Friday, 8 March 2024

शेतमालाला मिळाले ई-कॉमर्सचे शासकीय दालन; कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण

 शेतमालाला मिळाले ई-कॉमर्सचे शासकीय दालन;

कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण

 

            मुंबईदि. ७ : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

            यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे म्हणालेदेशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झालेली असून त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला आहे. भविष्यात भारतातील ई-कॉमर्स 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा कृषी क्षेत्राला व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप व वेब प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न होता. पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अपद्वारे केला आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरीबचत गटस्वयं सहाय्यता गटस्टार्टअपलहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादनेप्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

            या ॲपद्वारे ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय पोस्ट खाते व फर्स्ट अँड फास्ट लॉजिस्टिक करणार असल्यामुळे पोस्ट खात्यावरील विश्वास द्विगुणित होईल असेही यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले.

            यावेळी अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावलेमहाव्यवस्थापक सुजित पाटील पोस्टमास्टर जनरल (बिझनेस डेव्हलपमेंट) अमिताभ सिंगपोस्टमास्टर जनरल के सोमसुंदरममुंबई पोस्ट विभागाचे अजिंक्य काळेश्रद्धा गोकर्ण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

बहुपयोगी ॲप

            अॅप अनावरणाच्या दिवशीच 358 उत्पादकांची 1370 उत्पादने या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या ॲपवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळामार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे दैनंदिन भाव सुद्धा भविष्यात या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ॲप असे डाउनलोड करावे

            प्ले स्टोअर मध्ये हे ॲप Maha Agro Mart या नावाने उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड (लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.maidc.martकरून फ्लिपकार्ट ॲमेझॉन याप्रमाणेच 1370 उत्पादने खरेदी करता येऊ शकतात. या ॲपवरऑनलाइन पेमेंट सुद्धा करता येऊ शकते.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पसंतीचे राज्य

 उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी

 महाराष्ट्र पसंतीचे राज्य

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि.७ : उद्योग स्नेही धोरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे राज्य ठरले आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबई येथे आयोजित जपानच्या इशिकावा येथील उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळेसचिव डॉ श्रीकर परदेशीचौदा सदस्यीय शिष्टमंडळाचे अध्यक्ष यामामोटो हिरोशीउद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेराज्यात उद्योगाला पोषक वातावरण तयार झाले आहे. जपान येथील उद्योजकांच्या गुंतवणूक सोयीसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. महाराष्ट्र देशात विदेशी गुंतवणुकीत प्रथम स्थानी आहे. कर्नाटकगुजरातदिल्ली या तीन राज्याच्या एकत्रित विदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहेअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.कांबळे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या ओद्योगिक क्षमतेबाबत सादरीकरण करून माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जपानी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे शाल आणि बोधिसत्व यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. 

            शिष्टमंडळाचे प्रमुख श्री. यामा मोटो यांनी सुरुवातीस शिष्टमंडळातील सदस्यांचा परिचय करून दिला तसेच इशिकावा येथील पर्यटन व उद्योगातील विकासाबाबतची माहिती दिली.

शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व विद्यार्थ्यांना आयइसी किटचे

 शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व विद्यार्थ्यांना आयइसी किटचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

 

            मुंबईदि. ७ :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व त्यालाच जोडलेला डेस्क अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे  (IEC KIT) वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार भरत गोगावले यांच्यासह मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे मुख्य समन्वयक मनोज घोडे पाटीलआयटीसी कंपनीएएफएआरएम (AFARM)फिनिश सोसायटीचे प्रतिनिधी व लाभार्थी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये शेती साहित्याबरोबर वैयक्तिक उपयोगाच्या गोष्टींचा समावेश असल्याने त्याचा या शेतकऱ्यांना  लाभ होणार आहे. तर नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य ( IEC KIT) मुलांना उपलब्ध होणार असल्याने  या  मुलांची जाण वाढविण्याच्या दृष्टीने आईसी (Information, Education & Communication) किट उपयुक्त ठरणार आहे.

