Thursday, 2 May 2024

उत्सवात सहभागी होवून २० मे रोजी मुंबईतील नागरिकांनी आवर्जून मतदान करावे

 उत्सवात सहभागी होवून २० मे रोजी

मुंबईतील नागरिकांनी आवर्जून मतदान करावे

 मुख्य सचिव नितीन करीर यांचे आवाहन

            मुंबईदि. २ : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा असून त्यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सोमवार२० मे २०२४ या दिवशी मतदान करून उत्साहपूर्वक सहभाग नोंदवावाअसे आवाहन राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले.

            लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित मतदान जनजागृती विषयक कार्यक्रमात मुख्य सचिव श्री.करीर बोलत होते.

             या कार्यक्रमाला पोलिस महासंचालक रश्मी शुक्लाअपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताराजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारेसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेजलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाणअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णीमुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादवमुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकरनिवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे‘स्वीपच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांच्यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

            लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत दि. २० मे रोजी मतदान होत असून यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून मतदारांनीही या प्रक्रियेत मतदार म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात येणार आहेतअसेही श्री. करीर यांनी यावेळी सांगितले.

******

समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे -

 समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे

- निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

 

            मुंबई उपनगरदि. 2 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावेअशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी दिले.

            मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. थिंड माध्यम कक्षाचे कामकाजदैनंदिन पाठविले जाणारे अहवालसमाजमाध्यमवर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांचे सनियंत्रण कशा प्रकारे केले जात आहेयाची माहिती घेतली. सध्या वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा समाजमाध्यमांचा अधिकाधिक प्रचार उमेदवार करताना दिसतात. त्यामुळे या माध्यमाद्वारे उमेदवारांच्या प्रचाराकडे आणि त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या भेटीत श्री. थिंड यांनी माध्यम कक्षांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

००००

परवीनकुमार थिंड यांची मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती, संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

 परवीनकुमार थिंड यांची मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी

निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती,

संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

            मुंबई उपनगरदि. 2 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली.

            निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,  29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारी कार्यालयपाचवा मजलाप्रशासकीय इमारतसरकारी वसाहतवांद्रे (पूर्व)मुंबई – 400051. त्यांचा संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक (+)९१ ८९२८५७१२५३ असा आहे.

            दरम्याननिवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मुळे यांच्यासह पोलिस अधिकारीसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीखर्च पथक प्रमुख  आदी उपस्थित होते.  या बैठकीत निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी नामनिर्देशन व्यवस्था, ETPBMS वेळापत्रकघरपोच मतदानपोस्टल बॅलेट मतदानमतदानाच्या तयारी आदी बाबतचा आढावा घेतला. खर्चाच्या दृष्टिकोनातून आदर्श आचारसंहिता आणि संवेदनशील भागात सतर्कता बाळगावीअशा सूचना देत त्यांनी मुक्त आणि नि:पक्ष मतदान घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

0000

 

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

 महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री

मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या  65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

            या प्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरपोलीस उपायुक्त डॉ.दीक्षित गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकारीपोलीसज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

000

1 मे या जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आज *कर्मचारी संघटना अखिल भारतीय भौतिक एवं पुनर्वसन संस्थांन मुंबई

 1 मे या जागतिक कामगार दिन व  महाराष्ट्र  दिनानिमित्त  आज *कर्मचारी संघटना अखिल भारतीय भौतिक एवं पुनर्वसन संस्थांन मुंबई च्या वतीने कार्यशाळेचे आयोजन !            ___________

या कार्यक्रमास संस्थेचे निदेशक डाॅ. अनिल कुमार गौड हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते तर 

काॅ. संतोष नायर जनरल सेक्रेटरी COC, मुंबई,  

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी अँड. विजय धर्मराज रणदिवे,

काॅ. दिनेश हंसराज देढिया, माजी अध्यक्ष,अखिल भारतीय पोस्ट एम्प्लॉईज युनियन  हे प्रमुख पाहुणे व विविध  सरकारी कर्मचारी संघटनांचे  मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची  सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते  दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

   त्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. अमरदीप शिरसाट यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  आपल्या प्रास्ताविक भाषणात काॅ. अमरदीप शिरसाट यांनी कामगार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यात 2022 पासून जे महत्त्वपूर्ण बदल झालेत, ऊदा. जुुनी पेंशन योजना व नवीन पेंशन योजना, कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अनुशासनिक कारवाई,  इत्यादींबद्दल ॲड विजय रणदिवे यांनी 

