नगर जिल्ह्यातील राहुल पेटारे हा मुलगा एका हाताने टाळी वाजतो .... त्याची ही कला एकदा पहाच! 👏
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 7 January 2024
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे' चा शुभारंभ
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते
'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे' चा शुभारंभ
मुंबई, दि.7: राज्यपाल रमेश बैस यांनी निळा झेंडा दाखवून 'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे' चा शुभारंभ नरिमन पॉइंट येथे केला. त्यानंतर नरिमन पॉइंट येथे रोड शो करण्यात आला त्यामध्येही राज्यपाल सहभागी झाले. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणांनी हा परिसर दुमदुमला.
लष्कर, नौदल व वायुदल या तीनही दलातील सैन्यातील अधिकाऱ्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय कार्याची आठवण करून देवून,या शूरवीरांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी 'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे' हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवगळ्या दिवशी साजरा केला जातो.
नेव्ही फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल विजय वढेरा,सचिव कर्नल राज दत्ता,अर्जुन पुरस्कार प्राप्त लेफ्टनंट कर्नल फारोख तारापोर, लेफ्टनंट कर्नल गोपाल सिंग (वय वर्ष 93), नेव्ही फाउंडेशनचे माजी अध्यक्ष कॅप्टन राज मोहिंद्र- (वय 90 वर्षे), कारगिल युद्धानंतर ऑपरेशन मध्ये दिव्यांगत्व प्राप्त झालेले नाईक दीपचंद यासह लष्कर, नौदल व वायुदल या तीनही दलातील आजी आणि माजी अधिकारी यांचे कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित होते.
****
♦️ *विचारपुष्प*♦️
🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹
📜 *दैनिक पंचांग व आध्यात्मिक माहिती.*
*Follow the*
*Channel On*
*WhatsApp:*
https://whatsapp.com/channel/0029Va5NKic3mFY3FgYuwz3f
♦️ *विचारपुष्प*♦️
*🙏🙏परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळ गैरसमज आहे.🙏🙏*
*🙏🙏कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो.🙏🙏*
*🙏🙏जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये.🙏🙏*
*🙏🙏कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो.🙏🙏*
*🙏🙏SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.🙏🙏*
*🙏🙏नातं हृदयातून असाव रक्ताची नातं हल्ली वृद्धश्रमात सापडतात.🙏🙏*
*🙏🙏लाकडाच्या ओंडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा" 🙏🙏*
*🙏🙏नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही.🙏🙏*
*🙏🙏"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा.🙏🙏*
*🙏🙏"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा.🙏🙏*
*🙏🙏"भावना" ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे ह्यात सगळे वाहून जातात.🙏🙏*
🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹
*भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ महाराज*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️*
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
Follow this link to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919833271518
●┈┉❀꧁꧂❀┉┈●
Saturday, 6 January 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील “संपूर्ण स्वच्छता मोहिमे”चा सलग पाचवा आठवडा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील
“संपूर्ण स्वच्छता मोहिमे”चा सलग पाचवा आठवडा
---------
नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची;
स्वच्छता मोहीम अखंडितपणे सुरु ठेवा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि.6: स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानाला देखील प्रारंभ झाला आहे. शहरांमधील सर्वंकष स्वच्छतेवर भर देण्यासाठी यंत्रणा अहोरात्र काम करीत असून ही स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी मागील 3 डिसेंबरपासून शहरात ‘संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग)’ मोहीम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. सलग पाच आठवड्यापासून मुख्यमंत्री श्री. शिंदे हे स्वत: सुट्टीच्या दिवशी पहाटेपासून स्वच्छता मोहिमेत (डीप क्लिनिंग) सहभागी होवून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवित आहेत.
आज कुलाबा येथील आयएनएस शिक्रा येथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. याठिकाणी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनपाचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त संजोग कबरे, डॉ संगीता हसनाळे, उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनिशकुमार पटेल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद
मुख्यमंत्र्यांनी आयएनएस शिक्रा परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधून रस्त्यावर माती, कचरा राहणार नाही, साचलेल्या कचऱ्याचे विलगीकरण याविषयी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. शिवाय येथील मुंबई पब्लिक स्कूल, कुलाबा इंग्लिशचे विद्यार्थी, शिक्षक यांनाही स्वच्छता अभियानविषयी माहिती देत मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले.