जेजे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे १२ ते १७ मार्च या कालावधीत वार्षिक प्रदर्शन


जेजे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे

१२ ते १७ मार्च या कालावधीत वार्षिक प्रदर्शन

 

            मुंबई, दि. ७ : सर ज.जी. कला महाविद्यालय ही दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था असून २ मार्च रोजी या संस्थेने १६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेचा वार्षिक कला प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा ११ मार्च रोजी संध्याकाळी ५.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.  १२ मार्च ते दि. १७ मार्च या कालावधीत सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत हे प्रदर्शन सर्व कलाप्रेमींना विनामूल्य पाहता येईल.

            वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्वाचा उपक्रम असून यामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती निवडून त्या प्रदर्शित केल्या जातात.

            सर जेजे स्कुल ऑफ आर्टच्या मुख्य इमारतीतील तळमजला तसेच पहिला मजला व रे आर्ट वर्कशॉप या इमारतीमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज व संस्थेचे माजी विद्यार्थी व चित्रकार विलास शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. दि.१२ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वा विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शोचे आयोजनदि.१३ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वा प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर यांच्या हिंदुस्थानी शास्रीय संगीत गायनाच्या कार्यक्रमास सर्वाना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. दि.१६ मार्च रोजी कलावेध चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

            या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्रस्थिर चित्र प्रदर्शित केली आहेत त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र रंगविलेली आहेत

            शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबरलाकूडवेगवेगळ्या प्रकारचे दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविलेल्या आहेत धातू काम विभागातील विद्यार्थ्यांनी तांब्याचा पत्राविविध पद्धतीने ठोकून व वेगवेगळे उठाव निर्माण करून विविध कलाकृती तयार केल्या

            इंटेरियरच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर व इंटेरियरची डिझाईन तयार करून त्यांची मॉडेल या प्रदर्शनामध्ये सादर केली आहेत. टेक्स्टाईल या विभागातील विद्यार्थ्यांनी विव्हिंग व प्रिंटिंग पद्धतीने कार्पेटबेडशीटपडदेसाडीड्रेस इत्यादी वर नावीन्यपूर्ण डिझाईन केलेली पहावयास मिळतील याचबरोबर कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचीही कामे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

            कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी योग्य क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

ग्रामीण लघुउद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्धतेसाठी राज्यस्तरीय प्रदर्शनास सुरुवात

 ग्रामीण लघुउद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्धतेसाठी

राज्यस्तरीय प्रदर्शनास सुरुवात

-   सभापती रविंद्र साठे

 

            मुंबईदि. ७ : ग्रामीण लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने ८ मार्च ते १७ मार्च या कालावधीत सी.बी.कोरा केंद्रशिंपोली गावबोरीवली येथे राज्यस्तरीय वस्तू प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी केले आहे.

            प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण लघु उद्योजकांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

            या प्रदर्शनामध्ये खादी ग्रामोद्योग आयोग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ग्रामीण उद्योजकांच्या दर्जेदार उत्पादनांचा समावेश केला आहे. तसेच मध केंद्र योजना व मधाचे गाव यासह मधाच्या विक्रीसाठी इच्छुक लघुउद्योजकांना प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात येणार आहे.

            खादी ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने ग्रामीण भागात शासनाच्या रोजगार निर्मितीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तुंना/उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंडळ कार्यरत आहे. खादी सामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती मेळाचे सर्व जिल्ह्यात आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            या प्रदर्शनामध्ये ५० स्टॉल लावण्यात येणार असूनसकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत खुले राहील. प्रदर्शनामध्ये खादीवस्त्रहळदमधहातकागद उत्पादनेकोल्हापूरी चप्पलकेळीपासून विविध पदार्थमसालेविविध प्रकाची लोणचीपापडलाकडी खेळणीशोभेच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती श्री.साठे यांनी दिली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना

कौशल्य प्रशिक्षणासमवेत आर्थिक लाभ देणार

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला

            विविध १८ लघु व्यवसायातील कारागिर आणि शिल्पकारांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत १५ हजारापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांना पाच दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण आणि भांडवल खरेदीसाठी तीन लाखापर्यंत टप्प्याटप्याने कर्ज प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी दिली.

