Sunday, 7 January 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू

लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

 

            रायगड (जिमाका) दि. 7- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्य कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. कार्यक्रमाचे दिमाखदार आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  पूर्वतयारी आढावा बैठक नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय. एस. चहलमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, प्रधान सचिव तथा माहिती जनसंपर्क महासंचालनालायचे महासंचालक ब्रिजेश सिंहकोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदेनवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेरायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसेपनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर असलेल्या या सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजन देखील दिमाखदार व्हावे. सिडकोमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणजिल्हा व मनपा प्रशासनराष्ट्रीय महामार्ग या  सर्व यंत्रणानी आवश्यक त्या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करावी. तसेच सर्व यंत्रणानी कामामध्ये परस्पर समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच कार्यक्रम नियोजनामध्ये तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्था यांचे मार्गदर्शन घ्यावे असेही सांगितले.

            अटल सेतूच्या शिवडी आणि चिरले या दोन्ही ठिकाणचा परिसर सुशोभित करण्यात यावा. तसेच या संपूर्ण मार्गाची नियमित स्वच्छता ठेवावी. चिरले ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गांवर रोड फर्निचरचा वापर करावा. या मार्गाचे सुशोभिकरण, सौंदर्यीकरणआवश्यकता असेल तेथे दुरुस्ती तसेच परिसरातील भिंती रंगविणे आणि हरित पट्टे तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

            पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावीमोठ्या प्रमाणावर वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास कोणतीही अडचण होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाची तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी  व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या

चहा प्यायला plastic cup, पहा

 


एका हाताची टाळा

 नगर जिल्ह्यातील राहुल पेटारे हा मुलगा एका हाताने टाळी वाजतो .... त्याची ही कला एकदा पहाच! 👏



राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे' चा शुभारंभ

  

राज्यपाल रमेश बैस  यांच्या हस्ते  

'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डेचा शुभारंभ









 

            मुंबईदि.7: राज्यपाल रमेश बैस  यांनी निळा झेंडा दाखवून 'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डेचा शुभारंभ नरिमन पॉइंट येथे केला. त्यानंतर नरिमन पॉइंट येथे रोड शो करण्यात आला त्यामध्येही राज्यपाल सहभागी झाले. यावेळी भारत माता की जय या घोषणांनी हा परिसर दुमदुमला.

       लष्करनौदल व वायुदल या तीनही दलातील सैन्यातील अधिकाऱ्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय कार्याची आठवण करून देवून,या शूरवीरांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी  'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डेहा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवगळ्या दिवशी साजरा केला जातो.

            नेव्ही फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल विजय वढेरा,सचिव कर्नल राज दत्ता,अर्जुन पुरस्कार प्राप्त लेफ्टनंट कर्नल फारोख तारापोरलेफ्टनंट कर्नल गोपाल सिंग (वय वर्ष 93), नेव्ही फाउंडेशनचे माजी अध्यक्ष कॅप्टन राज मोहिंद्र- (वय 90 वर्षे)कारगिल युद्धानंतर ऑपरेशन मध्ये दिव्यांगत्व प्राप्त झालेले नाईक दीपचंद यासह लष्करनौदल व वायुदल या तीनही दलातील आजी आणि माजी अधिकारी यांचे कुटुंबीय देखील  यावेळी उपस्थित होते.

****


जय रामजी की

 एक बार जरूर सुनाएगा, आपको अच्छा लगेगा।


♦️ *विचारपुष्प*♦️

 🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹


📜 *दैनिक पंचांग व आध्यात्मिक माहिती.*


*Follow the*

*Channel On*

 *WhatsApp:*

 https://whatsapp.com/channel/0029Va5NKic3mFY3FgYuwz3f


      ♦️ *विचारपुष्प*♦️


*🙏🙏परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळ गैरसमज आहे.🙏🙏*

*🙏🙏कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो.🙏🙏*

*🙏🙏जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये.🙏🙏*

*🙏🙏कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो.🙏🙏*

*🙏🙏SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.🙏🙏*

*🙏🙏नातं हृदयातून असाव रक्ताची नातं हल्ली वृद्धश्रमात सापडतात.🙏🙏*

*🙏🙏लाकडाच्या ओंडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा" 🙏🙏*

*🙏🙏नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही.🙏🙏*

*🙏🙏"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा.🙏🙏*

*🙏🙏"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा.🙏🙏*

*🙏🙏"भावना" ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे ह्यात सगळे वाहून जातात.🙏🙏*

🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹

*भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ महाराज*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


*♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️*


●┈┉❀꧁꧂❀┉┈●


Follow this link to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919833271518


●┈┉❀꧁꧂❀┉┈●

Featured post

Lakshvedhi