Friday, 19 April 2024

मतदान

 सर्वांना विनंती….


मतदानाच्या दिवशी, मतदान करताना आपण ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाशी चिठ्ठी आपल्याला व्हीव्हीपॅटमध्ये दिसणार आहे, आणि ती खाली पडेपर्यंत तिथून हटायचं नाही…


जर चिठ्ठी खाली पडताना आपल्याला दिसली नाही तर, तिथे आपण ऑब्जेक्शन घ्यायचा आहे की माझी चिठ्ठी पडली नाही, आणि ती काळजीपूर्वक बघायची आहे…


आपण ज्याला मतदान केलेलं आहे, त्याच पक्षाचं चिन्ह आपल्या त्या व्हीव्हीपॅटमध्ये दिसते का आणि ती व्हीव्हीपॅटची टीप तुटून खाली कापून पडलेली आहे की नाही आहे तोपर्यंत आपण तिथून हटायच नाही…


आणि जर इथे आपण ऑब्जेक्शन घेतलं नाही, तर इथेच गोंधळ होणार आहे एवढं लक्षात ठेवा…!


          **

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांबाबत निवडणूक आयोग दक्ष

 दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांबाबत निवडणूक आयोग दक्ष

  

            मुंबईदि. 18 : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू असून उद्याम्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावीयासाठी भारत निवडणूक आयोगाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणूकांसंबंधित प्रसारित  होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवले जात आहे.

             राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात रामटेकनागपूरभंडारा-गोंदियागडचिरोली-चिमुर आणि चंद्रपूर या 5 लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान होत आहे.  मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होत आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीमध्ये निवडणुकीबाबत काही दखलपात्र मजकूरदृश्यबातमी असल्यास संबंधित जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली जात आहे. याकामी मुंबई येथे राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये  जिल्हास्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

          मतदान दिनी तसेच मतदानाच्या एक दिवस अगोदर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महत्वाच्या घटनाआचारसंहितेचा  भंगकायदा व सुव्यवस्था आदीबाबत बातम्या प्रसारित  झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत तत्काळ दखल घेतली जात आहे व त्याबाबतचा कृती अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येत आहे.

          राज्यस्तरीय माध्यम देखरेख व  संनियंत्रण कक्षची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सह सचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी  यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक डॉ.राहुल तिडकेअवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवीक्षेत्रीय कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

युपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी

 युपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी

 

               मुंबई दि.१८ : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात पुणे येथील सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यामध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ६नाशिक जिल्ह्यातून ५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर, बुलढाणाजळगावअकोलावाशिमहिंगोली, व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे, अशी माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.

            सारथी संस्थेने मराठाकुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससीपरिक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत विद्या र्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

            छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)पुणे ही संस्था मराठाकुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सारथीमार्फत युपीएससीकरिता लाभ घेऊन यश मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांची रँक क्रमांक व नावे पुढीलप्रमाणे :

             १२२ विनय सुनील पाटील (नाशिक), १४७ आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), २२४ ठाकरे ऋषिकेश विजय (अकोला), २५८ शामल कल्याणराव भगत (पुणे), २६७ उन्हाळे आशिष विद्याधर (बुलडाणा),२८७  निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (पुणे), ३०८ घोगरे हर्षल भगवान (पुणे), ३५९ शुभम भगवान थिटे (पुणे), ३९५ अंकित केशवराव जाधव (हिंगोली), ४१४ खिलारी मंगेश पराजी (अहमदनगर), ४९६ पाटील लोकेश मनोहर (जळगाव), ५३१ मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), ६०४ आविष्कार विजय डेले (नाशिक), ६१० केतन अशोक इंगोले (वाशिम), ६२२ देशमुख राजश्री शांताराम (अहमदनगर), ७०६ निकम सुरज प्रभाकर (नाशिक), ७३२ कुणाल संजय अहिरराव (नाशिक), ७५९ गौरी शंकर देवरे (पुणे), ८३७ शुभम उत्तमराव बारकाळे(नाशिक),  ९७६ श्रावण अमरसिंह देशमुख (सातारा), हे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत यशस्वी झाले आहेत.

            मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले आहेत.

