Wednesday, 8 May 2024

26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांची दहिसर विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट

 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांची दहिसर विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट

 

            मुंबई उपनगरदि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करीता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. 26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांनी आज 153- दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची माहिती घेतली.

            श्री. भदोरिया यांनी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना लोकसभा निवडणूक  नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी या कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय आणि सांघिक प्रयत्नाने काम करावे. मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावीमतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाहीयाची काळजी घ्यावी. दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या सुविधा पुरविल्या जातीलयाबाबतची दक्षता घ्यावीअशा सूचना यावेळी श्री. भदोरिया यांनी दिल्या. या भेटीदरम्यान श्री. भदोरिया यांनी 153-दहिसर विधानसभा मतदार संघातील स्ट्रॉंग रूम तसेच रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली. 

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज

 मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई उपनगरदि. 7 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर27- मुंबई उत्तर पश्चिम28- मुंबई उत्तर पूर्व29- मुंबई उत्तर मध्य या चारही मतदारसंघातून एकूण 87 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडउपजिल्हाधिकारी तेजस समेळ (निवडणूक) उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख मतदार

            जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले कीलोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबई उत्तर मतदारसंघात 19मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात 21मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 20तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी सुरू केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. मतदानासाठी सात हजार 384 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी दोन हजार 32 मतदान केंद्रांची संख्या तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. अशा मतदान केंद्रांवर उन्हाळाअवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन केले आहे. तेथे वॉटरप्रुफ मंडप टाकण्यात येतील. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीची व्यवस्थापिण्याचे पाणीवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअररॅम्पची व्यवस्था असेल. मतदान केंद्रे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या मतदान केंद्रांवर आवश्यक 40 हजार 615 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दोन हजार 728 मतदार करणार गृह मतदान

            या चारही मतदारसंघात 16 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने अतिरिक्त बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांत ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास अनुसरून दोन हजार 728 मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी 200 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके 10 व 11 मे 2024 या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडतील. तसेच दिव्यांग व 85 वर्षांवरील मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र ते मुख्य मार्गावर बेस्टच्या बसची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक तेथे ऑटो रिक्षांची मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी बूथ लेव्हल मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार तातडीने मिळतीलअसे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मदतीने मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर मुंबई उपनगर जिल्ह्यास अधिकची पोलीस कुमक मिळणार आहे.  निवडणूक कामासाठी नियुक्त आणि अत्यावश्यक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी निवडणूक कर्तव्यावरील 16 हजार 596तर अत्यावश्यक सेवेच्या कर्तव्यावरील सहा हजार 917 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी मतदार सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येतील.


 

मुंबई उपनगर जिल्ह्यात 12 निवडणूक निरीक्षक दाखल

            लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण चारखर्च तपासणीसाठी सहातर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दोन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. केंद्रीय यंत्रणा व राज्य यंत्रणेकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी 148 बैठी पथके तर 134 फिरती पथके अशी एकूण 282 पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत विना परवानाअवैध वाहतूक या प्रकारात 99 लाख 65 हजार रुपये किमतीची 56 हजार 386 लिटर दारू ताब्यात घेतली आहेतर 17 कोटी 93 लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

मतमोजणीची तयारी सुरू

            मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. मुंबई उत्तरमुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघासाठी मतमोजणी नेस्कोगोरेगाव येथे तर मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठीची मतमोजणी उदयांचल शाळाविक्रोळी येथे होणार आहे. त्याचीही तयारी सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

00000

 

Tuesday, 7 May 2024

निवडणूक पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांची अंधेरी पश्चिम मतदारसंघात भेट 20 मे रोजी मतदान करण्याबाबत केले आवाहन

 निवडणूक पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांची

अंधेरी पश्चिम मतदारसंघात भेट

20 मे रोजी मतदान करण्याबाबत केले आवाहन

            मुंबई उपनगर दि. 7 :  26 मुंबई उत्तर आणि 27 मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठीचे पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांनी 165 मतदारसंघ अंधेरी पश्चिम येथील मोरगाव चाळीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या चाळीतील मतदारांना 20 मे 2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान करण्याचे आवाहन केले.

            लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक श्री. शर्मा यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघ अंधेरी (पश्चिम) येथील मोरगाव चाळीला भेट दिली. यावेळी त्या मतदारसंघातील आणि चाळीतील सुमारे शंभर मतदार तसेच यावेळी तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता स्वामीआणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 'एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये', हा उद्देश समोर ठेवून श्री. शर्मा यांनी मतदानाबाबत जनजागृती केली. यावेळी उपस्थितांना आचारसंहितेचे उल्लघंन झाल्यास तक्रार करण्यासाठी सुरू आलेल्या सी व्हिजील (C-Vigil) ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष निवडणूक पोलिस निरीक्षक आपल्या भेटीला आल्याचे पाहून पोलिसांच्या भेटीचे जनतेने कौतुक केले. या भेटीमुळे मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यावेळी मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी श्री. शर्मा यांनी चमकिला’ चित्रपटातील त्यांनी लिहिलेले गाणे म्हणत मतदान करण्यासाठी आवाहन केले.

