Friday, 8 March 2024

छत्रपती संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे भाग्य

 छत्रपती संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे भाग्य

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण

ब्रेल लिपीमधील शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि गोंड समुदाय पुस्तकाचे प्रकाशन

            चंद्रपूर, दि.7 : जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. अशा या वाघांच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे हे माझे भाग्य आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

            प्रियदर्शनी सभागृह येथे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकिट, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे, मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड – 1, ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि महाराष्ट्र : गोंड समुदाय या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. मंचावर नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर, पुराभिलेख विभागाचे संचालक सुजित उगले, प्रा. अशोक जिवतोडे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

            शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 12 महान व्यक्तिरेखा आणि 12 ऐतिहासिक प्रसंगावर आधारीत पोस्ट तिकिट काढण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, केवळ 32 वर्षाच्या वयात छत्रपती संभाजी महाराज 120 लढाया लढले आणि जिंकलेही. छत्रपती संभाजी महाराजांची वीरता, पराक्रम आणि शौर्य शब्दबध्द करता येत नाही. जगात अनेक राजे होऊन गेले, त्या सर्वांनी आपले साम्राज्य वाढविण्यावर भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ख-या अर्थाने रयतेचे राज्य चालविले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरचे टपाल तिकीट हा केवळ एक कागदाचा तुकडा नाही, तर आपला शक्तीशाली वारसा आहे.

            श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सुर्याची उर्जा देणारा स्त्रोत होय. आग्र्याच्या ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेथेच गत दोन वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. दिनांक 4 मे रोजी वाघ नखे भारतात येत आहेत. ही वाघनखं पाच ठिकाणी जाणार आहे. दिल्लीच्या जे.एन.यु. विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांचे कौतुक केले.

            चंद्रपूर सतत प्रगतीच्या मार्गावर जात राहावा. राज्यातच नव्हे तर देशातील इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावा, या जिल्ह्याचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            प्रास्ताविका संचालक विभीषण चवरे यांनी केले. यावेळी पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.  

अंध बांधवांसाठी ब्रेललिपीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा :

            आपल्या राज्यात नोंदणीकृत अंध नागरिकांची संख्या 5 लक्ष आहे. या लोकांपर्यंतसुध्दा शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास पोहचविण्यासाठी ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ पोहचिवण्याचा निर्णय घेतला. अंध बांधवांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पोहचवू शकलो, याचा आनंद आहे. सर्व दिव्यांग शाळांमध्ये हा ग्रंथ पोहचविण्याच्या सूचना विभागाला दिल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र : गोंड समुदाय पुस्तकाचे विमोचन : गोंड समाजाच्या वीरतेचा इतिहास सर्वदूर पोहचविण्याच्या दृष्टीने प्रा. श्याम पोरेटे यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र : गोंड समुदाय’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी आपल्या अर्थमंत्री पदाच्या काळात 200 एकर जागा उपलब्ध करून दिली. तसेच विद्यापीठासाठी 800 कोटी रुपये मंजूर केल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचे कॉफीटेबल बुक : पुराभिलेख विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे उपलब्ध असून ही पत्रे सामान्य जनेतपर्यंत पोहचावित, या दृष्टिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळपत्रांचे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. तसेच पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारीत मराठेकालीन टाकसाळी संबंधाची मोडी कागदपत्रे, खंड – 1 हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

विभागाच्या वतीने आतापर्यंत विविध टपाल तिकिटे प्रकाशित : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शहाजी महाराजांवरील 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण, 6 जून रोजी राजभवन येथे शिवराज्याभिषेक तिकीटाचे अनावरण करण्यात आले असून केवळ 6 दिवसांत टपाल तिकीट काढण्याचा विक्रम देशात सर्वप्रथम झाला आहे. संत जगनाडे महाराज, बाबा आमटे, शहीद बाबुराव शेडमाके, अण्णाभाऊ साठे या महान व्यक्तीवरसुध्दा टपाल तिकीट काढण्यात आले आहे.

