Thursday, 11 April 2024

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलला

 पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा 

शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलला


 


            मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत आयोजित केला होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. या कारणांमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होवू न शकल्याने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


            पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा - २०२२ च्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले असल्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.


सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करणार


            राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.


0000

बिजू (बिजयानंद) पटनायकहे आपणास माहीत पाहिजे

 ( हे आपणास माहीत पाहिजे )


*बिजू (बिजयानंद) पटनायक (१९१६- १९९७) हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव तीन देशांच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले होते. भारत, रशिया आणि इंडोनेशिया.*


बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्रीही होते


बिजू पटनायक हे वैमानिक होते आणि दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियन अडचणीत असताना त्यांनी डकोटा हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बॉम्बफेक केली, ज्यामुळे हिटलरला माघार घ्यावी लागली. सर्वोच्च पुरस्कारही त्यांना देण्यात आला आणि त्यांना सोव्हिएत युनियनने मानद नागरिकत्व बहाल केले.


जेव्हा कवळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा बिजू पटनायक यांनीच २७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली ते श्रीनगर दिवसातून अनेक दौरे केले आणि सैनिकांना श्रीनगरला नेले.


इंडोनेशिया ही एकेकाळी डचांची म्हणजे हॉलंडची वसाहत होती आणि डच लोकांनी इंडोनेशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. डच सैनिकांनी इंडोनेशिया भोवतीचा संपूर्ण समुद्र आपल्या ताब्यात ठेवला आणि त्यांनी एकाही इंडोनेशियन नागरिकाला बाहेर पडू दिले नाही.


१९४५ मध्ये इंडोनेशियाची डचपासून मुक्तता झाली आणि पुन्हा जुलै १९४७ मध्ये पीएम सुतान जहरीर यांना डचांनी घरात अटक केली. त्यांनी भारताची मदत मागितली. त्यानंतर नेहरूंनी बिजू पटनायक यांना तत्कालीन इंडोनेशियन पंतप्रधान जहरीर यांना भारतात सोडवण्यास सांगितले. २२ जुलै १९४७ रोजी बिजू पटनाईक आणि त्यांच्या पत्नीने जीवाची पर्वा न करता डकोटा विमान घेतले, डचांच्या नियंत्रण क्षेत्रावरून उड्डाण करत ते त्यांच्या मातीत उतरले आणि मोठे शौर्य दाखवत इंडोनेशियन पंतप्रधानांना भारतात आणले. सिंगापूर मार्गे सुरक्षितपणे. या घटनेने त्यांच्यात एक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांनी डच सैनिकांवर हल्ला केला आणि इंडोनेशिया पूर्णपणे स्वतंत्र देश झाला.


 नंतर, जेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा त्यांनी बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला नवागताचे नाव देण्यासाठी बोलावले. त्यानंतर बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या मुलीचे नाव *मेघावती* असे ठेवले. 


इंडोनेशियाने १९५० मध्ये बिजू पटनायक आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या देशाचा मानद नागरिकत्व पुरस्कार *'भूमिपुत्र'* प्रदान केला होता. 

नंतर त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्षी इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्माननीय पुरस्कार *'बिनतांग जासा उत्मा'* प्रदान करण्यात आला.


बिजू पटनायक यांच्या निधनानंतर इंडोनेशियामध्ये सात दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि रशियामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्यात आला आणि सर्व ध्वज खाली करण्यात आले.


*आपल्या देशाच्या इतिहासाच्या पुस्तकांनी कधीही न सांगितलेल्या अशा महान व्यक्तीबद्दल मला कळले तेव्हा मला अभिमान वाटला.*

राज्यपालांकडून ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा

 राज्यपालांकडून ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा

 

          मुंबई, दि. १० : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पवित्र अशा रमजान महिन्यात उपवासप्रार्थना व दानधर्माला महत्व दिले आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंदउत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांनाविशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद उल फित्रच्या शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

 

Maharashtra Governor greets people on Eid-Ul-Fitr

            Mumbai, 10th April : Maharashtra Governor Ramesh Bais has greeted the people of the State on the occasion of Eid-Ul-Fitr (Ramzan Eid). In his message, the Governor has said:

            “The auspicious month of Ramzan attaches importance to fasting, prayers and acts of charity.  May Eid-Ul-Fitr bring happiness, good health and prosperity to all. Wishing Eid Mubarak to all, especially to Muslim brothers and sisters.”

आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

 आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या - काय करावे’ आणि काय करू नये

 

            मुंबईदि. 10 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

            आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी काय करावे’ आणि काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत. जाणून घेऊया याबाबतची माहिती.

 काय करावे?

            निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूरअवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणेपूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे. सभांमध्ये अडथळे आणणाऱ्यासुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावेत आणि मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्हउमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये.

 काय करू नये?

            निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. उमेदवार आणि मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणाही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. शासकीय काम आणि निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार यांची सरमिसळ करू नये. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नये. वेगवेगळ्या जातीसमूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेषतणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणेभित्तीपत्रकेसंगीत यांच्यासाठी करू नये. मतदारांना लाच देणेदारुचे वाटप करणेमतदारांवर गैरवाजवी दडपण वा धाकदपटशा दाखविणेतोतयेगिरीमतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणेमतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टींना मनाई आहे. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. तसेच त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण करू नये. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत. याचबरोबर मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रकेध्वजचिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.