            चलो वोट करोचलो वोट करो जीचलो वोट करो मेरे यारोचलो वोट करो जीचलो वोट करो जीअपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो,

            तुम सभी समझदार होवोट जरुरी हैंतुम सभी इमानदार होवोट जरुरी हैं,

            चलो वोट करो जीचलो वोट करो जीचलो वोट करो मेरे यारोचलो वोट करो जीचलो वोट करो जीअपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो

०००

बीड विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी ईडीसी प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून प्राप्त करावे

 बीड विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनी

ईडीसी प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून प्राप्त करावे

 

बीड, दि.7 (जीमाका) : मतदानापासून आपले कर्मचारी अधिकारी वंचित राहू नये, यासाठी  बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत बीड विधानसभा मतदारसंघातील अधिकारी/ कर्मचारी यांनी बीड तहसील कार्यालयातून निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी कविता जाधव यांनी कळविले आहे.

 

बीड विधानसभा मतदार संघांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी ज्यांनी प्रथम प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे केले आहे त्या ठिकाणी त्यांनी 12 (अ) अर्ज भरून दिलेले होते. अशा सर्व निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्रचे वाटप तहसील कार्यालय बीड येथील पहिल्या मजल्यावर सुरू असून दि. 11 मे 2024 तारखेपर्यंत ईडीसी प्रमाणपत्र करुन घ्यावे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांनी कळविले आहे.

 

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

  निवडणुकीच्या तिसऱ्या  टप्प्यातील अकरा मतदारसंघात

सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सरासरी  ५३.४० टक्के मतदान

 

            मुंबईदि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सरासरी  ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११  लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर - ५५.३८ टक्के

सांगली - ५२.५६  टक्के

बारामती - ४५.६८ टक्के

हातकणंगले - ६२.१८ टक्के

कोल्हापूर -  ६३.७१ टक्के

माढा - ५०.००  टक्के

उस्मानाबाद -  ५२.७८ टक्के

रायगड - ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५३.७५ टक्के

सातारा -  ५४.११ टक्के

सोलापूर - ४९.१७   टक्के

शिंक आली तर लोकांना SORRY नाही, देवाला THANKS म्हणा!*🥴⚜️🔥

 *😘 शिंक आली तर लोकांना SORRY नाही, देवाला THANKS म्हणा!*🥴⚜️🔥


*होय न सांगता येणारी न थांबवता येणारी शिंक, ही शिंक आरोग्यास फारच उपयुक्त आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे!*


*१). शिंकेमुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो या दाबामुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने झटका देऊन ढकलला जातो. याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहिन्या चांगल्याप्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.*


*२). पुर्वी लोक शिंका येण्यासाठी नाकात तपकीर ओढून कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.*


*३). आता शिंक येणे चुकीचे समजून लोक 'साॅरी' म्हणतात पण ती नैसर्गिक क्रीया आहे.*


*४). दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी आहे, कारण स्त्रिया स्वपांक करतेवेळी किंवा घराची साफ सफाई करतेवेळी, शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे त्यांची तब्येत अकारण स्थूल होते. शिंकेमुळे पोटावर प्रचंड दाब येतो व पोटाचे स्नायू आकुंचित केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पूर्ण होतो.*


*५). नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येण्यासाठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते.* 


*६). कृत्रिम शिंका येणेसाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात ह्यासाठी तपकीर वापरणेची गरज नाही.* 


*७). शिंकेमुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये ह्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धतीमध्ये ही क्रिया दिलेली आहे.* 


*८). अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते.*


*९). शिंकामुळे चेहरा थोडासा लालसर होतो व डोळ्यात पाणी येते हे सुध्दा आरोग्यवर्धक आहे. चेहरा उजळतो व डोळे स्वच्छ होतात.*


*१०). शिंकेमुळे डोक्यातील विचार चक्र खंडित होते व पुन्हा नविन विचारचक्र सुरू होतांना मेंदुला नवचैतन्य निर्माण होते.* 


*११). सतत सर्दी होत असेल तर ती शिंकांमुळे. काही काळाने अशी सततची सर्दी थांबते.* 


अशा अनेक उपयुक्त बाबींशी शिंकांचा संबध आहे. अचानक येणारी व थांबवता न येणारी शिंक ही सजीवास ईश्वर देणगीच आहेत..

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

 

            मुंबईदि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात  दुपारी ३ वाजेपर्यंत  सरासरी  ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

        तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर - ४४.४८ टक्के

सांगली - ४१.३० टक्के

बारामती - ३४.९६ टक्के

हातकणंगले - ४९.९४ टक्के

कोल्हापूर - ५१.५१ टक्के

माढा - ३९.११  टक्के

उस्मानाबाद - ४०.९२ टक्के

रायगड - ४१.४३  टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग - ४४.७३  टक्के

सातारा -  ४३.८३ टक्के

सोलापूर - ३९.५४ टक्के


Featured post

Lakshvedhi