तर श्री दिनेश देढिया यांनी लिव्ह रूल्स, मेडिकल बिल, एलटीसी, टैक्स डिडक्शन  इत्यादी महत्वपूर्ण विषयां बाबत सविस्तर  मार्गदर्शन  केले. निदेशक 

डाॅ. अनिल कुमार गौड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  कर्मचारी, कर्मचारी संघटना व ऊपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन पदाधिकाऱ्यांचे स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.  संघटनेचे सचिव काॅ. सुनील आळवे  यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यात योगेश घरत,मनोज माने,सुजय मोरे,रविराज रहाटे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम सेल्फी पॉईंट व सह्यांच्या मोहिमेसह प्रत्यक्ष संवादावरही भर

 महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी

मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम

सेल्फी पॉईंट व सह्यांच्या मोहिमेसह प्रत्यक्ष संवादावरही भर

 

            मुंबईदि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समारंभ पार दादर येथे पडला. यावेळी 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेल्फी पॉईंटसह्यांची मोहीम यासह प्रत्यक्ष संवादावर भर देऊन मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती ‘स्वीप’च्या मुख्य समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

            महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा मुख्य समारंभ हा दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव नितीन करीरपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहलबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीअपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकरअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णीमुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव,निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

            मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीविषयक विविध उपक्रम सुरू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून मतदार जनजागृतीविषयक संदेशांसह सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. त्याचबरोबर येत्या दि. २० मे २०२४ रोजी "मी अवश्य मतदान करणारच" या संदेशासह सह्यांसाठीचे फलक देखील उभारण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांना उपस्थित मान्यवरांनी व परिसरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

            आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त या समारंभप्रसंगी विविध क्षेत्रातील कामगार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अवश्य मतदान करण्याचे वचन घेऊन आम्ही मतदान करणारचअसा संकल्प त्यानी यावेळी केला. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशनवर काम करणारे हमाल बांधवअंगणवाडी सेविकाकम्युनिटी हेल्थ वर्करपरिचारिकाहोमगार्डपोलीसमुंबई अग्निशमन दलराष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)बांधकाम कामगारनाका कामगार व घरेलू कामगार यासारख्या विविध क्षेत्रातील कामगारांचा यामध्ये समावेश होता. प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असणाऱ्या या कामगारांनी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना व परिसरातील नागरिकांना येत्या २० मे २०२४ रोजी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केलेअशी माहिती श्रीमती मुकादम यांनी दिली.

===

Wednesday, 1 May 2024

देवमाणूस

 


बघा हे चंद्रकांत जी गोखले...


असा देवमाणूस खरोखरच अस्तित्वात होता,कोणाचा विश्वास बसणार नाही.


सच्चा रणभुमी  मागील योद्धा...असे सामाजिक कार्य  जमणार आहे का ?? 


चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख 

रुपये कारगिल शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली.आज हा आकडा कमी वाटत असला तरी चार दशकापुर्वी तो एक कोटीप्रमाणे होता .सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते केवळ  एकच वेळ जेवन करत ,कुणाचीही पण  एक पै ची पण मदत घेत नसत ,स्वतःला मिळणाऱ्या पेन्शन मधून,ते हे आभाळाएवढे समाजकार्य करत होते का ? तर  भारतमातेसाठी शाहिद झाल्याच्या घरात कुणी उपाशी राहू नये. रेशनींगच्या रांगेत  शेवटपर्यंत उभा राहणारा ,मराठी दिग्ग्ज अभिनेता.


मराठी रंगभूमी,आणि चित्रपटात आघाडीचा नायक ,नेहमी बसने व  पायी प्रवास करत.आपल्या विक्रमला ,तू मला भेटायला २००० रु चे पेट्रोल जाळून मुंबईहून पुण्याला  येऊ नकोस असे निक्षून सांगणारे  चंद्रकांत गोखले .कितीही अडचणी आल्या तरी कारगिल शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी प्रतिवर्षी एक लाख रुपये मदत थांबविली नाही.

-----------------------------------------------------------------------------------

अशी माणसं खरोखरच दुर्मिळ..


०२.०९.१९९९ ची गोष्ट.. मी सकाळी सकाळीच कुठल्याशा नाटकाच्या जाहिरातीचं अर्जंट काम करत घरी बसलो होतो, तेवढ्यात खालून खणखणीत आवाजात हाक ऐकू आली... "कुमार, आहेस का घरात?"

दोनतीन मिनिटांत जिन्याच्या पायऱ्या चढून शेजारच्या बिल्डिंगमधे राहणारे चंद्रकांत गोखले (बाबा) हजर झाले.