           

Thursday, 18 April 2024

लोकसभा निवडणुकीसाठी 450 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

 लोकसभा निवडणुकीसाठी 450 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

            मुंबई दि. 18 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण 450 मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

            राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. अशा सर्व युवा कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूकीचे कामकाज देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये वेगवेगळया जबाबदाऱ्या देऊन युवा कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. युवा मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीपासून निवडणूक आयोगाने नवीन उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील किमान एक मतदान केंद्र युवा कर्मचारी संचलित असावे यावर भर देण्यात आला आहे.

            ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. रत्नागिरी आणि नाशिकमध्ये 30, लातूरमध्ये 29 मुंबई उपनगरमध्ये 26 युवा कर्मचारी नियंत्रित मतदार केंद्र असणार आहेत. सर्वात कमी युवा कर्मचारी नियंत्रित मतदार केंद्र वाशिमहिंगोलीगडचिरोली आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी 3 केंद्र आहेत तर नंदुरबार या जिल्ह्यात 4 युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र आहेत.

            यावेळी राज्यात 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. तर एकूण 254 मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.

 

0000

दिलखुलास' या कार्यक्रमात सातारा पोलिस अधिक्षक समीर शेख यांची मुलाखत

 दिलखुलासया कार्यक्रमात सातारा पोलिस अधिक्षक

समीर शेख यांची मुलाखत

 

            मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांची 'कायदा व सुव्यवस्था          या विषयावर मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. ही मुलाखत शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजीआकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  ही मुलाखत सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी घेतली आहे.

           सातारा जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाची निवडणुकीच्या अनुषंगाने पुर्वतयारीसमाज माध्यमा वरती असलेली नजर, मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या दिवशी केलेली व्यवस्था, बंदोबस्त, सभारॅली यासाठी परवानगी, जाहीर सभांचे चित्रिकरण या बाबत 'दिलखुलासकार्यक्रमातून सातारा जिल्हयाचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी माहिती दिली आहे.

0000

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ वार्तापत्र, दि. १८ एप्रिल २०२४

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४

वार्तापत्रदि१८ एप्रिल २०२४

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

 

 मुंबईदि.१८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांची पहिली सरमिसळ (First Randomization) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत आज झाली.

           यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंडउपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसूंदर सुरवसेउपजिल्हाधिकारी तथा इव्हीएम व्यवस्थापनाचे समन्वयक अधिकारी महादेव किरवले यांच्यासह सर्व राष्ट्रीय व राज्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे आमंत्रित केलेले प्रतिनिधी उपस्थित होते.

             प्रारंभी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रीयेबाबत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. यादव यावेळी म्हणालेलोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दोन मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. विधानसभेच्या १० मतदारसंघांचा समावेश असून २ हजार ५१७  मतदान केंद्रे आहेत. या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय सरमिसळ मतदारसंघनिहाय करण्यात आली. प्रथमस्तरीय तपासणीनंतर जिल्ह्यात मतदानासाठी उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यासाठी निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ईएमएस प्रणालीद्वारे प्रथम सरमिसळ करण्यात आली.

           याद्वारे एकूण ३ हजार १६  बॅलेट युनिट (बीयु)३ हजार १६  कंट्रोल युनिट (सीयु) आणि  ३ हजार २६८ व्हीव्हीपॅट मशीनचे जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांच्या प्रमाणात सरमिसळ करण्यात आली.

 

वैदिक काल के भारत के अधिपति, संपूर्ण भारत के श्रद्धास्थान, इक्ष्वाकु कुल शिरोमणि, सूर्यवंशी आभा के धनी, समाज में नैतिकता

 👏🏻🙏🏻


*वैदिक काल के भारत के अधिपति, संपूर्ण भारत के श्रद्धास्थान, इक्ष्वाकु कुल शिरोमणि, सूर्यवंशी आभा के धनी, समाज में नैतिकता


और समानता को प्रेरित करने वाले, एकवचनी, एकव्रती, आदर्श, एकनिष्ठ, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र जी के जन्मोत्सव की सभी भारतीयों को शुभकामनाएं ।*


आप सभी को *"श्री राम नवमी"* की शुभकामनाएं । 

जय जय श्री राम 🙏🏻🙏🏻

Featured post

Lakshvedhi