Saturday, 6 April 2024

आपले नावं मतदार यादीत आहे का

 आपले नावं मतदार यादीत आहे का

            मतदान जनजागृती अभियानातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आपले नावं मतदार यादीत तपासून घ्यावेआणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in/ voter Helpline Mobile App वर आणि मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावाअसे आवाहन देखील जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.

०००

मंत्रालयीन अधिकारी - कर्मचारी यांना कायझेनचे प्रशिक्षण

 मंत्रालयीन अधिकारी - कर्मचारी यांना कायझेनचे प्रशिक्षण

 

          मुंबईदि. ५ कायझेन म्हणजे वैयक्तिक जीवनात आणि कार्यस्थळी चांगल्या प्रक्रियेसाठी सातत्याने सुधारणा करून लहान खर्चात मोठा बदल घडू शकतो. असे सांगून ही प्रक्रिया  निरंतर अंमलात आणल्यास  वेळकष्टाची बचत होऊन उत्साह निर्माण होत असल्याचे प्रतिपादन अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.

            मंत्रालयात अधिकारी - कर्मचारी यांना कायझेन इन्स्टिट्यूट मार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

            मध्यवर्ती टपाल केंद्र (C.R.U.) येथील टपालाचे व्यवस्थापनई ऑफिसच्या वापरास प्रोत्साहन देणे व जुन्या नस्त्यांचा अनुशेष निकाली काढणे यासाठी क्यूसीआय (QCI) मार्फत कायझेन इन्स्टिट्यूट (Kaizen Institute) या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

            यावेळी प्रशिक्षक हेमंत भांगे यांनी दिलखुलास संवाद साधत प्रशिक्षण दिले. यावेळी ते म्हणाले की, सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला असून सर्वांनी आपल्या वैयक्तिक जीवनात याचा उपयोग करावा. यामुळे  मोठा बदल नक्की घडून येईल असे त्यांनी सांगितले.

००००

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

 

            मुंबई दि.५ :   सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

            राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम२०२४दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ मधील तरतुदीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले असून निवड प्रक्रिया सुरु झालेली नाहीअशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता दिनांक २९ डिसेंबर२०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा दिनांक २८ एप्रिल२०२४ रोजी घेण्यात येणार होती. परंतुमहाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम२०२४दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या दिनांक २१ मार्च२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १९ मे२०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारीगट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीगट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

            महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम२०२४दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ मधील तरतुदीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी२०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत किंवा जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तथापिनिवड प्रक्रिया सुरु झालेली नाहीअशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा२०२४ करिता शासनाच्या महसूल व वन विभागवित्त विभागसामान्य प्रशासन विभागग्राम विकास विभागआदिवासी विकास विभागउद्योग उर्जा व कामगार विभागकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग इत्यादी विभागांकडून विविध गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गाकरिता प्राप्त मागणीपत्रामध्ये अराखीव पदांचा समावेश असल्यानेसामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळविण्यात आले आहे.

            सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही. प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता पुरेसा कालावधी देऊन तसेच संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोग इत्यादींमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेचे दिनांक विचारात घेऊन परिक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येईल.

आपले नावं मतदार यादीत आहे का

 आपले नावं मतदार यादीत आहे का,?


            मतदान जनजागृती अभियानातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आपले नावं मतदार यादीत तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in/ voter Helpline Mobile App वर आणि मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा, असे आवाहन देखील जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.

आई-बाबा मतदान करायचं हं….

 आई-बाबा मतदान करायचं हं….

आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी

साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

            मुंबई उपनगर, दि. 5 : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपल्या पालकांनीही सहभाग नोंदवावा अशी चिमुकल्यांची अपेक्षा! हीच अपेक्षा वर्सोवा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आई-बाबांना पत्र लिहून व्यक्त केली. 'आई - बाबा मतदान नक्की करायचं हं..' अशी आवाहन करणारी पत्रच या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना लिहिली. 


            मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांनी मताधिकार बजावावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून आज वर्सोवा येथील यूपीस या इंग्रजी माध्यम शाळेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.


            देशाच्या सर्वांगीण विकासात भावी पिढीचे योगदान अमूल्य असणार आहे. जर विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मतदानाचे महत्व पटवून दिले तर देशात एक सक्षम लोकशाही उभी राहण्यास नक्कीच मदत होणार आहे. ही बाब विचारात घेवून कामा रोड येथील इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रलेखनातून मतदान करण्यासाठी आग्रह केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी उंचावण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.


लोकशाहीची हाक ऐकू या, मतदार यादीत नाव नोंदवू या


            लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील युवक व युवतींचा सहभाग वाढावा यासाठी चर्चगेट, मरीन लाईन्स येथे स्वाक्षरी मोहीम आणि मतदान प्रतिज्ञा बँडचे वितरण असा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात 250 हून अधिक महिलांनी आणि युवतींनी सहभाग घेतला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून लोकल ट्रेन मधील प्रवासी महिलांना मतदानाचे महत्व पटवून देत संवाद साधण्यात आला.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन पी-दक्षिण विभाग आणि 175- कलिना विधानसभा मतदारसंघातील एच/पूर्व विभागातील बचत गट, मारुती टेकडी कलिना, सांताक्रुझ (पूर्व), रईस वस्ती संघ, पी उत्तर आणि एल वॉर्ड कुर्ला येथे महिला बचत गटांच्या सदस्य यांनी यावेळी ‘….मी मतदान करणार’ अशी शपथ घेत मतदान करण्याचा संकल्प केला. आसपी नूतन शाळा, मारवे रोड, मालाड पश्चिम येथे 158 जोगेश्वरी पूर्व, एसआरपी रेसिडेन्सी, सिध्दी सहकारी संस्था, गौरी नगर गोराई, बोरीवली 177 वांद्रे (प.), सखी सहेली मेळावा, अंगणवाडी सेविका तसेच बचत गट, शताब्दी रुग्णालय गोवंडी येथे नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती आणि चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील लहान मोठी दुकाने, स्वच्छता कर्मचारी आणि घरोघरी जाऊन मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले.


आपले नावं मतदार यादीत आहे का


            मतदान जनजागृती अभियानातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आपले नावं मतदार यादीत तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in/ voter Helpline Mobile App वर आणि मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा, असे आवाहन देखील जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.


०००

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध

 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील

आठ मतदारसंघात एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध

 

            मुंबईदि. 5 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा 25अकोला 17अमरावती 56वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

            दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल 2024 ही असून या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होईल.

00000

Friday, 5 April 2024

लोकसभा निवडणुकीसाठी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 लोकसभा निवडणुकीसाठी

440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 

            मुंबई दि. 5 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.     

            ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.

            या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

            'महिला नियंत्रित मतदान केंद्रस्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारीकर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालयपोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहीलअशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

            जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर 12, अकोला 6, अमरावती 8, औरंगाबाद 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदुरबार 4,  उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.

Featured post

Lakshvedhi