Tuesday, 16 April 2024

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

 मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय

सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

१६ राज्यस्तरीय सदिच्छादूत

            मुंबई दि. 15 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमेमुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलकभित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरसाहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिकअभिनेते प्रशांत दामलेअभिनेत्री मृणाल कुलकर्णीअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाडअभिनेत्री उषा जाधवअभिनेत्री सान्वी जेठवानीमहिला क्रिकेटपटू स्मृती मनधनासुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबतअर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंततृतीयपंथी प्रणीत हाटेतृतीयपंथी झैनाब पटेलदिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीतदिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सदिच्छादूत

            प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरेप्रणिता सोमणशिवम लोहकरेमिलिंद शिंदेआरुष बेडेकरवेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधेमयुरी लुतेप्रमिला चांदेकर तर बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            औरंगाबादमध्ये नवेली देशमुखउस्मानाबादमध्ये राहुल लखाडेधुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगीगडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणेगोंदियामध्ये मुनालाल यादवजळगावमध्ये निलिमा मिश्राजालनामध्ये किशोर डांगेडॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            कोल्हापूरमध्ये वीरधवल खाडेलातूरमध्ये बसवराज पैकेमेघा पवारसृष्टी जगतापमुंबई शहरामध्ये दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीतमुंबई उपनगरासाठी दिव्यांग कार्यकर्ती विराली मोदी हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. याशिवाय नागपूरसाठी जयंत दुबळे आणि ज्योती आमगेनांदेडसाठी भाग्यश्री जाधवसृष्टी जोगदंडकपिल गुडसुरकरनंदूरबारसाठी प्रतिक कदमरिंकी पावरा आणि शिवाजीराव मोरे काम करणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी चिन्मय उद्गगीरकरसागर बोडकेपालघरसाठी विक्रांत केणीपूजा पाटीलशुभम वनमाळीभाविका पाटीलपुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील.

            रायगडसाठी तपस्वी गोंधळीरत्नागिरीसाठी संकेत चाळके आणि पल्लवी मानेसांगलीमध्ये संकेत सरगरसातारामध्ये आदिती स्वामीसिंधुदुर्गमध्ये ओमकार अटारीसोलापूरमध्ये तानाजी गालगुंडेआनंद बनसोडेप्रार्थना ठोंबरे तर ठाण्यात अशोक भोईरवर्ध्यात निमिश मुळ्ये निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

            यवतमाळमध्ये अंकुर वाढवेआकाश चिकटेचंद्रपूरमध्ये शेख गायसुद्दिन आणि हिंगोलीमध्ये महेश खुळखुळे काम करणार आहेत. परभणीमध्ये संकर्षण कऱ्हाडेप्रशांत पाईकरावशुभम म्हस्केसुनील तुरुकमानेडॉ. राजगोपाल कलानी निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्यासाठी निवास, आरोग्य आणि भोजन व्यवस्थाही पाहणार जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

  नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर

मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्यासाठी

निवासआरोग्य आणि भोजन व्यवस्थाही पाहणार

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

            मुंबई उपनगरदि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास ५० हजार अधिकारीकर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक कालावधीत या कर्मचाऱ्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय कल्याण अधिकारी अर्थात वेल्फेअर ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत.

            निवडणुक कालावधीत एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असतानाच या यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही काळजी आता विशेषत्वाने घेतली जाणार आहेअशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघात हे वेल्फेअर ऑफिसर नियुक्त केले आहेत. निवडणूक प्रक्रिया आणि विशेष करून मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवासभोजनपिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे या सुविधा पुरविण्याबाबत येत आहेत.

कॅशलेस आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देणार

            आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास तत्काळ उपचार करण्याबाबतची कार्यवाहीही वेल्फेअर ऑफिसर यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

            या वेल्फेअर ऑफिसर यांच्याकडे मतदान केंद्राजवळ असलेली सर्व रुग्णालयेतेथे उपलब्ध असणाऱ्या आरोग्याच्या सुविधारुग्णवाहिकेची उपलब्धता आदींची माहिती असणार आहे. याशिवायकोणत्याही अधिकारीकर्मचारी यांना आवश्यकता भासल्यास तत्काळ कॅशलेस आरोग्य सुविधा संबंधित रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

            मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कोणत्याही अधिकारीकर्मचाऱ्यांना या कालावधीत कोणतीही अडचण उद्भवू नये याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

