Thursday, 8 February 2024

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी

कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

 

            मुंबई, दि. ८ : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने 2453 दावे निकाली काढले असून त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या 138 दिवसांच्या खंडित कालावधीतील 77 (73 मृत्यू व 4 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 1 कोटी 51 लाख रुपयाचा विमा वितरित  करण्यात येणार आहे .

            तसेच राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील 239 दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील 239 (237 मृत्यू व 2 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 4 कोटी 76 लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यातील 2137 (2094 मृत्यू व 43 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 42 कोटी 36 लाख रुपये अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची 47 कोटी 12 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.

            अशा प्रकारे राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 आणि 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील एकूण 2453 दावे  निकाली काढण्यात आले आहेत. त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

नवजात अर्भकाला वाचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा भातखळकारांकडून गौरव

 नवजात अर्भकाला वाचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा भातखळकारांकडून गौरव




मुंबई : मालाड पूर्वला जितेंद्र रस्त्यावरील नाल्यात टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला बाहेर काढून तिचा जीव वाचवण्यासाठी योगदान दिल्याबदल जीवदया अभियान मालाड फौंडेशनच्या पदाधिकारीकार्यकर्त्यांचा भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी गौरव केला. या फौंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे एका नवजात अर्भकाचे जीव वाचल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. मालाड पूर्वमधील देवचंदनगर जैन संघाच्या सभागृहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी जैन मुनी भगवंत जी यांच्यासह संघाचे ट्रस्टीप्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणालेजीवदया फौंडेशनसारखी सामाजिक संस्था माझ्या विधानसभा मतदारसंघात आहेयाचा मला अभिमान वाटतो. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अत्यंत गौरवास्पद आणि पुण्याईचे आहे. कार्यकर्त्यांनी जी तत्परता दाखवली त्यामुळे आज त्या नवजात शिशुचे प्राण वाचले आहेत. त्या बाळाच्या संगोपनासाठी सुद्धा या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या बाळाच्या संगोपनासाठी आणि तिच्या भविष्यासाठी जी मदत लागेल ती सर्वतोपरी आपण करू. आजही आपल्या समाजात मुलगी जन्माला आली म्हणून तिला नाकारण्याची मानसिकता आहेही बाब अत्यंत क्लेशकारक आहे. या कृत्याबद्दलचा शोध पोलीस घेतीलच. पण भविष्यात मुलगी आहे म्हणून तिला नाकारण्याची जी मानसिकता आहे त्यातून समाज कसा बाहेर पडेलयासाठी सुद्धा सर्वानीच काम करण्याची आवश्यकता आहेअसेही आमदार भातखळकर म्हणाले. यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते फौंडेशनचे अश्विन संघवीसमीर शहादेव शहादर्शित शहा या कार्यकर्त्यांचा शालश्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

दि. २७ जानेवारी रोजी हे नवजात शिशु जितेंद्र रस्त्यावरील एका नाल्यात आढळून आले. एका मुलाला नाल्यामधून आवाज ऐकू आल्यानंतर त्याने जीवदया अभियान मालाड फौंडेशनच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नाल्यातून उतरून संबंधित प्लास्टिक बॅग उघडून पहिली तर त्यात एक नवजात अर्भक असल्याचे आढळून आले. तिची नाळसुद्धा तशीच होती. या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तिला म. वा. देसाई रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. नऊ दिवसांच्या उपचारानंतर त्या बाळाची प्रकृती उत्तम असून अंधेरीच्या एका स्वयंसेवी संस्थेकडे तिला पुढील संगोपनासाठी पाठवण्यात आले आहे. या कामाची दखल घेऊन कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. 

मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वैद्यकीय योजनांचे लोकार्पण

 मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी 

हॉस्पिटल, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वैद्यकीय योजनांचे लोकार्पण 





जामनेर : मा. ना. श्री.  गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नव वर्षात नवीन संकल्पनांसह विविध योजनाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या योजनांमध्ये जीवन संजीवनी योजना, दिपज्योती योजना, मातृवंदना योजना, आधार वड योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या योजनांतर्गत रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. रागिणी पारेख यांच्या सारख्या नामांकित डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा आता जामनेरमध्ये मिळणार आहे. जर एखादा रुग्ण सरकारी योजनेत बसत नसेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा चॅरिटी बेडच्या माध्यमातून त्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात येतील.


मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, डॉ. रोहन पाटील, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ. सतीश पाटील, डॉ.नितीन महाजन, डॉ.तुषार पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, डॉ.सरिता महाजन, डॉ. प्रशांत भोळे, डॉ. मनोज विसपुते, डॉ.रितेश पाटील, डॉ.योगेश सरताळे, डॉ.स्वप्नील निकम, श्री. शिवाजी सोनार, श्री. चंद्रकांत बावीस्कर, श्री. विवेक पाटील, डॉ. किरण पाटील, न्यू रुबी स्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सीईओ डॉ. धनराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. तर ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, आरोग्यदूत श्री. रामेश्वर नाईक यांनी या लोकार्पण सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी विविध योजनांची माहिती दिली. 


डॉ. बशिरुद्दीन अन्सारी (कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट न्यू रुबी स्टार हॉस्पिटल) यांनी यावेळी जीवन संजीवनी योजनेविषयी माहिती दिली.  जीवन संजीवनी योजनेअंतर्गत हृदयरोग तपासणीपासून ते एंजियोप्लास्टीपर्यंत संपूर्ण उपचार केवळ ९९९ रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. यात ई.सी.जी, २डी ईको, स्ट्रेस टेस्ट, कॉर्डीओलॉजी कंसल्टेशन, एंजिओग्राफी, एंजियोप्लास्टी योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. यानंतर डॉ सप्नील पाटील (नेत्ररोग तज्ज्ञ न्यू रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर) यांनी दिपज्योती योजनेची माहिती देताना सांगितले कि, दिपज्योती योजने अंतर्गत नेत्र तपासणी, चष्म्यांचे नंबर काढणे, सायेचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात येईल. तसेच अत्याधुनिक बिना टाक्याचे लेझर मशीन (फेको), मोतीबिंदु ऑपरेशन फक्त ७००० रुपयांमध्ये करण्यात येईल. यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे व डॉ. रागीनी पारेख मॅडम या सदरील योजनेसाठी दरमहा जामनेरला उपलब्ध असतील.


यानंतर डॉ. राजेश नाईक (स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यू रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर) यांनी मातृवंदना योजने बद्दल सविस्तर माहिती दिली. मातृवंदना योजने अंतर्गत सर्व गरोदर मातांची तपासणी विनामुल्य होईल. पुर्वतपासणीसाठी आलेल्या गरोदर मातांची पहिली सोनोग्राफी मोफत करण्यात येईल. सर्व गरोदर मातांना पुढील ३ महिन्यापर्यंत रक्तवाढीसाठी हिमोग्लोबीनच्या व कॅल्शीयम गोळ्या मोफत  देण्यात येतील. प्राथमिक रक्त तपासणी व गरोदर मातांना धनुर्वात लस मोफत देण्यात येईल. पुढे आधार वड योजने विषयी डॉ. नितीन गायकवाड ( एमडी मेडिसीन) माहिती देतांना सांगितले की, योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरीकांसाठी हृदयरोग, ई.सी.जी, नेत्र तपासणी, दातांची तपासणी, मुखरोग व दंत तपासणी, गर्भाशयाचे कॅन्सरची व स्थनातील गाठीची मोफत तपासणी करण्यात येतील. तसेच अल्पदरात फिजीओथेरेपी आणि दर आठवड्याला योगासन वर्ग मोफत घेण्यात येणार आहेत.


न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जामनेर येथे सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. सदर योजना ६ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत कार्यान्वित असतील. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. धनराज चौधरी यांनी केले आहे.

