Wednesday, 3 January 2024

बालमेळाव्याच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील शाळांना सुट्टी द्या; जि.प.सीईओंकडे मागणी

 बालमेळाव्याच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील शाळांना सुट्टी द्या; जि.प.सीईओंकडे मागणी


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी बालमेळावा होत आहे. या बाल संमेलनाचा विद्यार्थ्यांना आनंद लुटता यावा, यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांना  एक दिवसाची सुट्टी द्यावी, अशी मागणी, मराठी वाङ्‌मय मंडळातर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांच्याकडे करण्यात आली आहे.


"कलानंद बालमेळावा" समिती प्रमुख संदीप घोरपडे, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, बन्सिलाल भागवत, गणेश ठाकरे, भागवत सुर्यवंशी  यांनी श्री.अंकित यांची भेट घेवून चर्चा केली. १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बालसाहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्यात मराठी मातृभाषे विषयी प्रेम, सदभाव निर्माण होईल व ते मातृभाषा संवर्धनासाठी प्रेरित होतील.


या करिता जळगांव जिल्हातील सर्व शिक्षण संस्था, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळांना साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ होणेसाठी व त्यांनी साहित्य संमेलनाच्या स्थळी भेट देण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे. तसेच "कलानंद बालमेळावा" या कार्यक्रमाला सहभागी होणसाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शाळांना दि.१ रोजी शासकीय सुटी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.


दिलखुलास’, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत

 दिलखुलास'जय महाराष्ट्रकार्यक्रमात

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'शाश्वत पर्यावरण विकास परिषदया विषयावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळपर्यावरण व वातावरणीय बदल विभागमहाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत 9 जानेवारी 2024 रोजी शाश्वत पर्यावरण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या  परिषदेच्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील अग्रणी उद्योगखासगी व सरकारी संस्थापर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन याबाबतची माहिती 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. पटेल यांची मुलाखत गुरुवार दि. 4शुक्रवार दि. 5 आणि शनिवार दि. 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवारदि. 6 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक श्रीकांत कुळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी शालेय शिक्षण विभागाच्या दिशादर्शिकेचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

 सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी शालेय शिक्षण विभागाच्या दिशादर्शिकेचे

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन

 

            मुंबईदि. 3 - शालेय शिक्षण विभागातील कार्यालयांच्या कामकाजाची वार्षिक रूपरेषा ठरवणाऱ्या आणि या विभागाला दिशा देणाऱ्या शैक्षणिक कॅलेंडर म्हणजे दिशादर्शिकेचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते बुधवारी करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या दिशादर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

            प्रधान सचिव रनजीत सिंह देओलशिक्षण आयुक्त सूरज मांढरेबालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटीलमंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ही दिशादर्शिका तयार करण्यासाठी शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

            मागील वर्षापासून अशी दिशादर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे. वर्षभरातील शैक्षणिक कामकाजाचे नियोजन दिशादर्शिकेत करण्यात आल्याचे शिक्षण आयुक्त श्री. मांढरे यांनी यावेळी सांगितले. दिशादर्शिकेमुळे शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आल्याचे प्रधान सचिव श्री. देओल यांनी सांगितले.

            ही दिशादर्शिका शालेय शिक्षण विभागास उपयोगी ठरत असल्याचे सांगून शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांनी समाधान व्यक्त केले. दिशादर्शिकेशिवाय टेबल प्लॅनर (मेज नियोजक)चेही प्रकाशन करण्यात यावेळी करण्यात आले.

दिशादर्शिकेची वैशिष्ट्ये

            शालेय शिक्षण विभागातील कार्यक्रमयोजनाविषय आणि सर्व प्रकारचे कार्यालयीन कामकाज अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण आयुक्तालयप्राथमिक शिक्षण संचालनालयमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालययोजना शिक्षण संचालनालयविभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयशिक्षणाधिकारी प्राथमिकमाध्यमिक व योजना यांच्या संपूर्ण वर्षाच्या कामकाजाचे नियोजन यात आहे. क्षेत्रभेटी वेळी एकाच शैक्षणिक विभागात एकाच वेळी दोन वरिष्ठ अधिकारी त्या आठवड्यात जाणार नाहीत, असे नियोजन केले आहे. राज्यस्तरीय अधिकारी क्षेत्र भेटीस गेल्यास सर्व संचालनालयाकडील कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित आहे.