००००

नागरिकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा

 नागरिकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई उपनगरदि. 15 :  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने मतदान करण्यासाठी सर्व यंत्रणांनी तयार केलेल्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून घ्यावाअसे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

            मुंबई उपनगर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे प्रमुख समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी किरण महाजनअपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडसमितीचे समन्वयक डॉ. सुभाष दळवी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले कीमतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ही भावना मतदारांमध्ये रुजवीत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व विभागांनी आपला कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यानुसार या जनजागृती अभियानाला गती देत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्याला मतदानासाठी प्रवृत्त करावे. मतदार जनजागृती अभियानाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल. मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर आहे. तथापिलोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करावयाचे असेलतर मतदारांना २४ एप्रिल २०२४ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. 

            मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत तेथील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच नागरिक सोशल मीडियावर मोठ्या संख्येने सक्रिय असतात. या संधीचा प्रशासकीय यंत्रणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उपयोग करून घ्यावा. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईलअसेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी श्री. महाजनडॉ. दळवीबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

००००

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांचे आवाहन 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक

 राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांचे आवाहन

26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक

            मुंबई उपनगर दि. 15 : निवडणूक आचारसंहिता काळात सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावेअसे आवाहन 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी केले.

            लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच श्री. देवरे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनारिपब्लीकन पक्षराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरताना घ्यावयाची काळजीनामांकन अर्ज व त्यासोबत भरावयाचे विविध नमुनेशपथपत्र याबाबतची प्राथमिक माहिती यावेळी देण्यात आली. उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी तयार केलेली ऑडिओ- व्हीडिओ जाहिरात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण कक्षाकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी निवडणुकी अगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी  उमेदवारास खर्च मर्यादा ही 95 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहेअसे यावेळी श्री. देवरे यांनी सांगितले.

            आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी या मतदारसंघात भरारी पथकेस्थिर निरीक्षण पथके क्षेत्रीय स्तरावर नियुक्त करण्यात आली आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी विविध परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवायउमेदवार सुविधा ॲपद्वारेही परवानगीसाठी अर्ज सादर करु शकतात. निवडणूक प्रचारासाठी वाहन परवानाध्वनीक्षेपकसभामेळावेप्रचार कार्यालय उघडण्यासाठी परवानामिरवणूकरॅलीरोड शोफिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपक तसेच हेलिकॉप्टर उतरवणे अथवा उड्डाण करण्यास परवानगी यासाठी या एक खिडकी कक्षातून विहित पद्धतीने अर्ज केल्यास तात्काळ परवानगी देण्याची कार्यवाही केली जाईलअसे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी सांगितले.

            एका विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील परवानगी असल्यास संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारीदोन पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील परवानगी असल्यास संबंधित लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीदोनपेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील परवानगी असल्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मुंबई उपनगर जिल्हा व जिल्ह्याबाहेरील परवानगी असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी स्तरावरुन परवानगी दिली जाईलअशी माहिती यावेळी श्री. देवरे यांनी दिली.

            26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठीची अधिसूचना दिनांक 26 एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण 17 लाख 43 हजार 846 इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 35 हजार 129महिला मतदार 8 लाख 8 हजार 309 आणि इतर 3918 मतदार आहेत.

0000

Monday, 15 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी 'गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी संजय दैने यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी 'गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी  जिल्हाधिकारी संजय दैने यांची  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

            मुंबईदि. १४ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

       जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्था  कार्यवाहीमाध्यमप्रमाणी करण समितीचे कामकाजसर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याबाबत  श्री. दैने यांनी माहिती दिली आहे. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने  यांची मुलाखत मंगळवार दि.१६ एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. 

0000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी 'गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी संजय दैने यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी 'गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी  जिल्हाधिकारी संजय दैने यांची  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

            मुंबईदि. १४ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

       जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्था  कार्यवाहीमाध्यमप्रमाणी करण समितीचे कामकाजसर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याबाबत  श्री. दैने यांनी माहिती दिली आहे. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने  यांची मुलाखत मंगळवार दि.१६ एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. 

0000

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी 'गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी संजय दैने यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

            मुंबई, दि. १४ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

       जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था कार्यवाही, माध्यमप्रमाणी करण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याबाबत श्री. दैने यांनी माहिती दिली आहे. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची मुलाखत मंगळवार दि.१६ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. 

0000

Featured post

Lakshvedhi