डीप क्लिनिंग ही मोहीम मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर करण्यात आली आहे. राज्यातही मोठ्या शहरात स्वच्छता मोहीम नियमित सुरू असल्याने हवेतील प्रदूषण कमी राहाण्यास मदत होणार आहे. यामुळे स्वच्छता करणाऱ्या खऱ्या हिरोंकडे शासनाचे लक्ष राहील, त्यांच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
पूर्व मुक्त मार्गाच्या (फ्री वे) सुरूवातीला आणि या मार्गावरील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीजवळ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग, भिंती पाण्याने साफ केल्या. स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती, कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते. कधी हातात पाण्याचा पाईप तर कधी झाडू घेवून स्वत: मुख्यमंत्री स्वच्छता करीत असल्याचे पाहून अधिकारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती.
माध्यम प्रतिनिधींना दिल्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस, हा पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार, कॅमेरामन यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पगुच्छाने सन्मानित करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पूर्व द्रूतगती मार्गावरील वाहतूक पोलीस चौकीजवळही मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आमदार यामिनी जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी सामील झाले होते.
***
00000
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की संकल्पना के
“संपूर्ण स्वच्छता अभियान का” पांचवां सप्ताह
---------
नागरिकों के स्वास्थ्य के लिए स्वच्छता महत्वपूर्ण;
स्वच्छता अभियान अखंडित रूप से जारी रखें - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश
मुंबई, दि.6: स्वच्छ, सुंदर व प्रदुषणमुक्त मुंबई के लिए संपूर्ण स्वच्छता अभियान की शुरुआत की है और राज्य में स्वच्छ महाराष्ट्र के लिए महास्वच्छता अभियान का भी प्रारंभ हुआ है. शहरों की सर्वंकष स्वच्छता पर जोर देने के लिए यंत्रणा दिन-रात काम कर रहीं है और स्वच्छता का अभियान अखंडित रूप से जारी रखने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए है.
मुंबई की हवा का प्रदुषण कम करने के लिए पिछले 3 दिसंबर से शहर में ‘संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग)’ अभियान मुख्यमंत्री की उपस्थिति में जारी है. लगातार पांच सप्ताह से मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वयं अवकाश के दिन सुबह से स्वच्छता अभियान में (डीप क्लिनिंग) शामिल होकर स्वच्छता कर्मचारियों का उत्साह बढ़ा रहें है.
आज कुलाबा स्थित आयएनएस शिक्रा से स्वच्छता अभियान का प्रारंभ हुआ. यहाँ पर कौशल विकास उद्यमिता एवं नवाचार मंत्री तथा मुंबई उपनगर के पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनपा के आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त संजोग कबरे, डॉ संगीता हसनाळे, उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनिशकुमार पटेल आदि उपस्थित थे.
मुख्यमंत्री ने विद्यार्थी, स्वच्छता कर्मचारियों से साधा संवाद
मुख्यमंत्री ने आयएनएस शिक्रा परिसर के स्वच्छता अभियान का निरिक्षण किया. उसके बाद मुख्यमंत्री श्री. शिंदे ने स्वच्छता कर्मचारियों से संवाद साधकर सडकों की मिट्टी, कचरा, जमा कचरें का विलगीकरण को लेकर कर्मचारियों को सूचना दी. इसके अलावा यहाँ के मुंबई पब्लिक स्कूल, कुलाबा इंग्लिश के विद्यार्थी, शिक्षक को भी स्वच्छता अभियान की जानकारी देते हुए इस अभियान में शामिल होने का आवाहन किया.
