Monday, 4 March 2024

हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत

एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

ठाणे,दि.3 (जिमाका):-  "शासन आपल्या दारी" हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणेहे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचेकष्टकऱ्यांचेशेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी "शासन आपल्या दारी" च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दि.15 एप्रिल 2023 पासून "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.

            "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदानकल्याण शिळफाटाकोळेकल्याण येथे करण्यात आले होतेत्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री निरंजन डावखरेकिसन कथॊरे,  संजय केळकरकुमार आयलानीविश्वनाथ भोईरशांताराम मोरेआमदार गीता जैनआमदार मनिषा कायंदेमाजी आमदार रविंद्र फाटकएम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त संजय मुखर्जीसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोलेजिल्हाधिकारी अशोक शिनगारेसर्व महानगरपालिकांचे आयुक्तजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुतेअपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळेनिवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीहे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. शेतकरीसर्वसामान्य माणूसगरजूवंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्गअटल सेतू, मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर आणला.

            स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण झपाट्याने कमी होत आहे. हे राज्य शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न आपण सोडवला. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्य सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीने होत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यामुळे देशाचा सन्मान जगात वाढल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यात 6 व 7 मार्च रोजी "नमो महा रोजगार" मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावाअसे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. ते म्हणाले कीएमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. हे राज्य शासन जनतेसाठी काम करत असल्याने जनता "शासन आपल्या दारी" या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "शासन आपल्या दारी" हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पहिल्यांदाच सुरू केला. सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. त्यापेक्षा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा.  या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे एकही पात्र लाभार्थी लाभापासून  वंचित  राहणार नाहीअसे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना  पोचविण्यासाठी काम सुरु आहे. "शासन आपल्या दारी "या योजनेच्या माध्यमातून शासनाचा  प्रत्येक अधिकारी प्रत्येक गरजू लाभार्थ्याच्या  घरापर्यत  जावून योजना पोहोचवित आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून  जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब व्यक्तीचे बँकेमध्ये खाते सुरू केले आहे. "शासन आपल्या दारी" योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जातो. जनसामान्यांच्या हिताचा असा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबधीत अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

      खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की,  जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी आले आहेत. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे. कल्याण पूर्व मध्ये सर्वात प्रथम "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम झाला. यामध्ये 20 हजार  लोकांना याचा लाभ दिला. तळागाळातील लोकांपर्यंत योजना  पोहोचण्यासाठी "शासन आपल्या दारी" हा  कार्यक्रम घेण्यात आला आहे.

            ते म्हणाले की, मेट्रो- 12 च्या निविदाचे काम पूर्ण झाले असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरत आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत आहे. येणाऱ्या काळात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणणार आहोत. तिसरी मुंबई ही नवी मुंबई ते कल्याण यामध्ये विकसित होत आहे. एम.एम.आर.डी.ए. नवीन डीपीआर तयार करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरविले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम येथे होत आहे. अंबरनाथ मध्ये दीडशे कोटी अनुदान मिळालेत्याचे आज भूमीपूजन झाले.

             कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली तसेच सभामंडपात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोबाईल टॉर्च दाखवून आणि त्याला उपस्थित नागरिकांनीही आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचे लाभ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई मेट्रो – 12 (कल्याण ते तळोजा) प्रकल्प कामाचा ई शुभारंभ आणि कल्याण पश्चिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ई उद्धाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

ooooo

डोंबिवली स्थित मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर अस्पताल का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया गया भूमिपूजन

 डोंबिवली स्थित मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर अस्पताल का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया गया भूमिपूजन

ढांचागत सुविधाओं का निर्माण करने में महाराष्ट्र अग्रसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि. 3 :  नागरिकों  बुनियादी सुविधाएं उपलब्ध कराने में देश में महाराष्ट्र अग्रसर हैयह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया.

      डोंबिवली स्थित मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर अस्पताल का भूमिपूजन और  विभिन्न  विकासकार्यों का आभासी  मंच के द्वारा लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों संपन्न हुआइस दौरान मुख्यमंत्री श्री. शिंदे बोल रहे थे.

     इस अवसर पर ठाणे जिले के पालकमंत्री शंभूराज देसाईलोक निर्माणकार्य (सार्वजनिक उपक्रम को छोड़ कर) मंत्री रवींद्र चव्हाणसांसद श्रीकांत शिंदेविधायक रवींद्र फाटक आदि मान्यवर उपस्थित थे.

    श्री. शिंदे ने कहा कि ठाणे जिले  में अनेक जगहों पर राज्य सरकार के जरिये विकास कामों को किया जा रहा है. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान के सहयोग से स्वच्छता अभियानवृक्षारोपण अन्य विविध लोकोपयोगी उपक्रम चलाएं जा रहें है. 

     उन्होंने आगे कहा कि अंबरनाथ में चिकित्सा महाविद्यालय मंजूर हुआ है और वहां पर अधिष्ठाता थी नियुक्त किये है.  कळवा स्थित अस्पताल के कार्डिओलॉजीन्यूरोलॉजी विभाग कॅशलेस किया गया है.  रेडियोलॉजी के माध्यम से जो इलाज होंगेवह भी कम दर (माफक)  दिए गए है. उसके लिए सांसद  डॉ. श्रीकांत शिंदे ने निरंतर पहल करने का जिक्र करते हुए  मुख्यमंत्री श्री. शिंदे ने उनका अभिनंदन किया है.

    मुख्यमंत्री श्री.शिंदे ने कहा कि महात्मा फुले जन स्वास्थ्य अभियान के अंतर्गत इसके पहले डेढ़ लाख तक उपचार की सीमा थीजिसे बढाकर अब पांच लाख तक उपचार लें सकेंगे. राज्य में प्रत्येक जिले में चिकित्सा महाविद्यालय निर्माण करने का निर्णय सरकार  ने लिया माता सुरक्षित तो कुटुंब सुरक्षित इसके  अंतर्गत चार करोड़ महिलाओं की स्वास्थ्य जाँच की गई है. केंद्र सरकार की  स्वास्थ्य योजना भी राज्य में चलाई जा रही है.

     मुख्यमंत्री श्री. शिंदे के हाथों आभासी मंच के द्वारा डोंबिवली पश्चिम स्थित मासळी बाजारडोंबिवली पूर्व स्थित महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहशास्त्रीनगर सामान्य अस्पताल स्थित पोस्ट मार्टमगृह (शवविच्छेदनगृह)नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU ), सुनील नगर स्थित अभ्यासिका आदि विकास कामों का शुभारंभ किया गया.

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल

 अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर

भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणे दि 3:. ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला

            अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री डॉ. बालाजी किनीकरकिसन कथोरेकुमार आयलानीमनीषा कायंदेरवींद्र फाटकअयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते

            वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन शहराचा विकास करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी येथे राम मंदिराची निर्मिती करून अनेक वर्षांचे स्वप्न  साकार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.

कोण कसं वागला या विचारात स्वतःला

 *कृतज्ञता*

कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्यासोबत कसे वागलो हे महत्त्वाचे नाही का? पुढे कसं वागायचं याचा विचार कराच .आपण कुठे चुकलो याचे आत्मचिंतन नक्कीच करा.या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख,अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्या विधात्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत.सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. *कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं.* *मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं.* आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की *विश्वासघात* *करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला* *पाहिजे.* आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. *आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका.फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे.* जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं, *सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.* 

ज्या व्यक्तीने तुम्हाला संधी दिली

      तुमची पात्रता पाहून नोकरी दिली, तीच पात्रता अनेक  व्यक्तीकडे आहे त्याना अजूनही नोकरी नाही.तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.. तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.कारण तुमच्याकडे जे काही आहे  ती फक्त *"नियतिची कृपा"आहे* 

 तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी *कृतज्ञ*  रहा. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. *दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून,आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.*

  कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, आत्मविश्वास. 

ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली,

ज्यांच्यामुळे तुमचे आयुष्य बदलले,

ज्यांच्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण झाले,

त्या व्यक्तीबद्दल नेहमी कृतज्ञ राहा,

विधात्याचे व त्या व्यक्तीचे नेहमी आभार व्यक्त करा 

     समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले बनण्याचा नक्कीच प्रयत्न करा, 

जमलं तर बघा विचार करून  🙏

🙏🌹🙏🌹🙏🌹

ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

 हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत

एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

ठाणे,दि.3 (जिमाका):-  "शासन आपल्या दारी" हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणेहे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचेकष्टकऱ्यांचेशेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी "शासन आपल्या दारी" च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दि.15 एप्रिल 2023 पासून "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.

