Wednesday, 3 April 2024

भवताल" मार्च २०२४ अंक प्रसिद्ध !

 भवताल" मार्च २०२४ अंक प्रसिद्ध !

"भवताल मासिका" चा मार्च २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. त्यात पुढील विषयांचा समावेश आहे:

• लाव्हा टनेल
६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झालेले एक अद्भुत स्ट्रक्चर (बेस्ट ऑफ महाराष्ट्र- १; महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा मागोवा घेणारा कॉलम)

• वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
(वनस्पती प्रजातींच्या मूळ नावांचा आणि त्याच्याशी संबंधित आशयाचा वेध घेणारी मांडणी)

• मेघालय - काझीरंगा
(एका आगळ्यावेगळ्या 'भवताल इकोटूर' चे रसपूर्ण वर्णन)

• भवताल बुलेटीन
('भवताल' च्या विविध उपक्रमांचा मागोवा)

• इको-अपडेट्स
(अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा)
...

सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

नावनोंदणीसाठी लिंक:

(आपण २०२४ या वर्षाची वर्गणी भरली नसल्यास रु. ५९० इतकी वार्षिक वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला "भवताल" चा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी,
G-pay:  9822840436
UPI:  abhighorpade@okhdfcbank

- संपादक

नकारात्मक विचार

 नकारात्मक विचार पाया कमकुवत करतात आणि तुमची क्षमता मर्यादित करतात.तुमचे विचार हे तुमचे आर्किटेक्ट आहेत.(Your Thoughts Are Your Architects)आपण कोण आहोत आणि आपण काय सक्षम आहोत याबद्दल आहेत.तुमच्या अंतरमनाला काय आग लावते? तुम्हाला खरोखर जिवंत वाटते कशामुळे? तुमचा उद्देश शोधणे.परेशान हो तो पढ़ो ! हैरान हो तो समझो !स्वतःबद्दल नकारात्मक बोलू नका.(Don't speak negative about yourself) 

   समस्या इतक्या मोठ्या होतात जेव्हा आपण काळजी करू लागतो आणि तक्रार करू लागतो तेव्हा आपण त्याबद्दल विचार करून खूप थकून जातो. अनेकदा अपयश येते. नियतीला सुबुध्दी साठी प्रार्थना करा,

काय करावे लागेल याची यादी तयार करा.  

मग बघा कामे सोपी होतात.आपल्याला वास्तवापेक्षा कल्पनेचा त्रास जास्त होतो.

    कल्पनेत आपण समस्येच्या स्वरूपाचा अतिरेक करून असे चित्र बनवतो की ती गुंतागुंतीची आणि कठीण आहे पण प्रत्यक्षात जेव्हा आपण तिचा सामना करतो तेव्हा आपल्याला कळते समजते समस्या किती छोटी आहे,

महाराष्ट्र शासनाचे 18 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे 18 वर्षे मुदतीचे

2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या अठरा वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 2 एप्रिल  2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  2 एप्रिल 2024 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 3 एप्रिल  2024 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 18 वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 3 एप्रिल  2024 पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 3 एप्रिल  2042 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर ३ आणि एप्रिल ३  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे 17 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 17 वर्षे मुदतीचे

2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सतरा वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री  16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 2 एप्रिल  2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  2 एप्रिल 2024 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 3 एप्रिल  2024 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी  17 वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 3 एप्रिल  2024 पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 3 एप्रिल  2041 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर ३ आणि एप्रिल ३  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे 15 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 15 वर्षे मुदतीचे

2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या पंधरा वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री  16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 2 एप्रिल  2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस्  2 एप्रिल 2024 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 3 एप्रिल  2024 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 15 वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 3 एप्रिल  2024 पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 3 एप्रिल  2039 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर ३ आणि एप्रिल ३  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-2022 अंतिम निकाल जाहीर

 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-2022

अंतिम निकाल जाहीर

            मुंबईदि.२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 20 ते 23 फेब्रुवारी,२०२४ आणि २६ ते २८ फेब्रुवारी२०२४ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२२ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १०१ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे.

            या परीक्षेमध्ये नाशिक जिल्हयातील ओंकार संजय निकुंभ हे खुला व मागास वर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रीमती स्वप्नाली संजय तांदुळजे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

            उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

            प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्तशिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहेअशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

 राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला

निवडणूक कालावधीत प्रतिबंध

            मुंबईदि. : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

       महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेलअसे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

Featured post

Lakshvedhi