प्री-वेडिंग करणाऱ्या सर्व तरुण आणि तरुणींना आदर्श ठरेल असा हा व्हि
डिओ सर्व आई-वडिलांनी तसेच त्यांच्या लग्नाळू मुला-मुलींनी जरूर पहावा.🙏
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
प्री-वेडिंग करणाऱ्या सर्व तरुण आणि तरुणींना आदर्श ठरेल असा हा व्हि
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांत
होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती
मुंबई, दि. 9 : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्रालयात होमिओपॅथिक महाविद्यालयांच्या विविध समस्या आणि राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक श्री. म्हैसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये होमिओपॅथीक विभाग सुरु करण्यासाठी सर्वांगीण अभ्यास केला जाईल. राज्यातील रूग्ण संख्या आणि डॉक्टर यांच्याबद्दल अधिकची माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
बीएचएमएस अभ्यासक्रमाचा व्यवस्थापन कोटा २५ टक्के व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा ५० टक्के करणे, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे नियम, उपनियम व विनियमनास मंजुरी, होमिओपॅथिचे स्वतंत्र संचालनालय सुरु करण्याविषयी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस, महाराष्ट्र यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
0000
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने
पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ९ :- कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे हाती घ्यावीत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा. पद्मदुर्ग येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात मुरुडजवळील पद्मदुर्गच्या पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक झाली. या बैठकीस खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद डॉ. शुभ मजुमदार, डॉ. अरूण मलिक, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रायगडचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पर्यटकांना पद्मदुर्ग किल्लास्थळी जाण्याकरिता आवश्यक सोयीसुविधांची कामे झाली पाहिजेत. या परिसरात जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ भारतीय पुरातत्व विभागाने तातडीने उपलब्ध करून द्यावे. तसेच किल्ला संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. किल्ल्यावर पर्यटन सुविधा उभारण्याच्यादृष्टीने राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल. किल्ल्याचे जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ वास्तूविशारदाची नियुक्ती करून आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग हा ऐतिहासिक महत्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये महाराजांनी सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग आदी जलदुर्गांची उभारणी करुन काही किल्ल्यांवर जहाजे बांधण्यास प्रारंभ केला. सागरी लाटांच्या माऱ्यामुळे पद्मदुर्ग किल्ल्याच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. या किल्ल्याचा हेरिटेज दर्जा राखून संवर्धनाची कामे करणे आवश्यक आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
-------०००------
नीलेश तायडे/विसंअ/
मुंबईत होणाऱ्या 'श्री छत्रपती शिवाजी महाराज
पारंपरिक क्रीडा महाकुंभात सहभागी व्हावे'
- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. ९ : मुंबई शहर आणि उपनगरात 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम पिढी घडवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. शिवकालीन पारंपरिक देशी खेळ, आपली भारतीय संस्कृती जपायला हवी आणि त्यासाठी सर्वांनी क्रीडा महाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे" असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत केले.
पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले की, या क्रीडा महाकुंभामध्ये १६ क्रीडा स्पर्धा आणि ४ क्रीडा प्रकारात सादरीकरण, प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. साधारण १० ते १२ लाख तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेसाठी ८ जानेवारी २०२४ पर्यंत १ लाख २५ हजार खेळाडूंची नोंदणी झाली आहे. राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आणि क्रीडा भारती संस्थेच्या सहयोगाने ही देशी क्रीडा स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाचे देखील सहकार्य लाभणार आहे.
पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, १६ क्रीडा स्पर्धांमध्ये लेझीम, लगोरी, लंगडी, कबड्डी, कुस्ती, मल्लखांब पंजा लढवणे, दंड बैठका, दोरीवरील उड्या, पावनखिंड दौड (मॅरेथॉन), फुगड्या, ढोल - ताशा स्पर्धा, विटीदांडू यासारख्या खेळांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी असून शाळा/महाविद्यालयातील सहभागी स्पर्धक खुल्या सहभागी स्पर्धकांबरोबर स्पर्धा करतील. ही स्पर्धा १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि खुला सर्वसाधारण वयोगट या वय श्रेणीमध्ये होईल. प्रत्येक श्रेणीतील प्रथम ४ खेळाडूंची विभागीयस्तरावर स्पर्धा करतील. एक क्यूआर कोड स्कॅन करून किंवा लिंकच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होणे शक्य होणार आहे. हा देशी क्रीडा महाकुंभ उपनगरात मुलुंड ते घाटकोपर, घाटकोपर ते कुर्ला, चुनाभट्टी, मानखुर्द, वांद्रे ते जोगेश्वरी, ओशिवारा आणि ओशिवारा ते दहिसर या ठिकाणी विविध प्रभागातील २० मैदानांवर आयोजित केला जाईल. प्रथम वॉर्ड पातळीवर क्रीडा स्पर्धा होतील. त्यातून जिंकलेल्या खेळाडूंना पुढे जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळेल.
पारितोषिक विजेत्या खेळाडू व संघास रोख रक्कम पारितोषिक एकूण रक्कम २२,६२,००० /- रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाईल. अंतिम स्पर्धा रोख पारितोषिक रक्कम संघ - रु. १०,०००/-, ८,०००/-, ६,०००/- व उत्तेजनार्थ रु. ५००० /- याप्रमाणे तर वैयक्तिक रोख पारितोषिक रक्कम रु. ३,०००/-, २,००० /-, १,०००/- व उत्तेजनार्थ ५००/- तर शरीर सौष्ठव स्पर्धा रोख पारितोषिक रक्कम रु. १०,००० /-, ९,००० / - ८,००० /- व उत्तेजनार्थ ७,००० /- आणि ढोल ताशा अंतिम स्पर्धा रोख पारितोषिक रक्कम रु. २५,००० /-, २०,००० /- १५,००० /- व उत्तेजनार्थ रु. १०,००० अशा स्वरूपात असणार आहे.
श्रीराम जीवन चरित्र स्पर्धा १० ते १७ जानेवारी २०२४ कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे. स्पर्धा वयोगट १ ली ते २ री,३ री ते ५ वी,६ वी ते ८ वी,९ वी ते १० वी असा आहे. चित्रकला स्पर्धा, निंबध स्पर्धा, कविता लेखन, नाट्य स्पर्धा, या मराठी हिंदी, इंग्रजी भाषेत आयोजित केल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात या स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित शाळा आणि महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिकेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी आवाहन केले आहे.
******
महा मुंबईच्या विकासात खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे सेवा होणार दाखल
- डॉ. स्वप्नील नीला
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखत
मुंबई, दि. 9 : नवी मुंबई परिसरात महामुंबई विकसित होत आहे. या महामुंबईच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून त्यातील खारकोपर ते उरण ही उपनगरीय सेवा येथील नागरिकांना मुंबईशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. महामुंबईच्या विकासात या रेल्वे सेवेचे महत्व अनन्य साधारण असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला यांनी ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला मुंबई व नवी मुंबईसह राज्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या प्रकल्पांचाही समावेश आहे. महामुंबईच्या विकासाच्या दृष्टीने खारकोपर ते उरण या उपनगरीय रेल्वे मार्गाचे त्याचबरोबर बेलापूर उरण प्रकल्प मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव या सहाव्या मार्गिकेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. याचबरोबर वर्धा, यवतमाळ, नांदेड या प्रकल्पांतर्गत असलेला वर्धा-कळंब नवीन ब्रॉडगेज प्रकल्प, अहमदनगर-बीड-परळी या नव्या मार्गावरील न्यू आष्टी ते अमळनेर प्रकल्पांमुळे राज्यातील नागरिकांना होणारा लाभ, दळण-वळणाची सुविधा कशाप्रकारे विस्तारीत होणार याबाबतची माहिती डॉ. नीला यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
डॉ. नीला यांची मुलाखत दिलखुलास कार्यक्रमात शनिवार दि. 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार, दि. 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स - https://x.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/
यू ट्यूब - https://www.youtube.co/
०००
चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी,
गणेश देवरूखकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, ९ : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चिराग शेट्टी याना मेजर ध्यानचंद खेलरत्न, ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार व मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ सन्मानित करण्यात आले. यासह एकूण नऊ खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
यासोबतच ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन खेळाडूंना प्रदान करण्यात आले. ‘मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना प्रदान करण्यात आले.
चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
मुंबईचे चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना बॅडमिंटनसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे उदय पवार बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. नंतर त्यांनी हैदराबाद येथील गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. चिराग शेट्टीना यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना बॅडमिंटनसाठी असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तथापि, ते सध्या मलेशियन ओपन स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे, या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही.
ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार प्रदान
ओजस देवतळे- नागपूरचा गोल्डन बॉय, 21 वर्षीय तेजस प्रवीण देवतळे यांनी ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण पदके जिंकून आणखी एक विक्रम केला. ओजस देवतळे यांच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आदिती स्वामी - सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली असून, त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. वर्ष 2023 मध्ये जर्मनी येथील बर्लिनच्या तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर विश्व करंडक स्पर्धेत 720 पैकी 711 गुण मिळवत जागतिक विक्रम केला आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. आदिती स्वामी यांच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गणेश देवरूखकर यांना उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान
गणेश देवरुखकर हे व्यायामशाळा संचालक, प्रशिक्षक, परीक्षक आणि कलाकार आहेत. ते मुंबईतील श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे मालक आणि व्यवस्थापक आहेत. एक अनुभवी मल्लखांबपटू, म्हणून त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि विविध पदके जिंकली आहेत. श्री. देवरुखकर यांना त्यांच्या मलखांब प्रशिक्षणा असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी
मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), अर्जुन पुरस्कार : ओजस देवतळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवनकुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब). ’
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’
ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)
0000
पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड सर्वोत्तम पर्याय
पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन
मुंबई, दि. 9 : पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी वसुंधरा अभियान, फिनिक्स फाऊंडेशन संस्था, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिखर परिषदेमध्ये चार सत्रांमध्ये पर्यावरण बदलाविषयीच्या समस्या, बांबू लागवड म्हणजे काय, बांबू लागवडीचे महत्व आणि वातावरण बदलामध्ये बांबू लागवडीचे महत्व या विषयावर चर्चासत्रे झाली. या चर्चासत्रामध्ये बांबू लागवडीचे महत्व सांगताना मार्गदर्शकांनी बांबू लागवडीमध्ये असलेल्या संधी, बांबू लागवडीमधून साधता येणारी आर्थिक प्रगती, त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय असल्याचे मनोगत सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच बांबू लागवडीमध्ये भविष्यातील देशाच्या आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
या शिखर परिषदेमधील चर्चेमध्ये राष्ट्रीय बांबू मिशनचे संचालक प्रभातकुमार, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, आसाम बायो रिफायनरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भास्कर फुकन, अदानी एन्टरप्रायजेसचे अमोल जैन, मुठा इन्डस्ट्रीचे नीरज मुथा, सीएनबीसीच्या मनीषा गुप्ता, रेणुका शुगर्सचे अतुल चतुर्वेदी, पीस ॲन्ड सस्टेनिबिलिटीचे संदीप शहा, आंतरराष्ट्रीय बांबू संघटनेचे बोर्जा दे ला इस्कार्बो, टेरीचे अरुपेंद्र मुलिक, नॅशनल रिफाईन्ड एरिया ॲथॉरिटीचे अशोक दहिवाल, एमएसएमई क्लस्टरचे मुकेश गुलाटी, भारतीय विज्ञान संस्थेचे माजी प्रमुख के.पी.जे.रेड्डी, पर्यावरण कार्यकर्त्या निशा जांमवल यांनी सहभाग घेतला.
0000