            "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदानकल्याण शिळफाटाकोळेकल्याण येथे करण्यात आले होतेत्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री निरंजन डावखरेकिसन कथॊरे,  संजय केळकरकुमार आयलानीविश्वनाथ भोईरशांताराम मोरेआमदार गीता जैनआमदार मनिषा कायंदेमाजी आमदार रविंद्र फाटकएम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त संजय मुखर्जीसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोलेजिल्हाधिकारी अशोक शिनगारेसर्व महानगरपालिकांचे आयुक्तजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुतेअपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळेनिवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीहे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. शेतकरीसर्वसामान्य माणूसगरजूवंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्गअटल सेतू, मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर आणला.

            स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण झपाट्याने कमी होत आहे. हे राज्य शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न आपण सोडवला. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्य सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीने होत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यामुळे देशाचा सन्मान जगात वाढल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यात 6 व 7 मार्च रोजी "नमो महा रोजगार" मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावाअसे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. ते म्हणाले कीएमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. हे राज्य शासन जनतेसाठी काम करत असल्याने जनता "शासन आपल्या दारी" या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "शासन आपल्या दारी" हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पहिल्यांदाच सुरू केला. सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. त्यापेक्षा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा.  या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे एकही पात्र लाभार्थी लाभापासून  वंचित  राहणार नाहीअसे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना  पोचविण्यासाठी काम सुरु आहे. "शासन आपल्या दारी "या योजनेच्या माध्यमातून शासनाचा  प्रत्येक अधिकारी प्रत्येक गरजू लाभार्थ्याच्या  घरापर्यत  जावून योजना पोहोचवित आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून  जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब व्यक्तीचे बँकेमध्ये खाते सुरू केले आहे. "शासन आपल्या दारी" योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जातो. जनसामान्यांच्या हिताचा असा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबधीत अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

      खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की,  जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी आले आहेत. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे. कल्याण पूर्व मध्ये सर्वात प्रथम "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम झाला. यामध्ये 20 हजार  लोकांना याचा लाभ दिला. तळागाळातील लोकांपर्यंत योजना  पोहोचण्यासाठी "शासन आपल्या दारी" हा  कार्यक्रम घेण्यात आला आहे.

            ते म्हणाले की, मेट्रो- 12 च्या निविदाचे काम पूर्ण झाले असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरत आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत आहे. येणाऱ्या काळात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणणार आहोत. तिसरी मुंबई ही नवी मुंबई ते कल्याण यामध्ये विकसित होत आहे. एम.एम.आर.डी.ए. नवीन डीपीआर तयार करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरविले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम येथे होत आहे. अंबरनाथ मध्ये दीडशे कोटी अनुदान मिळालेत्याचे आज भूमीपूजन झाले.

             कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली तसेच सभामंडपात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोबाईल टॉर्च दाखवून आणि त्याला उपस्थित नागरिकांनीही आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचे लाभ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई मेट्रो – 12 (कल्याण ते तळोजा) प्रकल्प कामाचा ई शुभारंभ आणि कल्याण पश्चिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ई उद्धाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

ooooo

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर -

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणे दि. 3 : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाणखासदार श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास राज्य शासनामार्फत विकास कामे सुरु आहेत.  नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानेही स्वच्छता अभियानवृक्षारोपण  तसेच इतर विविध लोकोपयोगी उपक्रम  राबविले जात आहेत.

            ते म्हणाले की,   अंबरनाथ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कळवा येथील रुग्णालयामधील  कार्डिओलॉजीन्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

            महात्मा फुले जन आरोग्य अभियाना अंतर्गत यापूर्वी दीड लाखापर्यंत उपचाराची मर्यादा होती. या मर्यादेत वाढ करून आता पाच लाखापर्यंत उपचार घेता येणार आहेत. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजारडोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहशास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृहनवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU ), सुनील नगर येथील अभ्यासिका आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

000

Sunday, 3 March 2024

आयोध्या नगरीतील रामाचे मंदिर. घंटेचं चित्र दिसले की

 *आयोध्या नगरीतील रामाचे मंदिर. घंटेचं चित्र दिसले की घंटेला टच करा घंटा वाजेल. व्हिडिओ पूर्ण होत आला की तुम्हांला प्रसादाची थाळी, आरतीचे ताट निरंजन अशी चार ताटे दिसतील. प्रत्येक ताटाला स्पर्श केला की ते ताट रामाजवळ जाईल आणि शेवटी आरतीच्या थाळीला स्पर्श केला की रामा पुढे आरती ओवाळली जाईल. खूपच सुंदर व्हिडिओ*                                    🙏 *बोला प्रभू श्रीराम चंद्र की जय* 🙏🚩🚩

Featured post

Lakshvedhi