Thursday, 18 April 2024

सुर्य तिलक

 


अतिशय सुंदर रामाचे गीत जयोस्तुते चालीवरती 👍🥰

 अतिशय सुंदर रामाचे गीत जयोस्तुते चालीवरती 👍🥰


मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन 16 राज्यस्तरीय सदिच्छादूत

 मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय

सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

16 राज्यस्तरीय सदिच्छादूत

            मुंबई, दि. 17 :- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरसाहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाडअभिनेत्री उषा जाधवअभिनेत्री सान्वी जेठवानीमहिला क्रिकेटपटू स्मृती मनधनासुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबरअर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडेतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंततृतीयपंथी प्रणीत हाटेतृतीयपंथी झैनाब पटेलदिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीतदिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

            प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरेप्रणिता सोमणशिवम लोहकरेमिलिंद शिंदेआरुष बेडेकरवेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधेमयुरी लुतेप्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            औरंगाबादमध्ये नवेली देशमुखउस्मानाबादमध्ये राहुल लखाडेधुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगीगडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणेगोंदियामध्ये मुनालाल यादवजळगावमध्ये निलिमा मिश्राजालनामध्ये किशोर डांगेडॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडेलातूरमध्ये बसवराज पैकेमेघा पवारसृष्टी जगतापमुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीतमुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगेनांदेडसाठी भाग्यश्री जाधवसृष्टी जोगदंडकपिल गुडसुरकरनंदूरबारसाठी प्रतिक कदमरिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकरसागर बोडकेपालघरसाठी विक्रांत केणीपूजा पाटीलशुभम वनमाळीभाविका पाटीलपुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.

            रायगडसाठी तपस्वी गोंधळीरत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी मानेसांगलीमध्ये संकेत सरगरसातारामध्ये आदिती स्वामीसिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारीसोलापूरमध्ये तानाजी गालगुंडेआनंद बनसोडेप्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईरवर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            यवतमाळमध्ये अंकुर वाढवेआकाश चिकटेचंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडेप्रशांत पाईकरावशुभम म्हस्केसुनील तुरुकमानेडॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

000000

राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन

 राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन


            मुंबई, दि. 17 : रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी उपस्थितांसह प्रभू रामाची माध्यान्ह आरती केली. राज्यपालांच्या वतीने सर्व उपस्थितांना यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले. राज्यपाल श्री.बैस यांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.  

००००

 

Governor Bais visits Ram Mandir; performs aarti on Ram Navmi

       Mumbai, dt.17 : Governor Ramesh Bais visited the Ram Mandir in the Raj Bhavan premises on the occasion of Ram Navami and performed aarti with all the devotees assembled on the occasion on Wednesday (17 April).

       The Governor extended Ram Navami greetings to all the people assembled on the occasion.

००००

लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात; शुक्रवारी होणार मतदान

 लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा       

1.41 लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघातशुक्रवारी होणार मतदान

            मुंबई, 17 :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

            मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करुन घेतली आहे.

            18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया या मतदारसंघात आहेत. रामटेक मतदारसंघात 31,725, भंडारा-गोंदिया 31,353, नागपूर 29,910, चंद्रपूर 24,443 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 24,026 इतके नवमतदार आहेत. यासह 20-29 वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 3,83,276,  भंडारा-गोंदिया 3,66,570, चंद्रपूर 3,42,787, नागपूर 3,37,961 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,28,735 इतके मतदार आहेत.

            30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार हे नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 5,06,372, रामटेक 4,90,339, चंद्रपूर 4,25,829, भंडारा-गोंदिया 3,99,115 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,56,921 इतके मतदार आहेत.

            पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 70,698 इतके मतदार आहेत. त्यापाठोपाठ रामटेक 46,413, भंडारा-गोंदिया 38,269, चंद्रपुर 37,480 आणि गडचिरोली-चिमुर 33,559 असे एकूण 2,26,419 ज्येष्ठ  मतदार आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

०००

Wednesday, 17 April 2024

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

 दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

          मुंबई दि. 16 : जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे.  या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.

            दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.

            विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.    

            भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.

0000


ओळखीत जर कोणी विवाह इच्छुक ब्राह्मण मुले मुली असतील तर त्यानां ही माहिती पाठवा

 तुमच्या ओळखीत जर कोणी विवाह इच्छुक ब्राह्मण मुले मुली असतील तर त्यानां ही माहिती पाठवा आणि ऑनलाईन योगिनी वधुवर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सांगा , ही नम्र विनंती 😊🙏🏻


Featured post

Lakshvedhi