००००००

वांद्रे पूर्वेच्या शिवालिक ट्रॅन्झिट कँप रहिवाशांचे त्याच ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झिशान सिद्दीकी यांच्या बैठकीत निर्णय

 वांद्रे पूर्वेच्या शिवालिक ट्रॅन्झिट कँप रहिवाशांचे

त्याच ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश

 उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झिशान सिद्दीकी यांच्या बैठकीत निर्णय

            मुंबईदि. 7 :- मुंबईतील वांद्रे पूर्वेच्या गोळीबार रोडवरील शिवालिक ट्रॅन्जिट कॅम्पमध्ये 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात यावे. वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकासकाने गेल्या 18 वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकसकांकडून हा प्रकल्प पूर्ण करुन रहिवाशांना न्याय मिळवून द्यावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांच्या मागणीवरुन मंत्रालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्तागृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदींसह संबंधित अधिकारी आणि शिवालिक ट्रान्झिट कॅम्प रहिवाशी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीतहा प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंबप्रकल्पाच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणीट्रॅन्झिट कॅम्प रहिवाशांच्या समस्यातेथील महिलाविद्यार्थी वर्गाच्या मागण्यांचा आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीशिवालिक विकासकाकडून प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब अक्षम्यरहिवाशांवर अन्याय करणारा आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी संबंधित रहिवाशी आणि गृहनिर्माण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमतीने अन्य चांगला विकासक शोधण्याच्या पर्यायाचा विचार करावा. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मान्यता घेण्यात यावी. 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थी स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकतात. महिला स्थानिक ठिकाणी घरकाम करतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रहिवाशांचे त्याच ठिकाणी उपलब्ध ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात यावेअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक  घेऊन अपेक्षित निर्देश दिल्याने शिवालिक ट्रॅन्झिट कॅम्पच्या रहिवाशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांचे आभार मानले.

महाराष्ट्राच्या विकासवाटा' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

 पायाभूत विकासासह महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'महाराष्ट्राच्या विकासवाटाकॉफी टेबल बुकचे प्रकाशन

            मुंबईदि. ७ - शेतीउद्योगपायाभूत सुविधासिंचनआरोग्यशिक्षण  महिला सक्षमीकरण आदी प्रत्येक क्षेत्रात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि यापुढेही राहील असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत २०४७साठी जो  रोडमॅप तयार केला आहेत्यामध्ये महाराष्ट्र निश्चितच आपले योगदान देईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित महाराष्ट्राच्या विकासवाटा’ या लोकसत्तातर्फे तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात श्री. एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरसंबंधित उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राची विकास वाट कायम प्रकाशमान आणि तेजस्वीच राहीलअसा विश्वास आहे. उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची चर्चा त्याचेच प्रतिक आहे. विकासाचा वेध घेतला जातोय. त्यामुळेच लोकसत्तेने 'महाराष्ट्राच्या विकासवाटासारखं कॉ़फीटेबल बुक लोकांसमोर ठेवलंय. खऱ्या अर्थाने हे कॉफी टेबल बुक आमच्या सरकारच्या कामगिरीचं प्रगती पुस्तक आहे.

विकास वाटेचे रुपांतर महामार्गात होण्यास सुरुवात

            राज्यात सुरु असलेल्या विकास कामांची व्याप्ती ही वाढत असून  अटल सेतूसमृध्दी महामार्गकोस्टल रोड यांसारखे प्रकल्प हे गेमचेंजर आहेत. समृद्धी महामार्ग लगत विविध नोड विकसित करण्यात येत  आहेत. प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या सहकार्यामुळे राज्याचा विकासरथ चौफेर घौडदौड करतोय. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स  करण्याचा  प्रधानमंत्री यांचा निर्धार असून महाराष्ट्रात  प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा महाराष्ट्र निश्चितच पूर्ण करेल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीनिती आयोगानेही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एमएमआर रिजनवर लक्ष केंद्रीत केलंय. २०३० पर्यंत एमएमआर रिजनचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्स करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.   टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केलीय. त्यांनी एक ब्लू-प्रिंट तयार केली असून त्यात कृषीअर्थराजकीयसामाजिकमहिला अशा अनेक घटकांचा यात विचार केला गेला आहे. महाराष्ट्राची भौगोलिक रचनाशेती-माती-सिंचन आणि पिक पद्धतीचा विचार करून त्यानुसार रोडमॅप तयार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात असेलली क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादनंपिकंऔद्योगिक विकास याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याच्या विकासाला नवी दिशा आणि चालना  त्यातून मिळणार आहे.

