महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त
विधान भवन येथे ध्वजारोहण
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाची देखणी वास्तू पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. गोऱ्हे तसेच महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, उप सचिव राजेश तारवी, उमेश शिंदे, उप सचिव (विधी) सायली कांबळी, अवर सचिव विजय कोमटवार, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
वृत्त क्र. 229
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त डॉ.दीक्षित गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
000
संजय ओरके/विसंअ/
वृत्त क्र. 228
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, जिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सेनानी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी व मुंबई जिल्हा, महिला कारागृह विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
0000