            दर सोमवारी कार्यालयीन साप्ताहिक बैठकापहिल्या व तिसऱ्या मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी आपल्या अधिनस्त कार्यालयांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार तर राज्यस्तरीय कार्यालये दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेणार. दिशादर्शिकेत शासन निर्णयानुसार शासकीय सुट्ट्या व घोषित कार्यक्रम (जयंती) यांचा समावेश. दिशादर्शिकेत हॅश चिन्हाने दर्शविलेले कामकाज सर्व कार्यालयांनी त्या दिवशी करणे अपेक्षित आहे. काही महत्त्वाच्या योजनांची माहिती तसेच बैठका व दौरे प्रभावी होण्याबाबत द्यावयाच्या सूचनांचा समावेश दिशादर्शिकेत करण्यात आला आहे. बालभारतीविद्या प्राधिकरणमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळराज्य परीक्षा परिषद यांची स्वतंत्र दिशादर्शिका तयार करण्यात आली आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 


 

वृत्त क्र

यंत्रमागधारकांचे भविष्य सुरक्षित करणारा सर्वसमावेशक अहवाल तयार करावा

 यंत्रमागधारकांचे भविष्य सुरक्षित करणारा

सर्वसमावेशक अहवाल तयार करावा

- मंत्री दादाजी भुसे

            मुंबई, दि. 3 : यंत्रमाग उद्योग हे राज्यातील मोठ्या संख्येने रोजगार आणि महसूल निर्मितीचे स्त्रोत असलेले महत्वपूर्ण क्षेत्र आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारकांना सुरक्षित भविष्याची हमी देणारा सर्वसमावेशक अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याच्या सूचना  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)  मंत्री तथा राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या उपाययोजना समितीचे अध्यक्ष दादाजी भुसे यांनी आज येथे दिल्या.

            राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गठित लोकप्रतिनिधींच्या समितीची आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा समितीचे अध्यक्ष श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. समिती सदस्य आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, रईस शेख, अनिल बाबरप्रवीण दटकेउपसचिव श्रीकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी देशातील इतर राज्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योगाची उलाढाल आहे, अशा गुजराततमिळनाडूकर्नाटकउत्तर प्रदेश या राज्यात यंत्रमाग उद्योगासाठी देण्यात येत असलेल्या सोयीसुविधावीज दरबाजारपेठखरेदी - विक्री व्यवस्था प्रणाली या सर्व गोष्टींचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात यावे. त्याआधारे महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाची सद्य:स्थिती आणि समस्या यांचा अभ्यास करुन एक सर्वसमावेशक उपाययोजनांचा समावेश असलेला अहवाल शासनाला सादर करता येईलअशा सूचना मंत्री श्री.भुसे यांनी केल्या.

            यंत्रमागधारकांच्या उद्योग संधींचा विस्तार आणि या उद्योगाचे बळकटीकरणाच्या दृष्टीने या क्षेत्रात  व्यापक सुधारणांची गरज आहे. समितीने अहवाल तयार करताना त्यात प्रामुख्याने अनुदानसामायिक शे़डनेट संकल्पनासाधे पॉवरलूम तसेच हायटेक पॉवरलूम यांना देण्यात येणारे अनुदान सवलतस्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय संधीयासोबत सर्व संलग्न बाबींचा सविस्तर आढावा घेऊन उपाययोजनांचा समावेश अहवालात करावा. कृषी नंतरचा क्रमांक दोनचा उद्योग असेलल्या यंत्रमाग क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कल्याण मंडळ करावे, अशा सूचना यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी केल्या.

            राज्यातील यंत्रमाग बहुल भागांची प्रत्यक्ष पाहणी करुन शिफारीसह व  योजनेच्या विस्तृत स्वरुपासह शासनास ही समिती अहवाल सादर करणार आहे. समितीच्या कार्यकक्षेत राज्यातील यंत्रमाग बहुल भागांतील संघटनांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणेयंत्रमाग धारकांच्या विविध संघटना,फेडरेशन यांच्याशी चर्चा करणेयंत्रमाग बहुल भागातील समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाय योजना  शासनास सादर करणेवस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेंतर्गत यंत्रमागधारकांना ऑनलाइन नोंदणीसाठी येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे, यंत्रमाग घटकांसाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे आणि राज्य शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे याबाबींचा समावेश आहे.

