Tuesday, 9 January 2024

नागपूर-अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा (सर्वसाधारण) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

 नागपूर-अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा (सर्वसाधारण)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य;

केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

 

            मुंबईदि. 8 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या टॉप-5’वर पोहोचली आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन’ डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्द‍िष्ट आहे. हे उद्द‍िष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने एक ट्रीलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणूक आकर्षित करणेनिर्यात वाढविणे तसेच राज्यासह केंद्राच्या योजनांचा अभिसरणाद्वारे अधिकाधिक निधीचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. विदर्भात पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहेत. विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूरसह अमरावती विभागातील महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांची एकत्रित सांगड घालून टुरिझम सर्किट विकसित करण्याच्या सूचना त्यांनी आज दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील 11 जिल्ह्यांचा आढावा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी घेतला. या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारअमरावतीचे पालकमंत्री चंद्रकात पाटीलअकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलबुलडाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील (प्रत्यक्ष उपस्थित)गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्रामभंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावितयवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचे पालकमंत्री संजय राठोड (प्रत्यक्ष उपस्थित)भंडाऱ्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटेगोंदियाचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडालेअकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अडाऊवाशीमचे जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय (प्रत्यक्ष उपस्थित)नागपूरचे पालक सचिव असीमकुमार गुप्ता (प्रत्यक्ष उपस्थित)वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. अनुपकुमार यादवनागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरीअमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेयनागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकरवर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेभंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरगोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारेचंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनगडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीनाअमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियारअकोल्याचे जिल्हाधिकारी अजितकुमारयवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाबुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटीलवाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासह वरिष्ठ अधिकारीसंबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीआर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा वार्षिक योजनांमधील निधी खर्चाचे प्रमाण अल्प राहून त्यामध्ये वर्षाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांनी वित्त विभागाने निधी वितरीत केल्यानुसार निधी खर्चाचे प्रमाण राहील याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. निधी वेळच्यावेळी खर्च करतानाच विकास कामे दर्जेदार पध्दतीने पूर्ण करावीत.

केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु आहेत. या योजना निती आयोगाच्या माध्यमातून सनियंत्रित करण्यात येत आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री पोषण अभियानप्रधानमंत्री स्कूल रायझिंग इंडियाप्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाप्रधानमंत्री स्वनिधी योजनाअमृत योजनामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाजल जीवन मिशनहर घर जलट्रॅव्हल फॉर लाईफप्रधानमंत्री जनआरोग्य योजना आदींचा समावेश आहे. या केंद्राच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

आकांक्षित जिल्ह्यांसह तालुक्यांना भरघोस निधी

            राज्यातील गडचिरोलीनंदुरबारवाशीमधाराशिव या जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश होतो. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अमरावतीबीडचंद्रपूरहिंगोलीजालनानांदेडनाशिकपालघरसोलापूरवर्धायवतमाळ या जिल्ह्यांतील अठरा तालुक्यांचा आकांक्षित तालुक्यात समावेश होतो. या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या‍ विकासासाठी 25 टक्के निधी राखून ठेवण्यात येतो. या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या निर्देशांकात वाढ करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात यावा. या आकांक्षित जिल्ह्यासह तालुक्यांना भरघोस निधी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

केंद्रासह राज्याच्या निधीचे प्रभावीपणे अभिसरण करावे

            महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे आपले उद्द‍िष्ट आहे. हे उद्द‍िष्ट साध्य करण्यासाठी  प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणूक आकर्षित करणेनिर्यात वाढविणे तसेच राज्यासह केंद्राच्या योजनांच्या अभिसरणाद्वारे निधीचा अधिकाधिक वापर करावा. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेला निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषत: शिक्षणआरोग्यपर्यटनमहिला व बालकल्याणकृषीमृद व जलसंधारणाच्या क्षेत्रात खर्च करावा.

डीपीसीच्या माध्यमातून वाढीव निधी

            जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जिल्ह्यांनी विविध यंत्रणांकडून आलेल्या मागणीनुसार निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यांची लोकसंख्याभौगोलिक क्षेत्रावर आधारित तयार करण्यात आलेल्या सूत्रानुसार निधीचे वितरण करण्यात येईल. तथापि, मागील जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निधीपेक्षा यंदा अधिकचा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

विकासकामांच्या गुणवत्तेत तडजोड नको

            राज्य सरकार जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यांना देत असलेला निधी हा सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातून देण्यात येतो. त्यामुळे या निधीचा विनियोग योग्य पध्दतीने झाला पाहिजे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करु नयेप्रत्येक काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजेअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

विदर्भात टुरिझम सर्किट उभारा

            विदर्भात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प नागपूर विभागात आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने विदर्भात येत असतात. त्यांना अधिकच्या सुविधा देतानाचया सर्व पर्यटन केंद्रांना जोडून टुरिझम सर्किट उभारण्यात यावे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यमेळघाट यांसारख्या पर्यटन क्षेत्रांना अधिकची सुविधा देण्याबरोबरच त्यांची अधिक प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिध्दी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

***

वंदना थोरात/विसंअ/

कोल्हापूर, सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक, अर्थ मंत्रालयाची मंजुरी 3300 कोटींचा प्रकल्प, 2300 कोटी जागतिक बँक देणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा

 कोल्हापूरसांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला

जागतिक बँकअर्थ मंत्रालयाची मंजुरी

3300 कोटींचा प्रकल्प, 2300 कोटी जागतिक बँक देणार

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा

 

            मुंबईदि. 8 : कोल्हापूरसांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणेया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँकप्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

            12 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक बँकेच्या पथकाने या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. त्याचसुमारास हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पात जागतिक बँक 280 मिलियन डॉलर्स (सुमारे 2328 कोटी रुपये)तर राज्य सरकार सुमारे 120 मिलियन डॉलर्स (सुमारे 998 कोटी रुपये) असे योगदान देणार आहे. एकूण 400 मिलियन डॉलर्सचा हा प्रकल्प असणार आहे.

            महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ, तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे. अनेक जागतिक संस्थांच्या गाठिशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठिशी असतो. अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतोअशी भूमिका उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती. त्यातून महाराष्ट्र वातावरणपूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे. पूररेषा आखणेनदी खोलीकरणगाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. नीती आयोगाने सुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला होता. एकिकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे सुद्धा यातून शक्य होणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईलअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

००००

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी “विकास पत्रकारिता” विषयावर कार्यशाळा

 ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी

विकास पत्रकारिता विषयावर कार्यशाळा

 

            ठाणेदि. 8 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालयालयाच्या अधिनस्त असलेल्या  विभागीय माहिती कार्यालयकोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालयठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी मंगळवारदि.9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत ठाणे महानगरपालिका(कै.नरेंद्र  बल्लाळ  सभागृहात विकास पत्रकारिता’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

             मुद्रीत (प्रिंट) आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील बदलते प्रवाहविकास पत्रकारितापत्रकारांसाठी शासकीय सुविधा याबाबत पत्रकारांना माहिती व्हावीया हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस प्रवेश विनामूल्य असून उपस्थित राहण्यासाठी  https://forms.gle/Ah2fLPBSPXAQP1ie7 या लिंकवर क्लिक करुन तेथील प्राथमिक माहिती भरुन आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.

            या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.संजय तांबटनाशिक न्यूज वाहिनीचे संचालक प्रा.श्रीकांत सोनवणेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे उपस्थित राहणार आहेत.

            ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावाअसे आवाहन कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळेजिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि ठाणे महानगरपालिका उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी केले आहे.

0000


महिला शिपाई प्रकरणी कोणतीही घटना घडलेली नाही

 महिला शिपाई प्रकरणी कोणतीही घटना घडलेली नाही

पोलिस उपायुक्तांचे (अभियान) स्पष्टीकरण

 

            मुंबईदि. 8 : काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात आली. याप्रकरणी तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता असा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कुणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे.

            या अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहेअसे स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.


सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक

 सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 8 :- देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारेबहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारेसत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक’ चित्रपटाला कर सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.

            चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची कर सवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजेअसे मत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळवित्तमहसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

 फुलेवाडाभिडेवाड्यातील स्मारकांच्या

कामासाठी निधी कमी पडू देणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 8 :- क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

            देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून शैक्षणिकसामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचे स्मारक त्याच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावे. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाहीअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरीपुरवठा मंत्री श्री. भुजबळमुख्य सचिव डॉ. नितीन करीरगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिकनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयअल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तरपुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारपुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतिज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्यस्त्री शिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टाकेलेला त्याग याची माहिती शालेयमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शनप्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवन कार्याबद्दलची माहिती देणारे थिएटरयूपीएससीएमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्रकौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तू सौंदर्यात भर घालणारे असले पाहिजेत्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

००००

Monday, 8 January 2024

.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे त्यांच्या आईच्या नावाने सहा मजली हाॅस्पिटल मुलूंड मध्ये वैशाली नगर येथे सुरू केले आहे


 दवाखाना मोफत आहे.

मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे त्यांच्या आईच्या नावाने सहा मजली हाॅस्पिटल मुलूंड मध्ये वैशाली नगर येथे सुरू केले आहे.

 मातोश्री गंगुबाई हाॅस्पिटल

येथे आधार कार्ड आणि पिवळे किंवा केशरी रॅशन कार्ड धारकचे मोफत ईलाज होतो.जातांना सोबत ऋग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड घेऊन जावे.

ऋग्णाला एकवेळ नाष्टा, दोन वेळा चहा आणि दोन वेळचे जेवण मोफत मिळते.

       येथे हृदय विकार, किडणी स्टोन, गुडघ्याची वाटी बदलणे, कमरेतील बाॅल बदली करणे, कॅन्सर , युरो प्लास्टी , महिलांची गर्भ पिशवी, अशा अनेक गंभीर आजारावर महात्मा फुले आरोग्य किंवा आयुष्य मान भारत या योजने अंतर्गत मोफत ईलाज केला जात आहे.

  गरजुंनी याचा आवश्य लाभ घ्यावा 🙏

हाॅस्पिटला जाण्यासाठी मुलूंड स्टेशन जवळच, येथून 401 नंबर किंवा 402 नंबर ची बस आहे. फक्त सहा रुपये मध्ये हाॅस्पिटला पोहोचता येते.

Featured post

Lakshvedhi