Tuesday, 9 January 2024

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी “विकास पत्रकारिता” विषयावर कार्यशाळा

 ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी

विकास पत्रकारिता विषयावर कार्यशाळा

 

            ठाणेदि. 8 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालयालयाच्या अधिनस्त असलेल्या  विभागीय माहिती कार्यालयकोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालयठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी मंगळवारदि.9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत ठाणे महानगरपालिका(कै.नरेंद्र  बल्लाळ  सभागृहात विकास पत्रकारिता’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

             मुद्रीत (प्रिंट) आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील बदलते प्रवाहविकास पत्रकारितापत्रकारांसाठी शासकीय सुविधा याबाबत पत्रकारांना माहिती व्हावीया हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस प्रवेश विनामूल्य असून उपस्थित राहण्यासाठी  https://forms.gle/Ah2fLPBSPXAQP1ie7 या लिंकवर क्लिक करुन तेथील प्राथमिक माहिती भरुन आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.

            या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.संजय तांबटनाशिक न्यूज वाहिनीचे संचालक प्रा.श्रीकांत सोनवणेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे उपस्थित राहणार आहेत.

            ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावाअसे आवाहन कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळेजिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि ठाणे महानगरपालिका उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी केले आहे.

0000


महिला शिपाई प्रकरणी कोणतीही घटना घडलेली नाही

 महिला शिपाई प्रकरणी कोणतीही घटना घडलेली नाही

पोलिस उपायुक्तांचे (अभियान) स्पष्टीकरण

 

            मुंबईदि. 8 : काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात आली. याप्रकरणी तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता असा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कुणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे.

            या अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहेअसे स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.


सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक

 सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 8 :- देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारेबहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारेसत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक’ चित्रपटाला कर सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.

            चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची कर सवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजेअसे मत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळवित्तमहसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

००००

फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

 फुलेवाडाभिडेवाड्यातील स्मारकांच्या

कामासाठी निधी कमी पडू देणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 8 :- क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

            देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून शैक्षणिकसामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचे स्मारक त्याच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावे. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाहीअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरीपुरवठा मंत्री श्री. भुजबळमुख्य सचिव डॉ. नितीन करीरगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिकनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयअल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तरपुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमारपुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतिज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्यस्त्री शिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टाकेलेला त्याग याची माहिती शालेयमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शनप्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवन कार्याबद्दलची माहिती देणारे थिएटरयूपीएससीएमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्रकौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तू सौंदर्यात भर घालणारे असले पाहिजेत्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

००००

Monday, 8 January 2024

.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे त्यांच्या आईच्या नावाने सहा मजली हाॅस्पिटल मुलूंड मध्ये वैशाली नगर येथे सुरू केले आहे


 दवाखाना मोफत आहे.

मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे त्यांच्या आईच्या नावाने सहा मजली हाॅस्पिटल मुलूंड मध्ये वैशाली नगर येथे सुरू केले आहे.

 मातोश्री गंगुबाई हाॅस्पिटल

येथे आधार कार्ड आणि पिवळे किंवा केशरी रॅशन कार्ड धारकचे मोफत ईलाज होतो.जातांना सोबत ऋग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड घेऊन जावे.

ऋग्णाला एकवेळ नाष्टा, दोन वेळा चहा आणि दोन वेळचे जेवण मोफत मिळते.

       येथे हृदय विकार, किडणी स्टोन, गुडघ्याची वाटी बदलणे, कमरेतील बाॅल बदली करणे, कॅन्सर , युरो प्लास्टी , महिलांची गर्भ पिशवी, अशा अनेक गंभीर आजारावर महात्मा फुले आरोग्य किंवा आयुष्य मान भारत या योजने अंतर्गत मोफत ईलाज केला जात आहे.

  गरजुंनी याचा आवश्य लाभ घ्यावा 🙏

हाॅस्पिटला जाण्यासाठी मुलूंड स्टेशन जवळच, येथून 401 नंबर किंवा 402 नंबर ची बस आहे. फक्त सहा रुपये मध्ये हाॅस्पिटला पोहोचता येते.

Waooo bolo waooo

 


              

नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट एमटीएचएल पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार

 नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट

एमटीएचएल पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार

                                      : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

            मुंबईदि. ७ : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 

            आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोडमरीन ड्राईव्हनरीमन पॉईंट याठिकाणी ही मोहिम राबवतानाचा मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत एमटीएचएल आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले  येथेही स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला.

 

            सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास सुरू झालेली ही मोहिम दुपारी दीडपर्यंत सुरू होती. नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी पार्क जवळील कोस्टल रोडच्या जुळ्या भूमिगत बोगद्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोहिमेला सुरूवात केली. वरळीकडून मुंबईकडे जाणाऱ्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहिर केले.

 

कोस्टल रोड बोगद्यात देशात प्रथमच सकार्डो प्रणाली

 

            भारतात प्रथमच सकार्डो ही अत्याधुनिक वायूविजन प्रणाली बोगद्यात बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धुर न साठता तो बाहेर फेकण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये यूटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला.

 

कोस्टल रोड बोगद्याचा दुसरा टप्पा मे अखेरीस

 

            कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडवर टोल नाही असे सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

१०० टॅंकर्सच्या वापराने एमटीएचएलवर स्वच्छता मोहिम

 

            मरीन ड्राईव्ह भागातील स्वच्छता मोहिम आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे एमटीएचएलकडे रवाना झाले. तेथे सुमारे १०० टॅंकर्सचा वापर करून रस्ता धुतला जात आहे. या भागात ग्रीन पॅच तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 

२२ किमी लांबीचा देशातील पहिला सागरी सेतू असून त्यामुळे मुंबई शहर नवी मुंबईगोवापुणे यांना कनेक्ट होणार आहे. राज्याचा सर्वांत महत्वाकांक्षी आणि गेमचेंजर प्रकल्प असल्याचे सांगत यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. मुंबईनवी मुंबईठाणे रायगड आज दोन तासांहून अधिक वेळ लागतो. आता मुंबईतून चिर्लेपर्यंत १५ मिनीटात पोहोचणे या प्रकल्पामुळे शक्य होईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

 

चिर्लेयेथून मुंबई पुणे आणि त्याचबरोबर गोव्याला देखील हा सागरी सेतू कनेक्ट करणार आहे. त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉरला कनेक्ट करेल.

 

अटल सेतू पर्यावरणपूरक प्रकल्प

 

            एमटीएचएल अटल सेतूचा फायदा लाखो लोकांना होणार असून १२ जानेवारीला त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा सागरी सेतू करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामध्ये स्टील डेक वापरले त्यामुळे जास्तीची वहन क्षमता निर्माण झाली आहे. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे त्यामुळे इथले फ्लेमिंगो जाऊन नये म्हणून काम करत असताना नॉईज बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल आणि टेम्पररीइम्बाक्टमेंट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

 

            चार हावडा ब्रीज होतीलसहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होतील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. पृथ्वीला दोन वेळा प्रदक्षिणा होतील एवढ्या वायर्स ह्या प्रकल्पात वापरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी एमटीएचएल आणि कोस्टल रोड हे दोन्ही गेमचेंजर असून ह्या नविन वर्षांत दोन्ही प्रकल्प सामान्यांना खुले करून त्यांना नव्या वर्षांची भेट मिळणार आहे.

०००


Featured post

Lakshvedhi