गतिमान वाहतूकीला प्राधान्य

            मुंबईतून नवी मुंबईतिसरी मुंबई आणि आता राज्य महामुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. एमएमआरमध्ये रस्त्यांचेमेट्रोचेरिंग रोडचे आणि सागरी सेतुंचं जाळे तयार करण्यात येत आहे. येत्या तीन-चार वर्षांत एमएमआरमधील जवळपास २०० किमी लांबीची मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे रस्त्यावरील ५० ते ६० लाख वाहनं कमी होतील आणि लोक मेट्रोतून आरामदायी प्रवास करतील. कालच कल्याण – तळोजा या मेट्रोचं भूमिपूजन झाले असून लवकरच मेट्रो तीन सुरू होत आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला जात आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरीपर्यंतचा आणखी एक टप्पा खुला झाला असूनमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लींकही खुली करण्यात येणार आहेबोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पाही लवकरच सुरू होत आहे. कल्याण डोंबिवलीभिवंडी येथील वाहतूक कोंडी दूर करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले की केंद्र शासनाचा राज्याला भक्कम पाठिंबा मिळत आहे. रेल्वेच्या गेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १५ हजार कोटी तर यंदा तेरा हजार कोटी मिळालेत. आज राज्यात एक लाख कोटींपेक्षा जास्त रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. अमृत रेल्वे स्थानक योजनेत राज्यातील ४४ तर मुंबईतील १४ स्टेशन्स आहेत.  सात वंदे भारत ट्रेन्स महाराष्ट्राला मिळाल्यात. रेल्वेचे बळकटीकरणही वेगात सुरू आहे. या सर्व प्रकल्पांचा फायदा या राज्यातील जनतेला होणार आहे. एअररेल्वेवॉटररोड अशा चौफेर कनेक्टिव्हिटीवर भर दिला जात आहे.

एमएमआर हे नवं ग्रोथ इंजिन ठरणार

            आजवर मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन समजलं जायचं. पण आता  एमएमआर हे नवं ग्रोथ इंजिन ठरणार आहे. नागपूर - गोवा शक्तीपीठग्रीनफिल्ड आदी  या महामार्गाचं काम सुरू होत असून  पाच हजार किमी लांबीचे अॅक्सेस कंट्रोल रस्ते बांधले जाणार आहेत. विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरचे काम ही केले जाणार असून  मुंबई दिल्ली फ्रेट कॉरिडोर सुरू झालाय. बुलेट ट्रेनच्या मार्गातले अडथळेही दूर झाले असून  नवी मुंबईचं एअरपोर्ट ही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणालेविकासाकामात पर्यारणपूरक कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. अटल सेतूचे काम करताना खूप दक्षता घेतलीफ्लेमिंगो संख्या कमी होऊ नये म्हणून विविध तंत्रज्ञानाचा वापर केला.

उद्योगवृद्धीवर भर

            राज्याची अर्थव्यवस्था भक्कम असून राज्यात अनेक उद्योजक गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. विदेशातील महाराष्ट्र मंडळांनी सुद्धा यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. दोन वर्षात दावोसमध्ये आम्ही पाच लाख कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. गेल्या वर्षभरात आपल्या राज्याचं ग्रॉस स्टेट डोमेस्टीक प्रॉडक्च (स्थूल उत्पन्न) दहा टक्क्यांनी वाढलंय. राज्याचं जीएसटी कर संकलन देशात पहिल्या क्रमांकच आहे. पोलादआयटीग्रीन एनर्जीकृषीलॉजिस्टिकइलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात मोठी गुंतवणूक महाराष्ट्राने आकर्षित केली आहे.  ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प उभारणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. २ लाख कोटींची गुंतवणूक होत आहेत्यातून जवळपास दोन लाख रोजगार निर्माण होणार असून संलग्न सेवांच्या माध्यमातून आणखी काही लाख लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. 