            लहान कामगार आणि कुशल कारागिरांना प्रशिक्षणकौशल्याबाबत सल्ला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यात येणार आहे. देशातील गरजू कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारातून ही योजना राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले. नोंदणीकृत कारागिरांना मान्यता देण्यात येणार आहे. आजतागायत ३ लाख कारागिरांची नोंदणी झाली असून१४ हजार कारागिरांना १०० प्रशिक्षण केंद्रामध्ये  कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            या प्रदर्शनाची सुरुवात जागतिक महिला दिनानिमित्त होत असल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५० कारागिर महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या विविध योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे.

            या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन ग्रामोद्योगी उत्पादने खरेदी करावी आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी ०२२/२२६१७६४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात चौथे महिला धोरण जाहीर महिलांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास

 माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात चौथे महिला धोरण जाहीर

महिलांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. ७ : महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिलांच्या उन्नतीसाठी काम करत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच चौथे महिला धोरण जाहीर होत असल्याचेप्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिना निमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रामावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवयूएन वुमन्सच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सुझन फर्ग्युसनटाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या लक्ष्मी लिंगममाविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे आदी उपस्थित होते.

            महिलांचा विकास हे उद्दिष्ट ठेऊन राज्यात आतापर्यंत ३ महिला धोरणं जाहीर करण्यात आल्याचे सांगून मंत्री अदिती तटकरे म्हणाल्याचौथे महिला धोरण आपल्या सर्वांसमोर ठेवताना आनंद होत आहे. महाराष्ट्र हे महिला धोरण आणणारे देशातील पहिले राज्य आहे. यापुढे महिलांसोबत लिंगभेदभाव नष्ट करून लैंगिक समानता आणणारेमहिला तसेच इतर लिंगी समुदायाला त्यांची ओळख आणि हक्कांसाठी लढावं लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे धोरण मार्गदर्शक ठरणार आहे. हे धोरण तयार करण्यासाठी महिला व बालकल्याणमंत्री म्हणून स्वतः लक्ष दिलंच पण या धोरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष होते.

            मंत्री आदिती तटकरे म्हणाल्याया तिन्ही धोरणांपेक्षा वेगळे आणि अंमलबजावणीवर भर देणारे असे हे चौथे महिला धोरण असणार आहे. या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिकसामाजिक उन्नतीसोबतच यामध्ये अष्टसूत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्यपोषक आहारशिक्षणकौशल्यमहिला सुरक्षामहिलांबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबविणेलिंग समानतापूरक रोजगारहवामान बदलनैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्यसांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश या महिला धोरणामध्ये आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री - पुरुष समानता येण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागाने हे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये अंमलबजावणीवर भर असणार आहे. त्यासाठी त्रिसूत्री ठरवण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमबवजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल. तर जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. या धोरणाच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबी होतील. समाजामध्ये स्त्रि-पुरूष समानता येण्यासाठी महिलांचे अवलंबित्व कमी होणे गरजेचे आहे. यासाठी या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे नियोजनही या धोरणामध्ये करण्यात आले आहे.

            यापुढे महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी देण्याबरोबरच अर्थसंकल्पात योग्य तरतूदशासन - प्रशासनात योग्य स्थानरोजगार - स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात समान संधीतंत्रज्ञानाचा योग्य वापरकौंटुंबिक हिंसाचारापासून संरक्षणसंपत्तीत समान वाटाउद्यमी महिला तसेच इतर लिंगी समुदायाला योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठआरोग्याच्या चांगल्या सेवा या व अशा अनेक बाबींवर या महिला धोरणाने योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील कोणत्याही घटकाला वगळले जाणार नाही सर्वांचा समावेश असलेलं हे सर्व समावेशक धोरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्यासमाजामध्ये स्त्री - पुरुष समानतेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. ही समानता येण्यासाठी पुरुषांनीही साथ देणे गरजेचे आहे. महिला दिन हा वर्षातून एकदा नाही. तर रोज साजरा केला जावा. येत्या काळात माविमच्या माध्यमातून महिलांना आणखी चांगले अर्थसहाय्य मिळेल.  त्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक निर्माण होतील व राज्यासह देशाच्या अर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होतील. अनेक महिला नवनवीन उद्योग उभारत आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

            महिला व बाल विकास विभागाचे सचिव श्री. यादव म्हणालेमहिलांना आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. लोणचीपापड यामधून बाहेर पडून इतर क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास वाव आहे. या क्षेत्रामध्ये आता महिलांनी काम करावे.

            यावेळी बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समुद्री शैवाल उत्पादनामध्ये चांगले काम करणाऱ्या रत्नागिरीच्या वर्षा गोरिवलेहायड्रोफोनिक शेती करणाऱ्या लता जाधवदूध व दुग्धजन्य पदार्थामधून आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या गोंदियाच्या ममता ब्राह्मणकरआदिवासी भागात काम करणाऱ्या यवतमाळच्या कल्पना लिंमजी मंगामसरपंच म्हणून ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार करणाऱ्या नंदुरबारच्या कौशल्या वडवी आणि छत्रपती संभाजीनगरच्या वर्षा सांगळे यांच्या सन्मान करण्यात आला.

00000

जेजे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे १२ ते १७ मार्च या कालावधीत वार्षिक प्रदर्शन

 

जेजे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे

१२ ते १७ मार्च या कालावधीत वार्षिक प्रदर्शन

 

            मुंबई, दि. ७ : सर ज.जी. कला महाविद्यालय ही दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था असून २ मार्च रोजी या संस्थेने १६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेचा वार्षिक कला प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा ११ मार्च रोजी संध्याकाळी ५.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.  १२ मार्च ते दि. १७ मार्च या कालावधीत सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत हे प्रदर्शन सर्व कलाप्रेमींना विनामूल्य पाहता येईल.

            वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्वाचा उपक्रम असून यामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती निवडून त्या प्रदर्शित केल्या जातात.

            सर जेजे स्कुल ऑफ आर्टच्या मुख्य इमारतीतील तळमजला तसेच पहिला मजला व रे आर्ट वर्कशॉप या इमारतीमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज व संस्थेचे माजी विद्यार्थी व चित्रकार विलास शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. दि.१२ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वा विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शोचे आयोजनदि.१३ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वा प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर यांच्या हिंदुस्थानी शास्रीय संगीत गायनाच्या कार्यक्रमास सर्वाना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. दि.१६ मार्च रोजी कलावेध चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

            या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्रस्थिर चित्र प्रदर्शित केली आहेत त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र रंगविलेली आहेत

            शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबरलाकूडवेगवेगळ्या प्रकारचे दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविलेल्या आहेत धातू काम विभागातील विद्यार्थ्यांनी तांब्याचा पत्राविविध पद्धतीने ठोकून व वेगवेगळे उठाव निर्माण करून विविध कलाकृती तयार केल्या

            इंटेरियरच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर व इंटेरियरची डिझाईन तयार करून त्यांची मॉडेल या प्रदर्शनामध्ये सादर केली आहेत. टेक्स्टाईल या विभागातील विद्यार्थ्यांनी विव्हिंग व प्रिंटिंग पद्धतीने कार्पेटबेडशीटपडदेसाडीड्रेस इत्यादी वर नावीन्यपूर्ण डिझाईन केलेली पहावयास मिळतील याचबरोबर कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचीही कामे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

            कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी योग्य क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

०००

Featured post

Lakshvedhi