            आचारसंहितेच्या या तत्त्वांचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांनी सी-व्हिजील ॲपवर ध्वनीमुद्रणध्वनीचित्रमुद्रण या माध्यमातून तक्रार करावीअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 


 

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करार

 सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी

ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करार

            मुंबईदि. 10 : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणीतसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकतागतिमानताअचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’ संदर्भात भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्यामध्ये नुकताच करार करण्यात आला.

            निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने सचिव वसंत पाटील आणि भारतीय स्टेट बँकेच्यावतीने उपमहाव्यवस्थापक नवीन मिश्रा यांनी स्वाक्षरी केली. या संगणक प्रणालीच्या विकसनाचाअंमलबजावणीचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च भारतीय स्टेट बँकेने उचललेला आहे.

            जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या बँक खात्यावर सहकारी संस्थांचा निवडणूक निधी जमा होणेत्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेळोवेळी आवश्यकतेनुसार वितरण होणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम राबविण्याकरीता निधीचा खर्च करणेतसेच निवडणूक खर्च प्रस्ताव मान्यतेसाठी सादर होणे व मंजुरी प्राधिकारी यांनी त्याबाबत निर्णय घेणे या सर्व टप्प्यांचे केंद्रीभूत पद्धतीने सनियंत्रण करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक अशी निवडणूक निधी व्यवस्थापन पोर्टल’ ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

            राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर राज्यातील २५० व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळता अन्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि राज्यातील सर्व सहकारी संस्थाकृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षणनिर्देशन व नियंत्रण करणे व अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने प्राधिकरणाने ही प्रणाली विकसित केली आहे.

            या प्रणालीमुळे निवडणूक निधीचे सर्व व्यवहार रोखीने करण्याऐवजी डिजिटल व्यवहार करण्याचे सर्व फायदे प्राप्त होणार असून सर्व  व्यवहारांमध्ये पारदर्शकतागतिमानताअचूकता आणण्यासाठी मदत होणार आहे. निवडणूक कार्यक्रमांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व प्रभावी व्हावी यासाठी राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामकाजावर सनियंत्रण ठेवता येणार आहे.

            जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडील खात्यामध्ये जमा होणाऱ्या निवडणूक निधीची संस्थानिहाय जमा-खर्च ताळमेळ ठेवणे सुकर होणार आहे. तसेच हा निधी विहित केलेल्या दराने जमा करण्यात आला आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करणे सोयीस्कर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विहित केलेल्या निवडणूक खर्चाची बाबवार खतावणी ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. निवडणुकीनंतर निवडणूक खर्चास मान्यता प्राप्त करुन घेण्याचा प्रस्ताव बिनचूक आणि मुदतीत सादर करण्यास मदत होणार आहे.

            ऑनलाईन पद्धतीने विविध प्रकारचे डॅशबोर्ड्सनियमित सूचना तसेच आवश्यकतेनुसार विविध अहवाल उपलब्ध राहणार आहेत. निवडणूक खर्चाच्या प्रस्तावांचा निवडणूक निर्णय अधिकारी निहाय ताळमेळ घेणे आणि निवडणूक खर्चास मान्यता देणे या बाबींचे संनियंत्रण सुकर होणार आहे.

            कोणत्या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या प्रस्तावास मान्यता घेतली आहे किंवा कसे याची सातत्याने पडताळणी घेणेकनिष्ठ कार्यालयाने कार्यवाही मुदतीत न केल्यास त्याबाबत त्यांचे संबंधित वरिष्ठ कार्यालय प्रमुखांना संगणक प्रणालीच्या माध्यमातून नियमित ॲलर्टस् जाणे शक्य होणार आहेअसेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे.

0000


Wednesday, 10 April 2024

मतदान कार्ड नाही ? तरी करता येणार मतदान ! आधार, पॅनकार्डसह 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

 मतदान कार्ड नाही तरी करता येणार मतदान !

आधार, पॅनकार्डसह 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

 

            मुंबईदि. 10 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

                भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहेते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीतअशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

            मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट)वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)केंद्र अथवा राज्य शासनतसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्रबँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुकपॅन कार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्डमनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्रनिवृत्तीवेतनाची दस्तावेजसंसदविधानसभाविधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्रआधार कार्डभारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्रकामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

                एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेलपण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्रयादी भाग क्रमांकमतदानाची तारीखवेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावेअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

--

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची 

'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 



          मुंबईदि. १० : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी राज्यात प्रशासन सज्जयाविषयी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

       राज्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसर्व टप्प्यातील निवडणुकांसाठी झालेली तयारीनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्था कार्यवाहीमाध्यमप्रमाणीकरण समितीचे कामकाजसर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. एस. चोक्कलिंगम यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मुलाखत गुरुवार दि. ११ व शुक्रवार दि. १२  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR  

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR  

००००

Featured post

Lakshvedhi