विविध क्षेत्रात राज्याची आघाडी

            स्वच्छतेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.गेल्याच आठवड्याच डीपीआयआयटीने अहवाल प्रसिध्द केला असून महाराष्ट्रात १ लाख कोटींपेक्षा जास्त एफडीआय आल्याचे त्यातून स्पष्ट होते. एफडीआयमध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

             शेतकऱ्यांचे आयुष्य सुखी आणि आनंदी करण्यासाठी सरकार झटतेय. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून राज्यातील ८८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आजवर ३५ हजार कोटींचे वाटप आपण केलंय. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात ३८ हजार रुपये टप्याटप्याने जमा केलेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची मदत दिली आहे.  एक रुपयांतील पिक विम्यामुळे ३ हजार ४९ कोटींची भरपाई मिळाली आहे. १२१ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. १५ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली येईल. 'शासन आपल्या दारीयोजनेतून ३ कोटी ८० लाख लोकांना थेट लाभ दिला आहे. नमो महारोजगार मेळावेमुख्यमंत्री नारी शक्ती असे जनसामान्यांच्या आयुष्यात थेट बदल घडवणा-या योजना शासन राबवत असून त्यातुन  राज्यात चांगले परिवर्तन होत आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळाया अभियानाची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झाली आहे.

            आरोग्य क्षेत्रातही भरीव काम सरकार करत आहे. दीड लाखांच्या आरोग्य विम्याची मर्यादा पाच लाख केली. अटी शर्ती काढून टाकल्या असून साडेबारा कोटी जनतेला त्याचा लाभ मिळणार आहे.  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून १८० कोटींपेक्षा अधिक निधी गरजू रुग्णांना वाटप केले आहे. शेती असो किंवा उद्योगपायाभूत सुविधा असो की सिंचनाचे प्रकल्पमहिला सक्षमीकरण असो किंवा आरोग्य व्यवस्थाशिक्षण असो किंवा पर्यटन प्रत्येक क्षेत्रात आपला महाराष्ट्र अग्रेसर होते,  आजही आहे आणि पुढंही राहीलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यांनी यावेळी व्यक्त केला.

००००

मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

 मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. 7 : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसमोर काही आव्हाने असली तरी मनोरंजन विश्वाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मुंबईतील चित्रनगरीचे मेकओव्हर राज्य शासन करणार आहेगाला हेवा वाटेल अशी चित्रनगरी  आपण करू. चित्रपट ही मोठी इंडस्ट्री आहेमहाराष्ट्रातील कलाकार संस्कृती पुढे नेण्याचं काम करीत असल्याने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने मटा सन्मान २०२४ पुरस्कार प्रदान सोहळा विले पार्ले येथील मुकेश पटेल सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र टाइम्सचे समूह संपादक पराग करंदीकर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनावसुंधरा साथी सन्मान पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपेरे यांना आणि युथ आयकॉन सन्मान शास्त्रीय गायक महेश काळे यांना प्रदान करण्यात आला.

            यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्र टाइम्स सतत २४ वर्षे उत्कृष्ट कलाकृतींचा आणि गुणवंत कलावंतांचा गौरव करत आहे. ही अभिनंदनीय गोष्ट आहे. पत्रकारितेमध्ये ६-७ दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या मटाने मराठी वाचकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. विविध उपक्रमातून महाराष्ट्राच्या सामाजिकसांस्कृतिक प्रगतीत म.टा. ने महत्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

             या सोहळ्यात सुमनताईंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभलेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसुमनताईंच्या आवाजात आपण अनेक सुमधुर गाणी ऐकली. त्यांची गाणी आणखी हजारे वर्षे अशीच ताजीतवानी वाटणार आहेत. तसेच तरुण पिढीपर्यंत भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचवण्यात महेश काळे यांचे मोठे योगदान आहे.   केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही ते शास्त्रीय संगीताचा प्रसार करून खऱ्या अर्थाने  कला संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे दूत बनले आहेतअशा शब्दात त्यांनी महेश काळे यांचा गौरव केला.