चिऊताई चिऊ माझ्या अंगणात

 राकेश सुभाष शेलार

आर्वी राकेश शेलार

गाण्याचे बोल- चिऊताई चिऊ माझ्या अंगणात ये 

इयत्ता -अंगणवाडी

जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा गिम्हवणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी

वार्षिक स्नेहसंमेलन

सन-२०२३/२४

दिनांक-०६/०२/२०२४


Wednesday, 7 February 2024

राज्यातील ५००० एस टी बस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार

 राज्यातील ५००० एस टी बस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

महामंडळाची २३४ कोटी रुपयांची बचत होणार

प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सेवा

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ६ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

               या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैनकिंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरमहाव्यवस्थापक ( भांडार व खरेदी) वैभव वाकोडे उपस्थित होते.

            एकूण ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण हे तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईलअसे श्री. जैन यांनी सांगितले. राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे १६ हजार  प्रवाशी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च डिझेलवर केला जातो. हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स् गॅस प्रा.लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. रुपांतरीत झालेल्या वाहनांची देखभाल ही रुपांतरण केलेल्या कंपनी मार्फत करण्यात येणार असून त्याचा देखभालीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.

००००

राज्यातील ५००० एस टी बस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार

 राज्यातील ५००० एस टी बस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

महामंडळाची २३४ कोटी रुपयांची बचत होणार

प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सेवा

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ६ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

               या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैनकिंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरमहाव्यवस्थापक ( भांडार व खरेदी) वैभव वाकोडे उपस्थित होते.

            एकूण ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण हे तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईलअसे श्री. जैन यांनी सांगितले. राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे १६ हजार  प्रवाशी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च डिझेलवर केला जातो. हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स् गॅस प्रा.लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. रुपांतरीत झालेल्या वाहनांची देखभाल ही रुपांतरण केलेल्या कंपनी मार्फत करण्यात येणार असून त्याचा देखभालीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.

००००

श्री क्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा

 श्री क्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

            मुंबईदि. ६: श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरीभाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूरचा सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात दर्शन रांगमंदिर व परिसराचा विकासघाट बांधकामआपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावाअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमुख्य सचिव डॉ. नितीन करीरसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकनियोजन विभागाचे सचिव सौरव विजयपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारसोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ अवसेकर महाराज आदी दुरदृष्य संवादप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            पंढरपूर यात्रा कालावधीत गर्दीचे विकेंद्रीकरण करणे तसेच गर्दीचे व्यवस्थापन करणे अत्यंत जिकिरीचे होते. याकरिता मंजूर विकास योजनेतील प्रदक्षिणा मार्गाकडून मंदिराकडे येणारे आणि प्रदक्षिणा मार्गाकडून नदी पात्राकडे जाणारे विकास योजनेतील रस्ते विकसित झाल्यास पोलीस विभागाला आणि प्रशासनाला एकेरी मार्ग नियोजनगर्दी विकेंद्रीकरण व व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

            आराखड्यामध्ये समाविष्ट कामांबाबत एकसूत्रता व सुसंगतता असावी तसेच तीर्थक्षेत्राला अनुषंगिक कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी देशपातळीवरील वास्तूविशारदपुरातत्व शास्त्रज्ञअभियंत्यांच्या कल्पाना स्वीकारून कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत संकल्पना स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात सहभागी झालेल्या सल्लागारांचे सादरीकरण विभागीय आयुक्तांच्या तांत्रिक सल्लागार समिती समोर झाले. आज त्यातील तीन सल्लागारांनी या बैठकीत आराखड्याबाबत सादरीकरण केले.

            वाराणसी येथील काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सुविधा देतानाच परिसराचा विकास करण्यासाठीचा आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी संप्रदायमंदिर समितीनागरिकपंढरपुरातील लोकप्रतिनिधी या सर्वांशी चर्चा करून आराखडा करावाअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जे निवासीव्यापारीदुकानदार बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला देणे व योग्य ते पुनर्वसनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

Featured post

Lakshvedhi