००००

नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार

 नायगाव येथे दहा एकर जागेत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सातारा दि. 3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात 100 कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

            थोर समाजसुधारकक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 वा जयंती सोहळा राज्य शासन व सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने नायगाव (ता. खंडाळा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळउत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माणइतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेराज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरआमदार महादेव जानकरअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री मकरंद पाटीलजयकुमार गोरेमहेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्री शिक्षणाची क्रांती केली. समाजाला जगण्याची दिशा दिली. अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते. माझ्यासाठी ते ऊर्जादायी आहेत. सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्वत्यागयोगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील.

            क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाचे चैतन्य आहेतअसे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टातूनच महिलांच्या जीवनात शिक्षणाची पहाट निर्माण झाली. त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्र घडला. आज महिला मुख्य प्रवाहात आल्या आहेत. स्त्री शिक्षणातून महिला अबला नव्हे, तर सबला आहेत ही जाणीव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. हा इतिहास जतन करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साताऱ्यात त्यांचे स्मारक सुस्थितीत आणण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे.

            नौदलातील युद्धनौकेचे नेतृत्व मराठी महिला करत आहे. त्यांचा आपल्याला अभिमान असून या सर्वांचे मूळ प्रेरणा स्त्रोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम आहे. सावित्रीबाई नसत्या, तर देशसमाज पन्नास वर्षे मागे गेला असता. शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश देण्याचे काम त्यांनी केले आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहायचे प्रसंगी अन्याय करणारे आपल्या जवळचे असले तरी त्यांच्या विरोधात बंड करायचे ही शिकवण त्यांनी दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

फुले दांपत्य हा आपला अभिमान

            फुले दांपत्य हा आपला अभिमान आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीत्यांच्या कार्याचे स्मरण पुढच्या पिढ्यांना रहावे यासाठी त्यांचे भिडे वाड्यात मोठे स्मारक उभे करण्यात येत आहे. शासनाने अनेक योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या आहेत. यामध्ये लेक लाडकीजिल्हा वार्षिक योजनेतून मुख्यमंत्री महिला सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांना एसटी प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत दिली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंगविक्री यासाठीही योजना करत आहोत. इतर मागासवर्गीय घटकातील मुलींसाठी ७२ शासकीय वसतिगृह जानेवारी अखेरपर्यंत सुरू होत आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, समाज व्यवस्थेतील अंधश्रद्धा अनिष्ट प्रथा यांच्यावर प्रहार करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या.            स्त्री शिक्षणासाठी सुरुवात करताना सावित्रीबाईंनी हाल अपेष्टा सहन केल्या म्हणूनच आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विचारांचा प्रसार साहित्याच्या माध्यमातून केल्याने हे  शक्य झाले.  प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. समाजसेवेसाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून राज्याप्रमाणे संपूर्ण देशात साजरा व्हावा यासाठी प्रधानमंत्री यांना विनंती करण्यात यावी असे आवाहनही मंत्री श्री. भुजबळ यांनी केले. मुलींना एनडीएमधील प्रशिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रबोधिनीला 24 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रबोधिनीसाठी लवकरात लवकर जागाही उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मंत्री श्री. भुजबळ यांनी केली. नायगाव येथील त्यांच्या स्मारकासाठी प्रा. हरी नरके यांनी दिलेल्या योगदानाची आठवण केली.

            मंत्री श्री. सावे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे असे सांगून महिलांना स्वयं सिद्ध करण्यासाठी विविध योजनांच्या माहिती देणाऱ्या प्रणालीचे उद्घाटन यावेळी करण्यात येत असल्याचे सांगितले. महाज्योतीच्या माध्यमातून एनडीए व पोलीस प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नायगावला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

            पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, नायगाव या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी शासनाने मूलभूत सोयी सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. या ठिकाणी पर्यटकविद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यावेत. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईं फुले यांची प्रेरणा घेऊन समाजात मूलभूत परिवर्तनासाठी कार्य करावे. यासाठी जागतिक दर्जाचे अभ्यास केंद्र या ठिकाणी निश्चितपणे उभे करण्यात येईल.

            महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, स्त्रियांचा संघर्ष हा जन्मापासून नव्हे, तर गर्भापासूनच सुरू आहे. विधवा प्रथा आणि बाल विवाह प्रतिबंधाचे ठराव ग्रामपंचायतस्तरावर मंजूर होत आहेत,  त्यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.  