            ते म्हणालेराहीबाई पोपेरे यांना वसुंधरा साथी सन्मान’ दिला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे दिला जातो.पर्यावरण जागृतीसाठी व्यासपीठ म.टा.ने उपलब्ध करून दिले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई यांचं कर्तृत्व मोठं आहे. त्यांनी हायब्रिडविरुद्ध लढा उभारला आणि देशी बियाण्यांचा प्रसार केला. कोणतीही शैक्षणिक पदवी नसली तरी त्या सगळ्यांना डिग्री देणाऱ्या ठरल्या आहातअशा शब्दात त्यांनी राहीबाईंचे कौतुक केले.

            राहीबाई यांनी विषमुक्त शेतीसाठी जे काम सुरू केले आहे त्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे राज्य सरकारने १२१ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. १५ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहेअशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

विष मुक्त शेती अभियान राज्यात सुरु

सुरांच्या दोन पिढ्यांचा आज सन्मान

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमटा सन्मान पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित झालो ही भावना मनामध्ये आहे. बीजमाता राहीबाई यांचे काम ही सर्वात मोठी सेवा आहे. आपण सध्या जल वायू प्रदूषणामुळे आरोग्य विषयक प्रश्नांना सामोरे जात आहोत. कॅन्सर रुग्ण वाढत आहेत. विष युक्त अन्न हे याचे मूळ कारण आहे. ते दूर करण्यासाठी राहीबाई प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जनजागृतीचे काम त्या करत आहेत.

            राज्य शासनाने विषमुक्त शेती मिशन सुरू केले आहे. राज्यातील २५ लाख हेक्टर शेती विष मुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. यासाठी काम सुरू झाले असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

            आजच्या मटा सन्मान सोहळ्यात सुरांच्या दोन पिढ्यांचा सन्मान आज केला  गेला आहेअसे सांगून श्री. फडणवीस म्हणाले कीसुमनताई यांची गाणी अजरामर आहेत. त्यांनी १३ विविध भाषेत गाणी गायली. देवघरात तेवणारा दिवा त्याप्रमाणे सुमनताईंचे गाणे असल्याचे ते म्हणाले. महेश काळे यांनी अभिजात संगीताच्या माध्यमातून  नवीन पिढीला शास्त्रीय संगीताचे वेड लावले. जगातील वेगवेगळ्या देशात हे संगीत नेलेअसे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

            यावेळी पुरस्कारार्थीनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सुमन कल्याणपूर यांनी कृतार्थतेची भावना व्यक्त केली. गेली सत्तर दशके गायन करताना प्रत्येक वेळी रसिकांचे प्रेम मिळाले.  राहीबाई यांनीही आपण निसर्गाच्या शाळेत शिकलो आणि विषमुक्त अन्ना साठी आपण काम करत आहोत. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तरमहेश काळे यांनीअभिजात संगीत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात नेऊन त्याच्या प्रसाराचे काम करण्यास या पुरस्काराने आणखी बळ मिळेल असे सांगितले.

            यावेळी नाट्य चित्र क्षेत्रातील कलावंततंत्रज्ञ यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महिला दिन

 नारी तु, भारी तु ! 

संसारी तु, जग उद्धारि तु, 

संस्कारी तु, ललकारी तु, 

वैज्ञानिक तु, वैमानिक तु !! 

सामाजिक तु, राजकारणी तु, 

व्यावसायिक तु, प्रगतीशील तु, 

सैनिक तु, लढाऊ तु, 

वेगवान तु, गतीमान तु !!!

सलाम तुला, अन नारी दिनाच्या शुभेच्छा तुला.

नारी तु, अन लई भारी तु !!!!

सर्व लहानथोर महिलांना, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  भरभरून शुभेच्छा.  🙏💐🌹

00000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित

               मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत.

            यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या एक वर्ष ८ महिन्यात २५,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला. मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही. पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टीबायपास सर्जरीकर्करोगावरील शस्त्रक्रियाकेमोथेरपीडायलिसिसजन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रियासर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियारस्ते अपघातविद्युत अपघातभाजलेले रुग्णजन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

            दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष प्रमुख श्री. चिवटे यांनी केले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi