Tuesday, 5 March 2024

जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही

 जिल्हास्तरीय वारकरी भवनाचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            जळगाव दि. 4 (जिमाका ) : जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            आज त्यांच्या हस्ते या 'वारकरी भवनचे भूमिपूजन खेडी ( जळगाव )येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजनपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलखा. उन्मेष पाटीलखा  रक्षा खडसेआ. राजुमामा भोळेआ किशोरआप्पा पाटीलआ.चिमणराव पाटीलआ.चंद्रकांत पाटीलजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकितह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि  मनाला खुप आनंद झाला. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या  'वारकरी भवनचे भूमीपूजन होत  आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून  शुभेच्छा देतो.  

             पालकमंत्री गुलाबराव  पाटील यांनी विकासकामांसोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू  या सर्वात महत्वाचे असे 'वारकरी भवनबांधण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला असल्याचे सांगून या 'वारकरी भवनप्रमाणे  प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

            ते पुढे म्हणाले कीआपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातूनत्यातील कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मरण करुन मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाच काम तसेच जनजागृतीच काम करीत आहे.   पंढरपुरचा विकास होत असतांना  राज्यातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेतत्या सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 'वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी  राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये अडीच हजार कोटींची  तरतुद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे आहे वारकरी भवन

            प्रस्तावित जिल्हातील वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वा‍र्षिंक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- १८१०.३८ चौ.मी. (तळ मजला) (टप्पा-1) वारकरी भवन            पहिल्या टप्प्यात  सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत ) प्रस्तावित आहे.


कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्श न

 कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या

जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्श

            मुंबई. दि. ४ : राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीवादी व समाज सुधारक राजे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ निर्मिती करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला माहित व्हावे हा या मागील मुख्य उद्देश असून यानिमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी चित्ररथाचे प्रदर्शन ०५ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे.


            हा चित्ररथ कोल्हापूरमधील महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या प्रदर्शनाचे उद्धाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करणार असून या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


            मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे तसेच मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन चित्ररथ निर्मिती कामी लाभले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


000

मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ ची ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

 मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ ची

ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

            मुंबईदि. ४ : वाचनाने माणूस अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होतो. प्रत्येकाने नॅशनल लायब्ररी येथे दोन दिवसीय सुरू असलेल्या या ग्रंथ महोत्सवाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केले.

             दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी कळवले आहे. नॅशनल लायब्ररी वांद्रे पश्चिम येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयमुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे उद्घाटन मुंबई उपनगरचे आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेमुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद महाडिककोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवेराज्य ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, अॅड. दीपक पडवळकरमुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड उपस्थित होते.

            आमदार अॅड. आशिष शेलार म्हणालेकाळाच्या ओघात वाचनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. मात्र नव्या पिढीला दोन दिवस येथे सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या साहित्य संस्कृतीची माहिती मिळेल. ग्रंथ महोत्सवात विविध प्रकाशकांची पुस्तके देखील आहेत. शासनाच्या या  उपक्रमाचा येथील सर्व ग्रंथ प्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

            कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. बनसोड यांनी प्रास्ताविक केले. तर कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती साळवे यांनी आभार मानले.

ग्रंथ महोत्सव २०२३ मध्ये उद्या विविध परिसंवाद

            दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.५ मार्च रोजी पहिल्या सत्रात 'प्रकाशन व्यवसायातील आव्हानेया परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळेमॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळेजयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकरज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असेल.

            वाचन संस्कृतीसामाजिक बांधिलकी या विषयी चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अवयव दान काळाची गरज हे पुरुषोत्तम पवार सादर करणार आहेत.

             याशिवाय राकेश तळगावकर यांची संकल्पना असलेले  मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकरअस्मिता पांडे राजश्री पोतदारआशुतोष घोरपडेसमीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.

            समारोपात वाचनाची आनंदयात्रा या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिलेविनम्र भाबलतसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. सोबत ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामुल्य असणार आहेत.

