Monday, 8 January 2024

Waooo bolo waooo

 


              

नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट एमटीएचएल पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार

 नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट

एमटीएचएल पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार

                                      : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

            मुंबईदि. ७ : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

 

            आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोडमरीन ड्राईव्हनरीमन पॉईंट याठिकाणी ही मोहिम राबवतानाचा मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत एमटीएचएल आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले  येथेही स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला.

 

            सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास सुरू झालेली ही मोहिम दुपारी दीडपर्यंत सुरू होती. नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी पार्क जवळील कोस्टल रोडच्या जुळ्या भूमिगत बोगद्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोहिमेला सुरूवात केली. वरळीकडून मुंबईकडे जाणाऱ्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहिर केले.

 

कोस्टल रोड बोगद्यात देशात प्रथमच सकार्डो प्रणाली

 

            भारतात प्रथमच सकार्डो ही अत्याधुनिक वायूविजन प्रणाली बोगद्यात बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धुर न साठता तो बाहेर फेकण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये यूटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला.

 

कोस्टल रोड बोगद्याचा दुसरा टप्पा मे अखेरीस

 

            कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडवर टोल नाही असे सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

१०० टॅंकर्सच्या वापराने एमटीएचएलवर स्वच्छता मोहिम

 

            मरीन ड्राईव्ह भागातील स्वच्छता मोहिम आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे एमटीएचएलकडे रवाना झाले. तेथे सुमारे १०० टॅंकर्सचा वापर करून रस्ता धुतला जात आहे. या भागात ग्रीन पॅच तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 

२२ किमी लांबीचा देशातील पहिला सागरी सेतू असून त्यामुळे मुंबई शहर नवी मुंबईगोवापुणे यांना कनेक्ट होणार आहे. राज्याचा सर्वांत महत्वाकांक्षी आणि गेमचेंजर प्रकल्प असल्याचे सांगत यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. मुंबईनवी मुंबईठाणे रायगड आज दोन तासांहून अधिक वेळ लागतो. आता मुंबईतून चिर्लेपर्यंत १५ मिनीटात पोहोचणे या प्रकल्पामुळे शक्य होईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

 

चिर्लेयेथून मुंबई पुणे आणि त्याचबरोबर गोव्याला देखील हा सागरी सेतू कनेक्ट करणार आहे. त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉरला कनेक्ट करेल.

 

अटल सेतू पर्यावरणपूरक प्रकल्प

 

            एमटीएचएल अटल सेतूचा फायदा लाखो लोकांना होणार असून १२ जानेवारीला त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा सागरी सेतू करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामध्ये स्टील डेक वापरले त्यामुळे जास्तीची वहन क्षमता निर्माण झाली आहे. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे त्यामुळे इथले फ्लेमिंगो जाऊन नये म्हणून काम करत असताना नॉईज बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल आणि टेम्पररीइम्बाक्टमेंट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

 

            चार हावडा ब्रीज होतीलसहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होतील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. पृथ्वीला दोन वेळा प्रदक्षिणा होतील एवढ्या वायर्स ह्या प्रकल्पात वापरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी एमटीएचएल आणि कोस्टल रोड हे दोन्ही गेमचेंजर असून ह्या नविन वर्षांत दोन्ही प्रकल्प सामान्यांना खुले करून त्यांना नव्या वर्षांची भेट मिळणार आहे.

०००


भारतीय सैन्यदल !! एक अभिमान !!!, एक salute बनतोच

 भारतीय सैन्यदल !! एक अभिमान !!!


भारतातील प्रसिद्ध चहा कंपनी "ताजमहाल" ने विजयवाडा येथे एक मोठा होर्डिंग लावला आहे, जेथे वर्षभर पाऊस पडतो. या होर्डिंगवर मोठे लाकडी चमचे आहेत. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या चमच्यांमध्ये पाणी साचते, ज्याच्या वजनामुळे चमचे वाकून सर्किट बोर्डवर आदळतात, त्यामुळे "मेघ मल्हार" राग आपला मधुर सूर वाजू लागतो. राग मेघ मल्हार वर्षाशी संबंधित आहे हे जाणून घेऊया. या आश्चर्यकारक पर्यावरणपूरक प्रयत्नाची दखल घेऊन, "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स" ने कंपनीला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे. प्रशंसा प्रमाणपत्र या होर्डिंग्जना जगातील सर्वोत्कृष्ट "इको-फ्रेंडली होर्डिंग" म्हणून घोषित करते.🌧️⛈️🌨️🎼🎹🔉