मुख्यमंत्री श्री. शिंदे ने बताया कि डीप क्लिनिंग यह अभियान मुंबई तक ही सीमित न रखते हुए समूचे राज्य में लागू किया गया है. राज्य के बड़े शहरों में स्वच्छता अभियान नियमित शुरू रहने से हवा का प्रदुषण कम रहने तथा कम होने में मदद होगी. जिससे स्वच्छता करनेवाले असली हीरों की ओर सरकार का ध्यान रहेगा
और बताया कि उनकी समस्याए, उनके बच्चों के शैक्षणिक प्रगति के लिए
शिक्षण मित्र’ विद्यार्थी, शिक्षक, पालकांना देणार गतिमान सेवा
शिक्षण मित्र’ विद्यार्थी, शिक्षक, पालकांना देणार गतिमान सेवा
Ø वर्धा जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपुर्ण उपक्रम
Ø जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची संकल्पना
Ø उपक्रमास लोकसेवा हक्क कायद्याची जोड
Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते शुभारंभ
वर्धा, दि.5 (जिमाका) : विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत शिक्षण विभागाच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने ‘शिक्षण मित्र’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला लोकसेवा हमी कायद्याची जोड देण्यात आली असून विविध प्रकारच्या 20 सेवा या उपक्रमाद्वारे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा वर्धा पहिलाच जिल्हा आहे. वने, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता शासकीय सेवा त्यांना कमी वेळेत आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने लोकसेवा हमी कायदा आणला आहे. या कायद्यांतर्गत विविध सेवा कालमर्यादेत उपलब्ध करून दिल्या जातात. वर्धा जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून ‘शिक्षण मित्र’ नावाचा उपक्रम सुरु करून शिक्षण विभागाच्या 20 सेवा या कायद्यांतर्गत आणल्या. या सेवा कालमर्यादेत उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सेवा उपलब्ध होणार आहे.
या सेवांमध्ये खाजगी माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, मुख्य लिपीक व तत्सम पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी नेमणूक, वैयक्तिक मान्यता आदेश देणे, स्वाक्षरीचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदलीस मान्यता, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विनाअनुदानित वरुन अनुदानित पदावर बदलीस मान्यता देणे.
खाजगी माध्यमिक शाळामधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेत्तर समायोजन, खाजगी शाळांमधील अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 3 लक्ष पर्यंत वैद्यकीय प्रतीपूर्ती प्रस्ताव मंजूर करणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी मंजुरी आदेश, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण देयक मंजूर करणे, विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेत बदल, दुरुस्ती, विद्यार्थी, त्यांचे वडील व आईच्या नावात बदल, विद्यार्थ्यांच्या जातीच्या नावात बदल मंजुरी आदेश या सेवांचा समावेश आहे.
सोबतच इयत्ता 10 वी व 12 चे गुणपत्रक, प्रमापत्रक मध्ये विद्यार्थी, वडील, आईच्या नावात व जन्मतारखेत बदल करण्याबाबत शिफारसपत्र मिळणे, खाजगी माध्यमिक शाळा खाते मान्यता वर्धित करणे, वेतनेत्तर अनुदान मंजुरी आदेश व वेतनेत्तर अनुदान वितरित करणे, खाजगी शाळा अनुदान टप्पा अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे आदी सेवा या उपक्रमात घेण्यात आल्या आहे. यातील काही सेवा 15 दिवस तर काही सेवा 21 दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्याचे शिक्षणक्षेत्र गतिमान होईल - राहुल कर्डिले
लोकसेवा हमी कायद्यांतर्गत बऱ्याच सेवा ऑनलाईन करण्यात आल्या. यामुळे नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध होत आहे. शिक्षण विभागाचे कामकाज अधिक गतीमान झाले पाहिजे, यासाठी आपण जिल्ह्यात 20 प्रकारच्या सेवा या कायद्यांतर्गत आणल्या. ‘शिक्षण मित्र’ नावाचा स्वतंत्र उपक्रम सुरु केला. यासाठी वेगळे स्वतंत्र पोर्टल देखील सुरु करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक, पालकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र गतिमान होण्यास मदत होणार आहे.
शुभारंभालाच अनुकंपा नियुक्तीचे पत्र
‘शिक्षण मित्र’ उपक्रमाचा शुभारंभ वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाला. शुभारंभाप्रसंगीच अभिजित मधुकरराव देशमुख या युवकास उपक्रमाच्या पोर्टलद्वारे तातडीने कार्यवाही करून अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे पत्र श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी दिवंगत शिक्षक मधुकरराव देशमुख यांच्या पत्नी भारती देशमुख उपस्थित होते.
000000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...