVIGIL) हे ॲप सुरू केले आहे. तर नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे.  सी व्हिजिल या ॲपच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्ह्यांअंतर्गत असलेल्या लोकसभा मतदारसंघात १६ मार्च ते ५ मे पर्यंत १२३ तक्रारी प्राप्त झाल्या.या सर्व तक्रारीचे जिल्हा निवडणूक विभागाकडून निवारण करण्यात आले आहे. तसेच एनजीएसपी पोर्टलवर  नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल घेतली जात आहे.

                नागरिकांना निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करता येते. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करण्यात येते. १६ मार्च ते ५ मेपर्यंत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ७२ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ५१ तक्रारी सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारीचे  निवारण करण्यात आले आहे.

               निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल  हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात.https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर  १६ मार्च ते दि. ५ मे २०२४ या कालावधीत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८९३ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८४८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८३१ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८३७  तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित २८ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहेवरील ॲप/पोर्टलवर केलेल्या तक्रारीबाबत काय कार्यवाही झाली याची माहिती तक्रारदारास त्याचे लॉगीनमध्यॆ पाहता येते अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून दिली आहे.     

0000

Wednesday, 8 May 2024

दिलखुलास' कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची मुलाखत

 'दिलखुलास' कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी

सिद्धाराम सालीमठ यांची मुलाखत

            मुंबईदि.8 : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी  अहमदनगरचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांची मुलाखत घेण्यात आली आहे.

               ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

            अहमदनगर जिल्ह्यात असलेले मतदारसंघनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृतीकायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजनसर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी माहिती दिली आहे.

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

 भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

            मुंबईदि. 8 : भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमाचे यश असून  मतदान प्रक्रियेसाठी  निवडणूक आयोगाने उत्कृष्ट नियोजन केल्याचे मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळांच्या  प्रतिनिधींनी व्यक्त केले.

            भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अंतर्गत परदेशी शिष्टमंडळ प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी महाराष्ट्रात आलेले आहेत. रायगड येथील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची भेट घेऊन भारतातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

            या शिष्टमंडळात बांगलादेशश्रीलंकाकझाकिस्तान आणि झिम्बाबाब्वे या देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे. यात बांगलादेशमधील निवडणूक आयोगातील अधिकारी महम्मद मोनिरुइझमन टीजी एम शाहताबुद्दीनकझाकिस्तान केंद्रीय निवडणूक आयोगातील नुरलान आब्दीरोव, आयबक झिकनश्रीलंकेच्या निवडणूक आयोगाच्या सिलया हिलक्का पासिलिना आणि झिम्बाब्वे निवडणूक आयोगाच्या सिम्बराशे तोंगाई आणि न्यायमूर्ती प्रशिला चिगुम्बा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवारविशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रासहसचिव मनोहर पारकरअवर सचिव भास्कर बनसोडेयोगेश गोसावी उपस्थित होते.

            शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी यावेळी मतदान केंद्रावरील पाहणीबाबत आपला अनुभव व्यक्त करताना येथील मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील सुव्यवस्थासुरळित सुरु असलेली मतदान प्रक्रिया ही निश्चितच यंत्रणेच्या तयारीचे यश असल्याचे सांगितले. तसेच  भारतात तरुण मतदार मोठ्या प्रमाणात असून मतदान केंद्रावर  तरुण मतदार त्याच सोबत सर्व वयोगटातील मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. विशेषतः मतदारांच्या चेहऱ्यावर मतदान करण्याचा असलेला आनंद हा एखाद्या सणात सहभागी झाल्यासारखा होता असे या प्रतिनिधींनी आवर्जून सांगितले. या सगळ्यांतून मतदारांचा मतदान प्रक्रियेवर असलेला विश्वास ठळकपणे दिसून आला. मतदारांसोबतच येथील मतदान केंद्रावरील बुथ प्रतिनिधी देखील माहितीगार असल्याचे समाधान सुद्धा प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले.