मला घाईघाईत म्हणाले,

"कुमार, एक तातडीचं, महत्त्वाचं काम होतं..! मला कारगिल जवानांच्या मदतीसाठी 100,000 रु. पाठवयचेत, पण 16,000 रु कमी पडताहेत..मला मिळतील का उसने?"

मी म्हणालो, "बाबा, आत्ता माझ्याकडं एवढे पैसे नाहीत, पण संध्याकाळपर्यंत बँकेतून काढून दिले तर चालेल का?"

तर "चालेल, मी येतो संध्याकाळी" म्हणाले आणि आनंदात घरी गेले...

मी संध्याकाळी बँकेतून आणून 16,000 रु. तयार ठेवले...

संध्याकाळी 4-4.30 च्या सुमारास बाबा पुन्हा माझ्या घरी आले आणि म्हणाले,

"मला येणे होते ते 3500 रु. आत्ताच एकाकडून मिळाले, तर आता तू मला फक्त 12,500 रुपयेच दे"

मग कापडी पिशवीतून एक पिवळा पडलेला, नीट घडी घातलेला कागद माझ्या हातात देत म्हणाले,

"हा कागद असू दे तुझ्याकडं.."

मी कुतूहलानं कागद पाह्यला, तर त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या जुन्या लेटरहेडवर, (सकाळी हवी असलेली) 16,000 ची रक्कम माझ्याकडून उसनी घेत असल्याचं आणि ती डिसेंबर 99 च्या आत परत करणार असल्याचं त्यांनी 'लिहून' दिलं होतं, एवढंच नव्हे, तर, 'मी जिवंत नसलो, तर माझा मुलगा विक्रम आपले पैसे परत देईल' असंही लिहिलं होतं..!!!

त्यांच्या कल्पनेप्रमाणे दोन 'रेव्हेन्यू स्टँप्स' लावून, त्यावर सही करून तो 'कागद' (त्यांच्या परीनं) त्यांनी 'प्रमाणित'ही केला होता..!

मी म्हणालो, "बाबा काय गरज आहे ह्या कागदाची? जमतील तेव्हा द्या पैसे परत. पण मी हा कागद ठेवून घेणार नाही!"तर डोळ्यांत पाणी आणून आर्जवपूर्वक तो ठेवून घ्यायला त्यांनी मला भाग पाडलं.

तीनचारच दिवस होतात, न होतात, एवढ्यात बाबा पुन्हा माझ्याकडे आले, आणि (डिसेंबरचा 'वायदा' असताना) पिशवीतून पैशांचा गठ्ठा काढून मला देत म्हणाले,

"अरे.. योगायोग बघ कसा आहे..! कालच मला एका चित्रपटाचं काम आलं आहे, आणि त्यांनी अ‍ॅडव्हान्सही दिलाय.. आता ती चिठ्ठी आण, आणि माझ्यासमोर फाडून टाक..!"

मी म्हटलं, "मुळीच फाडून टाकणार नाही..! माझा ठेवा आहे तो..!"

मी त्याच कागदावर तारीख टाकून आभारपूर्वक पैसे परत मिळाल्याचे लिहिले, आणि (.. मी 'नको' म्हणत असताना बाबांनी आवर्जून लिहून आणलेला) तो 'कागद' जपून ठेवला..!

ह्या आमच्या 'व्यवहाराची' माहिती कदाचित विक्रम गोखल्यांनाही नसावी.. (मीही सांगितली नाही अजून.. पण आता कधीतरी आवर्जून सांगायलाच हवी..!)

सोबत : त्या 'कागदपत्राचा' फोटो, आणि पूर्वी मी टिळक स्मारक मंदिराच्या पायऱ्यांवर, फिल्म कॅमेऱ्याने काढलेला बाबांचा फोटो.


एक वेळ उपाशी राहुन प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देनारा अभिनेता चंद्रकांत गोखले...जन्म - ७ जानेवारी १९२१..मृत्यु - २० जुन २००८.

परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील ,

अभिनय प्रवास..वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण..सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटक व त्याहिपेक्षा जास्त चित्रपटात काम ,चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख रुपये शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली.या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण आदरांजली .


सच्चा रणभुमीमागील योद्धा...असे जाज्ज्वल्य  सामाजिक कार्य  करायचे म्हटले तर आज कुणाला जमणार आहे का ??  


आजही अभिनेते विक्रम गोखले आपल्या वडिलांचा वसा पुढे चालवत आहेत.


लेखक अज्ञात

Featured post

Lakshvedhi