उघडा डोळे बघा नीट आपलं भविष्य पूर्ण अंधारात आहे प्रत्येक पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 31 January 2024
विदर्भातील आठ जिल्ह्यांत 'कौशल्य रथ' च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देणार
विदर्भातील आठ जिल्ह्यांत 'कौशल्य रथ' च्या माध्यमातून
व्यवसाय प्रशिक्षण देणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि. ३० : स्थानिक युवकांमधील कौशल्य विकास वाढवणे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणे, कौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यांत "कौशल्य रथ" च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि पुष्पांचल फाउंडेशनतर्फे आयोजित "कौशल्या रथ" चे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यानी हिरवी झेंडीं दाखवून केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त निधी चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे, पंचशील फाउंडेशनचे संचालक गौरांग पांडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘कौशल्य रथ’चा उद्देश रोजगारक्षमता आणि उद्योजकता वाढवण्यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यातील युवकाना करिअर मार्गदर्शन करणे, त्यासंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध कौशल्य क्षेत्रीय परिषदा यांच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या कौशल्य विषयक अभ्यासक्रमासाठी युवक युवतींची नोंदणी करणे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करणे याकरिता ‘कौशल्य रथ’ महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानांतर्गत नियोक्ते आणि नोकरी शोधणारे यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी व्यक्तींसाठी ‘कौशल्य रथा’द्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये पाच बसेसचा वापर करून महाविद्यालयांमध्ये थेट नावनोंदणी सत्रे आयोजित केली जाणार असल्याची श्री. लोढा यांनी सांगितले.
000
इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र
इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल
मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र
मुंबई, दि. ३० :- अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या इट राईट कॅम्पस उपक्रमात मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी लहू कनसकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरात, सहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवले, सहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे आदी उपस्थित होते.
मुंबई मध्यवर्ती कारागृहाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाक गृहातील उपकरणांची स्वच्छता व देखभाल नोंदी, पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड्स, अन्न पदार्थ हाताळणाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र, ऑडिट, कच्च्या मालाची गुणवत्ता तसेच बनवलेल्या अन्नाची गुणवत्ता व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता या निकषांमध्ये परिपूर्ण कामगिरी केली आहे. इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून प्रमाणपत्र मिळवणारे पहिले कारागृह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढेही मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उपक्रमात सातत्य राखावे अशी अपेक्षा मंत्री श्री. आत्राम व्यक्त केली.
मंत्री श्री. आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात इट राईट कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून राज्यातील रुग्णालये, महाविद्यालयाची कॅन्टीन, इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स कॅन्टीन मध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) श्रीमती अनुपमा पाटील यांनी यावेळी सांगितले.
००००
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या
प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार
- मंत्री धर्मरावबाबा आत्राम
मुंबई, दि. ३० :- अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज अधिक गतीने व सुलभपणे होण्यासाठी विभागाकडील प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
मंत्री श्री. आत्राम यांनी आज त्यांच्या दालनात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरात, सहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवले, सहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्याबरोबरच फिरत्या प्रयोगशाळेसाठी १६ वाहने खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. या प्रयोगशाळा पिपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम गतीने व्हावे म्हणून विभागातील सह आयुक्त अन्न, औषध, सहाय्यक आयुक्त अन्न, औषध पदावरील पदोन्नतीची प्रकरणे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावीत. विभागाकडील पदे पुनर्जीवित करणे, नवीन पदांना मान्यता घेणे, वर्ग तीन व चार पदांची भरती प्राधान्याने करावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र
इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल
मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र
मुंबई, दि. ३० :- अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या इट राईट कॅम्पस उपक्रमात मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी लहू कनसकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरात, सहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवले, सहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे आदी उपस्थित होते.
मुंबई मध्यवर्ती कारागृहाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाक गृहातील उपकरणांची स्वच्छता व देखभाल नोंदी, पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड्स, अन्न पदार्थ हाताळणाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र, ऑडिट, कच्च्या मालाची गुणवत्ता तसेच बनवलेल्या अन्नाची गुणवत्ता व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता या निकषांमध्ये परिपूर्ण कामगिरी केली आहे. इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून प्रमाणपत्र मिळवणारे पहिले कारागृह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढेही मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उपक्रमात सातत्य राखावे अशी अपेक्षा मंत्री श्री. आत्राम व्यक्त केली.
मंत्री श्री. आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात इट राईट कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून राज्यातील रुग्णालये, महाविद्यालयाची कॅन्टीन, इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स कॅन्टीन मध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) श्रीमती अनुपमा पाटील यांनी यावेळी सांगितले.
००००
सागरी वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी लिथुआनियाला सर्वतोपरी सहकार्य
सागरी वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी
लिथुआनियाला सर्वतोपरी सहकार्य
– मंत्री संजय बनसोडे
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. राज्यात सागरी वाहतूक आणि त्या अनुषंगाने विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक कऱण्यासाठी लिथुआनियातील उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे राज्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
लिथुआनियाच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री श्री. बनसोडे यांची भेट घेऊन येथील सागरी क्षेत्र वाहतुकीतील विविध संधींबाबत चर्चा केली.
लिथुआनियाचे भारतातील राजदूत डायना मिक्व्हीसीन, डायरेक्टर जनरल कापेडा सी पोर्ट ॲथॅारिटीचे अल्गीस लटाकस यांच्यासह तेथील बंदरे विभागाचे महासंचालक, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, प्रशासन अधिकारी प्रदीप बढिये, राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलिंद हरदास आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, लिथुआनिया हा बाल्टीया प्रदेशापैकी एक सागरी विकास क्षेत्रात अग्रणी भाग आहे. राज्यात सागरी विकास धोरण २०२३ मधील विविध नवीन वैशिष्ट्य सागरी पर्यटन, नवीन बंदरे, मालवाहतुकीसाठी रस्ते व रेल्वे कडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधासह अद्यावत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र आणि लिथुआनियातील सागरी क्षेत्रातील विविध संधींसंदर्भात मंत्री श्री. बनसोडे यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली. राज्यातील सागरी वाहतूक आणि इतर संधीच्या अनुषंगाने सादरीकरणही करण्यात आले. यावेळी बंदरे विकास मंत्री आणि सागरी विकास मंडळाचे अधिकारी यांना लिथुआनियाच्या सागरी विकास, उद्योगास भेट देण्याचे निमंत्रण शिष्टमंडळाने दिले.
महाराष्ट्रात काम करणे निश्चितपणे आवडेल, अशी भावना यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली. एकत्रितपणे बंदरे विकासाच्या अनुषंगाने यापुढील काळात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मंत्री श्री. बनसोडे यांनी, या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने राज्यात निश्चितपणे स्वागत आणि सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
000
जर्मनीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार
जर्मनीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार
मंत्री चंद्रकांत पाटील यांची जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत बैठक
मुंबई, दि. ३० : जर्मनीला किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट, ओमकार कलवाडे यांच्या समवेत जर्मन शिष्टमंडळाची बैठक झाली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून, या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यानंतर जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल.
या निवडलेल्या विद्यार्थ्यांना जर्मन येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाईल. जर्मन येथे गेल्यानंतर त्यांचे किमान तीन महिन्याचे प्रशिक्षण होईल. मात्र यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी किंवा संबंधित कंपनीकडून नाकारले तर त्यांना किमान तीन महिन्यांचा भत्ता देणे अनिवार्य करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.
आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरण्याचे युग आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून युवा पिढी एकापेक्षा अधिक कौशल्य विकास प्राप्त करू शकते. जर्मनी येथे संधी मिळालेले विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपल्या देशाची, राज्याची वेगळी ओळख निर्माण करतील असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...