            एस.चोक्कलिंगम यांनी भारतातील निवडणूक प्रकिया पारदर्शकनिर्भय वातावरणात पार पाडण्याला निवडणूक आयोगाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत असून महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात झालेली मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितशांततापूर्ण पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत पैश्यांचा, बळाचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर कुणाकडूनही केल्या जाऊ नये यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व आवश्यक यंत्रणांना नियुक्त करण्यात आलेले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे आणि कायदेशीर मार्गाने पार पाडण्यासाठी विविध संबंधित यंत्रणांना जबाबदारी निश्चित करण्यात आली असून ठिकठिकाणी तपासणी नाकेभरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. उमेदवाराच्या प्रचारापासून ते मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनस्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवल्या जाईपर्यंत सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्या जाते. त्यामुळे सर्व प्रक्रिया ही नियंत्रणात असून यशस्वीरित्या शांततापूर्ण मतदान पार पडत आहेतअसे सांगून ईव्हीएम मशीनची सुरक्षातपासणीमतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थाबुथ प्रतिनिधींची नियुक्तीस्ट्राँग रूम सील करने यासर्व बाबींची सविस्तर माहिती यावेळी श्री.चोकलिंगम यांनी दिली.

००००

प्रशिक्षणामुळे पूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग होवून प्रभावी काम करण्यास मदत

 प्रशिक्षणामुळे पूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग होवून प्रभावी काम करण्यास मदत

- स्वाधिन क्षत्रिय

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकारी – कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम

            मुंबईदि. 8 : शासकीय सेवेत काम करीत असताना नागरिककेंद्री काम करावे लागते. समाजाप्रती जबाबदार राहून शासनात आल्यानंतर मिळालेली भूमिका पार पाडावी लागते. अशावेळी संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कामासंदर्भातील प्रशिक्षण मिळाले पाहिजे. प्रशिक्षणामुळे पूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग होवून प्रभावी काम करण्यास मदत मिळतेअसे मत भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आज व्यक्‍त केले. 

                भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेद्वारा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ परिषद सभागृहमंत्रालय येथे करण्यात आला. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ. ह. भोसलेविभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सत्यबीर दोडसंचालक (प्रशासन) हेमराज बागुलसेवानिवृत्त अवर सचिव आशिष लोपीस उपस्थित होते.

               भारतीय लोकप्रशासन संस्था ही प्रशिक्षणाची गरज बघून प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करीत असल्याचे सांगत श्री. क्षत्रिय म्हणालेही संस्था अखिल भारतीय स्तरावरील आहे. संस्थेच्यावतीने नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या उपयोगाने कामकाज गतिमानप्रभावी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येते. प्रशिक्षणाची गरज भागविण्यासाठी संस्थेमार्फत यशवंतराव चव्हाण व बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालांचे आयोजनही करण्यात येते. नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पारितोषिकासाठी संस्थेकडे पाठविण्याचे व व्याख्यानमालांचा उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

                महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी म्हणालेकामकाजाच्या गतिमानतेसाठी आणि काळानुरूप कामकाजात सुधारणा होण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. प्रशिक्षणामुळे संबंधित नियमकायदे अथवा संबंधित कामकाजाबाबतच्या झालेल्या बदलांचे ज्ञान मिळाल्यामुळे काम करताना संबंधित अधिकारी- कर्मचारी आत्मविश्वासाने सामोरे जातो. निर्णय घेताना अशा प्रशिक्षणाची निश्चितच मदत होते.  शासनाचे काम हे नियमकायदे यांना अनुसरून चालत असते. त्यामुळे प्रशिक्षणांचे आयोजन विशिष्ट कालावधीनंतर करण्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

               माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. दोड यांनी प्रशासकीय कामकाजातील नियमकायदे याबाबत विचार व्यक्त केले. संचालक हेमराज बागूल यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची गरज स्पष्ट केली. अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी प्रशिक्षणामुळे अधिक सक्षमतेने पार पाडण्यास मदत होईल.  प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग करून आपले काम प्रभावीपणे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमात वर्तणूकशिस्त व अपिल नियमविभागीय चौकशी या विषयांबाबत वक्ते आशिष लोपीस यांनी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण सत्राला सुरूवात केली. या प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयसामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****

दिलखुलास' कार्यक्रमात बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात बीडच्या जिल्हाधिकारी

दीपा मुधोळमुंडे यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 8 : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बीड जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी  बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळमुंडे  यांची मुलाखत घेण्यात आली आहे.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात, शुक्रवार 10 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहेपत्रकार अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            बीड जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघलोकसभा  निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्थेबाबतचे नियोजनसर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळमुंडे यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.

Featured post

Lakshvedhi