 


भारतातील प्रसिद्ध चहा कंपनी "ताजमहाल" ने विजयवाडा येथे एक मोठा होर्डिंग लावला आहे, जेथे वर्षभर पाऊस पडतो.  या होर्डिंगवर मोठे लाकडी चमचे आहेत.  जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या चमच्यांमध्ये पाणी साचते, ज्याच्या वजनामुळे चमचे वाकून सर्किट बोर्डवर आदळतात, त्यामुळे "मेघ मल्हार" राग आपला मधुर सूर वाजू लागतो.  राग मेघ मल्हार वर्षाशी संबंधित आहे हे जाणून घेऊया.

  या आश्चर्यकारक पर्यावरणपूरक प्रयत्नाची दखल घेऊन, "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स" ने कंपनीला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे. प्रशंसा प्रमाणपत्र या होर्डिंग्जना जगातील सर्वोत्कृष्ट "इको-फ्रेंडली होर्डिंग" म्हणून घोषित करते.🌧️⛈️🌨️🎼🎹🔉

Sunday, 7 January 2024

आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु आहे. कृपया आपल्या मुलांना ह्यांची माहिती द्या. 🙏

 आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु आहे. कृपया आपल्या मुलांना ह्यांची माहिती द्या. 🙏


अन् मुख्यमंत्री गेले माजी सैनिकांच्या भेटीला

 अन् मुख्यमंत्री गेले माजी सैनिकांच्या भेटीला

 

            मुंबईदि. ७: मुंबई संपुर्ण स्वच्छता अभियानात सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नरिमन पॉईंट येथील एनसीपीए संकुलात माजी सैनिकांचा मेळावा सुरू असल्याचे समजताच त्यांनी तिकडे जात माजी सैनिकांशी संवाद साधला. 

           

            देशाचे रक्षण करताना दिव्यांगत्व आलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला. तुमचा कार्यक्रम सुरू असल्याचे समजल्यावर मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि तुमच्या भेटीला आलोतुम्ही सारे सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करता म्हणून आम्ही सुरक्षित जीवन जगू शकतो याबाबत मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे,असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

 

            आम्हाला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान असून राज्यात माजी सैनिकांसाठी काही योजना राबविण्याचा आमचा मानस आहे. तसेच याबाबत अजून काही करता येणे शक्य असेल तर आवर्जून सूचना कराव्यात असेही सुचवले. यावेळी तिन्ही सैन्य दलातील माजी सैनिक उपस्थित होते.

०००


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू

लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

 

            रायगड (जिमाका) दि. 7- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्य कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. कार्यक्रमाचे दिमाखदार आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  पूर्वतयारी आढावा बैठक नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय. एस. चहलमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, प्रधान सचिव तथा माहिती जनसंपर्क महासंचालनालायचे महासंचालक ब्रिजेश सिंहकोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदेनवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेरायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसेपनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर असलेल्या या सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजन देखील दिमाखदार व्हावे. सिडकोमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणजिल्हा व मनपा प्रशासनराष्ट्रीय महामार्ग या  सर्व यंत्रणानी आवश्यक त्या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करावी. तसेच सर्व यंत्रणानी कामामध्ये परस्पर समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच कार्यक्रम नियोजनामध्ये तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्था यांचे मार्गदर्शन घ्यावे असेही सांगितले.

            अटल सेतूच्या शिवडी आणि चिरले या दोन्ही ठिकाणचा परिसर सुशोभित करण्यात यावा. तसेच या संपूर्ण मार्गाची नियमित स्वच्छता ठेवावी. चिरले ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गांवर रोड फर्निचरचा वापर करावा. या मार्गाचे सुशोभिकरण, सौंदर्यीकरणआवश्यकता असेल तेथे दुरुस्ती तसेच परिसरातील भिंती रंगविणे आणि हरित पट्टे तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

            पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावीमोठ्या प्रमाणावर वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास कोणतीही अडचण होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाची तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी  व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या.

०००

 

Featured post

Lakshvedhi