            यावेळी आमदार श्री. गोरे यांनी नायगाव नगरीत शासनाने दहा एकर जमीन खरेदी करावी व त्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे करावे अशी मागणी केली.

            या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. ‘महाज्योती’मार्फत उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्याहस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारीपोलिस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवलेसरपंच साधना नेवसेयांच्यासह अधिकारीबचत गटातील महिलाशालेय महाविद्यालयीन युवती व नागरिक यांची उपस्थिती होती.

००००


दगडांच्या देशा... मेघालया ! (मेघालय डायरी) राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्राचे वर्णन करणाऱ्या या ओळी. पण *‘दगडांचा देश’* ही ओळख एकट्या महाराष्ट्राला लागू पडत नाही, तर ईशान्य भारतातील मेघालय या राज्याचेसुद्धा असेच वर्णन करण्याचा मोह होतो. कारण माहितीए?... ही गावांची नावे पाहा- Mawphlang (मॉफलाँग)... ‘सॅक्रेड फॉरेस्ट’ साठी प्रसिद्ध असलेलं गाव. Mawsynram (मॉसिनराम)... सर्वाधिक पावसाबाबत चेरापुंजीशी स्पर्धा करणारे गाव. Mawlynnong (मॉलिनाँग)... आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ ठरलेले गाव. या सर्व गावांच्या नावांमधे एक साम्य आढळते. ते म्हणजे, या सर्व गावांची नावे ‘Maw / मॉ’ यापासून अक्षरापासून सुरू होतात. फक्त इतकीच गावे नव्हेत, तर Mawkriah, Mawlai, Mawtnun, Mawshynrut, Mawthadraishan, Mawphanlur, Mawnan… अशी अनेक गावे मेघालयात आहेत. तिथे फिरताना अशी कितीतरी गावे लागतात. त्यातील ‘Maw / मॉ’ या शब्दाचा अर्थ माहितीए?... त्याचा अर्थ- दगड किंवा खडक. Mawphlang म्हणजे खडक व गवत किंवा गवतावरचा खडक. Mawlynnong म्हणजे खडकाचे गाव. काही जण सांगतात- खडकाची गुहा. Mawkriah म्हणजे खडकाची बास्केट. Mawlai म्हणजे खडक आणि तीन. याचे अनेक अर्थ काढतत. हे गाव शिलाँग या मुख्य गावापासून तीन मैल अंतरावर आहे. या गावात तीन गौरवार्थ दगड (स्मारके) आहेत. काही जण याचा अर्थ हद्दीचा दगड असाही सांगतात... असे हे गावाच्या नावांचे दगड पुराण! याशिवाय मेघालयात मोठ्या संख्येने शिळास्मारके पाहायला मिळतात. लोकांच्या स्मरणार्थ / गौरवार्थ शिळा उभारण्याची प्रथा आहे. ‘यू- मावथो – दूर - ब्रीव’ या ठिकाणी तर एकाच परिसरात शेकडो शिळा उभारल्या आहेत. याशिवाय अनेक गावांमधे दगड उभारून केलेली स्मारके आहेतच. आता सांगा, अशा राज्याला ‘दगडांचा देशा’ नाही म्हणायचे तर आणखी काय...? ... नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी, चलो मेघालय, Exclusive @gmail.com - अभिजित घोरपडे


 दगडांच्या देशा... मेघालया !

(मेघालय डायरी)

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्राचे वर्णन करणाऱ्या या ओळी. पण *‘दगडांचा देश’* ही ओळख एकट्या महाराष्ट्राला लागू पडत नाही, तर ईशान्य भारतातील मेघालय या राज्याचेसुद्धा असेच वर्णन करण्याचा मोह होतो. कारण माहितीए?...

ही गावांची नावे पाहा-

Mawphlang (मॉफलाँग)... ‘सॅक्रेड फॉरेस्ट’ साठी प्रसिद्ध असलेलं गाव.
Mawsynram (मॉसिनराम)... सर्वाधिक पावसाबाबत चेरापुंजीशी स्पर्धा करणारे गाव.
Mawlynnong (मॉलिनाँग)... आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ ठरलेले गाव.