००००

‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र

  ‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. 4 : ‘ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतीलअसा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवेअसा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. मीटरमध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे’असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

            चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वासमहिम गुप्ताताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरउपवनरंक्षक कुशाग्र पाठकजितेश मल्होत्रासार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणेकार्यकारी अभियंता मुकेश टांगलेविभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीदेशाचे रक्षण करणा-या जवानांना आपण सॅल्यूट करतोतसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणा-या वन अधिकारी व कर्मचा-यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहेतशीच वसुंधरेचे रक्षण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाहीतो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहीलअसे त्यांनी नमूद केले.

            मंत्री म्हणालेताडोबा भवन हे इको – फ्रेंडली असावेया इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नयेत्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी 18 कोटी 8 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहेमात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त 14 कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम

            वन विभागाच्या इमारतीविश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचा-यांच्या निवासी वसाहतीसुद्धा कॅम्पमधून उत्तम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असे राहील ताडोबा भवन

            चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालकताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत 18 कोटी 8 लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर 100 आसन क्षमतेचे ऑडीटोरीयमपहिल्या माळ्यावर उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय तर दुस-या माळ्यावर क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.

0000

हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द

वन विभागाच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 

            मुंबईदि. ४ :  वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५,७२४ रोपट्यांपासून भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे  वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे.

            चंद्रपूर येथे वनविभागाच्यावतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी (२ मार्च) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५,७२४ रोपट्यांनी भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

            वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारीवन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपूर येथे ६५,७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या हरित भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असल्याचे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वासमहिप गुप्ताताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकरवनअधिकारी प्रशांत खाडेमिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

त्वरित उद्यान करण्याच्या सूचना

             ‘भारतमाता’ शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरीत साकारावे. तसेच आज मिळालेले प्रमाणपत्र हे तेथे दर्शनी भागात लावावे. विशेष म्हणजे ही रोपटे सुध्दा नवनिर्मित उद्यानामध्ये भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे लावावीतअशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

अनेक वर्षांची मागणी पूर्णवाशिमकरांमध्ये उत्साह

 

            वाशिमदि. 4 : वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेला होता.

            सोहळ्याला संभाजीराजे छत्रपतीपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलखासदार भावना गवळीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेआमदार ॲड. किरण सरनाईकमाजी मंत्री महादेव जानकरगोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेयजिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारेपोलीस अधीक्षक अनुज तारेसहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आदी सोहळ्याला उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले.  सोहळ्याला स्थानिक नागरिकशिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी नगरपरिषदेमार्फत १.२५ कोटी खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा जमिनीपासून ३५ फूट उंच तर अश्वारुढ पुतळा १३ फूट उंच आहे.

०००

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

 शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी

प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व

शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण

            वाशिमदि. 4 :  शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असूनअनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलखासदार भावना गवळीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेआमदार ॲड. किरण सरनाईकमहादेव जानकरगोपीकिशन बाजोरियाजिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.पोलीस अधीक्षक अनुज तारेसहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुरकृषी सहसंचालक किसन मुळेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, 'आत्मा'च्या प्रकल्प संचालक अनिसा इस्माईल महाबळे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेशेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रूपयांत पीक विमाकिसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे येथील स्थानिक शेतीमालाला विक्रीची सुविधा,  तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. 

            केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन  शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेजक्लिनिंगग्रेडीगपॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

            सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी ८४ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याचप्रमाणेअडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी प्रशिक्षण गृह निर्माण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी व संलग्न विभागाच्या तंत्रज्ञानविषयक गरजेवर आधारित प्रशिक्षण देणेनाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा केंद्राचा उद्देश आहे. केंद्राची क्षमता प्रीकूलिंग १० मे.टनकोल्ड स्टोरेज ४० मे.टनरायपेनिंग चेंबर १५ मे.टनग्रेडिंग अँड पॅकिंग२ व्यावसायिक गाळे आहेत. जिल्ह्यातील एकूण ९० शेतकरी उत्पादक कंपनी२ हजार २१४ शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ३० हजार २१० शेतकऱ्यांना संघटित करण्यात आले आहे.

०००


Featured post

Lakshvedhi