Thursday, 8 February 2024

दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा

दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक

पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा

            - पालकमंत्री संजय राठोड

            मुंबई‍‍दि. ८ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या बसस्थानकाची पुनर्बांधणीची कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

            मंत्रालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रलंबित विषयाबाबत बैठक झाली.

             पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले कीदिग्रस आणि दारव्हा येथील अत्याधुनिक बसस्थानकांमुळे नजिकच्या सर्व भागातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार आहे. या बसस्थानकातील विद्युत व्यवस्थापेव्हर ब्लॉककाँक्रिटीकरणवाहनचालक विश्रांतीगृह या कामांनाही मंजुरी मिळाली आहे. ही कामे उत्कृष्ट दर्जाची करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री.राठोड यांनी दिल्या.

            एसटी महामंडळातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतबसस्थानक निधीजादा बसेस मिळणे या विषयाबाबतही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी आढावा घेतला.

                या बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरपरिवहन विभागाचे सहसचिव श्री. होळकरपरिवहन विभागाचे महाव्यवस्थापक श्री.बरसट तसेच परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी

कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

 

            मुंबई, दि. ८ : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने 2453 दावे निकाली काढले असून त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या 138 दिवसांच्या खंडित कालावधीतील 77 (73 मृत्यू व 4 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 1 कोटी 51 लाख रुपयाचा विमा वितरित  करण्यात येणार आहे .

            तसेच राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील 239 दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील 239 (237 मृत्यू व 2 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 4 कोटी 76 लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील 2137 (2094 मृत्यू व 43 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 42 कोटी 36 लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची 47 कोटी 12 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.

            अशा प्रकारे राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 आणि 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील एकूण 2453 दावे  निकाली काढण्यात आले आहेत. त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

0000

बनावट अन्न व औषध परवाना वापरुन निविदा प्रक्रियेत सहभागासंदर्भात चौकशी समिती गठीत

 बनावट अन्न व औषध परवाना वापरुन निविदा प्रक्रियेत

सहभागासंदर्भात चौकशी समिती गठीत

                                                   - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

               मुंबईदि. 8 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेवून निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

            या समितीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेस प्रत्यक्ष भेट देवून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल आवश्यक कागदपत्रांसह त्वरित सादर करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी  दिल्या आहेत.

             डॉ. दिलीप म्हैसेकरसंचालकवैद्यकीय शिक्षण व संशोधनमुंबई अध्यक्ष, डॉ. हेमंत गोडबोलेप्राध्यापकन्यायवैद्यकशास्त्र विभागडॉ. शंकरराव चव्हाण, सदस्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयनांदेड,सदस्य  डॉ. सुनिल लिलानीसहयोगी प्राध्यापकसुक्ष्मजीवशास्त्र विभागश्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयधुळे सदस्य श्री. समाधान जामकरप्रशासकीय अधिकारीवैद्यकीय शिक्षण व संशोधनमुंबई  हे समितीचे सदस्य आहेत.

0000

सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

 सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी

विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

 

            मुंबईदि. ८ : सांगली  जिल्ह्यातील खानापूरआटपाडीपलूस व कडेगाव या महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी ४ फेब्रुवारीपासून खानापूर तालुक्यातील विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती विधी व न्याय विभागाच्या विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

            सांगली जिल्ह्यातील खानापूरआटपाडीपलूस व कडेगाव या महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे नव्याने निर्मित केलेल्या विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील. ४ फेब्रुवारी २०२४ पासून या न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याचे प्रमुख सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतीलअसे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

 सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

            मुंबईदि. ८ : सातारा जिल्ह्यातील फलटण महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी 4 फेब्रुवारीपासून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती विधी व न्याय विभागाच्या विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

            सातारा जिल्ह्यातील फलटण महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील. ४ फेब्रुवारी २०२४ पासून या न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतीलअसे या अधिसुचनेत नमूद करण्यात आले आहे.

०००

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील पात्र उमेदवारांना आवाहन

 सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागातील

पात्र उमेदवारांना आवाहन

 

            मुंबईदि. ८ : सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिनस्त विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थापुणे विभागांतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सहकार आयुक्त यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज केलेले  उमेदवार व्यावसायिक चाचणी परीक्षा कोणत्या माध्यमातून (मराठी/इंग्रजी) देणार आहेत, याबाबतचा तपशील भरण्यासाठी दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी लॉगिन करूनटॅब्स ओपन करुन व्यावसायिक परीक्षेचे भाषा माध्यम नोंदवावेअसे आवहान योगीराज सुर्वेविभागीय सहनिबंधकसहकारी संस्था, पुणे विभाग, पुणे यांनी केले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/


 


देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘ओटीएम’ प्रदर्शनी

 देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांशी

संवाद वाढवण्यासाठी ‘ओटीएम’ प्रदर्शनी

चंद्रशेखर जयस्वाल

 

            मुंबई, दि. 8 : देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘ओटीएम’ प्रदर्शनी महत्त्वाची भूमिका बजावेल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील 40 उद्योजक या ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी झाले आहेत, असे  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले.

            जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरबी.के.सी.येथे आजपासून तीन दिवस आऊट बाऊंड ट्रॅव्हल मार्ट (ओ. टी. एम.) मार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांचा सहभाग असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन करताना श्री.जयस्वाल बोलत होते. यावेळी पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे उपस्थित होते.

            श्री.जयस्वाल म्हणाले की, या प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सीरिसॉर्टविविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी  चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतील, इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल.

            राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल.

Featured post

Lakshvedhi