या सर्व गावांच्या नावांमधे एक साम्य आढळते. ते म्हणजे, या सर्व गावांची नावे ‘Maw / मॉ’ यापासून अक्षरापासून सुरू होतात. फक्त इतकीच गावे नव्हेत, तर Mawkriah, Mawlai, Mawtnun, Mawshynrut, Mawthadraishan, Mawphanlur, Mawnan… अशी अनेक गावे मेघालयात आहेत. तिथे फिरताना अशी कितीतरी गावे लागतात. त्यातील ‘Maw / मॉ’ या शब्दाचा अर्थ माहितीए?... त्याचा अर्थ- दगड किंवा खडक.

Mawphlang  म्हणजे खडक व गवत किंवा गवतावरचा खडक.
Mawlynnong  म्हणजे खडकाचे गाव. काही जण सांगतात- खडकाची गुहा.
Mawkriah  म्हणजे खडकाची बास्केट.
Mawlai  म्हणजे खडक आणि तीन. याचे अनेक अर्थ काढतत. हे गाव शिलाँग या मुख्य गावापासून तीन मैल अंतरावर आहे. या गावात तीन गौरवार्थ दगड (स्मारके) आहेत. काही जण याचा अर्थ हद्दीचा दगड असाही सांगतात... असे हे गावाच्या नावांचे दगड पुराण!

याशिवाय मेघालयात मोठ्या संख्येने शिळास्मारके पाहायला मिळतात. लोकांच्या स्मरणार्थ / गौरवार्थ शिळा उभारण्याची प्रथा आहे. ‘यू- मावथो – दूर - ब्रीव’ या ठिकाणी तर एकाच परिसरात शेकडो शिळा उभारल्या आहेत. याशिवाय अनेक गावांमधे दगड उभारून केलेली स्मारके आहेतच.

आता सांगा, अशा राज्याला ‘दगडांचा देशा’ नाही म्हणायचे तर आणखी काय...?
...

नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी,
चलो मेघालय,
Exclusive Meghalaya - Kaziranga
(26 Feb - 4 March 2024)

9545350862

- अभिजित घोरपडे

विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश

 विश्व मराठी संमेलनामध्ये दर्जेदार

मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश

- मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 3 : येत्या 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे नवी मुंबईतील वाशी आयोजन होणार असून या संमेलनात मराठमोळ्या दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेलअशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

            मंत्री श्री.केसरकर यांनी आज विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाचा आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधवराज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मराठी विकास संस्थेला देण्यात आली आहे.

            जानेवारी 2023 मधील विश्व मराठी संमेलनाला मराठी भाषकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यावर्षी देखील विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. याबाबत प्राप्त अभिप्रायांचा विचार करून आणि विश्व संमेलनाचा हेतू विचारात घेता मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ ही या विश्व संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

            संमेलनाच्या आयोजनाचा आढावा घेताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीविश्व मराठी संमेलनासाठी जगभरातून मराठी भाषक प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यासमोर मराठी भाषेतील दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण व्हावे. ग्रंथ दिंडीढोल ताशाविद्यार्थ्यांचे लेझीम पथकांच्या सादरीकरणाद्वारे मराठमोळ्या वातावरणात सर्वांचे स्वागत व्हावे. महाराष्ट्राचीमराठी भाषेची महती सांगणारीमराठी माणसांना जोडून ठेवणारी गीतेबोलीभाषेतून कला सादर करणाऱ्या कलाकारांचे कार्यक्रमकविता वाचनअभिवाचनमहाराष्ट्राचा इतिहाससंत साहित्याचा इतिहास अशा विविध कार्यक्रमांद्वारे उद्घाटनाचा सोहळा आयोजित व्हावा.

            संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये मराठमोळा वस्त्र सोहळाखाद्य संस्कृतीव्यवहारात मराठीचा वापरमराठी उद्योजकांचा परिसंवादतरुणाईमध्ये मराठी भाषेचा प्रसार होण्यासाठी उपाययोजनाप्रसारमाध्यमांच्या मराठी संपादक/ वाहिनी प्रमुखांशी संवादपुस्तक निर्मितीचा प्रवास जाणून घेण्यासाठी लेखक ते प्रकाशक यांच्याशी संवादभावगीतेशास्त्रीय संगीत आदींवर आधारित कार्यक्रमांचा समावेश करावाअशी सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी केली.

            मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये योगदान दिलेल्या राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा. राज्याबरोबरच इतर राज्य आणि परदेशातून मराठी भाषक येणार आहेत. त्यांनाही सहभागी करून घेण्याची सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी केली.

0000

Featured post

Lakshvedhi