Tuesday, 7 May 2024

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात

 मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात

१४ उमेदवार निवडणूक रिंगणात

- निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

            मुंबईदि. ०६  :- मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण’ या लोकसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेतअशी माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ३ उमेदवारांनी माघार घेतली. या मतदारसंघात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.      

        मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवारांचे नावपक्ष व चिन्ह खालीलप्रमाणे

१) अरविंद गणपत सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, २) मोहम्मद शुऐब बशीर खतिब - बहुजन समाज पार्टी – हत्ती, ३) यामिनी यशवंत जाधव- शिवसेना – धनुष्यबाण, ४) अफजल शब्बीर अली दाऊदानी - वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलिंडर, ५) मो. नईम शेख - एम पॉलिटिकल पार्टी – बॅटरी टॉर्च, ६) राहुल फणसवाडीकर - लोकशाही एकता पार्टी – शिवण यंत्र, ७) सुभाष रमेश चिपळूणकर - राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी – कॅमेरा, ८) अरविंद नारायण सावंत – अपक्ष – चिमणी, ९) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष – एयर कंडीशनर, १०) मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज - अपक्ष – बादली, ११) मनीषा शिवराम गोहिल - अपक्ष  - शिट्टी, १२) मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष – खाट, १३) शंकर सोनवणे – अपक्ष – गॅस शेगडी, १४) सबीहा खान – अपक्ष – हिरा       

        मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १५ लाख ३२ हजार २२६ मतदार असून त्यापैकी ८ लाख ३० हजार ६२० पुरुष, ०७ लाख ०१ हजार ५६३ स्त्री तर ४३ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण ४० हजार १२० ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +) असून त्यात १९ हजार ३५० पुरूष तर २० हजार ७७० स्त्री मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या १५ हजार २७४ इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या ५५१४ असून त्यामध्ये १६२८ पुरुष तर ११८५ स्त्री मतदार आहेत.  

            मुंबई दक्षिण मतदारसंघामध्ये एकूण १५२७ मतदान केंद्र असून ०४ सहाय्यकारी मतदान केंद्र,  ०१ सखी महिला मतदान केंद्र, ०१ नवयुवकांसाठी मतदान केंद्र तर ०१ दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र असेल, अशी माहिती श्री. कटकधोंड यांनी दिली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात

 मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात

१५ उमेदवार निवडणूक रिंगणात

निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

            मुंबईदि. ६  :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी दिली. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने माघार घेतली नसून या मतदारसंघात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.      

            मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवारांचे नावपक्ष व चिन्ह खालीलप्रमाणे

१) अनिल यशवंत देसाई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- मशाल, २) राहुल रमेश शेवाळे – शिवसेना- धनुष्यबाण, ३) विद्यासागर भिमराव विद्यागर - बहुजन समाज पार्टी- हत्ती, ४) अबुल हसन अली हसन खान - वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर, ५) डॉ. अर्जुन महादेव मुरुडकर - भारतीय जवान किसान पार्टी – भेटवस्तू, ६) ईश्वर विलास ताथवडे - राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी – चपला, ७) करम हुसैन किताबुल्लाह खान - पीस पार्टी – काचेचा पेला, ८) जाहीद अली नासिर अहमद शेख - आजाद समाज पार्टी (कांशी राम)- किटली, ९) दिपक एम. चौगुले - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी – नागरिक, १०) महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे - राईट टु रिकॉल पार्टी- प्रेशर कुकर, ११) सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी - सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया – ऑटो रिक्षा, १२) अश्विनी कुमार पाठक – अपक्ष – बॅटरी टॉर्च, १३) आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष – उस शेतकरी, १४) विवेक यशवंत पाटील – अपक्ष – संगणक, १५) संतोष पुंजीराम सांजकर – अपक्ष – शिट्टी

        मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ९ लाख ५१ हजार ७३८ मतदार असून त्यापैकी ५ लाख १० हजार १६८ पुरुष, ४ लाख ४१ हजार ३८९ स्त्री तर १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ६७९ ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +) असून त्यात ७ हजार ४५५ पुरूष तर ८ हजार २२४ स्त्री मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या १० हजार २३८ इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या २७०१ असून त्यामध्ये १६७६ पुरुष तर १०२५ स्त्री मतदार आहेत.

        मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये एकूण १५३९ मतदान केंद्र असून ५ सहाय्यकारी मतदान केंद्र,

२ सखी महिला मतदान केंद्र, १ नवयुवकांसाठी मतदान केंद्र तर दिव्यांग मतदारांसाठी १ मतदान केंद्र असेल, अशी माहिती श्री. पानसरे यांनी दिली.

****

‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ विषयावर मुलाखत

 ‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची

‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ विषयावर मुलाखत

            मुंबईदि. ६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ जळगाव जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी  जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. ८ मे २०२४  रोजी  आणि गुरुवार ९ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            जळगाव जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघलोकसभा  निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजनसर्व घटकातील मतदारांसाठी  करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे.

0000


लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

 

            मुंबईदि.७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजल्या पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले आहे.

            तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११  लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:

लातूर - ७.९१ टक्के

सांगली - ५.८१ टक्के

बारामती - ५.७७ टक्के

हातकणंगले - ७.५५ टक्के

कोल्हापूर -८.०४ टक्के

माढा -४.९९ टक्के

उस्मानाबाद -५.७९ टक्के

रायगड -६.८४ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के

सातारा -७.०० टक्के

सोलापूर -५.९२ टक्के

0000

वंदना थोरात/विसंअ/

 


मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात

 मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात

१४ उमेदवार निवडणूक रिंगणात


- निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड


            मुंबई, दि. ०६ :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३१- मुंबई दक्षिण’ या लोकसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ३ उमेदवारांनी माघार घेतली. या मतदारसंघात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.      


        मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह खालीलप्रमाणे


१) अरविंद गणपत सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, २) मोहम्मद शुऐब बशीर खतिब - बहुजन समाज पार्टी – हत्ती, ३) यामिनी यशवंत जाधव- शिवसेना – धनुष्यबाण, ४) अफजल शब्बीर अली दाऊदानी - वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलिंडर, ५) मो. नईम शेख - एम पॉलिटिकल पार्टी – बॅटरी टॉर्च, ६) राहुल फणसवाडीकर - लोकशाही एकता पार्टी – शिवण यंत्र, ७) सुभाष रमेश चिपळूणकर - राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी – कॅमेरा, ८) अरविंद नारायण सावंत – अपक्ष – चिमणी, ९) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष – एयर कंडीशनर, १०) मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज - अपक्ष – बादली, ११) मनीषा शिवराम गोहिल - अपक्ष - शिट्टी, १२) मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष – खाट, १३) शंकर सोनवणे – अपक्ष – गॅस शेगडी, १४) सबीहा खान – अपक्ष – हिरा       


        मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १५ लाख ३२ हजार २२६ मतदार असून त्यापैकी ८ लाख ३० हजार ६२० पुरुष, ०७ लाख ०१ हजार ५६३ स्त्री तर ४३ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण ४० हजार १२० ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +) असून त्यात १९ हजार ३५० पुरूष तर २० हजार ७७० स्त्री मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या १५ हजार २७४ इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या ५५१४ असून त्यामध्ये १६२८ पुरुष तर ११८५ स्त्री मतदार आहेत.  


            मुंबई दक्षिण मतदारसंघामध्ये एकूण १५२७ मतदान केंद्र असून ०४ सहाय्यकारी मतदान केंद्र, ०१ सखी महिला मतदान केंद्र, ०१ नवयुवकांसाठी मतदान केंद्र तर ०१ दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र असेल, अशी माहिती श्री. कटकधोंड यांनी दिली.


****

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन पारंपरिक पद्धतीने स्वागत मतदान साहित्य वाटप-वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्राँग रूमला भेट

 निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे

अलिबाग येथे झाले आगमन पारंपरिक पद्धतीने स्वागत

मतदान  साहित्य वाटप-वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्राँग रूमला भेट

 

 

रायगड दि. 6 :- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आयइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधींचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरीता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटपवाहतूक आणि स्ट्राँग रूममतमोजणी कक्षाची पाहणी केली.

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने औक्षणफेटा आणि हार घालून स्वागत केले. या विदेशी प्रतिनिधी मंडळामध्ये बांग्लादेशचे दोन प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी,जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे दोन प्रतिनिधी नुरलान अब्दिरोवआयबक झीकन (केंद्रीय निवडणूक आयोग कझाकिस्तान)श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना (संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे आहेत.

या प्रतिनिधींनी जे.एस.एम. महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रस्तरीय पथकाची साहित्य वाटपाची तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जाण्यासाठी केलेल्या वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.  याबरोबरच मतदान यंत्राविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना एकूण मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ.ज्योस्ना पडियार यांनी ईव्हीएमव्हीव्हीपॅट याविषयी प्रत्यक्ष हाताळणी करून दाखविली. या मंडळाने नेहुली येथील स्ट्राँगरूमची पाहणी केली. मतदानानंतर स्ट्राँगरूम मध्ये जमा करण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची विधानसभा मतदार संघनिहाय रचना केली जाते त्याची पाहणी करुन त्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच मतमोजणी कशा पद्धतीने होतेमतमोजणी केंद्राची रचनाआवश्यक त्या सर्व बाबींची माहिती घेतली.

0000


लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे

 लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठ

राजकीय पक्षांनी सहकार्य करावे

निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

            मुंबईदि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले.

               लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षउमेदवारांनी पालन करावयाच्या नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी श्री. पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.

               या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवसर्वसाधारण निरीक्षक गौरी शंकर प्रियदर्शीनिवडणूक पोलीस निरीक्षक मुकेश सिंहअपर पोलीस आयुक्त अनिल पारसकरसहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरातसमन्वय अधिकारी तुषार मठकरउपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मतदारांनी उन्हापासून योग्य ती काळजी घ्यावी. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून प्रथमोपचार पेटीवेटिंग रूम व इतर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबईत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

               निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देऊन श्री. पानसरे म्हणालेमुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत आहे. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. प्रचारविषयक नियमनिवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

            याप्रसंगी ११ नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना व अन्य १५ उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन श्री. पानसरे यांनी यावेळी केले. ईव्हीएमबाबतच्या शंका, रॅन्डमायझेशन कसे होतेयाबाबतचे प्रात्यक्षिक निरीक्षकांसमोर उमेदवारांच्या प्रतिनिधींना ८ मे रोजी दाखविले जाणार असल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले

            निवडणूक काळात सोशल मीडिया वापरताना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी योग्य ती काळजी घ्यावीडिपफेक व्हिडिओ करणे हा गुन्हा आहे. रॅली काढताना वाहतुकीला अडथळा होईलअशी कृती करता कामा नयेस्पीकरची परवानगी पोलिसांकडून घ्यावी, ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजांवर बंदी असल्याचे अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi